Thursday 30 August 2018


Reflections for the homily of 22nd Sunday in Ordinary time (02-09-2018) by: Br Isidore Patil.





सामन्य काळातील २२ वा रविवार

दिनांक – ०२-०९-२०१८
पहिले वाचन - अनुवाद ४:१-२,६-८
दुसरे वाचन : याकोब १:१७-२७
शुभवर्तमान - मार्क ७:१-८,१४-१५, २१-२३




'पाळी जो आज्ञाशी सर्व मिळे त्याशी'

प्रस्तावना
   आज देऊळमाता आपल्याला परमेश्वराच्या सानिध्यात राहून आनंद करण्यास बोलावत आहे. परमेश्वराचे नियम हे प्रेमाने पूर्ण होत असतात. व ते आपल्याला पवित्र करतात. आजची वाचने आपल्याला परमेश्वराचे नियम पाळून त्याच्या आज्ञेत राहण्यास आमंत्रण करत आहे.
     आजच्या पहील्या वाचनात मोशे इस्त्रायल लोकांना देवाने ज्या आज्ञा दिल्या आहेत त्या काटेकोरपणे पाळावयास सांगतो. दुसऱ्या वाचनात याकोब सर्व ख्रिस्ती बांधवांना सांगतो की, आपण नेहमी परमेश्वराचे शब्द पाळणारे असले पाहिजे. शुभवर्तमानात प्रभू येशू आपल्याला सांगतो की, आपल्या अंतःकरणातून जे निघते तेच आपल्याला भ्रष्ट करत असते. कारण आतून म्हणजे अंत:करणातून वाईट विचार बाहेर पडतात. आपण आपले विचार व आचरण शुद्ध ठेवले पाहिजे व परमेश्वराच्या आज्ञेत राहून त्याचे नियम पाळले पाहिजेत.
     परमेश्वराचे नियम आपल्याला पाळता यावेत व शुद्ध अंतःकरणाने जीवन जगता यावे म्हणून आपण आजच्या ह्या मिस्सा-बलिदानात प्रार्थना करूया. 

सम्यक विवरण
पहिले वाचन - अनुवाद ४:१-२,६-८

     या पहिल्या वाचनात मोशे इस्त्रायेलच्या लोकांना परमेश्वराची शिकवण देत परमेश्वराच्या नियमाबद्दल सांगत आहे. मोशे सांगतो कि, परमेश्वाराचे नियम हे खूप महान  आहेत. हे नियम तुम्ही नेहमी पाळायल हवेत. मोशे त्यांना सांगतो जर तुम्ही या आज्ञा पाळल्या नाहीत तर तुमचा  मृत्यू होईल व त्याचे योग्य पालन केल्यास जो देश परमेश्वर देणार आहे तो तुम्हांस मिळेल. परमेश्वर लोकांना ह्या  नियमाचे  तंतोतंत पाळण करण्यास सांगतो व त्यामध्ये काही जोडण्यास व काही कमी करण्यस बंद करतो. हे नियम काटेकोरपणे पाळल्यास दुसरे सर्वजण म्हणतील कि हे राष्ट्र खूप महान, बुद्धीमान व समजूतदार आहे
दुसरे वाचन : याकोब १:१७-२७
     आजच्या वाचनात याकोब देवाच्या वचनाप्रमाणे आचारण करण्यास विनंती करतो कारण यामुळेच आपली आत्मिक वाढ होते. ज्याला ऐकण्याची सहनशीलता असते तो कमी बोलतो व रागवत नाही. मनुष्याचा राग देवाचा कार्यात अडथळा निर्माण करतो. तसेच याकोब सांगतो की, आपल्या पापी स्वभावामुळे सर्व प्रकारचे मलीन व दुष्ट विचार उचंबळून येतात. आपण त्याचा त्याग करावा व देवाचे वचन व नियम नम्रतेने स्विकार करावे.
     याकोब म्हणतो की, आरशात आपल्या मुखावरील मलिनता पाहिल्यावर जो त्याकडे दुर्लक्ष करतो तो स्वतःलाच फसवतो. आपण देवाच्या वचनाप्रमाणे कृतीही करावी. यामुळेच आपण सुखी राहणार. तसेच देवाच्या दृष्टीत शुद्ध व निर्मळ आचारण हे आपले ध्येय असावे.

शुभवर्तमान - मार्क ७:१-८,१४-१५, २१-२३

     आजच्या शुभवर्तमानात मार्क आपणास सांगत असताना म्हणतो, येशूची परीक्षा घेऊन त्याला दोषी ठरविण्याच्या उद्देशाने परुशी व शास्त्री त्यांच्याकडे येतात. कोणी बाजारात गेला, तर पर-राष्ट्रीय लोकांच्या स्पर्शाने किंवा त्याच्या वस्तूला स्पर्श करून यहुदी मनुष्य अशुद्ध होतो. या मुळे बाजारातून घरी परतल्यावर पाण्याने स्वतःला शुद्ध करावे अशी रीत आहे असे परुशि शिकवत असत.
     येशूचे शिष्य हे नियम पळत नाहीत. म्हणून ते अशुद्ध हाताने जेवतात असा आरोप परुशायानी त्यांच्यावर लावला. परंतु येशूने परुश्यानी ढोंगी म्हटले. त्यांची भक्ती फक्त बाहेरचा देखावा होता. कारण त्यांचे मन देवाकडे लावले नव्हते.
     माणसाच्या अंतकरणातून जे निघते तेच त्याला अशुद्ध करत असते. परुश्यांची कृती दिशा भूल करणारी होती. परुशी म्हणजे ‘लोका संगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण’, हेच प्रभू येशूने लोकांना समजावून सांगितले. वाईट वागणुकीने जीवनावर विपरीत परिणाम होतात, असे येशूने तेथे जमलेल्या लोक समुदायाला सांगितले.


मनन चिंतन

     आजची तिन्ही वाचने आम्हांला परमेश्वराचे नियम पाळून त्याच्या समीप येण्यास सांगत आहेत. होय, परमेश्वराचे नियम हे प्रितीच्या सु-संस्कारने  परिपूर्ण होतात. आणि हेच नियम प्रत्येकाच्या हृदयात वास करत असतात. त्याचे पालन करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. जर आम्ही ती वचने पाळली तर आम्हां प्रत्येका मध्ये अमुलाग्र बदल होण्यास वेळ लागणार नाही. म्हणून कवीवर्य म्हणतात, ‘वचने अमर वचने, सुमधुर मंगल वचने’. म्हणूनच आपण सर्व जन देवाची लेकरे आहोत, त्याच्या वचनाशी जागृत राहिले पाहिजे.
      आजचे पहिले वाचन इस्त्रायली लोकांना मोशे द्वारे परमेश्वराच्या आज्ञेची आठवण करून देत आहे. मोशेने लोकांना जीवनात यशस्वी होण्यासाठी  परमेश्वराच्या आज्ञा पाळण्यास सांगितले. परंतु  ह्या चेतावनी वर लोकांनी  दूरलक्ष केले. म्हणून याचेच कारणस्तव परुशी व याजकानी या नियमात भर घातली. आणि लोकांचे जीवन आणखी कठीण बनवले.
    आजच्या शुभवर्तमानात आपण पाहतो कि, येशूने परुश्याना व त्यांच्या ढोंगीपणाला चोख उत्तर दिले. कारण परुशी स्वतः नियम पाळत नव्हते. आपण परुश्याप्रमाणे ढोंगीपणाचे जीवन जगता कामा नये. तसेच येशू ख्रिस्त आपल्याला बाह्यरुपापेक्षा आपल्या अंतःकरणावर अधिक लक्ष देण्यास आवाहन करीत आहे. तसेच आपण इतरांच्या जीवनात मदत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
     आपल्या अंतःकरणात असलेला गर्व, तिरस्कार, द्वेष  वाईट विचार हे आपल्या व्यक्तिमत्वाची इतरांना जाणीव करून देतात. त्यामुळे आपण आपले जीवन परिवर्तीत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपला सर्वात मोठा शत्रू आपणच असतो, कारण त्याच्याकडे गर्वाचे शस्त्र असते. आपण परमेश्वराची आज्ञा पाळली की आपले हृदय परिवर्तीत होईल. परमेश्वराची आज्ञा आपल्याला दुसऱ्यामध्ये चांगले पाहण्यासाठी व त्यांना प्रेम करण्यासाठी प्रोस्ताहित करतात. तसेच पापवृत्ती बाजूला सारून सत्कृत्ये आचरणात आणण्यास मदत करतात.
     जेव्हा आपण पश्चाताप करून दुसऱ्यांना क्षमा करतो तेव्हाच आपण  चागलं व सहानुभूतीच खरेपणाच जीवन जगू शकतो व तेव्हा परमेश्वराच्या आज्ञा आपल्या मदतीला येत असतात. तसेच पौल आजच्या दुसऱ्या वाचनात सांगतो की, परमेश्वराचे शब्द हे परमेश्वराच्या आज्ञा आहेत. त्या आपण आचारणात आणून त्यानुसार जगले पाहिजे. प्रभूच्या वचनाचा स्विकार करा. त्या वचनाच्या सानिध्यात राहा कारण हि वचने आपल्या अंत करणात रुजवलेली आहेत. आजच्या स्तोत्र-संहितेत स्तोत्रककार सांगतो कि, “प्रामाणिक माणसे देवाच्या सानिध्यात  राहतील आणि देवाच्या सानिध्यात राहणे म्हणजे त्याच्या आज्ञा पाळून  अंतकरण शुद्ध ठेऊन चांगले जीवन जगणे होय.


विश्वासू लोकांच्या प्रार्थना
प्रतिसाद : प्रेमळ पित्या आमची प्रार्थना ऐकून घे.

१)      आपले पोप फ्रान्सीस, बिशप, कार्डीनल, फादर्स, सिस्टर्स, प्रापंचिक, डिकन्स यांच्यासाठी आपण प्रार्थना करूया. देऊळ मातेची शिकवण आणि परमेश्वराच्या आज्ञा त्यांनी पाळून इतरांना त्यांचा प्रचार करण्यास परमेश्वराने त्यांना शक्ती द्यावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

२)      आपण आपल्या देशातील सर्व नेते व सर्व सरकारी कर्मचारांसाठी प्रार्थना करूया. परमेश्वराने त्यांना सुबुद्धी द्यावी जेणे करून ते आपल्या देशात शांती व न्याय प्रस्थापित करून एकत्रितपणे देशाच्या कल्याणासाठी झटू शकतील, म्हणून आपण प्रार्थना करूया.

३)      आपल्या स्थानिक समाजासाठी व त्यांच्या गरजांसाठी प्रार्थना करूया. आम्ही सर्व परमेश्वराच्या प्रेमाची व दयेची साक्षीदार होऊन ते प्रेम व दया आम्ही आमच्या शेजाऱ्यावर दाखवावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

४)      आपण आपल्या धर्मग्रामासाठी प्रार्थना करूया. आपण सर्व ख्रिस्ती लोकांनी येशूच्या आज्ञेत नेहमी राहावे व प्रभू येशूच्या वचनाचे आचरण करावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

५)      आपण सर्व आजारी लोकांसाठी प्रार्थान करूया. परमेश्वराने त्यांच्या सर्व गरजा, इच्छा व आकांश पूर्ण कराव्यात म्हणून आपण प्रार्थना करूया.

६)      आता आपण थोडा वेळ शत राहून आपल्या सामाजिक व कौटुंबिक व वैयक्तिक गरजांसाठी प्रार्थना करूया.




Thursday 23 August 2018


Reflections for the homily of 21st Sunday
 in Ordinary time (26-08-2018) by: Br Amit D’Britto.





सामान्य काळातील २१ वा रविवार

दिनांक: २६-०८-२०१८
पहिले वाचन: यहोशवा २४:१-२, १५-१८.
दुसरे वाचन: इफिस ५: २१-३२.
शुभवर्तमान: योहान ६:६०-६९



प्रभुजी आम्ही कोणाकडे जाणार? सार्वकालिक जीवनाची वचने आपणाजवळ आहेत.

प्रस्तावना:

आज आपण सामान्यकाळातील एकविसावा रविवार साजरा करीत आहोत. आजची तिन्ही वाचने आपल्याला देवाचे महत्व पटवून देतात.
     पहिल्या वाचनात यहोशवा आपल्या लोकांना देवापासून दूर गेल्याची आठवण करून देतो व लोकांना त्याची जाणीव होते व ते परमेश्वराची सेवा करण्याचा निश्चय करतात. पौलाचे इफिसकरांस पत्र ह्यातून घेतलेल्या दुसऱ्या वाचनात संत पौल हा ख्रिस्ती कुटुंबाचा जीवनक्रम कसा असावा याविषयी आपणास माहिती देतो. योहानकृत शुभवर्तमानात आपण पेत्राने येशू हा ख्रिस्तअसल्याची दिलेली कबुली ह्याविषयी ऐकतो. तसेच पेत्राने पूर्ण विश्वासाने येशूला उत्तर दिले की, ‘प्रभूजी सार्वकालिक जीवनाची वचने आपणाकडे आहेत तर तुम्हाला सोडून आम्ही कुणाकडे जावे?’
     पेत्राला धैर्य व विश्वासाने तारले. तेच धैर्य व विश्वास पेत्राप्रमाणे आपल्यालाही प्राप्त व्हावा, तसेच खरा ख्रिस्ती जीवनक्रम कळून चांगले ख्रिस्ती जीवन जगण्यास प्रभूची प्रेरणा मिळावी म्हणून आपण ह्या मिस्साबलिदानात प्रार्थना करूया.

सम्यक-विवरण
पहिले वाचन: यहोशवा २४:१-२, १५-१८.

     यहोशवा हा मोशेच्या काळातला इस्रायलच्या अनेक नेत्यांपैकी एक महान धाडसी नेता होता. तो साधा, सरळ, धाडसी, निर्भय, पारदर्शक नेता म्हणून प्रसिद्ध होता. त्याची निर्भयता केवळ त्याच्या व्यक्तिमत्वामुळे नव्हे तर परमेश्वराचे अस्तित्व त्याच्या बरोबर होते म्हणून त्याला निर्भयता प्राप्त झाली व यश मिळत गेले. ज्यावेळेला लोकांनी परमेश्वराच्या इच्छेकडे दुर्लक्ष केले आणि ते वाईट मार्गाला लागले तेव्हा यहोशवाने परखड भूमिका घेऊन लोकांना मार्गावर आणले. ईश्वरइच्छेपुढे त्याने कोणतीही तडजोड केली नाही.
     यहोशवाने आपल्या लोकांना एकत्र करून त्यांना अखेरचा संदेश देण्याचे ठरविले. कोणत्याही कर्तबगार पुरुषाने तसेच केले असते. एखाद्या नेत्याने समाज एका विशिष्ट शिखरावर पोहचविल्यानंतर त्याच दिशेने व गतीने वाढ व्हावी ही त्याची अपेक्षा असते. यहोशवाने आपल्या सर्व श्रेष्ठींना, प्रचारकांना आणि प्रजेला बोलावून त्यांना परमेश्वराच्या चांगुलपणाची आठवण करून दिली.
     परमेश्वराने इस्रायलच्या दुधा-मधाच्या प्रदेशात कसे नेले हे दाखवून दिले. यहोशवाने आपल्या लोकांना हिंमत दिली. धर्मशास्त्र पाळावे व प्रभूच्या म्हणण्याप्रमाणे चालावे म्हणजे परमेश्वर त्यांना यशस्वी करील असा आदेश दिला.

दुसरे वाचन: इफिस ५: २१-३२.

     दुसऱ्या वाचनात संत पौल हा आपणास ख्रिस्ती जीवन कसे असावे, तसेच पती-पत्नींनी त्यांची जबाबदारी कुटुंबात कशी पार पाडावी ह्याचे महत्व पटवून देतो. आपल्याला माहित आहे की संत पौलाच्या जीवनात परिवर्तन झाले होते व तेच परिवर्तन तो सर्व ठिकाणी प्रगट करतो व अनेकांना ख्रिस्ता जवळ आणतो. इफिस पत्रात तो आपणास ख्रिस्ती जीवनक्रम कसा असावा ह्याविषयी मार्गदर्शन करतो. विशेष करून पती-पत्नीचे जीवन कसे असावे ह्याविषयी कानउघडणी करतो.

शुभवर्तमान: योहान ६:६०-६९

       प्रभू येशू जेव्हा आपल्या जीवनाची भाकरह्या विषयावरील प्रवचनाची शेवट करत असतात तेव्हा पुष्कळ शिष्यांना त्याची शिकवण कठीण वाटते. म्हणून ते येशूला सोडून जात असतात. परंतु शुभवर्तमानाच्या शेवटी असे लक्षात येते कि, पेत्र आणि इतर सर्व प्रेषित हे येशू बरोबर राहण्याचे व आपले जीवन व्यतीत करण्यास ठरवितात.
       ‘मांस-देह खाणेहे प्रभूचे शब्द, मनुष्याचा पुत्र स्वर्गात चढून जाईल, त्याला दुःख भोगून मरण सोसावे लागेल हे सर्वच समझण्यास अवघड होते. आणि हेच कदाचित शिष्याच्या अडथळ्याचे कारण ठरले असेल.
       तसेच लोकांमध्ये विश्वासाचा अभाव आहे हे येशूला ठाऊक होते. तसेच पित्याकडून सर्व गोष्टीचा पुढाकार घेतला जातो ह्या मुद्द्यावर प्रभू येशू पुन्हा एकदा भर देत आहे. शिमोन पेत्र हा त्या बारा जणाचा प्रवक्ता होता व त्याच्या बोलण्यातून येशुवरील त्याचा विश्वास अधिक गाढ असल्याचे दिसून येते.  

बोधकथा

एकदा एक ख्रिस्ती उपदेशक मध्य भारतातून जाणाऱ्या एका रेल्वे गाडीमध्ये मोफत बायबल वाटप करीत होता. तेव्हा एका व्यक्तीने  रागाच्या भरात मिळालेली बायबलची प्रत फाडली व ती खिडकीतून बाहेर  फेकून दिली.
       ह्या प्रसंगाचा शेवट येथेच झाला नाही तर हि घटनेमुळे एका व्यक्तीच्या जीवनाचा आरंभ होतो. त्या रेल्वे मार्गाला समांतर असलेल्या बाजूच्या रस्त्यावरून एक अतिशय उदास, निराश व हतबल झालेला श्रीमंत सुनील नावाचा तरुण जीवनाचा शेवट करण्याच्या इच्छेने तेथून जात होता. तेव्हा त्याला एक कागद मिळते ज्यावर लिहलेले असते, “मीच जीवनाची भाकर आहे, जो माझ्याकडे येतो त्याला  कधीही भूक लागणार नाही.तो तरुण इतराच्या मदतीने जाणून घेतो कि, हे बायबलमधील प्रभू येशूचे शब्द आहेत.
       मग सुनील एक बायबल विकत घेतो आणि वाचण्यास सुरुवात करतो. तेव्हा तो प्रभू येशूकडे व त्याच्या शिकवणीकडे इतका आकर्षित होतो कि, तो आपले जीवन संपुष्टात आणण्याचा विचार विसरून जातो व पुन्हा एकदा नव्याने जीवन जगण्यास सुरुवात करतो.
आकाश व पृथ्वी हि नष्ट होतील परंतु माझी वचने नष्ट होणार नाहीत.तसेच शुभवर्तमानात आपण पाहतो कि, काही शिष्य प्रभू येशूच्या वचनास नाकारून त्याला सोडून जातात तर काही त्याचा स्विकार करून पाठलाग करतात. त्याचप्रमाणे ट्रेन मधून प्रवास करणाऱ्या व्यक्तीला जे काही कडू वाटले तेच सुनीलला जीवन जगण्यास नवी आशा, आनंद व प्रेम प्राप्त करून देते.

मनन-चिंतन

       आजच्या शुभवर्तमानात आपल्याला असे लक्षात येते कि, काही शिष्य येशूची शिकवण न समजल्यामुळे व ती त्यांना अमान्य असल्यामुळे ते प्रभू येशूला सोडून जातात. तेव्हा प्रभू येशू तेथे अजूनही त्यांच्या सोबत असलेल्या त्याच्या बारा शिष्यांना विचारतो कि, “तुमचीही जाण्याची इच्छा आहे का?”  तेव्हा शिमोन पेत्र म्हणतो कि, “प्रभुजी आम्ही कोणकडे जाणार? सार्वकालिक जीवनाची वचने आपणाजवळ आहेत.इतकेच नव्हे तर पेत्र पुढे अजून म्हणतो कि, “आम्ही विश्वास ठेविला आहे, व ओळखिले आहे कि देवाचा पवित्र तो पुरुष आपणच आहात (योहान ६: ६८-६९). ह्या त्याच्या उद्गारात पेत्राने पुढील तीन निश्चित विधाने केली.
१)      प्रभू येशू शिवाय आम्ही कोणाकडे जाणार?
पेत्र व त्याचे शिष्य येशुबरोबर बराच काळ राहिले होते. त्यांनी प्रभू येशूची प्रेमाची, क्षमेची व दयेची शिकवण ऐकली होती. त्यांनी प्रभूने केलेले चमत्कार पहिले होते. त्यांनी प्रभूचा उदात्त व थोर स्वभाव जाणून घेतला होता. तसेच त्यांनी प्रभू येशूचे मानवी, आध्यात्मिक व सामाजिक जीवन अगदी जवळून पहिले होते. म्हणूनच पेत्र म्हणाला, “प्रभू आम्ही कोणाकडे जाणार ?”
       आपणही जीवनात काय शोधात आहोत. प्रभू येशू हाच मार्ग, सत्य व जीवन आहे’. तोच आपल्याला प्रेमाची व क्षमेची जीवन-किल्ली देत आहे. तो आपल्याला प्रेमाने आमंत्रित करून म्हणतो कि, “अहो, कष्टी आणि भाराक्रंती जनहो तुम्ही मजकडे या; मी तुम्हाला विसावा देईन.प्रभूकडे सर्वकाही आहे, फक्त आपण त्याचा शोध घेत त्याच्या मागे गेले पाहिजे.
२)      सार्वकालिक जीवनाची वचने प्रभू येशू जवळ आहेत.
पेत्राच्या उद्गारातून आपल्या लक्षात येते कि, बायबल मध्ये सार्वकालिक जीवन प्राप्त करण्यासाठी अर्थपूर्ण वचने आहेत. बायबल हे आपल्या साठी अतिशय महत्त्वपूर्ण पुस्तक आहे. बायबल वाचन करून आपल्या जीवनात परिवर्तन होऊ शकते. आपले जीवन बदलून आणण्याची शक्ती प्रभू शब्दामध्ये आहे. प्रभू येशू म्हणतो कि, “ जो माझा देह खातो व माझे रक्त पितो, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे. आणि मीच त्याला शेवटल्या दिवशी उठवीन” (योहान ६: ५४).
       आपणही प्रभू येशू द्वारे मिळणाऱ्या सार्वकालिक जीवन प्राप्तीसाठी त्याच्या अधिक जवळ येऊया.
३)      देवाचा पवित्र पुरुष प्रभू येशू ख्रिस्त आहे.
     मोशे हा जुन्या करारातील महान संदेष्टा होता व येशूला दुसरा मोशे संबोधले जाते. परंतु प्रभू येशू संदेष्ट्या पेक्षा अतिशय महान होता. तो मसीहा होता. आणि हीच बाब पेत्राने ओळखली होती. पेत्राने येशूच्या स्पर्शामध्ये देवाचा स्पर्श जाणून घेतला होता. त्याने प्रभू येशू मध्ये अनंतकालीन जीवनाचे ओझरते दर्शन घेतले होते. त्याला प्रभूच्या थोरवीची व पवित्र्याची जाणीव झाली होती. म्हणूनच तो प्रभूला देवाचा पवित्र पुरुषअसे घोषित करतो.
       पेत्राप्रमाणे आपणही प्रभू येशू मधील पावित्र्याची जाणीव करून घेऊया. आणि त्याच्या अधिक जवळ येऊन तो किती चांगला आहे, ह्याचा अनुभव घेऊन पाहूया! (स्त्रोत्रसंहिता ३४: ८).

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: ऐकावी प्रार्थना, करतो मी याचना


१. आपल्या धार्मिक नेत्यांनी, देऊळ मातेची शिकवणूक सर्व ख्रिस्ती लोकांपर्यंत पोहचवावी व त्यांना ती योग्यरीतीने आचरणात आणण्यासाठी योग्य ती मदत करावी म्हणून आपण प्रार्थना करू या.
२. प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीने एकमेकांच्या सु:खदुःखात सह्भागी होऊन एकमेकांस साह्य करावे व प्रभू ख्रिस्ताचा प्रेमाचा, दयेचा आणि क्षमेचा संदेश आपल्या आचरणात आणावा म्हणून आपण प्रार्थना करू या.
३. आपल्या पॅरीशमधील आजारी माणसांना चांगले आरोग्य, बेरोजगारांना रोजगार आणि दुःख-संकटात सापडल्यांना प्रभूचे धैर्य लाभावे म्हणून आपण प्रार्थना करू या.
४. ख्रिस्ती श्रद्धेमुळे ज्या लोकांवर अन्याय, अत्याचार होत आहेत, अश्या लोकांना ख्रिस्ती श्रद्धेशी एकनिष्ठ राहण्यासाठी प्रभू परमेश्वराचे सामर्थ्य व धैर्य लाभावे म्हणून आपण प्रार्थना करू या.
५. थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक हेतूंसाठी प्रार्थना करूया.



Friday 17 August 2018



Reflections for the homily of 20th Sunday in Ordinary time 
(19-08-2018) by: Br Jameson Munis





सामान्य काळातील विसावा रविवार

दिनांक १९-०८-१८
पहिले वाचन नितीसुत्रे ९:१-६
दुसरे वाचन इफिसकरांस पत्र ५:१५-२०
शुभवर्तमान योहान ६:५१-५८





माझा देह खरे खाद्य आणि माझे रक्त खरे पेय आहे.


प्रस्तावना

     आज पवित्र ख्रिस्तसभा सामान्य काळातील विसावा रविवार साजरा करीत आहे. आपल्या रोजच्या जीवनात आपण अनेक प्रकारचे चविष्ट खाद्य व पेय सेवन करत असतो; परंतु आजची उपासना आपल्याला ख्रिस्ताचे शरीर व रक्तहेच खरे खाद्य व पेय आहे ह्यावर मनन-चिंतन करण्यास आमंत्रित करत आहे.
     नितीसुत्रे ह्या पुस्तकातून घेतलेल्या आजच्या पहिल्या वाचनात  देव प्रजेला सुज्ञतेच्या मार्गावर चालावयास आवाहन करत आहे. तसेच इफिसकरांस लिहिलेल्या  पत्रातून घेतलेल्या आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौल इफिस येथील लोकांना स्वतःचे आचरण ख्रिस्तमय करून व आत्म्याने परिपूर्ण होण्यास आमंत्रित करीत आहे. तसेच आजच्या योहानलिखित शुभवर्तमानात प्रभू येशू सांगतो कि, ‘माझे देह खरे खाद्य व माझे रक्त खरे पेय आहे; जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल.’
     प्रभू येशूच्या ह्या जीवनदायी भाकरीची किंमत काय आहे याचे महत्व पटावे म्हणून या मिस्साबलिदानात विशेष प्रार्थना करूया.

सम्यक विवरण
पहिले वाचन नितीसुत्रे : ९:१-६

     पहिल्या वाचनात उत्तम अशी सूत्रे मांडलेली आहे. जे आपणास देवावरील व आपल्या ज्ञानावर कसे प्रेम करावे हे शिकवतात. माणसाने माणसाशी कसे वागावे, सामाजिक व्यवहार कसे पार पडावेत आणि नीतीचे जीवन कसे जगावे ह्यावर मार्गदर्शन करत आहे. सर्व ज्ञानाचा आणि सुज्ञतेचा उगम देव आहे. देव सज्जनाला उंचावितो, परंतु दृष्टाला दंड देतो अशा प्रकारचा उपदेश हे वाचन करत आहे. तसेच येथे श्रीमंती सुज्ञता व श्रीमंत मूर्खता या दोघींनी आपापले आमंत्रण दिले आहे. येथे श्रीमंती सुज्ञता नगरच्या उच्चस्थानावरून  ओरडून म्हणते कि, तुम्ही माझी भाकर खा आणि मी मिसळेलेला द्राक्षरस पी”. सुज्ञपणे वागणे म्हणजे, प्रामाणिक वर्तन, न्याय आणि शहाणपणात वाढणे. म्हणून आजचे पहिले वाचन सुज्ञतेच्या मार्गाने चालण्यास आव्हान करत आहे.

दुसरे वाचन  : इफिसकरांस पत्र : ५: १५-२०

     दुसऱ्या वाचनात संत पौल इफिसकरांस सांगतो कि, तुम्ही अज्ञानासारखे नव्हे तर ज्ञानासारखे सभोवार नजर ठेवून चाला. तुम्ही कसे जगत आहात याकडे लक्ष द्या. कोणत्या दिशेला चालला आहात ते पहा. तुम्ही पापमार्गाने चालू नका. सैतानाच्या धोरणाप्रमाणे चालणे शहाणपण नाही. विश्वासाचे जीवन जगा. आपल्या वेळेचा आपण कसा उपयोग करत आहोत या कडे लक्ष द्या. कारण जर ती प्रभूची इच्छा नाही, तर आपण प्रभूला संतोष देणार नाही. व त्याच्याविरुध्य वागणार. दारूचा दुष्परिणाम शरीरावर व बुद्धीवर होतो, म्हणून तुम्ही द्राक्षरसाच्या नशेत राहू नका, तर पवित्र आत्म्याच्या सहवासात राहा व येशू ख्रिस्ताचे धन्यवाद व आभार माना. त्यांनी आपल्याला त्याचे स्वःताचे शरीर व रक्त दिले आहे. जो आपल्याला एकमेकांशी व प्रभुशी संबंध चांगले ठेवतो.

शुभवर्तमान योहान : ६:५१-५८

     शुभवर्तमानात प्रभू येशू एक महत्वाचे विधान करत आहे. ते म्हणजे, “माझे देह खरे खाद्य आणि माझे रक्त खरे पेय आहे.तसेच प्रभू येशू पुढे सांगतो कि, मी जीवनाची भाकर आहे. मी स्वर्गातून उतरलो आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. येशू ख्रिस्ताची हि विधाने एकूण तेथे जमलेल्या लोकांना मोठे आश्चर्य वाटले. हि विधाने आजही खरी आहेत. इस्त्राईल लोकांनी चाळीस वर्षे अरण्यात मान्ना खाल्ला तरी त्यांना सार्वकालिक जीवन मिळाले नव्हते. ख्रिस्त स्वताः सार्वकालिक जीवन देतो. हे जीवन त्याच्यावर (येशूवर) विश्वास ठेवून म्हणजे त्याचा स्विकार करून मिळते. ज्याने ख्रिस्तावर विश्वास ठेवला, त्याला ते मिळाले आहे. सार्वकालिक जीवन जगाला देता यावे यासाठी येशूला वधस्तंभावर मरण सहन करावे लागले. वधस्तंभावर पापाच्या खंडणीसाठी टांगलेल्या ख्रिस्ताला स्विकार करणाऱ्याला सार्वकालिक जीवन मिळेल असे ख्रिस्ताने माझा देह खाणे व माझे रक्त पिणेया वाक्यांनी सुचविले आहे. जो येशू ख्रिस्ताकडे येऊन त्याचा स्विकार करतो तो आत्म्यात तृप्त होतो. त्याला आत्मिक भूक व तहान लागत नाही. जो कोणी ख्रिस्ताकडे जातो तो कोणीही असला तरी ख्रिस्त त्याला धिक्कारत नाही. तो अशा व्यक्तीला सार्वकालिक जीवन देतो. त्याचा कधीच नाश होणार नाही.

बोधकथा

     प्रिया नावाची एक सोज्वळ मुलगी होती व तिचे आईवडील तिच्या बालपणीच वारले होते. ती तिच्या आजीबरोबर  एका छोट्याश्या घरात रहात होती. परिस्थिती बिकट असल्यामुळे तिला एक दिवसाचे जेवणही मिळत नसे. त्यामुळे ती कधी कधी उपाशी राहत तर कधी चटणी-भाकर खाऊन राहत. प्रिया जरी दिसायला सुंदर असली , परंतु जेवण व इतर सुविधांच्या अभावामुळे ती अशक्त दिसत होती. तसेच ती शाररीकदृष्ट्याही दुर्बल झाली होती. त्यामुळे शेजारच्या रोजी काकीला तिचे दुःख पाहवेना म्हणून तिला प्रियाची दया आली. तिने तिला आपल्या घरी नेले. तिने तिला खायला-प्यायला व औषधही आणून दिले. त्यामुळे प्रिया काही दिवसातच सुधृढ झाली व तिला नव-चैतन्य लाभले.

मनन चिंतन

     आजची उपासना आपल्याला वरील कथेद्वारे आठवण करून देते की, आपल्या सर्वांना सार्वकालिक जीवन मिळावे म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने त्याचे शरीर व रक्त ह्याचे स्मारक आपल्यापुढे ठेवले आहे. प्रभू येशू म्हणतो, मी जी भाकर देईन ती माझा देह असून ती जगाच्या कल्याणासाठी पोषक आहे व जो माझे सेवन करतो तो माझ्यामुळे जगेल.
     आपण सर्वजण देवाची प्रेमळ मुले-मुली आहोत. देव आपला स्वर्गीय पिता आहे. तो आपले तारण करतो. आपल्या इच्छा आणि आकांश पूर्ण करतो. तरीसुद्धा आपण देवाच्या इच्छेविरुद्ध वागतो आणि देवापासून दूर जातो. आपण देवापासून जेवढे दूर जातो तेवढा येशू आपल्या अधिक जवळ येतो. विशेषरित्या जेव्हा आपण ख्रिस्त-शरीर सेवन करतो तेव्हा येशू आपल्या अंतःकरणात येतो. येशू आपणास कृपा व शक्ती देतो. याच ख्रिस्त-शरीराला जीवनाची भाकर असे म्हटले आहे. ही जीवनाची भाकर स्विकारून आपण ख्रिस्ताला स्विकारतो व ख्रिस्तमय बनतो. व आपण पवित्र बनतो.
     आपल्या रोजच्या जीवनात आपली शाररीक भूक भागवण्यासाठी आपण चांगले व पोषक अन्न घेत असतो. पोषक अन्न सेवन करून सुद्धा काही वेळा आपली शाररीक भूक भागत नाही व काही वेळा शरीरावर विपरीत परिणाम होत असतात. कधी-कधी आपल्याला वेगवेगळे आजार जडत असतात. परंतु आजच्या, उपसानामध्ये आपल्याला सर्वकालीक जीवनाच्या भाकरीचा उल्लेख आहे. मी जीवनाची भाकर आहे. जो कोणी माझे शरीर खातो, तो सर्वकाळ जगेल.” (योहान ६ : ५८) या संत योहांनच्या सहाव्या अध्यायात प्रभू येशू ख्रिस्त हेच सत्य सांगत आहे कि, आपले जीवन फलदायी झाले पाहिजे.
     आपल्या आईवडिलांना,  भावा-बहिणींना मदत केली पाहिजे. मित्र-मैत्रिणींची सेवा केली पाहिजे. दुसऱ्यांच्या अडी-अडचणीत मदत करून त्यांना उत्तेजन केले पाहिजे. दुसऱ्याना चांगली प्रेरणा दिली पाहिजे. त्यासाठी आपण देवाचे देह आणि रक्त अनुभवले पाहिजे. ते म्हणजे, आपण प्रभू ख्रिस्ताला त्याच्या आज्ञाद्वारे व चांगल्या कृत्याद्वारे चिकटून राहिले पाहिके कारण प्रभू येशूला अशक्य असे काहीच नाही आणि जे तो करतो ते सर्व चांगलेच असते. म्हणून आपण शाररीक इच्छेला जास्त प्राधान्य न देता, सार्वकालिक जीवनाच्या भाकरीकडे लक्ष केंद्रित करून आपली अध्यात्मिक वाढ करण्याचा प्रयत्न करूया.     

विश्वासू लोकांच्या प्रार्थना
प्रतिसाद : हे प्रेमळ परमेश्वरा आमची प्रार्थना एकून घे.

१)     आमचे पोप महाशय, सर्व बिशप, धर्मगुरू, धर्म-बंधू-भगिनी यांनी त्यांच्या आचार-विचारातून लोकांसमोर चांगला आदर्श ठेवावा तसेच त्यांच्या सुवार्ताकार्यात प्रभूचा वरदस्त त्यांना सतत लाभावा व त्यांच्या नेतृत्वाखाली आपल्या ख्रिस्ती धर्माची प्रगती होत राहावी म्हणून आपण प्रभू कडे प्रार्थना करुया.
२)     आजच्या उपासनेमध्ये सहभागी झालेल्या सर्व भाविकांनी त्यांची अंतकरणे उघडवून येशू स्वःता जीवनाची भाकर आहे, यावर खऱ्या श्रद्धेने व विश्वासाने येशूच्या शरीराचे व रक्ताचे सेवन करावे व त्याच्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून आपण प्रार्थना करूया.
३)     आपल्या देशातील राज्यकर्त्ये व विविध अधिकारी ह्यांनी देशाच्या व लोकांच्या प्रगतीसाठी योग्य ते श्रम करावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
४)     या पावसाच्या ऋतूमध्ये आपणा सर्वांना चांगला पाऊस मिळावा व शेतीची चांगली वाढ व्हावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
५)     ज्या कुटुंबामध्ये विविध कारणांमुळे जी भांडणे व वाद चालू आहेत, अशा सर्व कुटुंबात शांती व प्रेम नांदावे व परमेश्वराचा आशीर्वाद राहावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
६)    आता आपण आपल्या सामाजिक, कौटुंबिक व वैयक्तिक हेतुसाठी प्रार्थना करूया.