Tuesday, 1 October 2013

Malcolm Dinis hails from Our Lady of Lourdes Church, Uttan-Pali, Bhayander. He belongs to the St. Bonaventure Capuchin Province of Maharashtra. Having imbibed in Franciscan spirit, Malcolm is known for his homilies that are praxis oriented and faith based.  Presently, he is pursuing his Theological studies in Jnana Deepa Vidyapeeth, Pune.




सामान्यकाळातील सत्ताविसावा रविवार.
दिनांक:०६/१०/२०१३.
                                          
  वर्ष-
ह्बाक़्क़ुक, :-, :-.
तिमथि, : -, १३-१४.
लूक, १७:-१०.
"प्रभो आमचा विश्वास वाढवा."

प्रस्तावना:

'विश्वास' हा आजच्या उपासनेचा मुख्य विषय आहे. विश्वास म्हणजे धर्मज्ञान नव्हे तर ती एक वृत्ती आहे. मनाचा कल आहे. त्यात बुद्धी, मनभावना इच्छाशक्ती ही सारी गुतMMलेली आहेत. अपुरा विश्वास आपल्याला कधीच पूर्ण निकाल देऊ शकत नाही कारण तो संशयी असतो.
"पण त्याने काही धरता विश्वासाने मागावे, कारण संशयी असतो. लोटलेल्या उचबळलेल्या समूद्राच्या लाटेसारखा आहे. असा माणूस बुद्धीचा असून आपल्या सर्व कार्यात चचल असतो. आपणाला प्रभूचा काही मिळेल असे त्याने समजू नये."
संत थॉमस अक़्वायनस ह्या ख्रिस्ती तत्वज्ञाने विश्वासाची व्याखा पुढीलप्रमाणे केली. "परमेश्वर आपल्या कृपेने मानवाची इच्छाशक्ती चालवतो आणि मग त्या इच्छाशक्तीच्या प्रभावाने बुद्धी एखाद्या दैवी सत्याला मान्यता देते म्हणजे देवाचे अस्तित्व मान्य करणे हाच खरा विश्वास होय." आजच्या तिनही वाचनात 'विश्वासाचे' महत्व पटवून दिले आहे. ''न्यायाचा सुर्य उगवू दे, नीतीचा प्रकाश पसरू दे, माणूसकीचा दिप उजळू दे प्रभो. विश्वात विश्वासाचा सूर्योद्य होऊ दे.''

सम्यक विवरण:
पहिले वाचन:
संदेष्टाचा काळ हा इस्त्रायलाच्या इतिहासात अत्यंत महत्वाचा काळ होता. समुद्राच्या लाटांनी किनारा धुऊन काढावा तसे हे संदेष्टे समाज धुऊन काढीत. लोकांना कराराची आठवण करून देणे आणि हदयातून परमेश्वराशी नाते जोडणे ह्याकडे संदेष्टाचा कल होता. अन्यायाविरूध्द सतत झटणे व सर्वत्र सत्याची भाषा वापरल्यामुळे ते वाईट लोकांच्या नजरेत अप्रिय होते पण परमेश्वराच्या नजरेत प्रिय व अनमोल होते.
आजच्या पहिल्या वाचनात आपण बघतो की, हबाक्कूक संदेष्टा लोकांवर झालेल्या अन्यायाविरूध्द देवाजवळ तक्रार करतो. परंतू परमेश्वर म्हणतो, ''घाबरू नकोस, हा दृष्टांत नेमिलेल्या समयासाठी आहे, त्यास विलंब लागला तरी त्याची वाट पाहा, तो येईलच त्याला विलंब लागावयाचा नाही कारण धार्मिक मनुष्य आपल्या विश्वासाने वाचेल.''
दुसरे वाचन:
आजच्या दुस-या वाचनात संत पौल सांगतो कि ''आपल्या विश्वासात सात्विकतेची, सात्विकतेत ज्ञानाची, ज्ञानात इंद्रियदमनाची, इंद्रियदमनात धीराची, धीरात सुभक्तीची, सुभक्तीत बंधुप्रेमाची व बंधुप्रेमात प्रीतीची भर घाला.'' (१पेत्र१:५-७). संत पौल, येशू ख्रिस्त हाच तारणारा व प्रभू असल्याचे घोषित करतो. संत पौल आपल्या साक्षीद्वारे जगभर पसरत असलेल्या ख्रिस्तसभेने आपला  विश्वास गमावू नये असे आर्वाजून आव्हान करीत आहे. देवाने आपल्याला भित्रेपणाचा नव्हे, तर  सामर्थ्याचा, प्रीतीचा व सयंमाचा आत्मा दिला आहे म्हणून येशूख्रिस्ताठायी असलेला विश्वास व प्रीती दृढ ठेवण्यास आव्हान करतो.
शुभवर्तमान (१:५-१०):
दींनासाठी दीन होऊन दींनामध्ये अवतरलेल्या दींनाचा एकमेव कैवारी म्हणजे येशूख्रिस्त अशी ख्रिस्ताची ओळख करून देणारे लुकलिखित शुभवर्तमान 'विश्वासाचे' प्रेरणास्थान आहे. प्रभू येशू ख्रिस्त हाच आपल्या समस्या सोडवू शकतो म्हणून त्यांच्यावरती विश्वास ठेवा व विश्वास वाढवा हाच संदेश संत लूक आपल्या लोकांना देत आहे.
संत लूक हा हेल्लेणी समाजातील ग्रीक वैद्य (कलस्सै४:१४). स्वभावाने दयाळू व गोरगरिबांविषयी सहानुभूती दाखवणारा तो माणूस होता. जरी तो सुशिक्षित व श्रीमंत होता तरी मनाने व हदयाने गरीब होता. पौलाचा शिष्य म्हणून आदय ख्रिस्तसभेत कार्य करणारा हा संत लूक, स्वत:च गरिबांचा वाली होता. लूकच्या शुभवर्तमानाचा दृष्टीकोन फार व्यापक आहे. येशूख्रिस्त हा विश्वासाचा गुरू आहे व जर आपण त्याच्यावर संपूर्ण मनाने व हदयाने विश्वास ठेवला जर आपण कधीच अंधकारात चालणार नाही तर आपण प्रकाशाचे दूत बनतो व अशक्य गोष्टी शक्य करू शकतो हाच संदेश संत लूकला आजच्या शुभवर्तमानातून सिद्ध करायचा आहे.
१.प्रेषितांच्या विनंतीचा संबंध (१७:१-७):
जेव्हा आपला विश्वास आंधळा होतो तेव्हा तो आपोआप मरून जातो ह्याच्यावर प्रेषितांचा ठाम विश्वास होता. म्हणूनच ओवी ५ मध्ये आपण बघतो की प्रेषित प्रभूला म्हणाले, “आमचा विश्वास वाढवा.” ‘समुद्रात टाकावे’ (१७:२) हा वाक्यप्रचार आणि ‘समुद्रात लाविली जा’ (१७:६) दर्शवितात की, ओवी ५-६ ह्यांचा समावेश मागच्या उता-यामधून झाला आहे जो प्रेषितामध्ये विश्वासाची विनंती निर्माण करतो.
लहांनातील एकाला आकलन करणे व क्षमा करण्यासाठी तयार असणे हा प्रेषितांचा विनंतीसाठी संबंध निर्माण करतो. कारण आमच्याकडे पुरेसा विश्वास नसल्यामुळे आम्ही काहीच करू शकत नाही अशी त्यांची धारणा होती आणि म्हणूनच, '' प्रभूजी, आमचा विश्वास वाढवा'' ही विनंती करण्यास त्यांना भाग पाडले.
२. विनंतीला होकार व मोहरीच्या दाण्याचे महत्व (ओवी६):
येशूख्रिस्ताने मोहरीच्या दाण्याची तुलना विश्वासाबरोबर केलेली आहे. माणसाचा विश्वास जर मोहरीच्या दाण्याऐवढा उत्तम दर्जाचा असेल तर त्यांची कामगिरी भक्कम राहील व तो त्याच्या जीवनात कामगिरी बजावेल (लूक, १३:१९). ख्रिस्ताने प्रेषितांच्या विनंतीला मोठ्या विश्वासाचे आश्वासन दिले नाही, कारण विश्वासाची विपुलता महत्वाची नसून त्याचा दर्जा महत्वाचा आहे. म्हणजेच काडीमात्र विश्वासातून पूर्ण विश्व उभारण्याचे सामर्थ्य प्रभू येशू ख्रिस्त आपल्यामध्ये निर्माण करीत आहे.
आजच्या दाखल्यातून संत लूक ख्रिस्तसभेच्या नेत्यांना एकच आव्हान करीत आहे की, त्यांनी त्यांच्या सेवेचा मोबदल्याचा विचार न करता आपण सेवा करणारे दास आहोत आणि फक्त परमेश्वराची कृपा आम्हाला चांगले दास बनवू शकते जेणेकरून आपण आपले कार्य एकनिष्ठेने करून ख-या विश्वासाची घोषणा प्रकट करू शकतो.

मनन- चितंन (जीवनध्येय):
''विश्वास म्हणजे केवळ ईश्वर भक्ती नाही, तर विश्व प्रेम आणि मानवसेवा ही त्या विश्वाची अविभाज्य अंगे आहेत.'' विश्वास हा मानव व देव ह्यामधील घनिष्ठ नातं आहे. जसे झाडाला वाढण्यासाठी खत व पाण्याची गरज असते तसेच माणसाला जीवनात पुढे जगण्यासाठी विश्वासाची व प्रेमाची गरज असते. देवाची इच्छा हीच आहे की, ज्याला त्याने पाठविले त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवावा (योहान,६:२९). म्हणजेच ख्रिस्तीलोकांचा खरा उद्‌देश येशूख्रिस्तावर विश्वास ठेवणे हा होय. कारण नियमशास्त्रांतील कर्मा वाचून मनुष्य विश्वासाने नीतिमान ठरतो ( रोम,३:२८; गलती, २:१६,३:८, २४). माझे नितीमत्व, माझे स्वत:चे नव्हे तर ते ख्रिस्तावरील विश्वासाने प्राप्त होणारे म्हणजे देवापासून प्राप्त होणारे नितीमत्व असे असावे (फिलीप्प,३:९;रोम,३:२२). येशू ख्रिस्त सागंतो की, विश्वासाची विपुलता महत्वाची नसून त्यांचा दर्जा महत्वाचा आहे. जर तुमच्याकडे मोहरीच्या दाण्याऐवढा विश्वास जरी असला तर तुम्हाला काहीच असाध्य होणार नाही (मत्तय, १७:२०).
बायबलमध्ये, विश्वास आणि प्रामाणिकपणा हे छोट्या गोष्टीद्वारे जोडले गेलेले आहेत. ''जो अगदी थोडक्याविषयी विश्वासू असतो तो पुष्कळविषयीही विश्वासू आहे.'' (लूक,१६:१०; मत्तय,२५:२१). विश्वासाचे संचलन एकटा माणूस करू शकत नाही कारण विश्वास हा सामुदायिकांचा मुख्य व मजबूत घटक आहे. आपण जीवनामध्ये एकमेंकावर विश्वास ठेवतो म्हणूनच आपले व कुंटुबियांचे संगोपण केले जाते. जर आपण विश्वास गमावून बसलो तर मग तेथे संशयाचे, ढोंगीपणाचे, अशांततेची वलय निर्माण होतात व आपण ऐकमेकांना  अडथळे निर्माण करतो व ख-या प्रेमाचा व आपुलकीचा आनंद गमावून बसतो. म्हणूनच परमेश्वराच्या वचनाप्रमाणे दिवसभर वर्तन करणे हेच ख-या ख्रिस्ती माणसाच्या विश्वासाचे प्रतिक आहे. ख्रिस्तावर विश्वास ठेवणारा मनुष्य कधीही अंधकारात चालत नाही तर तो प्रकाशाचा दुत बनतो. आपला येशूख्रिस्तावरील विश्वास डगमगत असेल तर प्रेषिताप्रमाणे आपण सुध्दा म्हणूया, ''प्रभो आमचा विश्वास वाढवा.'' 
आजच्या युगात विचारसरणीवर खूप भार घातला जातो व जीवनात विश्वासाला द्वितीय स्थान प्राप्त झाले आहे, अशा ह्या जगात आपण वावरत असताना आपली श्रध्दा व आपला विश्वास किती दृढ आहे याची आपण चाचणी केली पाहिजे. कारण, ''जो विश्वासात जगेल तो, स्वर्गीय नदंनवनात पात्र होईल व जो अविश्वासात चालतो तो नरकाच्या अंधकारास पात्र होईल.

बोध कथा:
१. एक विद्‌वान प्रोफेसर होता. जे बुध्दीला पटेल तेच मी मानणार अशी त्याची विचारधारणा होती. एकदा रस्त्यांने जात असताना त्याला एक शेतकरी शेतामध्ये काम करताना दिसला. प्रोफेसरने त्याला प्रश्न केला, ''काय रे शेतक-या, तुझ्या बुध्दीला जे पटत नाही त्यावर तू विश्वास ठेवतोस काय?'' शेतकरी म्हणाला, ''होय साहेब, मी विश्वास ठेवतो. तुम्ही विश्वास ठेवता काय?'' प्रोफेसर म्हणाला, ''माझ्या बुध्दीला जे पटत नाही त्यावर मी मुळीच विश्वास ठेवत नाही.'' शेतक-याने त्या प्रोफेसरला प्रश्न केला, ''प्रोफेसर साहेब, या माझ्या शेतात एक गाय, एक कोबंडी आणि एक मेंढरू हे तीन प्राणी चरत आहेत. एकाच कुरणात, एकाच अन्नावर तिघेही चरत आहेत, हे तुम्ही पाहता. मग मला असं सांगा की, हे तीनही प्राणी एकाच अन्नावर चरत असताना गाईच्या अंगावर केस, कोबंडीच्या अंगावर पिसे आणि मेंढराच्या अंगावर लोकर हे कसं काय?'' या प्रश्नाचे उत्तर तो प्रोफेसर देऊ शकला नाही. तो मानखाली घालून तेथून निघून गेला. सर्वच गोष्टी आपल्या बुध्दीला कळल्याच पाहिजेत असा आग्रह धरणे हे शहाणपणाचं लक्षण नाही. या विश्वाच्या गोष्टी आपल्या बुध्दीच्या, दृष्टीच्या, स्पर्शाच्या पलिकडे आहेत. त्या रासायनिक प्रयोगशाळेत सिध्द्‌ करता येत नाहीत. तरी देखील त्याचे अस्तित्व आपल्याला मान्य करावं लागतं.
२. श्री थाँमस हे एक दिवस एका महत्वाच्या कामासाठी पुण्याला निघाले होते. बसमधून उतरल्यानतंर एका ठिकाणी खूप गर्दी जमल्याचे त्यांनी पाहिले. एका मुलाला दुचाकीने ठोखर देऊन रक्तबंबाळ केले होते. तो मुलगा तेथे तडफडत असताना थाँमसनी पाहिला. त्यांनी तात्काळ रिक्षा करून त्या तरूणाला हाँस्पिटलमध्ये नेले व त्याच्या घरी फोन करून कुटुंबियांना कळविले. अशाप्रकारे थाँमस ह्यांनी ख्रिस्ती ह्या नात्याने आपला शेजारधर्म दाखविला. म्हणूनच येशूख्रिस्त म्हणतो की, आपली मनोवृत्ती जगापेक्षा वेगळी असायला हवी, त्याने म्हटले आहे, 'आम्ही निरूपयोगी दास आहोंत, आम्ही आमचे कर्तव्य केले आहे, असे म्हणा'(१७:१०).

विश्वासू लोकांच्या प्रार्थना.
आपले उत्तर:: नम्र होऊनी प्रभू तुज करितो प्रार्थना.
१. ख्रिस्तसभेचे अधिकारी पोप महाशय, सर्व बिशप, धर्मगुरू व व्रतस्थ बंधू व भगिनी जे ख्रिस्ताच्या मळ्यात कार्य करतात त्यांचा विश्वास बळकट व्हावा व इतरांचा विश्वास त्यांनी बळकट करावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. विश्वासाची जडणघडण व मूल्यांची जोपासना करण्याचे महत्वाचे काम हे कुटुंबाचे असते. ही महत्वाची जबाबदारी पार पाडण्यास प्रत्येक कुटुंबाला प्रेरणा व कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. ख्रिस्ताच्या मळ्यात करण्यासाठी आपल्या परिसरातील अनेक तरूण-तरूणींना पुढे येण्यास पवित्र आत्म्याची प्रेरणा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. आपल्या धर्मग्रामात जे लोक वेगवेगळ्या आजाराने पछाडलेले आहेत त्यांना परमेश्वराच्या कृपेचा अनुभव यावा आणि नवजीवनाची वाट त्यांना दिसावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. आपल्या स्वत:च्या कौटुंबिक हेतूंसाठी तसेच वैयक्तिक गरजांसाठी शांत राहून आपण प्रार्थना करूया. 

13 comments:

  1. All the Best..........God Bless You and let your word inspire many

    ReplyDelete
  2. फादर आपले मनपूर्वक अभिनंदन. मराठी भाषेमध्ये आपल्या प्रवचनच्या ब्लॉगला हार्दिक शुभेछा.

    ReplyDelete
  3. Dude simply rocking....God bless thy efforts... Do Continue.. Best of luck....

    ReplyDelete
  4. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  5. hi,br.u have done gd job,may God bless u.

    ReplyDelete
  6. Dear Bro
    Congrates
    God bless you

    ReplyDelete