Friday, 27 September 2013

Malcolm Patil hails from St. Andrew’s parish, Uttan-Chowk, Bhayander.  He belongs to the St. Bonaventure Capuchin Province of Maharashtra. Presently, he is pursuing his Theological studies in Jnana Deepa Vidyapeeth, Pune.   





असिसीकर संत फ्रान्सिसचा सण.
दिनांक:०४/१०/२०१३.                                                   
बेनसिरा, ५०:,-,-.
गलंतीकरास, :१४-१८.
मत्तय, ११:२५-३०.

प्रस्तावना: (संत परिचय)
आज आपण असिसीकर संत फ्रान्सिस या महान संताचा सण साजरा करीत आहोत. संत फ्रान्सिसचा जन्म ११८२ साली इटली येथील असीसी गावात एका कपड्यांच्या व्यापा-याच्या घरी झाला. त्याच्या जीवनातली पहिली वीस (२०) वर्षे ख्याली-खुशाली, चैनबाजी आणि ऐषारामामध्ये गेली. शेजारी असलेल्या पेरूजिया देशाबरोबर झालेल्या युद्धात फ्रान्सिंस युद्धकैदी म्हणून पकडला गेला. त्याला तुरूंगात डांबण्यात आले. तुरूंगातून परतल्यानंतर तो बरेच महिने तापाने फणफणत होता. आपण ज्या प्रकारचे जीवन जगत आहोत ते किती अर्थहीन आहे ह्याची जाणीव त्याला ह्या आजारपणात झाली. आता पर्यत जे जीवन त्यांने वाया घालविले होते त्याच्या बदली आता तो अधिक पवित्र जीवन जगू लागला. गरिंबाची विशेषत: महारोंग्याची सेवा करणे, एकांतात प्रार्थना करणे, चिंतन-मनन आणि प्रायश्चित करणे अशा गोष्टी तो करू लागला. तो म्हणत असे, ''गोरगरिबांची सेवा हीच ख्रिस्ताची सेवा होय.
एके दिवशी संत डेमियन चर्चमध्ये प्रार्थना करताना क्रुसावरील येशूने त्याला आज्ञा केली, ''खचत चाललेल माझं घर दुरूस्त कर''. ख्रिस्ताचे हे शब्द, शब्दश: घेऊन फ्रान्सिस्को चर्चची दुरूस्ती करण्यासाठी आवश्यक असलेले दगड जमा करू लागला. त्याने आपल्या घरांदावर, धन-संपत्तीवर आनंदाने पाणी सोडले आणि तो सैन्यासी होऊन गरिबातले गरीब जीवन जगू लागला. ख्रिस्ताचा शिष्य म्हणून देवराज्याची घोषणा करू लागला. भावाभावांमध्ये प्रेमाचे नाते जोडले जावे, शेजा-या - पाजा-यामध्ये शांतीचे वातावरण नांदावे म्हणून तो लोकांना उपदेश करीत फिरू लागला. हे सर्व तो इतक्या तळमळीने आणि साधेपणाने करीत असे की प्रारंभी जे लोक त्याचा तिरस्कार करीत होते ते आता आश्चर्याने थक्क झाले.
हळूहळू त्याच्याभोवती समविचारी लोक जमा होऊ लागले. शहरातील महत्वाची पदे जबाबदा-या सांभाळणारे लोक त्याचे अनुयायी बनले. त्यांनी आपले होते नव्हते ते विकून टाकले आणि त्यांची मालमत्ता गोरगरिंबाना वाटून टाकली. ज्यांना धर्मगुरू होता कार्य करायचे होते त्यांच्यासाठी त्यांने तृतीय श्रेणीतील धर्मबंधूच्या संस्थेचा पाया रचला गेला.
संत फ्रान्सिसचे पावित्र्य इतके पराकोटीला पोहोचलेले होते की .. १२२६ साली लावेरना ह्या ठिकाणी प्रार्थना करीत असताना त्याच्या शरीरावर येशूचे पवित्र घाव दिसू लागले. त्यावेळी त्याचे वय ४४ वर्षे होते. शेवटी आँक्टोंबर १२२६ साली फ्रान्सिस मरण पावला. त्याच्या मृत्युनंतर अवघ्या दोन वर्षात त्याला संत पद देण्यात आले. जगातील सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय संत म्हणून त्याची ख्याती आहे.
संत फ्रान्सिसचे निसर्गावर नितांत प्रेम होते. त्याचे सुर्यस्तोत्र खूप प्रसिद्ध आहे. .. १२१२ साली त्यांनी येशू जन्माची महती वर्णन करणारा गाईचा गोठा तयार केला. त्यामध्ये सर्व जिंवत पात्रे त्यांने सादर केली. तेव्हापासून गाईचे गोठे बनवण्याची प्रथा सुरू झाली. ‘हे प्रभो मला तुझ्या शांतीचा दुत बनव’ ही त्याची प्रार्थना जगप्रसिद्ध आहे.

वाचनाचा सारांश:
पहिले वाचन
पहिले वाचन बेनसिरा या पुस्तकातून घेतलेले आहे. महापुरोहित सियोन ह्यांने मंदिर दुरूस्त करून शहराची मजबूती केली लोकांना नाशापासून रक्षण करण्याची दक्षता घेतली.
दुसरे वाचन
दुसरे वाचन गलतीकरांस पत्र या अखेरच्या परिच्छेदात संत पौलाने आपल्या शरीरावर येशूच्या खूणा धारूण करून गलंतीकराच्या भावनाना आवाहन केल्याचे स्पष्ट होते. ख्रिस्ताशी एकनिष्ठ राहिल्याने त्याला सोसावा लागलेला छळ, झालेल्या जखमा हेच त्याच्या आस्थेचे शुद्धतेचे प्रमाण आहे असे तो म्हणतो. देवाच्या आज्ञा पाळणे हेच महत्वाचे तत्व असल्याचे सांगितले आहे या तत्वानुसार चालणा-याना शाती दया मिळेल जे ख्रिस्तावर विश्वास ठेवतात त्यांची नियमाशास्त्रापासून सुटका झाली आहे आणि तेच आब्राहामाचे खरे वंशज आहेत हेच त्याच्या संदेशाचे र्मम आहे. गंलतीकर खरोखर देवाचे लोक आहेत आणि ते सत्याला यर्थाथपणे प्रतिसाद देतील हा पौलाचा भरवसा येथे स्पष्ट होतो.
शुभवर्तमान (मत्तय,११:२५-३०):
. येशूच्या कार्याचा स्विकार:
येशूचा स्विकार प्रतिष्ठीतांनी म्हणजेच शास्त्री परूशी यांनी नव्हे तर लहान बालके, दीन दुबळे, दु:खी कष्टी त्याचे शिष्य यांनी प्रतिसाद दिला म्हणजेच त्याचा स्विकार केला. प्रभू येशू ख्रिस्त देवामधले नाते हे पिता पुत्राचे होते म्हणूनच प्रभू येशू अनेकवेळा आपल्या पित्याला आब्बा या नावानी हाक मारताना आढळतो. (मार्क,१३:३२; योहान,:३५; लुक१०:२२) या संदर्भावरून कळून येते कि पिता पुत्राचे नाते हे खास होते (मत्तय,२८:१८; योहान,१०:१५; योहान,१३:). आजच्या शुभावार्तामानातली पहिली ओवी (२५) सांगते कित्यावेळी येशू असे बोलू लागला’. या वाक्यावरून कळून येते की अनेक नगरातील लोकांनी पश्चाताप केला नव्हता त्यानी येशूला धिक्कारले होते. अशावेळी येशू बोलू लागला, तो निराश होऊन बोलत नव्हता तर तो स्वर्गीय पित्याची स्तुती करू लागला कारण देवपिता जो करीत होता ते योग्य आहे म्हणूनच प्रभू येशूने स्तुती केली. एखाद्याचे शिक्षण किंवा बुद्धिमत्ता यावरून त्याला देवाच्या गोष्टी कळतात असे नाही तर जो देवाच्या इच्छेप्रमाणे वागतो म्हणजेच बालकाप्रमाणे होतो त्यांना देव स्वत: स्वर्गीय गोष्टी कळवत असतो आणि त्याच्या मनाला त्या समजत असतात.
. पाचारण:
पाचारण करणे म्हणजेच बोलावणे किंवा निवड करणे असे होय. प्रतिसाद देणे किंवा देणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. तो म्हणतो, ''पहा मी दारावर उभा आहे दार ठोकीत आहे, जो माझी वाणी ऐकून दार उघडील त्याच्याबरोबर मी आत जाईन त्याच्याबरोबर मी जेवण करेन तो मजबरोबर जेवण करील. ख्रिस्ताने जे श्रमाने कष्टाने थकून गेलेले आहेत तसेच जे भाराखाली दडपलेले आहेत त्यांना स्वत:कडे येण्याचे आमंत्रण दिले.
. आज्ञाधारकपणा:
ओझे हे आज्ञाधारकपणा जबाबदारी घेणे याचे चिन्ह होते. नियमशास्त्रात जू ओझे घेतले पाहिजे असे रब्बी वांरवार सांगत. त्यांच्या नियमामुळे हे ओझे अधिक अवघड व अवजड झाले होते. तुलनेने येशूचे ओझे हलके आहे आणि जो मनाचा सौम्य लीन आहे त्याला प्रभूचा शिष्य होण्यासाठी अवघड जात नाही. प्रभू येशूने स्वत:विषयी दोन महत्वाची विधाने केली; माझ्या पित्याने माझ्या हाती सर्व काही दिले आहे. पित्यावाचून पूत्राला कोणी ओळखत नाही यावरून तो किती महान आज्ञाधारक आहे हे कळून येते.
. विश्वास:
ज्यांनी ख्रिस्ताचा स्विकार केला त्यांनी ख्रिस्ताला समाधान दिले व त्यांच्यावर विश्वास ठेवला. त्यामुळेच त्यांनी देवपित्याचे स्तवन केले. त्यावेळच्या धर्मपुढार्यांनी ख्रिस्ताला ओळखले नाही, त्याच्यावर विश्वास ठेवला नाही, त्याचा स्विकार केला नाही म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो हे पित्या स्वर्गाच्या पृथ्वीच्या प्रभो मी तुझे स्तवन करीतो कारण ज्ञानी विचारवंत ह्यापासून तू गुप्त ठेवून, तू बालकास प्रकट केला.

बोध कथा:
. श्री वेलेरीयन हे एक दु:खी कष्टी निराश गृहस्थ होते. त्याच्या जीवनातील सर्वच प्रसंगी म्हणजेच शिक्षणापासून नोकरीपर्यत, लग्न जमविण्यापासून ते संसार करेपर्यत, ते सर्वच पातळीवर अपयशी ठरले. त्याच्या मनात आत्महतेचे विचार येऊ लागले. या जगण्यात काहीच अर्थ नाही असे त्याला वाटू लागले. त्याला मानसिक आजाराने अस्वस्थ केले. शेवटी त्याच्या एका जवळच्या मित्राने त्याला ताबोर येथे तपासाठी जाण्यास आग्रहाने विंनती केली. त्याने नाईलाजाने होकार दिला तिथे तो प्रार्थना करीत असताना त्याने नम्र हृदयाने देवाकडे मध्यस्थी केली. आपले दु:, कष्ट, यातना प्रभूला सांगितले ही प्रार्थना संपण्याअगोदरच त्याला देवाचा स्पर्श झाला. त्याच्या जीवनातील निराशेची जागा आशेने घेतली, त्याच्या अंधारमय जीवनात प्रकाशाची ज्योत पेटू लागली प्रभू येशू ख्रिस्त हाच तारणकर्ता आहे ह्याची त्याला विश्वासाने जाणीव झाली. म्हणूनच म्हटले जाते कि प्रार्थना ही ईश्वराला घातलेली हाक आहे आणि जो श्रद्धेने मागतो त्याला मिळत असते.
. एकदा मदर तेरेजाना विचारण्यात आलेतुम्हाला गोरगरिंबात दीन दु:खीतामध्ये ईश्वराचे दर्शन घडते आम्हाला का घडत नाही?” मदरने उत्तर दिले, ''तुम्ही पाहता परंतु तुम्हाला दिसत नाही.'' दृष्टी दोन प्रकारची असते. देहस्वरूपी आणि आत्मस्वरूपी. देहस्वरूपी माणसाला भिकारी दिसतो तर आत्म्याने पाहणा-याला त्या भिका-यात परमेश्वर दिसतो.

मनन चिंतन:
आजच्या जगात अनेक माणसे गांजलेल्या पागंलेल्या अवस्थेत आहेत. काही कुटूंबात दु:खाचा डोंगर आहे तर काहीच्या जीवनात आजारपणाचा वनवास आहे. व्यसनाधिन पतीमुळे अनेक कुटूंबे उध्वस्त झाली आहेत. तसेच बेकारीच्या विळख्यात सापडल्यामुळे अनेकांना नैराश्येने ग्रासलेले आहे, काहीच्या जीवनात अपयशाची साडेसाती सुरू आहे तर काहीच्या जीवनात बेअब्रूचा कलंक लागलेला आहे. अश्या सर्व दु:खी कष्टी, भाराक्रांत लोकांना खुद् जगाचा तारणारा, मुक्ती अनुभव घेण्यासाठी बोलावत आहे. तो म्हणत आहे, ''अहो दु:खी कष्टी आणि भाराक्रांत जण हो तुम्ही मजकडे या म्हणजे मी तुम्हास विसावा देईन.''
धन्यवादीत फ्रेडरिक ओझानम म्हणतात की जर तुम्हाला गोरगरीब, दु:खीकष्टी यांच्या छिन्नविछिन्न देहातील आणि मनातील जखमी ख्रिस्त दिसला नाहीतर पवित्र मिस्सामधील भाकरीमध्ये मोडल्या जाणा-या ख्रिस्ताला तुम्ही कधीच ओळखणार नाहीत. संत बर्नड म्हणतो की वेदी सजविण्या वस्त्रहिनाला वस्त्र दया व तसे केल्यास तुमचे वेदी सजविणे व्यर्थ आहे. प्रभू येशू ख्रिस्त स्वत: देवपुत्र असून आम्हांसाठी क्रुसावर मरण पावला. यातना, कष्ट, दु: सर्व काही सहन केले परंतु त्यांने कुठल्याच प्रकारची तक्रार केली नाही. एकाने त्याला फसवले, दुस-याने त्याला नाकारले तरीसुद्धा त्यांने एकही शब्द उच्चारला नाही उलट त्यांने क्षमेचा महामंत्र आम्हांसाठी दिला. ज्याने आंधळ्याना दु:ष्टी दिली, अंपगाना बळ दिले, रोग्यांना बरे केले, मेलेल्यांना उठवले तोच व्याकुळ झालेला ख्रिस्त आम्हासर्वाना प्रेमाचे आव्हान करत आहे. तो म्हणत आहे, ''तुम्ही शंकीत असाल तर माझ्याकडे या, तुम्ही अंधारात असाल तर मजकडे या मी जगाचा प्रकाश आहे, तुम्ही आजारी असाल तर पुनरूस्थान जीवन मीच आहे, तुम्ही उपाशी असाल तर घ्या आणि खा हे माझे शरीर आहे, तुम्ही तांन्हेले असाल तर घ्या आणि प्या हे माझे रक्त आहे, तुम्ही थकलेले असाल तर मजकडे या मी तुम्हाला विसावा देईन  आणि तुम्हाला मार्ग सापडत नसेल तर माझ्याकडे या कारण मार्ग, सत्य जीवन मीच आहे.
संत फ्रान्सिस असिसीकर ह्याने सुद्धा दीन-दु:खीताची सेवा केली. कुष्ठरोग्यामध्ये प्रेमासाठी व्याकुळ झालेला ख्रिस्त त्यांने पाहिला म्हणूनच त्यांने स्वर्गीय पित्याची सेवा करण्याचा मार्ग पत्कारला. मदर तेरेजानी स्वत: रस्त्यावर जाऊन कच-याच्या पेटा-यात जखमी पडलेल्या अनांथाना उचलून त्यांच्या घावाना मलम लावून त्याची सेवा केली, मलिन झालेला ख्रिस्ताचा चेहरा तिने पुसून टाकला. म्हणूनच म्हटले जाते की स्वत:साठी जगलास तर मेलास आणि ख्रिस्तासाठी जगलास तरच खरा जगलास. कोकीळा पक्षी जसा आपली पिल्ले गेल्यामुळे चंपकाच्या झाडावर बसून दु:खाने व्याकुळ होऊन रडतो. फांदयावर बसून रडगाणे गातो त्याचप्रमाणे आज सुद्धा प्रभू येशू ख्रिस्त प्रेमासाठी व्याकुळ झालेला आहे. तो पुन्हा-पुन्हा म्हणत आहे, ''अहो कष्टी आणि भाराक्रांत जनहो तुम्ही मजकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन.'' त्याच्या पाचारणाला होकार देण्यासाठी आम्ही तयार आहोत का? त्याच्या सानिध्यात बसण्यासाठी आपणाकडे वेळ आहे का? जीवनात कितीही संकट आली, दु:खाचे प्रसंग आले तरी प्रभू ख्रिस्तावर सदैव प्रेम करायला हवं कारण प्रेम दिल्यानेच प्रेम वाढत असते म्हणूनच म्हटले जाते की एकाने प्रेम दुस-यावर करणे सर्वत्र प्रेमाचे, शांतीचे वातावरण पसरवने ह्यालाच खरं प्रेम म्हणतात.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना.
आपले उत्तर: हे प्रभो आमची प्रार्थना ऐक.
. ख्रिस्तसभा हा संवेदनाक्षम असा विश्वासू जनांचा समुदाय आहे त्यामुळे आपल्या शिकवणीतून प्रार्थनेतून आणि प्रत्यक्ष कार्याद्वारे ख्रिस्तसभेने ह्या जगात प्रभू ख्रिस्ताची सुवार्ता पसरावी म्हणून आपण प्रार्थना करूया
. प्रभूच्या सुवार्तेचे प्रेषित प्रसारक म्हणून आपण संर्वानी न्याय, शांती, ऐक्य परस्पर स्नेहभाव ही स्वर्गराज्याची मूल्ये जोपासावीत आणि आपल्या संपर्कात येणा-याना ईश्वरी प्रेमाचा अनुभव दयावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
. विविध जातीधर्माचे लोक आपल्या देशात गुण्यागोविंदाने नांदत रहावे त्यांच्यातील ऐक्य दिवसेंदिवस भक्कम होत रहावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
. जे लोक शारिरीक तसेच मानसिक आजाराने  पछाडलेले आहेत. ज्यांची शस्रक्रिया होणार आहेत अश्या सर्व लोकांवर प्रभूचा स्पर्श व्हावा त्यांना नविन आरोग्यदान मिळावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
. आपल्या ज्या इच्छा आंकाक्षा आहेत त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या इच्छेप्रमाणे पुर्ण व्हाव्यात म्हणून आपण विशेष प्रार्थना करूया.