Reflections for the homily of 22nd Sunday
in Ordinary time (02-09-2018)
by: Br Isidore Patil.
सामन्य काळातील २२ वा रविवार
दिनांक – ०२-०९-२०१८
पहिले वाचन - अनुवाद ४:१-२,६-८
दुसरे वाचन : याकोब १:१७-२७
प्रस्तावना
आज देऊळमाता आपल्याला परमेश्वराच्या सानिध्यात राहून आनंद करण्यास
बोलावत आहे. परमेश्वराचे नियम हे प्रेमाने पूर्ण होत असतात. व ते आपल्याला पवित्र
करतात. आजची वाचने आपल्याला परमेश्वराचे नियम पाळून त्याच्या आज्ञेत राहण्यास आमंत्रण
करत आहे.
आजच्या पहील्या वाचनात मोशे इस्त्रायल लोकांना देवाने ज्या आज्ञा
दिल्या आहेत त्या काटेकोरपणे पाळावयास सांगतो. दुसऱ्या वाचनात याकोब सर्व ख्रिस्ती
बांधवांना सांगतो की, आपण नेहमी परमेश्वराचे शब्द पाळणारे असले पाहिजे.
शुभवर्तमानात प्रभू येशू आपल्याला सांगतो की, आपल्या अंतःकरणातून जे निघते तेच
आपल्याला भ्रष्ट करत असते. कारण आतून म्हणजे अंत:करणातून वाईट विचार बाहेर पडतात. आपण
आपले विचार व आचरण शुद्ध ठेवले पाहिजे व परमेश्वराच्या आज्ञेत राहून त्याचे नियम
पाळले पाहिजेत.
परमेश्वराचे नियम आपल्याला पाळता यावेत व शुद्ध अंतःकरणाने जीवन
जगता यावे म्हणून आपण आजच्या ह्या मिस्सा-बलिदानात प्रार्थना करूया.
सम्यक विवरण
पहिले वाचन - अनुवाद ४:१-२,६-८
या पहिल्या वाचनात मोशे इस्त्रायेलच्या लोकांना
परमेश्वराची शिकवण देत परमेश्वराच्या नियमाबद्दल सांगत आहे. मोशे सांगतो कि,
परमेश्वाराचे नियम हे खूप महान आहेत. हे नियम तुम्ही नेहमी
पाळायल हवेत. मोशे त्यांना सांगतो जर तुम्ही या आज्ञा पाळल्या नाहीत तर तुमचा
मृत्यू होईल व त्याचे योग्य पालन केल्यास जो देश परमेश्वर देणार आहे
तो तुम्हांस मिळेल. परमेश्वर लोकांना ह्या नियमाचे तंतोतंत पाळण
करण्यास सांगतो व त्यामध्ये काही जोडण्यास व काही कमी करण्यस बंद करतो. हे नियम
काटेकोरपणे पाळल्यास दुसरे सर्वजण म्हणतील कि हे राष्ट्र खूप महान, बुद्धीमान व समजूतदार आहे
दुसरे वाचन : याकोब
१:१७-२७
आजच्या वाचनात याकोब देवाच्या वचनाप्रमाणे आचारण करण्यास विनंती
करतो कारण यामुळेच आपली आत्मिक वाढ होते. ज्याला ऐकण्याची सहनशीलता असते तो कमी
बोलतो व रागवत नाही. मनुष्याचा राग देवाचा कार्यात अडथळा निर्माण करतो. तसेच याकोब
सांगतो की, आपल्या पापी स्वभावामुळे सर्व प्रकारचे मलीन व दुष्ट विचार उचंबळून
येतात. आपण त्याचा त्याग करावा व देवाचे वचन व नियम नम्रतेने स्विकार करावे.
याकोब म्हणतो की, आरशात आपल्या मुखावरील मलिनता पाहिल्यावर जो
त्याकडे दुर्लक्ष करतो तो स्वतःलाच फसवतो. आपण देवाच्या वचनाप्रमाणे कृतीही करावी.
यामुळेच आपण सुखी राहणार. तसेच देवाच्या दृष्टीत शुद्ध व निर्मळ आचारण हे आपले
ध्येय असावे.
शुभवर्तमान - मार्क ७:१-८,१४-१५, २१-२३
आजच्या
शुभवर्तमानात मार्क आपणास सांगत असताना म्हणतो, येशूची
परीक्षा घेऊन त्याला दोषी ठरविण्याच्या उद्देशाने परुशी व शास्त्री त्यांच्याकडे
येतात. कोणी बाजारात गेला, तर पर-राष्ट्रीय
लोकांच्या स्पर्शाने किंवा त्याच्या वस्तूला स्पर्श करून यहुदी मनुष्य अशुद्ध
होतो. या मुळे बाजारातून घरी परतल्यावर पाण्याने स्वतःला शुद्ध करावे अशी रीत आहे
असे परुशि शिकवत असत.
येशूचे
शिष्य हे नियम पळत नाहीत. म्हणून ते अशुद्ध हाताने जेवतात असा आरोप परुशायानी
त्यांच्यावर लावला. परंतु येशूने परुश्यानी ढोंगी म्हटले. त्यांची भक्ती फक्त
बाहेरचा देखावा होता. कारण त्यांचे मन देवाकडे लावले नव्हते.
माणसाच्या
अंतकरणातून जे निघते तेच त्याला अशुद्ध करत असते. परुश्यांची कृती दिशा भूल करणारी
होती. परुशी म्हणजे ‘लोका संगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण’, हेच प्रभू
येशूने लोकांना समजावून सांगितले. वाईट वागणुकीने जीवनावर विपरीत परिणाम
होतात, असे येशूने तेथे जमलेल्या लोक समुदायाला सांगितले.
मनन चिंतन
आजची तिन्ही वाचने आम्हांला परमेश्वराचे नियम पाळून त्याच्या समीप
येण्यास सांगत आहेत. होय, परमेश्वराचे नियम हे प्रितीच्या सु-संस्कारने
परिपूर्ण होतात. आणि हेच नियम प्रत्येकाच्या हृदयात वास करत असतात. त्याचे पालन करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. जर आम्ही ती
वचने पाळली तर आम्हां प्रत्येका मध्ये अमुलाग्र बदल होण्यास वेळ लागणार नाही.
म्हणून कवीवर्य म्हणतात, ‘वचने अमर वचने, सुमधुर मंगल वचने’. म्हणूनच आपण सर्व जन
देवाची लेकरे आहोत, त्याच्या वचनाशी जागृत राहिले पाहिजे.
आजचे पहिले वाचन इस्त्रायली लोकांना मोशे द्वारे परमेश्वराच्या आज्ञेची
आठवण करून देत आहे. मोशेने लोकांना जीवनात यशस्वी होण्यासाठी परमेश्वराच्या आज्ञा पाळण्यास सांगितले. परंतु ह्या चेतावनी वर लोकांनी
दूरलक्ष केले. म्हणून याचेच कारणस्तव परुशी
व याजकानी या नियमात भर घातली. आणि लोकांचे जीवन आणखी कठीण बनवले.
आजच्या
शुभवर्तमानात आपण पाहतो कि, येशूने परुश्याना व त्यांच्या
ढोंगीपणाला चोख उत्तर दिले. कारण परुशी स्वतः नियम पाळत नव्हते. आपण
परुश्याप्रमाणे ढोंगीपणाचे जीवन जगता कामा नये. तसेच येशू
ख्रिस्त आपल्याला बाह्यरुपापेक्षा आपल्या अंतःकरणावर अधिक लक्ष देण्यास आवाहन करीत
आहे. तसेच आपण इतरांच्या जीवनात मदत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
आपल्या अंतःकरणात असलेला गर्व, तिरस्कार, द्वेष वाईट विचार हे आपल्या व्यक्तिमत्वाची इतरांना
जाणीव करून देतात. त्यामुळे आपण आपले जीवन परिवर्तीत करण्याचा प्रयत्न केला
पाहिजे. आपला सर्वात मोठा शत्रू आपणच असतो, कारण त्याच्याकडे गर्वाचे शस्त्र असते.
आपण परमेश्वराची आज्ञा पाळली की आपले हृदय परिवर्तीत होईल. परमेश्वराची आज्ञा
आपल्याला दुसऱ्यामध्ये चांगले पाहण्यासाठी व त्यांना प्रेम करण्यासाठी प्रोस्ताहित
करतात. तसेच पापवृत्ती बाजूला सारून सत्कृत्ये आचरणात आणण्यास मदत करतात.
जेव्हा
आपण पश्चाताप करून दुसऱ्यांना क्षमा करतो तेव्हाच आपण चागलं व सहानुभूतीच
खरेपणाच जीवन जगू शकतो व तेव्हा परमेश्वराच्या आज्ञा आपल्या मदतीला येत असतात.
तसेच पौल आजच्या दुसऱ्या वाचनात सांगतो की, परमेश्वराचे शब्द हे
परमेश्वराच्या आज्ञा आहेत. त्या आपण आचारणात आणून त्यानुसार जगले पाहिजे.
प्रभूच्या वचनाचा स्विकार करा. त्या वचनाच्या सानिध्यात राहा कारण हि वचने आपल्या
अंत करणात रुजवलेली आहेत. आजच्या स्तोत्र-संहितेत स्तोत्रककार सांगतो कि, “प्रामाणिक माणसे देवाच्या सानिध्यात राहतील आणि देवाच्या सानिध्यात
राहणे म्हणजे त्याच्या आज्ञा पाळून अंतकरण शुद्ध ठेऊन चांगले जीवन जगणे होय.
विश्वासू लोकांच्या प्रार्थना
प्रतिसाद : प्रेमळ पित्या आमची प्रार्थना
ऐकून घे.
१) आपले
पोप फ्रान्सीस, बिशप, कार्डीनल,
फादर्स, सिस्टर्स, प्रापंचिक, डिकन्स यांच्यासाठी आपण प्रार्थना करूया. देऊळ मातेची शिकवण आणि
परमेश्वराच्या आज्ञा त्यांनी पाळून इतरांना त्यांचा प्रचार करण्यास परमेश्वराने
त्यांना शक्ती द्यावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
२) आपण
आपल्या देशातील सर्व नेते व सर्व सरकारी कर्मचारांसाठी प्रार्थना करूया.
परमेश्वराने त्यांना सुबुद्धी द्यावी जेणे करून ते आपल्या देशात शांती व न्याय प्रस्थापित
करून एकत्रितपणे देशाच्या कल्याणासाठी झटू शकतील, म्हणून
आपण प्रार्थना करूया.
३) आपल्या
स्थानिक समाजासाठी व त्यांच्या गरजांसाठी प्रार्थना करूया. आम्ही सर्व
परमेश्वराच्या प्रेमाची व दयेची साक्षीदार होऊन ते प्रेम व दया आम्ही आमच्या
शेजाऱ्यावर दाखवावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
४) आपण
आपल्या धर्मग्रामासाठी प्रार्थना करूया. आपण सर्व ख्रिस्ती लोकांनी येशूच्या
आज्ञेत नेहमी राहावे व प्रभू येशूच्या वचनाचे आचरण करावे म्हणून आपण प्रार्थना
करूया.
५) आपण
सर्व आजारी लोकांसाठी प्रार्थान करूया. परमेश्वराने त्यांच्या सर्व गरजा,
इच्छा व आकांश पूर्ण कराव्यात म्हणून आपण प्रार्थना करूया.
६) आता
आपण थोडा वेळ शत राहून आपल्या सामाजिक व कौटुंबिक व वैयक्तिक गरजांसाठी प्रार्थना
करूया.