Thursday 24 August 2023

 Reflections for the 21th Sunday in Ordinary Time (27/08/2023) by Br. Trimbak Pardhy




सामान्य काळातील एकविसावा रविवार

दिनांक: २७/०८/२०२३

पहिले वाचन: यशया २२:१९-२३

दुसरे वाचन: रोमकरांस पत्र ११:३३-३६

शुभवर्तमान: मत्तय १६:१३-२०




प्रस्तावना:

आजची तिन्ही वाचने आपणास येशू ख्रिस्ताला जवळून ओळखण्यास आमंत्रण देत आहे. त्याला ओळखण्यास श्रद्धेची विश्वासाची भरपूर गरज आहे. आपली अंतकरणं शुद्ध निर्मळ ठेवण्यास आजची उपासना आपली आध्यात्मिक तयारी करत आहे.

आजच्या पहिल्या वाचनात यशया संदेष्टाद्वारे परमेश्वर आपल्याला देवाचे आदेश पाळण्यास त्याच्या आज्ञेनुसार वागण्यास सांगत आहे. शेबनाला देव ताकीद देत आहे की, तुला सर्व महत्त्वाच्या पदावरून कामावरून काढले जाईल. गर्विष्ठ जीवन जगला म्हणून तुला नवीन राजा सर्व चांगल्या गोष्टींपासून दूर ठेवील. सर्वकाही काढून घेऊन ते सर्व दुसऱ्याला दिले जाईल.

आजच्या दुसऱ्या वाचनात आपल्याला सांगण्यात आले आहे की, देव महान श्रेष्ठ आहे. त्याची बुद्धी विज्ञान हे आपल्या समजण्याच्या पलीकडे आहे. आपण नम्र होऊन त्याच्या समोर नतमस्तक होऊन त्याचा गौरव करूया. आजच्या शुभवर्तमानात येशू ख्रिस्त शिष्यांना विचारतो कि मनुष्याच्या पुत्राला लोक कोण म्हणून म्हणतात? तसेच पुढे येशू शिष्यांना म्हणतो की तुम्ही मला कोण म्हणून म्हणता? तेव्हा शिमोन पेत्राने उत्तर दिले आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहा. हाच प्रश्न प्रभू येशू आम्हा प्रत्येकाला विचारत आहे. पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणतात? तर आपण उत्तर काय बर असेल? आज आपण सुद्धा प्रभू येशूवरील आपली श्रद्धा वाढूया म्हणूया आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहा.

आजच्या मिसा बलिदानात भाग घेत असताना, प्रभूला सांगूया की तुझी बुद्धी ज्ञान हेच सर्वश्रेष्ठ आहे, तू सर्वस्व आहे, खरा देव, ईश्वर, प्रभू आहे. त्यामुळे जीवनात फक्त प्रभू येशूलाच स्थान देऊया. याच ख्रिस्ताच्या सानिध्यात राहूया.

बोधकथा.

एक गरीब भिकारी सकाळी गाडीत बसून पाच स्टेशन पलीकडे असलेल्या गावांमध्ये झोळी वाटवा घेऊन भिक्षा मागायला जायचा आणि सकाळी जाणाऱ्या संध्याकाळी परत येणाऱ्या गाडीने प्रवास करत असे. गाडीत शिरणारे प्रवासी गाडीत बसायला जागा सर्वांना मिळत असली तरी लोटालोट करून धक्के मारून खाली पाडत गाडीमध्ये आधी जावून बसण्याचे प्रयत्न करायचे.

एक दिवस तो भिकारी आपल्या जोळीसह त्याच गाडीत चढणार होता. झोळीमध्ये अख्या दिवसाची कमाई म्हणजे दोन अडीच किलो तांदूळ जमलेले होते. त्याची झोळी देखील जुणी झाली होती. गाडी आली, तो गाडीत चढणार इतक्यात प्रवाशांनी त्याला धक्का मारून खाली पाडले. त्याची झोली खाली पडली, फाटली आणि मेहनतीचे तांदूळ सांडले गेले. एका प्रवाशांनी बघितलं आणि तो प्रवासी खाली उतरला. त्याच्याकडे एक प्लास्टिकची पिशवी होती ती त्यांनी त्या भिकाऱ्याला देऊन पडलेले जवळ जवळ सर्व तांदूळ जमा करून त्या पिशवीत घातले. आणि भिकाऱ्याला हात धरून गाडीत चढवले. रिकाम्या जाग्यावर ते दोघे व्यवस्थित बसले नंतर गाडी चालू झाली.

मग तो भिकारी त्या मदत करणाऱ्या माणसावर टक लावून बघू लागला. त्याच्या मनात एक विचित्र प्रश्न येत होता  आणि तो म्हणजे येशु विषयीचा. ह्या भिकाऱ्याने येशू ख्रिस्ताला कधी पाहिलं नव्हतं फक्त येशूने केलेल्या चमत्काराविषयी बरंच ऐकलं होतं. त्याला कोणी असं सुद्धा सांगितलं होतं की येशू इतरांचं भलं करत  फिरला. म्हणून त्याचा प्रश्न असा होता की हा मनुष्य प्रभू येशू आहे का? कारण या माणसाला गाडीत चढायचं होतं तो माझ्यावर आलेलं संकट बघून गाडीतून उतरला आणि मला मदत केली. माझ्या संकटात धावून त्याने मदत केली त्याच्यामध्ये मला  ख्रिस्ताची खरी ओळख झाली.

 मनन चिंतन

ख्रिस्ताठायी जमलेल्या माझ्या प्रिय भाविकांनो आज देऊळमाता आपल्याला देवाची खरी ओळख करून घेण्यास बोलावीत आहे. पहिल्या वाचनात यशया संदेष्टा आपल्याला राजा हिलकिया याचा पुत्र याकिम ह्याला दिलेली राज्यसत्ता कशी चालवणार देवाचे आदेश पाळण्यास किंवा त्याच्या आज्ञेनुसार कसे वागणार याविषयी सांगत आहे. दुसऱ्या वाचनात संत पॉल आपल्याला सांगत आहे, की देव महान श्रेष्ठ आहे. त्याची जी बुद्धी आहे ती आपल्या समजण्याच्या पलीकडे आहे.

आजच्या शुभवर्तमानात येशू ख्रिस्ताची खरी ओळख करून दिलेली आहे. येशू हा एक असामान्य माणूस होता. तो संदेष्टा आहे किंवा त्याच्या अंगी काही अलौकिक तत्त्व आहे याविषयी सर्वांचे एक मत होते किंवा सर्वांना मान्य होते. ख्रिस्ता विषयी लोकांच्या मनात फारच मोठा आदर होता. परंतु ख्रिस्ताची खरी ओळख नव्हती.

म्हणून आज प्रभू येशू ख्रिस्त जीवनातील घाई गर्दी पासून खूप दूर गेल्यानंतर आपल्या शिष्यांना प्रश्न विचारतो, "मनुष्याच्या पुत्राला लोक कोण म्हणून म्हणतात". तेव्हा काही शिष्याने म्हटले बाप्तिस्मा करणारा योहान तर, काहींनी एलायजा किंवा संदेष्टा आहे असे म्हटले. परंतु शिमोन पेत्राने ख्रिस्ताला खरोखर ओळखले होते. त्यांनी उत्तर दिले "आपण  जिवंत देवाचे पुत्र आहात".

ख्रिस्ताने अनेक कार्य केली होती. चमत्कार प्रवचने दिली होती. पेत्राणी आपल्या स्वतःच्या डोळ्यांनी हे सर्व पाहिले होते हृदयाने अनुभवले होते. त्यामुळे ख्रिस्ताने पेत्राला एक नवीन जीवनाची भेट दिली. देवाच्या राज्याच्या चाव्या त्याच्या हातात दिल्या होत्या. दुसऱ्याचे भले करणे दुसऱ्यांची सेवा करणाऱ्यांच्या चाव्या दिल्या होत्या. तर माझ्या प्रिय भाविकांनो, देवाची ओळख करून घेण्यासाठी आपल्याला कोणतीही किंमत द्यावी लागत नाही. किंवा मोठ्यामोठ्या  पुस्तकांचा अभ्यास करावा लागत नाही. तर आपल्याला अंतकरणातून देवाची ओळख झाली पाहिजे. ज्याप्रमाणे संत लोकांनी स्वतःला समर्पण करून देवाची आज्ञा पाळताना  त्यांनी देवाला ओळखून घेतले, त्याचप्रमाणे आपण देखील देवाला ओळखून त्याची दया शांती आणि आशीर्वादाचा अनुभव घेऊ शकतो. देवाला संपूर्ण मनाने समर्पण करून त्याच्यावर विश्वास ठेवणे हा जीवनातील सर्वात महत्त्वाचा अनुभव आहे.

जी लोक देवाचा शोध अंतकरणापासून करतात त्यांना देव स्वतःचे प्रकटीकरण करतो. जर आपण स्वतःच्या मार्गाने जाणे सोडून देवाला संपूर्ण समर्पण केले तर देवाचा आत्मा आमच्यात  सतत वास करील.

बोधकथेत सांगितल्याप्रमाणे एक गरीब भिकाऱ्याला देवाची ओळख एका सामान्य माणसाद्वारे होते. हा मनुष्य ख्रिस्त नव्हता परंतु त्याच्यात देवाची वस्ती होती. कारण त्याची कृती वाखाण्यासाठी होती. त्याला देवाची  खरी ओळख झालेली होती.

तर माझ्या प्रिय भाविकांनो ख्रिस्ताची खरी ओळख आपण गुड फ्रायडेच्या दिवशी क्रुसावर पाहतो आणि आपल्या डोळ्यात अश्रू आणतो अशी ओळख नको आहे. परंतु त्याची खरी ओळख पटल्यावर आपणाला त्याच्याकडे पहावत नाही त्याचे क्रुसावरचे दुःख आपल्याला पाहावत नाही अशी ओळख झाली पाहिजे. आपण ख्रिस्ताची ओळख करण्यासाठी नाशिकला वेलंकनीला किंवा वांद्राच्या माउंट मेरीला जात असतो. आपण मेणबत्ती, मेणाची बाहुली, साड्या, हार, फुले, गुच्छ किंवा छोटे - छोटे सोन्याचे दागिने दान करत असतो. परंतु शेजारच्या विधवेची तीन पोरं काल रात्री उपाशी अन्न विना फक्त पाणी पिऊन झोपली किंवा एक म्हातारा भिकारी थंडीने गारठून मान टाकून मेला. ह्याची जर आपल्याला परवा नसेल तर देवाला दानधर्म देऊन काहीच फायदा नाही.

म्हणून आज प्रभू येशू ख्रिस्त त्याची ओळख  आपल्याला भुकेलेले, जे तहानलेले वस्त्रहीन आहेत त्याच्यामध्ये करण्यास सांगत आहे. कारण ख्रिस्ताची खरी ओळख आजच्या दलित, पीडितात, महारोग्यात, उघडा, नागडा टाकलेल्या रुग्णांमध्ये दिसून येईल. म्हणून असे म्हटले आहे करशील जे गरिबासाठी होईल ते माझासाठी.

म्हणून आज येशू ख्रिस्ताने विचारलेला हा प्रश्न जीवनातील सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. हाच प्रश्न आज आपण स्वतःला विचारूया ख्रिस्त आपल्यासाठी कोण म्हणून आहे? ख्रिस्त माझ्यासठी कोण म्हणून आहे? खरोखर आपण ख्रिस्ताला ओळखले आहे का? किंवा आपण ख्रिस्ताला आपल्या जीवनात कोणते स्थान दिले आहे? ह्या प्रश्नावर आपण आज मनन चिंतन करूया.

 

विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद: हे प्रभू आमची प्रार्थना ऐक.

. आपले पोप, बिशप तसेच सर्व धार्मिक अधिकाऱ्यांनी देवाच्या वचनाचा नम्रपणे आणि प्रामाणिकपणे प्रचार करावा म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.

 . आपल्या जीवनात ख्रिस्ताला अधिक महत्व देऊन त्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन गावागावात होणाऱ्या कार्यक्रमात सहभाग घेऊन समेट घडवून आणावा एकीचा समाज निर्माण व्हावा म्हणून आपण प्रार्थना करूया.

 . हे प्रभू आम्ही सर्वजण महामारीत अडकलेले आहोत. आमच्या मनात अनेक शंका-कुशंका निर्माण होतात. आमच्या विश्वासाला तडा जाण्याची शंका नाकारता येत नाही. तुझ्या अधिकाधिक जवळ येऊन तुझ्यावरच आमची श्रद्धा वाढव हा वरदहस्त आम्ही तुझ्याकडे मागतो म्हणून आपण प्रार्थना करूया.

 . आमच्या स्वतःच्या गरजांसाठी विश्सेकरून ज्यांनी आपल्याला प्रार्थनेची विनंती केली आहे अशा सर्वांची  आपण आता आठवण करुया आणि त्यांना प्रभूचा आशीर्वाद लाभावा म्हणून आपण विशेष प्रार्थना करूया.

 . थोडावेळ शांत राहून आपण आपल्या सामाजिक, कौटुंबिक आणि व्ययक्तिक हेतूंसाठी आपण प्रार्थना करूया.