Friday 21 June 2019


Reflection for the Feast of Body and Blood of Christ (23-06-2019) By Br. Julius Rodrigues 







ख्रिस्ताच्या अतिपवित्र शरीर व रक्ताचा सोहळा






दिनांक: २९-५-२०१६
पहिले वाचन: उत्पत्ती १४: १८-२०
दुसरे वाचन: १ करिंथ ११:२३-२६
शुभवर्तमान: लुक ९:११-१७





 प्रस्तावना:

“घ्यानी खा देह माझा छीन्न विछीन्न तुमच्यासाठी
घ्यानी प्या रक्त माझे भळभळ वाहे तुमच्यासाठी”

आज देऊळमाता मोठ्या आनंदाने प्रभू येशू ख्रिस्ताच्या अतिपवित्र शरीर आणि रक्ताचा सोहळा साजरा करत असताना प्रभू येशूच्या महान त्यागाची व प्रेमाची आठवण करून देत आहे.   
आजच्या तिन्ही पवित्र वाचनात प्रभू येशूच्या स्वर्गीय भोजन ह्या वर प्रकाश झोत टाकत आहे. आजच्या वाचनात आम्हांला जो भोजना विषयी आविष्कार केला आहे ते भोजन सर्व साधारण भोजन नसून शाररीक व आत्मिक भोजन आहे. कि ज्या द्वारे मनुष्य आपल्या मानवी जीवनात काल क्रमण करू शकतो.   
मानवी शरीराच्या पोषणासाठी जशी भाकरीची नितांत गरज असते त्याच प्रमाणे आपल्या आध्यात्मिक पोषणासाठी, तारणसाठी व सार्वकाळीक जीवनासाठी आपल्याला प्रभू ख्रिस्ताची गरज आहे व त्याच्या भोजनात सहभागी होण्यास आगत्याचे आहे. ख्रिस्ताने क्रुसावर आपले शरीर व रक्त सांडून आपल्याला पापांच्या बंधनातून मुक्त केले व स्वतः आम्हासाठी त्याची आठवण म्हणून वेदीवर बळी बनला व आम्हांसाठी त्याच्या देहाच दान करून आम्हांमध्ये भाकरीच्या व द्राक्षरसाच्या रूपाने आम्हांमध्ये वस्ती केली आणि आमचं दररोज आध्यात्मिक पोषण करत आहे.
आज तोच ख्रिस्त आमच्या विश्वासाच द्दोतक आहे. म्हणून आजच्या सणाच्या दिवशी मोठ्या भक्ती भावाने श्रध्येने ह्या मिसात सहभागी होवू यां व आपल अंतःकरण ख्रिताच वस्तीस्थान करूया.

सम्यक विवरण:

पहिले वाचन: उत्पत्ती १४: १८-२०

उत्त्पतीच्या पुस्तकात भाकर व द्राक्षारसाचा उल्लेख केला आहे. अब्राहामने कदार्लार्गोमर आणि त्याच्याबरोबरचे राजे यांस सामोरे जाऊन त्यांच्या वर विजय मिळविला. ह्या कर्तुत्वाबद्दल शालेमाचा राजा मलकीसदेक जो देवाचा याजक होता, त्याने भाकर व द्राक्षरस घेऊन अब्राहाकडे  गेला आणि त्याला आशीर्वाद दिला. 

दुसरे वाचन: १ करिंथ ११:२३-२६

 संत पौल, प्रभू भोजनाचे महत्व व गांभीर्य करिंथ येथील मंडळीच्या निदर्शनास आणत आहे. वल्हांडणाचे भोजन चालू असता, ख्रिस्ताने मेजावरील बेखमीर भाकर घेतली. ही बेखमीर भाकर ख्रिस्ताचे दैवी व्यक्तिमत्व व जीवन दर्शविते. ख्रिस्ताने स्वतः भाकर होऊन स्वतःचे अर्पण केले. रक्त सांडल्याशिवाय  क्षमा मिळत नाही (इब्री ९:२२). ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे देवाने पापक्षमेचा नवा आविष्कार केला आहे. प्रभू भोजन ख्रिस्ताच्या मरणाची,  तारणाच्या महान योजनेची आणि ख्रिस्ताच्या पुनरागमनाची घोषणा आहे,  असे संत पौल या वाचनात सांगत आहे.

शुभवर्तमान: लुक ९:११-१७

बारा जण आपली कामगिरी संपवून परत माघारी आले आहेत, येथे प्रभू येशूची इच्छा होती कि शिष्यांना घेऊन एकांतस्थळी विसाव्यासाठी जावे. पण लोकांच्या गर्दीमुळे ते अशक्य झाले. म्हणून येशूने ही संधी साधून लोकांना शिक्षण देऊ लागला. दिवसभर येशू शिकवण देत होता. जेव्हा सायंकाळच्या सुमारास शिष्यांना लोकांच्या भोजनाची काळजी वाटू लागली. कारण त्यांच्याकडे पुरेसी शिदोरी नव्हती व अन्न विकत घेण्यास पैसेही नव्हते.
त्यांच्या जेवणाचा प्रश्न गहणच होता. तुम्ही त्यांच्या जेवणाची व्यवस्था करा असे येशु ख्रिस्ताने म्हणताच, ते पेचात पडले. आमच्याजवळ असलेल्या पाच भाकरी व दोन मासे एवढ्याने आम्ही काय करणार अशी त्यांना खंत वाटू लागली. तेवढे कारण प्रभू येशूने म्हणतो जे आहे तेवढ़ पुरे आहे. नंतर प्रभू येशूने भाकर व माश्यांना आशीर्वाद देऊन लोकांना वाढ़ण्यास सांगतो.

मनन चिंतन:

“मी भाकर जीवनाची, स्वर्गीय भाकर मी”

    आज आपण ख्रिस्ताच्या अतिपवित्र शरीर आणि रक्ताचा सोहळा साजरा करीत आहोत. आज आपण जर समाज्यात पाहिले तर आपणास आढळून येईल की प्रत्येक जण भुकेला आहे, कोणी पैशाचा, कोणी संपतीचा, कोणी शरीराला, कोणी नावलौकिकपणाचा तर कोणी आध्यात्मिकतेचा अश्या अनेक प्रकारच्या भुका मानवास लागल्या आहेत आणि अश्या ह्या परस्थितीमध्ये आपण अडकून पडलो आहोत. भूक लागणे सहाजीकच आहे परंतु ती भागवण्यासाठी मी कोणते मार्ग अनुसरतो ते देखील तितकेच महत्वाचे आहे स्व:ताचे शरीर व रक्त देणे म्हणजे सर्वस्वाचा त्याग करणे होय आणि हा त्याग आपल्या प्रभू ख्रिस्ताने केला.
भूक लागणे हा मानवी जीवनाचा अविभाज्य घटक आहे आणि जर आपण आजूबाजूला पहिले तर आपणांस आढळून येईल की प्रत्येक व्यक्ती हा कोणत्या ना कोणत्या भुकेने ग्रासलेला आहे. आपल्यातील प्रत्येक व्यक्ती भुकेला आहे. कोणी पैशाचा भुकेला तर कोणी संपतीचा तर कोणी मान-सन्मानाचा तर कोणी नावलौकीक्ता तर कोणी पोटाचा. प्रत्येक जन हि भूक भागवण्याचा अतोनात प्रयत्न करत आहे. स्वताःचा विकास, स्वताचे सरंक्षण आणि स्वतःला सर्वात जास्त फायदा कसा होईल ह्याकडे प्रत्येकाचा कल लागला आहे ( परंतु आज आपण ख्रिस्तामध्ये काहीतरी वेगळेपणा पाहणार आहोत) त्यासाठी कोणत्याही स्थंरालाजाऊन किंवा कोणतेही मार्ग अनुक्रमून तो आपली खळगी भरण्याचा प्रयत्न आज मानव करत आहे. जो ख्रिस्त  तुमच्या आणि माझ्यासारखा आहे तो स्वताःहाचे शरीर आणि रक्त देत आहे. तो त्याच्या सर्वस्वाचा त्याग करत आहे. आपला प्राण तो क्रुसावर देऊन आपले शरीर आणि रक्त आपल्या पोषणासाठी तो आपणांस प्रदान करीत आहे. दुसऱ्याची भूक भागवण्यासाठी खुद्द ख्रिस्त आपले शरीर व रक्त आम्हांस खादय व पेय म्हणून देत आहे.
जिवंत देवाची भाकर म्हणजे ख्रिस्ताचे शरीर व रक्त हे आपणांस सार्वकालिक जीवनासाठी आवश्यक आहे. शाररीक अन्न आपणांस जीवन देते फक्त मरणा पर्यंत परंतु जे अन्न ख्रिस्त देतोय ते अन्न आपल्याला अनंत काळाचे जीवन देत आहे, आपल्याला पुन्हा कधीही भूक लागणार नाही.
     आजच्या तिन्ही वाचनात आपण भाकरी विषयी ऐकले आहे आणि जी भाकर ख्रिस्त आपणास देतोय ती वेगळी भाकर आहे ती म्हणजे स्वतःचे शरीर व स्वतःचे रक्त.
आजच्या शुभवार्तमानात आपण भाकरीचा चमत्कार ह्या विषयी ऐकले आहे ई ख्रिस्त लोकांसोबत खात, पित आहे, त्यांच्यासोबत वावरत आहे. ख्रिस्ताला लोकांची काळजी होती आणि त्यांच्या गरजा त्याला ठाऊक होत्या. ते भुकेले होते आणि तो त्यांस अन्न देतो, तो त्याच्या उदारपणात महानता आहे. तो फक्त त्यांची भूक भागवत नाही तर तो त्यांस महान धडा शिकवितो. तो त्यांस शिकवितो तो त्यांस आमंत्रित करतो आणि तो त्यास बरे करतो. त्यांच प्रमाणे तो आज आपणा सर्वांना देखिल आमंत्रण करत आहे. जेंव्हा आपण मिस्साबली साजरी करतो, तो आपणांस बोलावतो. आपले स्वागत करतो, आपल्याशी बोलतो. त्यांच्या स्वतःच्या शरीराद्वारे व रक्ताद्वारे आणि अश्या प्रकारे आपल्याला तृप्त करतो आणि आरोग्य, सुख, शांती व प्रेम देतो.
मिस्साबलीदान हे देवाकडून मिळालेले एक महान भेट आहे. आज आपण हा सण साजरा करीत असताना आपण आठवण ठेवीली पाहिजे की आपण ख्रिस्ताचे शरीर आहोत. ( १ करिंथ १२: २७) 
संत अगस्तीन म्हणतात “जे स्वीकारता त्याच्या सारखे व्हा”जर आपण मिस्सा बलिदान एकमेकांसोबात साजरे करतो आणि ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त सेवन करतो मग आपण सगळे ख्रिस्ताचा श्वास म्हणून ओळखले गेले पाहिजे. ख्रिस्त जो जिवंत देव आहे तो आपल्यात असला पाहिजे
    आज जर आपण पाहिले तर लोकांचा त्या जिवंत भाकरीवरील विश्वास कमी झालेला आहे, आणि ख्रिस्तशरीराला पुरेसा सन्मान मिळल नाही. असे म्हटले जाते ज्याने त्याला अनुभवले त्याने सर्वस्व जिंकले. आज हा सण साजरा करीत असताना आपण प्रत्येकाने ख्रिस्ताच्या शरीराचा व रक्ताचा अनुभव घ्यावा व जगाला प्रेम अर्पावे म्हणून आपण प्रार्थना करूया. 
   
विश्वासू लोकांच्या प्रार्थना

आपला प्रतिसाद : परमेश्वरा तुझ्या रक्ताने आम्हाला शुद्ध कर

१) आमचे परमगुरु, महागुरू, धर्मगुरू, धर्मभगिनी व व्रतस्त या सर्वांना तुझ्या पवित्र शरीराने व रक्ताने व्यापून टाक जेणे करून तू दिलेले कार्य त्यांच्या कडून सरळीत घडून येईल.
२) प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीने एकमेकांच्या सुख-दु:खात सहभागी होऊन एकमेकांस सहाय्य करावे व प्रभू ख्रिस्ताच्या प्रेमाचा, दयेचा आणि क्षमेचा संदेश आपल्या आचरणात आणावा म्हणून प्रार्थना करूया.
३) आपल्या परिश मधील जे लोक आजारी आहेत, अश्या सर्व लोकांस परमेश्वराच्या शरीराचा व रक्ताचा गुणकारी स्पर्श व्हावा व त्यांना चांगले आरोग्य मिळावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
४) आज आपण हा सन साजरा करीत असताना अश्या लोकासाठी विशेष प्रार्थना करूया, की ज्यांचा पर्मेश्वरावरून विश्वास कमी झाला आहे. परमेश्वराने त्यांना विश्वासाच्या दानाने भरून काढावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
 ५) आपण आपल्या वैयक्तिककौटुंबिक आणि सामाजिक हेतूंसाठी थोडावेळ शांत राहून प्रार्थना करूया.  



No comments:

Post a Comment