Thursday, 5 March 2026

Reflections for the homily for Third Sunday in the Season of Lent (08/03/2026) by Fr. Jostin Pereira


प्रायश्चित काळातील तिसरा रविवार
दिनांक: ०८/०३/२०२६
पहिले वाचन:  निर्गम १७:३-७
दुसरे वाचन: रोमकरांस पत्र ५:१-२,५-८
शुभवर्तमान:  योहान ४:५-४२

प्रस्तावना

आज आपण प्रायश्चित काळातील तिसरा रविवार साजरा करीत आहोत. आजची उपासना प्रभू येशू हा जिवंत पाण्याचा झरा आहे याविषयी बोध करत आहे. पहिल्या वाचनात परमेश्वर देव इस्रायल लोकांना खडकातून पाणी देतो व त्यांची तहान भागवतो याचे वर्णन केले आहे. दुसऱ्या वाचनात संत पौल आपल्यला सांगत आहे कि, ख्रिस्ताच्या मरणाने आपण नीतिमान झालो आहोत. पवित्र शुभवर्तमानात शमरोनी स्त्रीला जिवंत पाणी स्वीकारण्याची संधी परमेश्वर देतो व तिच्याठायी नवे जीवन जगण्याची आशा निर्माण करतो.  स्वर्गीय गोष्टीविषयी तिच्याठायी तहान निर्माण करतो. ख्रिस्त देत असलेल्या जिवंत पाण्याचा संबंध मनपरिवर्तन व पापक्षमेशी जोडलेला आहे. मनपरिवर्तन करून आपण जिवंत पाण्याच्या झऱ्याजवळ येऊया.

मनन चिंतन

माझ्या प्रिय बंधुभगिनीनो, पाणी हे जीवन आहे.  रात्रंदिवस माणसाला पाणी लागते. पिण्यासाठी, आंघोळीसाठी, स्वच्छतेसाठी, कपडे धुण्यासाठी, बागायतीसाठी पाणीच लागते. पाण्याविना जगणे कसे कठीण आहे हे माणसाला ठाऊक आहे. येशू जिवंत पाण्याचा झरा आहे म्हणजेच माणसाला पाण्याइतकीच किंबहुना अधिक आवश्यकता येशूची आहे. जीवनातील विविध प्रसंगी माणसास येशूची गरज भासते. पाणी म्हणजे जीवन! खिस्त हा जीवन आहे. खिस्त हा माणसाचा जीव असला पाहिजे. हे आपल्याला आजच्या उपासनेमध्ये सांगितले आहे.

आजच्या पहिल्या वाचनात आपण ऐकतो कि, इस्रायली लोक पिण्याच्या पाण्यासाठी मोशे जवळ कुरकुर करू लागले आणि देवाने मोशेद्वारे खडकांतून पाणी काढून त्यांची तहान भागवली तथापि देवाने त्यांच्यासाठी जे काही केले ते सर्व इस्रायल लोक विसरतात हि दुदैवाची बाब आहे देवाने त्यांना इजिप्त लोकांच्या हातांतून सोडवले तांबड्या समुद्रातून मार्ग काढला तरी सुद्धा त्यांनी देवावर विश्वास ठेवला नाही आणि आज प्रभू येशू आपणास सांगत आहे की आपण देवाच्या उद्धारत्यावर विश्वास ठेवतो का? किंवा आपला विश्वास फक्त चांगल्यावेळेस पर्यंत मर्यादित असतो का?

आजच्या दुसऱ्या वाचनात संत पॉल आपल्याला सांगत आहे ख्रिस्ताच्या मरणाने आपण नीतिमान झालो आहोत .

आजच्या शुभवर्तमनात आपल्याला शोमरोनी स्त्री आणि येशू मधील संभाषण ऐकावयास मिळते.  शोमरोनी नावाची बाई आपल्या हातामध्ये घागर आणि पोहरा घेऊन याकोबाच्या विहिरीवर आली होती येशू तिला भेटला आणि तिच्याशी संवाद केला आणि तिला म्हणाला बाई मला तहान लागली आहे आणि त्या बाईने पिण्याच्या पाण्याऐवजी ती त्याला सांगत आहे तू दुसऱ्या धर्माचा आहेस दुसऱ्या जातीचा आहेस.

होय माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो पाणी कुठल्या जातीचं नसतं पाणी कोणत्या धर्माचं नसतं पाण्याला रंग नसतो पाण्याला गाव नसतं फक्त पाण्याद्वारे आपण आपली तहान भागवत असतो अशावेळी प्रभू येशू तिच्याबरोबर संवाद करत आहे आणि तिला सांगत आहे तू मला पाणी देण्यासाठी कुरकुर करत आहेस परंतु मी तुला जिवंत पाण्याचा झरा देणार आहे अशावेळी ही बाई म्हणू लागली आपल्याकडे पोहरा नाही आहे विहीर खोल आहे आणि तुम्ही मला पाणी कसे देऊ शकाल साधं पाणी तुम्ही देऊ शकणार नाही तर जिवंत पाण्याचा झरा कसा देऊ शकणार.

होय माझ्या प्रिय बंधूभगिनींनो प्रभू येशू पाण्यासाठी तळमळलेला नव्हता तर तिच्या आत्म्यासाठी तळमळलेला होता त्याला तिला जिंकून घ्यायचं होतं तिच्या धर्माच्या, जातीच्या पलीकडे तिला न्यायचं होतं आणि तो तिच्याशी संवाद करू लागला आणि तो संवाद करीत असताना हळूहळू शंभरोनी बाईला त्याची ओळख भेटली ती नंतर म्हणू लागली की हा मनुष्य साधासुधा कोणी नसून तो मसीहा असावा तो गुरुवर्य असावा तो संदेष्टा असावा अशा प्रकारे येशूने उघड केलेले तिच्या जीवनाचे रहस्य ऐकून ती स्त्री आवाक झाली होती.

तिच्या श्रद्धेला उधान आले होते, ती लगेच बोलली महाराज आपण संदेष्टा आहात हे आता मला कळले.  तिने त्याचे महात्म्य मान्य केले.  येशुतला देव माणूस तिने ओळखला आणि स्वीकारला.  तिच्या साक्षी मुळे नगरांतील पुष्कळ शंभरोनी लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला (योहान ४:३९).

ख्रिस्त या उपवास काळात आपणास जिवंत पाण्याचा झरा आहे.  त्यातून आपण प्याले तर आपणास ऐहिकतेची तहान लागणार नाही.  त्यामुळे आपणास सर्वकालिक जीवन मिळेल.

 येशूच्या मरण पुनरुसस्थानाने आपणास सर्वकालिक जीवन उपलब्ध करून दिले आहे. शोमरोनी स्त्रीने येशु वर विश्वास ठेवून ते अमृत प्राशन केले. तिला परत नवऱ्याची तहान लागली नाही.  येशूमध्ये तिला सारे विश्व मिळाले हेच पाणी चाखायला मिळाले आणि त्याला पुन्हा भ्रष्टाचाराची तहान लागली नाही (लूक१९:१:१०). मतायने येशु वर विश्वास ठेवला आणि त्यालाही तहान लागली नाही तो येशूचा शिष्य बनला (मतय: ९:९-१३).

माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो, आपल्या जीवनामध्ये प्रभुने दर्शन द्यावे म्हणून आपली आध्यात्मिक तयारी करू या. तो आपल्या जीवनात येऊ पाहत आहे आपला न्याय करण्यासाठी नव्हे तर आपल्याला विपुल प्रमाणात जीवन देण्यासाठी व जिवंत पाणी देण्यासाठी  प्रभू येत आहे. आपण प्रभू येशू ख्रिस्ताकडे येऊ या. त्यांने आपल्याला दर्शन द्यावे; आपल्या पापांची क्षमा करावी म्हणून आपण त्याला नम्रतेने विनवू या तिच्याप्रमाणेच आपण देखील आपले मनपरिवर्तन करूया व देवाच्या दयेची साक्ष जगाला देऊया. त्यासाठी आपल्या दुबळेपणाची व पापी जीवनाची घागर प्रभू चरणी ठेवून त्याने दिलेल्या नवजीवनात प्रवेश करण्यास आपल्याला कृपा आणि शक्ती मिळावी म्हणून आपण  प्रार्थना करू या.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद: “हे प्रभू आमची प्रार्थना ऐक.”

१. आपल्या ख्रिस्तसभेचे दूरा वाहणारे पोप लियोबिशपधर्मगुरूधर्मभगिनी व व्रतस्थ यांना परमेश्वराने शारीरिकमानसिक व आध्यात्मिक आरोग्य द्यावे व योग्य निर्णय घेण्यासाठी त्यांना पवित्र आत्म्याची शक्ती मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

२. जे कोणी जीवनात निराश आहेतहताश आहेतअशांना परमेश्वराच्या प्रेमाचा स्पर्श व्हावा व आपले ख्रिस्ती जीवन त्यांनी विश्वासाने जगावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

३ जे कोणी देवापासून दुरावलेले आहेतत्यांना ह्या प्रायश्चित काळात देवाने स्पर्श करावा व त्यांनी देवाच्या प्रेमाचा अनुभव घेऊन देवाजवळ परत यावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

४. या प्रायश्चित काळात आपण आपल्या जीवनाला एक नवीन वळण देऊन परमेश्वराच्या शाश्‍वत जीवनाच्या पाण्याचा आस्वाद दुसऱ्यांना द्यावा व ह्याद्वारे परमेश्वराची प्रचिती आपल्या जीवनाद्वारे दुसऱ्यांना व्हावी म्हणून आपण प्रभुचरणी प्रार्थना करूया.

५. थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या सामाजिकवैयक्तिक व कौटुंबिक हेतू प्रभू चरणी मांडूया.