John Mendonca
hails from Our Lady of Bethlehem Church, Dongri, Mumbai. He belongs to the St.
Bonaventure Capuchin Province of Maharashtra. Being a lover of nature, a
kind-hearted person and a good musician, his reflections speak the heart and
mind of an ordinary faithful. Presently, he is pursuing his Theological studies
in Jnana Deepa Vidyapeeth, Pune.
सामान्यकाळातील एकोणतीसावा रविवार
वर्ष-क
निर्गम, १७:८-१३.
२ तीमथी, ३:१४; ४:२.
लूक, १८:१-८.
''त्यांनी सर्वदा प्रार्थना करावी व खचू नये''
प्रस्तावना:
आजचे पहिले वाचन व शुभवर्तमान आपणास प्रार्थनेचे सामर्थ्य आणि प्रार्थनेचे सातत्य पटवून देते.
आणि आजच्या दुस-या वाचनात संत पौल आपणास सांगतो कि देवाचे शब्द हे
तारणदायी, आध्यात्मिक आणि
जीवनदायी आहेत. आजच्या शुभवर्तमानामध्ये शिष्य ''प्रभू आम्हास प्रार्थना करण्यास
शिकवा'' (लूक, ११:१) अशी विनवणी करताना आढळत आहेत. कारण त्यांनी अनुभवले होते कि प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या जीवनात
प्रार्थनेला अंत्यत महत्वाचे स्थान दिले आणि ह्या प्रार्थनेद्वारेच असंख्य अशा
अशक्य गोष्टी शक्य केल्या. ह्यास्तव, प्रार्थनेविना आमचे सर्व संदेश रिक्त व सामर्थ्यहीन असतात.
प्रार्थनेद्वारे सर्वसर्मथ परमेश्वराकडून सामर्थ्य प्राप्त होते. प्रार्थना ही सर्वांना
प्राप्त झालेली संधी आहे म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त आजच्या उपासनेद्वारे आपणास
विश्वासामध्ये टिकून राहण्यास व नित्य प्रार्थनामय जीवन जगण्यास आमंत्रण देत आहे.
पहिले वाचन, (निर्गम, १७:८-१३):
प्रार्थनेच्या आमंत्रणाचा प्रस्ताव आपल्यासमोर अगदी पहिल्या
वाचनापासूनच एखाद्या आलेखाप्रमाणे सादर करण्यात आला आहे. ह्या वाचनात आपण पाहतो की, जेव्हा मोशेने त्याचे हात प्रार्थनेमध्ये उंच
केले तेव्हा यहोशवा आणि इस्त्राएल लोकांनी त्यांच्या शत्रूवर- अमालेकीवर विजय मिळविला. पंरतू जेव्हा मोशेने
त्याचे प्रार्थनामय हात खाली घेतले तेव्हा इस्त्राएल लोकांना अपयशाचा अनुभव आला.
इजिप्तमधून बाहेर पडल्यावर अल्प काळात ही घटना घडली. इस्त्राएली लोकांच्या गरजा
भागवण्यास देवाचे सामर्थ्य पुरून उरणार आहे हे या प्रसंगातून दाखवले आहे.
दुसरे वाचन (२ तीमथी, ३:१४; ४:२):
तीमथी विश्वासी जणांना बजावत आहे कि त्यांनी फसू नये तर सावध राहावे कारण ह्यासाठी आवश्यक ते शिक्षण व उत्तेजन त्यांना दिले गेले आहे. कारण ते जे शिकले आहे आणि ज्याची त्यांना व्यक्तिश: अनुभवाने खात्री पटली आहे, ते सर्व त्यांनी दुढ धरून त्यात टिकून राहणे अगत्याचे आहे. हा
बोध प्रत्येक ख्रिस्ती सेवकाने नित्याने मनावर घेऊन आचरणात आणणे जरुरेचे आहे. तीमथीला हे ज्ञान
कोणी दिले? ते कोठून आले?
याचेही मोठे महत्व आहे. तीमथीला
प्रेषितांकडून ख्रिस्ती सुवार्तेविषयी पुष्कळ शिक्षण मिळाले होते. एवढेच नव्हे तर
त्याला बालपणापासून शास्त्रलेख शिकविले होते. हे ईश्वरप्रेरित शास्त्रलेख सदबोध, धर्मतत्वाचे शिक्षण, शील स्वभाव व नीती शिक्षण चार व्यापक हेतूद्वारे
जीवनाच्या सर्वच क्षणांना स्पर्श करतात आणि देवाच्या भक्ताला सज्ज राहण्यास मदत करित असतात.
शुभवर्तमान(लूक,१८:१-८):
सम्यक विवरण:
आजच्या शुभवर्तमानात आपण पाहतो की एक गरीब विधवा न्यायधीशाकडे सातत्याने
न्यायाची मागणी करते. तिचे सततचे येणे व न्यायधीशाचे सततचे नाकारणे ह्या दोन गोष्टी स्पष्ट करतात. एक, कदाचित आपल्याला काही लाच मिळावी ह्या हेतूने तो न्यायी नसलेला न्यायधीश तिचे ऐकूण घेत
नसावा कारण लाच देणे त्या गरीब विधवा स्त्रीला शक्य नव्हते. किंवा गरीब विधवा माझे काहीच वाईट करू शकत नाही अशी भावना त्याच्यात असावी. आणि म्हणूनच चिकाटीने पुन्हा-पुन्हा आपले गह्राने सांगणे एवढेच तिच्या हाती होते. ह्यास्तव
देवाच्या नियमांना आणि माणसांना न जुमानणारा हा न्यायाधीश (१८:४), अखेर त्या विधवेच्या सततच्या तक्रारीला कंटाळून तिला न्याय देतो.
आजच्या शुभवर्तमानाद्वारे न्यायी नसलेला न्यायधीश व दयाळू देव
ह्यांच्यातील फरक आपणापुढे सादर केला जात आहे (१८:७). देवाचे निवडलेले लोक म्हणजे, त्याचे पाचारण ऐकून त्याला प्रतिसाद देणारे लोक,
जेव्हा त्यांच्या
सुख-दु:खात देवाने आपले समर्थन करावे अशा आशेने त्याला विंनती करतात व ''तुझे राज्य येवो'' हीच प्रार्थना करतात तेव्हा देव नक्कीच
त्यांच्या प्रार्थनेला होकारात्मक प्रतिसाद देईल की नाही हा खरा महत्वाचा प्रश्न
नाही, तर मनुष्याचा
पुत्र येईल तेव्हा आशा न सोडता चिकाटीने प्रार्थना
करणारे विश्वासू लोक असतील का? हाच महत्वाचा प्रश्न आहे(१८:८). मनुष्याचा पुत्र येण्याची प्रतिक्षा करताना
संकटाच्या काळात, सदासर्वदा मन खचू
न देता प्रार्थना करावी म्हणून या दाखल्यातून धीर व उत्तेजन आपणास देण्यात आले आहे (१८:१).
ज्याप्रमाणे न्यायधीशाने लगेच त्या विधवा स्त्रीची याचना ऐकली नाही, तर त्यासाठी तिला सातत्याने याचना करावी लागली
त्याचप्रमाणे परमेश्वर सुध्दा आपली याचना त्वरित
ऐकत नाही व आपणास सातत्याने प्रार्थनामय याचना करावी लागते असा गैरसमज आपण करून घेत असतो. परंतु संत लूक दाखल्याच्या सुरुवातीस दाखल्याचा प्रमुख उद्देश आपणासमोर सादर करतो, त्यांनी सर्वदा प्रार्थना करावी व खचू नये
ह्याविषयी त्याने त्यांना एक दाखला सांगितला (१८:१) आणि सरतेशेवटी येशू ख्रिस्त ह्या
दाखल्यांची सांगता सुंदर अशा वचनाद्वारे करतो, ''तर देवाचे जे निवडलेले लोक रांत्रदिवस त्याचा
धावा करितात त्याचा तो न्याय करणार नाही काय? आणि त्याच्याविषयी तो विलंब लावील काय? मी तुम्हास सांगतो तो त्यांचा न्याय लवकर करील''
(१८:७-८). न्याय ह्या शब्दाची व्याख्या अचूक, योग्य व वेळेपणा या तीन शब्दात केली जाते. प्रभू परमेश्वर अचूक वेळी योग्य अशी प्रार्थना मान्य करित असतो.
बोधकथा:
१.
दिपक सहा वर्षानंतर अमेरिकेतून पुण्याला येणार होता परंतु दुदैवाने जेव्हा तो पुण्याच्या
विमानतळावर पोहचला तेव्हा त्याला कळून चुकले की आज संपूर्ण महाराष्ट काही कारणास्तव बंद आहे.
त्याच्या लगेच लक्षात आले की त्याच्या एका मित्राचे घर विमानतळाजवळच आहे.
त्याने लगेच आपल्या मित्राला आपली व्यथा फोनवरून सांगितली व लागलीच त्याचा मित्र येऊन दिपकला त्याच्या
घरी घेऊन गेला.
मित्राचे घर हे साधे होते. मित्राचा परिवार
हा प्रार्थनामय परिवार होता. मित्राच्या घरी वरच्या मजल्यावर
त्यानी एक खोली खास पाहुण्यांसाठी
तयार केली होती. आपले सर्व सामान जिन्यावरून वरच्या मजल्यावर फरफटत वर नेत असताना दिपकला आपले मनावरचे ऒझे फार जड वाटत होते. तो
जिन्याच्या वरच्या टोकावर पोहचला. तेथे त्याला एक पाटी टांगलेली दिसली. तिच्यावर लिहिलेले होते, ''आज आपण प्रार्थना केली का?'', ''आपण सर्वांसाठी प्रार्थना केली का?''
दिपकला कबूल करावे लागले की तो शारीरिक नव्हे तर आध्यात्मिक धापा सुद्धा टाकत आहे. आणि त्याच वेळी त्याने गुडघे टेकून
प्रार्थनेद्वारे देवाशी संवाद साधला. दिपकला वाटले कि जणूकाही देवाने त्याचे सर्व ओझे घेतले होते व शांतीरूपी देणगीचे हलके ओझे बहाल केले होते. प्रार्थनाहीन ख्रिस्ती म्हणजे शक्तीहीन
ख्रिस्ती. म्हणूनच
प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीने प्रार्थनेचे सातत्य जोपासले पाहिजे.
२.
मि. जोसेफ एका अपघातात गंभीररीत्या जखमी झाल्यामुळे बरेच दिवस हॉस्पिटलमध्येच
होते. त्याची छोटी मुलगी प्रिया ‘पप्पा कुठे आहेत?’ म्हणून नेहमी विचारत असे. ह्यास्तव
प्रियाला तिच्या आईने एकेदिवशी हॉस्पिटलमध्ये नेले.
मि. जोसेफ हे बेशुध्द असल्यामुळे प्रियाला
तिच्या वडिलांबरोबर संवाद साधता आला नाही. घरी परत येत असताना बस स्टॉपवरच प्रियाने आईला विचारले, ''पप्पा माझ्याबरोबर बोलले का नाहीत?'' ह्यावर आईने म्हटले, ''बेटा, पप्पा आजारी आहेत ते लवकर बरे व्हावेत
म्हणून तू देवाकडे प्रार्थना कर.'' आईचे हे उद्गार ऐकताच प्रियाने तेथेच बस
स्टॉपवर ए, बी, सी, डी म्हणावयास सुरूवात केली. आईने प्रियाला ए, बी, सी, डी म्हणावयास मनाई केली तेव्हा प्रिया म्हणाली, ''मम्मी मला प्रार्थना करता येत नाही म्हणून मी ए,
बी, सी, डी म्हणते. देव ह्या ए, बी, सी, डी चा स्विकार करून माझ्या पप्पासाठी छानशी प्रार्थना बनवेल''. प्रार्थनेसाठी कधीच वेळेची व ठिकाणाची बंधने
नसतात.
मननचिंतन:
आजच्या
उपासनेद्वारे प्रभू येशू आपणास सांगतो की आपण खचून न जाता सातत्याने प्रार्थना करावी. परंतु जेव्हा आपण आपल्या
दैनंदिन जीवनाचा विचार करतो तेव्हा खरोखरच आपल्या जीवनात प्रार्थनेला अगदी महत्वाचे स्थान आहे
का? आपण सातत्याने प्रार्थना
करतो का? मोशेने व त्या
विधवा स्त्रीने प्रार्थनेचे सातत्य टिकवून धरले. त्यांच्या आदर्शाचा आपण पाठपुरावा
करतो का?
सातत्याने खचून न जाता जो देवाकडे धावा करतो त्यास देव
कधीही नाकारत नाही. आपल्या जीवनात सुध्दा आपण अनेकवेळा ह्या सातत्याचा अनुभव घेतलेला असेलच.
आपल्या मागे येऊन भिक्षेची मागणी करणारा भिकारी, सातत्याने नोकरीच्या ईटरव्हयूसाठी जाणारा आपला
मित्र, एखादया ठराविक
प्रसंगी सतत कर्जाची मागणी करणारे आपले नातेवाईक किंवा आपला मित्रपरिवार ह्या
सर्वांच्या सातत्याच्या मागणीमुळे आपल्याही काळजाला पाजर फुटतोच व त्यांना आपण
आप-आपल्या परीने मदत करतो.
आणि हेच सत्य, प्रभू येशूख्रिस्त आपणास सांगतो, ''मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे सापडेल, ठोका म्हणजे उघडेल'' (११:१०). आणि हाच देवाचा उदारपणा येशूख्रिस्ताने आपणास
पटवून दिलेला आहे. ख्रिस्त म्हणतो, ''तुमच्यामध्ये असा कोण बाप आहे की जो आपल्या
मुलाने मासा मागितला असता त्याला साप देईल? तुम्ही वाईट असतांही तुम्हाला आपल्या मुलांना
चांगल्या देणग्या दयावयाचे कळते, तर मग स्वर्गीय पित्याजवळ जे मागतात त्यास तो किती
विशेषकरून पवित्र आत्मा देईल''(११:११).
आज ख्रिस्त, सातत्यमय प्रार्थनेचा संदेश देत असताना कदाचित आपल्या मनामध्ये शंकेची पाल
चुकचुकत असणार की आपण सातत्याने प्रार्थना का करावी? जर का देव सर्वज्ञानी आहे तो आपल्या सर्व
इच्छा, आकांक्षा, व गरजा जाणतो तर आपण
प्रार्थना का करावी? येथे आपण एक मात्र लक्षात ठेवले पाहिजे की आपण प्रार्थना अशासाठी करत नाही की देवाने आपणावर दयाळू दुष्टीने पाहावे. वस्तुतः देव स्वभावातच प्रेमळ व दयाळू आहे. तो आपणावर रागीट व दुष्ट नजरेने कधीच पाहत नाही. देव जी कृपादाने आपणास बहाल करीत आहे व जी कृपादाने तो बहाल करणार आहे ती स्विकारण्यास आपण सदैव योग्य रितीने तत्पर असावे व देवाला सर्वस्वी आपल्या हृदयात स्थान दयावे ह्यास्तव आपण प्रार्थना करावी.
प्रार्थना ही देवाने मानवाला दिलेली अमुल्य अशी देणगी आणि
शक्ती आहे. प्रार्थना आपण कोणासाठीही करू शकतो व कोणत्याही हेतुसाठी करू शकतो,
मात्र हे हेतू देवाच्या वचनाशी सबंधित
असायला हवीत. उदा. हेजिकिया याने दिर्घ आयुष्यासाठी प्रार्थना
केली. दानियएलाने सिंहाच्या पिंज-यामधून सुटका व्हावी म्हणून प्रार्थना केली (दानियाल ६:२०-२३). दाविद राज्याने दयेच्या याचनेसाठी प्रार्थना
केली (स्तोत्र १७:१). संत पिटरने क्षमेसाठी प्रार्थना केली (लुक २२:६१).
प्रार्थनेला कधीच वेळेचे आणि ठिकाणचे बंधन नसते. उदा. मत्स्याच्या पोटातून योनाने आपला देव परमेश्वर
याची प्रार्थना केली(योना १:१७ पुढे). आपली मुलगी बरी व्हावी म्हणून जायरसने ख्रिस्ताजवळ
रस्त्यावर प्रार्थना केली(लुक ५:२३-२५). दाविद राज्याने गुहेमध्ये प्रार्थना केली.
पश्चातापी चोराने शेवटच्या क्षणी क्रुसावरून प्रार्थना केली(लुक २३:४०-४३). ख्रिस्ताने डोंगरावर, एकांतपणे, लोकांमध्ये, गेथसेमनी बागेमध्ये प्रार्थना केली(मती २६:३६).
आजच्या पहिल्या वाचनात आपण पाहतो की देवाने मोशेची
प्रार्थना ऐकली. मोशे हा फक्त देवाचा निवडलेला भक्त होता. परंतु येशूख्रिस्त हा देवाचा एकुलता एक पुत्र, आपल्या तारणासाठी, देवाने ह्या धरतीवर पाठविला. मग ख्रिस्त जो आपला तारणारा
आहे, त्याच्या नावाने केलेली प्रार्थना देव कधीच
नाकारू शकत नाही. कारण ख्रिस्त ह्याविषयी स्वत:च साक्ष
देताना म्हणतो, ''पुत्राच्याठायी पित्याचा गौरव व्हावे म्हणून
तुम्ही जे काही माझ्या नावाने मागाल ते मी करीन'' (योहान, १४:१३). ह्यास्तव आपण ख्रिस्ताच्या नावाने सातत्याने स्वर्गीय पित्याजवळ प्रार्थना करणे
अगत्याचे आहे.
कारण सुखदु:खाचा
आधार असते प्रार्थना,
अधंकारात दिप असते
प्रार्थना,
असाहय लोकांचे साहय
असते प्रार्थना,
निराशितांची आशा
असते प्रार्थना,
दुर्बळांचे बळ असते
प्रार्थना,
थकलेल्या मनाचा
विसावा असते प्रार्थना,
हृदयाची आस असते
प्रार्थना,
दोन मनाचा, दोन जीवाचा संगम
असते प्रार्थना,
स्वर्गराज्याची
पायवाट असते प्रार्थना,
म्हणूनच प्रभू येशू
म्हणतो, ''सातत्याने खचून न जाता,
नित्य करावी आपण प्रार्थना''.
विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: हे देवा दया कर
आणि तुझ्या लोकांची प्रार्थना ऐक.
१. हे स्वर्गीय
पित्या, ख्रिस्तसभेचे सर्व धर्माधिकारी ख्रिस्ताच्या प्रेमाचा, मायेचा, क्षमेचा आणि प्रार्थनेचा संदेश जगजाहीर करत
असताना त्याच्यावर होणा-या अन्यायाला व अत्याचाराला त्यांनी धीराने सामोरे जावे व
त्यासाठी त्यांना ईश्वरी कृपा व शक्ती मिळावी म्हणून आपण प्रार्थना करू या.
२. हे दयाळू
पित्या, आमच्या देशातील अन्याय, अत्याचार व भष्टाचार दूर व्हावा व जे लोक सातत्याने न्यायाची मागणी करत
आहेत अशा लोकांच्या विनवणीकडे न्यायअधिकां-यानी लक्ष
दयावे व त्यांना योग्य न्याय मिळावा म्हणून आपण प्रार्थना करू या.
३. हे प्रेमळ
पित्या, जे युवक-युवती देवापासून दूर गेले आहेत त्यांना प्रभूच्या प्रेमाचा स्पर्श
व्हावा व त्यांनी येशूख्रिस्त हा खरा 'मार्ग, सत्य आणि जीवन आहे' हे सत्य त्यांच्या जीवनात स्विकारावे म्हणून आपण प्रार्थना
करू या.
४. हे दयावंत
पित्या, आम्ही आमच्या सुख-दु:खात प्रार्थनेचे सातत्य
टिकवून ठेवावे व प्रार्थनेला महत्वाचे स्थान देऊन दररोज एक कुटुंब म्हणून
एकत्रितपणे प्रार्थना करावी म्हणून आपण प्रार्थना करू या.
५. हे
सर्वशक्तिमान पित्या, जे लोक आजारी, दु:खी-कष्टी आणि
सकंटग्रस्त आहेत अश्या सर्वांना प्रभूच्या दयेचा आणि मायेचा स्पर्श व्हावा व त्यांचे जीवन पुन्हा एकदा प्रभू प्रेमाने बहरावे म्हणून
आपण प्रार्थना करू या.
६. आता थोडा वेळ
शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक गरजा ईश्वर चरणी समर्पित करू या.
Dear brothers. I am happy that you have started posting marathi homilies. Congrates n keep it up. God bless your mission.
ReplyDeleteGood Thoughts, keep it up.
ReplyDeleteBravo....very good.
ReplyDeleteHey bros....congrats people...you guys are doing amazing....
ReplyDeletebravo br.....very gd,god bless u,keep it up.
ReplyDeletegood and nice thoughts
ReplyDeletegood work bro.John.
ReplyDeleteCongrats dear Br. John! Keep it up! God bless you!
ReplyDeletenice work congrats to your hard work............Keep it up.........
ReplyDeletewell done!!!! we are proud of you
ReplyDeletegood work brother
ReplyDeleteIt is a very good beginning. Today's homily on prayer is just beautiful. Good anecdote with nice explanation. Homily. Prayers of faithful are really handy. Thanks Fathers and Brothers.
ReplyDeleteDear John....y
ReplyDeletewell done
why this kolavari
Good homily. Best wishes from Fr. Michael fernandes
ReplyDelete