Reflection for the 11th Sunday in Ordinary
Time (13/06/2021) By Fr. Benjamin Alphonso
सामान्य काळातील
अकरावा रविवार
दिनांक: १३/०६/२०२१
पहिले वाचन:- यहेजकेल १७: २२-२४
दुसरे वाचन:- २ करिंथ ५:६-१०
शुभवर्तमान:- मार्क ४: २६-३४
संत अन्थोनीचा
सण
प्रस्तावना:
आज आपण
सामान्य काळातील अकरावा रविवार साजरा करीत आहोत. आज आपण जग प्रसिद्ध संत अन्थोनी ह्याचा
सण साजरा करीत आहोत. आजचे पहिले वचन यहेजकेल या पुस्तकातून घेतले आहे. देवा
यहेजकेल ह्या संदेष्ट्याद्वारे आपल्याला सांगतो कि, मी निचास उंच व जे स्वःताला
उंच असे मानतात त्यांना नमविण. दुराऱ्या वाचनात संत पौल कारीन्थिकरांस पाठवलेल्या दुसऱ्या
पत्रामध्ये ‘श्रध्येच्या मार्गदर्शनाने आम्ही धैर्याने वागतो आणि प्रभूला
संतोश्वीने हेच आमचे ध्येय होय. संत मार्क लिखित शुभवर्तमानान आपण स्वर्ग
राज्याविषयी ऐकतो. प्रभू येशू म्हणतो, “स्वर्गाचे राज्य एका मोहरीच्या दाण्यासारखे
आहे. मोहरीचा दान अगदी लहान (सूक्ष्म) असला तरी त्याचे रुपांतर मोठ्या झाडामध्ये
होते. देवाचे राज्य अगदी त्याचा प्रमाणे नकळत वाढते. जगप्रसिद्द पादुआचा संत
अन्थोनी ह्याने आपल्या प्रवचनाद्वारे लोकांना प्रभूकडे आणले आणि देवराज्य
प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. आजच्या ह्या पवित्र मिस्साबलिदानात आपण विशेष
प्रार्थना करूया कि, आपण सर्वांनी आनंदाने देवराज्याची घोषणा करावी.
मनन चिंतन:
आपण अनेक
राज्याविषयी गोष्टी ऐकतो. आपण वाचले व ऐकले आहे कि, अनेक प्रसिद्ध व लोकप्रिय असे
राजे होऊन गेले ज्यांनी आपल्या कार्याद्वारे आपले प्रजेची मने जिंकली आणि अशा
राज्याविषयी लोकांच्या मनात प्रेम व आपुलकी आहे. आपल्या भारत देशाच्या उत्तरेला तिबेर
नावाचा एक देश आहे. तिबेर ह्या देशात अजुनही राजा आहे. तिकडचा राजा लोक प्रिय आहे.
त्या देशाच्या राज्याने जाहीर केले कि, आता राजेशाही बस झाली आपण निवडणूक घेऊन
देशाची सत्ता लोकांकडे देऊया. पण लोकांनी ती गोष्ट स्वीकारली नाही. लोकांच म्हणन
असं आहे कि, राजा हा फार चांगला आहे. त्याचे लोकांवर खूप प्रेम आहे. राजा स्वतः
लोकांना भेट देतो. आपल्या राज्यात (देशात) सर्व लोक आनंदित असावीत असा त्याचा
ध्येय आहे. सर्वांना मोफत व वैद्यकीय इलाज देतात. जर काही कारणामुळे एखाद्याच घर
पडले किंवा नष्ट झाले तर राज स्वतः नोंद घेऊन त्यांना नवीन घर व जागा देतात. असा
राजा ज्याला सर्व प्रजेची काळजी व प्रेम आहे. ह्या कोरोनाच्या काळात ते स्वतः
लोकांना भेट देऊन त्यांनी कशी काळजी घ्यायची हा सल्ला देत आहत. जगत तिबेर असा देश
आहे, जिथे सर्वांचे लसीकरण झाले आहे. जसा राजा तसी प्रजा. आज तिबेर देशात, जगातील
सगळ्यात आनंदी लोक आपल्याला आढळतात.
आपल्या सगळ्यांना
प्रश्न पडतो कि, देवाचे राज्य म्हणजे नक्की काय? प्रभू येशूची नक्की शिकवण काय
होती? प्रभू येशूच्या शुभवर्तमानाचा मुख्य विषय होता, ‘देवाचे राज्य’ अथवा
‘स्वर्गाचे राज्य’. होय, प्रभू येशू देवराज्याची घोषणा करण्यासाठी ह्या जगत आला
होता. आजच्या शुभवर्तमानात आपण ऐकतो कि, आपण चीवातूर घेऊन धडपड करण्याची काहीही
गरज नाही. पेरलेले बी वाढून आपोआप फळ देईल. नैसर्गिक वाढीची प्रतिक्रिया आम्हाला
समजत नाही. पण त्या वाढीत सहभागी होण्यासाठी ती समजून घेण्याची आम्हाला गरज नाहीच,
कारण बीज अंकुरात वाढीस लागण्याच्या स्थितीत असण मात्र गरजेचे आहे. पिक मिळण्याचे
अभिवच तर आहेच पण त्याबरोबर पवित्र शास्त्रात अनेकदा देवाच्या न्यायाची सूचनाही
आहे. दुसऱ्या दाखल्यामध्ये पुन्हा जवळजवळ लक्षात येणारी बीयाची वाढ आणि त्याचे
आश्चर्यकारक परिणाम याचे वर्णन केले आहे. मोहरीचे ‘बी’ अगदी छोटे असते पण त्याची
वाढ झाली कि कालांतराने मध्यपूर्वेतील एका मोठ्यात मोठ्या रोपात त्याची गणना केली
जाते. देव राज्याची वाढही अशीच असते. प्रारंभी ते अगदी अल्प वाढते पण अखेरीज
त्याचाच जय होतो.
आजच्या
पहिल्या वाचनात आपण ऐकतो कि, याहोवाने संदेष्ट्याद्वारे सांगितले कि, तो स्वतः
गंधसरूच्या शेंड्यावरील एक डहाळी घेऊन ती लावील आणि त्याचे रुपांतर तो सुंदर आणि
बलाढ्य अशा झाडामध्ये होऊन ह्या झाडाच्या छायेखाली सर्व पशुपक्षी निवास करतील. हे
झाड परमेश्वराच्या राज्याचे प्रतिक होय. सर्व राज्ये सहभागी होण्यासाठी तो आमंत्रण
करतो. त्याचबरोबर कालांतराने ही सर्व राष्ट्रे एका मागोमाग नाश पावतील असे याहोवा
म्हणतो; परंतु इतिहासावून कळते कि, देवाचे राज्य सर्वदा टिकेल. त्याचा कोणीही नाश
करू शकत नाही.
दुसऱ्या वाचनात
संत पौल करिंथकरांस म्हणतो, देवाकडे आपल्याला केवळ विश्वासाने जाता येते. आपल्या
प्रत्येकाला देहाने केलेल्या गोष्टी म्हणजे ह्या जीवनात कोणताही व्यक्तीने केलेले
कृत्य, असाच ह्या संदर्भाचा अर्थ आहे. आमच्या सर्व कृत्यांबद्दल आपण देवाला
जबाबदार आहोत आणि योग्य असेल त्याप्रमाणे आपल्याला लाभ होईल किंवा हानी सोसावी
लागेल.
परमेश्वर
नेहमी आपल्याकडे करुणामय दृष्टीने पाहतो. आपण सर्वजन मोहरीच्या दाण्यासारखे आहोत.
आपण देवाचा म्हणजेच स्वर्गराज्याचा शोध घेतला पाहिजे. आपण आपल्या वागण्या,
कृत्याद्वारे देवाराज्य प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आज आपण स्वतःला
प्रश्न विचारूया कि, आपण देवराज्याची सुवार्ता पसरविण्याचा प्रयत्न करतो का?
पादुआचा संत अन्थोनीने आपल्या प्रवचनाद्वारे व कार्याद्वारे देवाचे राज्य
प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. आज आपण पादुआचा संत अन्थोनीच्या मध्यस्थीने
देवाकडे मागुया कि, परमेश्वराने आपल्या सगळ्यांना आशीर्वादित करावे जेणे करून आपळे
कार्य आणि वागण्याद्वारे आपण देवाचा राज्याची घोषणा करावी.
विश्वासू लोकांच्या प्रार्थना
प्रतिसाद :- हे प्रभो आमची प्रार्थना ऐक.
1. आमचे
परमगुरुस्वामी, महागुरुस्वामी व सर्व कार्यकर्त्यांना परमेश्वराचा स्पर्श
व्हावा व प्रभूच्या प्रेमशांतीचा संदेश त्यांनी सर्वत्र पसरावा म्हणून आपण प्रार्थना
करू या.
2. यंदाच्या
वर्षी सुद्धा आपल्याला चांगला पाऊस मिळावा व आपल्या शेतकरी बांधवाना चांगले पिक
घेता यावे म्हणून आपण प्रार्थना करू या.
3. जे कोणी
आजारी आहेत त्यांना चांगले आरोग्य, जे दुःखी आहेत त्यांचे दुःख दूर व्हावे व जे एकटे आहेत
अशांना प्रभूचा सहवास मिळावा म्हणून आपण प्रार्थना करू या.
4. जे
तरुण-तरुणी देवापासून दूर जाऊन अंधारात भरकटत आहेत, त्यांना
प्रभूच्या प्रकाशात मार्गक्रमण करावे व जागतिक मोह सोडून प्रभूच्या प्रेमाकडे
वळावे म्हणून प्रार्थना करू या.
No comments:
Post a Comment