Leon D’Britto hails from St. Joseph
Church, Umrala, Vasai. He belongs to the St. Bonaventure Capuchin Province,
Maharashtra. Presently, he is pursuing his theological studies at JDV, Pune. As
he is passionate reader and creative thinker he likes to venture in the new field
of knowledge. This homily comes to us with Theological reflection with a biblical
perspective.
सामान्य
काळातील चौतिसावा रविवार
ख्रिस्तराजाचा सण
२४/११/२०१३
पहिले
वाचन - २ शमुवेल ५:१-३
दुसरे
वाचन – कलस्सेंकरांस पत्र १:१२-२०
शुभवर्तमान
- लूक २३:३५-४३
प्रस्तावना
आज ख्रिस्तसभा
ख्रिस्तराजाचा सण साजरा करीत आहे
व आपणा सर्वांस
पुन्हा एकदा आठवण
करून देत आहे
कि ख्रिस्त हाच
खरा राजा आहे.
तो राजांचा राजा
आहे. तो फक्त
ह्या विश्वाचा राजा
नसून तो आपल्या
कुटुंबाचा, आपल्या शरिराचा, आत्म्याचा
व प्रत्येक इंद्रियांचा
राजा आहे. आजच्या
पहिल्या वाचनात इस्रायली प्रजा
दावीद राज्याकडे कशी
येते व दावीद
राजा हा एक
अखंड इस्राएलचा राजा
कसा बनतो ह्याचे
वर्णन ऐकतो. आजच्या
शुभवर्तमानात राजांचा राजा येशूख्रिस्त
ह्याची वधस्तंभावर कश्या प्रकारे
चेष्टा मस्करी व हाल
करण्यात येतात आणि अश्या
प्रसंगात सुद्धा येशू एका
चोराला कश्या प्रकारे त्याच्या
तारणाचे आश्वासन देतो हे
आपण पाहतो .
आज हा
ख्रिस्तराजाचा सण साजरा करित असताना ज्याप्रकारे इस्राएल
प्रजेने दावीद राज्याकडे येऊन
'आमचा राजा बना' अशी विनवणी
केली त्याचप्रमाणे आपणदेखील
ह्या मिस्साबलीदानात सहभागी
होत असताना राजांचा राजा प्रभू येशूकडे
विनंती करूया की त्याने आपल्याला
त्याची प्रजा म्हणून स्विकार करावा
व त्याच्या राज्यात
प्रवेश द्यावा.
पहिले वाचन = २ शमुवेल ५:१-३.
पहिले वाचन = २ शमुवेल ५:१-३.
दाविद ह्याला यहुद्याचा
राजा म्हणून अभिषिक्त
केले होते व
वरील वाचनात आपण
ऐकतो की उत्तरेकडील
राजे सुद्धा दावीद
राजाकडे येतात व त्याला
आपला राजा मानतात
. अश्याप्रकारे यहुदा व इस्राएल
हि राज्य एकत्रित
झाल्यामुळे दावीद राजाचे राज्य
खऱ्या अर्थाने पूर्ण होते. कारण
यहुदा व इस्राएल
ह्यांच्या एकत्र येण्याने याकोबाच्या
बारा मुलांचे, बारा
वंश एका छत्राखाली
आले व
त्यामुळे एक राष्ट्र
,एक राजा आणि
एक प्रजा असे
ऐक्य साधले गेले.
शुभवर्तमान
=
लूक २३:३५-४३
एकाबाजूला सर्व येशू
हा यहूद्यांचा राजा
आहे असे म्हणत
त्याची थट्टा मस्करी करतात
तर दुसऱ्याबाजूला येशूबरोबर
वधस्तंभी खिळलेल्या दोन चोरांपैकी
एक चोर त्या
वधस्तंभावर खिळलेल्या त्या राजांच्या राजाची व त्याच्या
राज्यांची मस्करी न करता
त्यावर विश्वास ठेवतो व
येशूला म्हणतो "तू आपल्या
राजाधीकाराने येशील तेव्हा माझी आठवण
कर". तेव्हा येशु त्या
चोराला म्हणतो "तू आज
माझ्याबरोबर सुखलोकात असशील". अश्याप्रकारे
त्या चोराने येशूवर
दाखवलेल्या विश्वासाचे फळ म्हणून त्याला
येशूच्या राज्यांत प्रवेश मिळतो
.
सम्यक विवरण
सणाची
पाश्वभूमी-
ख्रिस्तराजाचा सण हा
विसाव्या शतकात सुरु झाला. पोप पायस अकरावे
ह्यांनी हा सण
१९२५ पासून सुरु
केला. त्या वेळेस
संपूर्ण युरोपमध्ये सेक्युलरिसम व
हुकुमशाहीचा प्रभाव वाढत होता.
बहुतेक ख्रिस्ती भाविक ह्या
सेक्युलरिसम व हुकुमशाहीला
बळी पडत होते
तसेच ह्या वाईट
प्रभावामुळे लोकांनी ख्रिस्ताच्या अधिकारावर
व चर्चच्या नेत्यांच्या
अधिकारावर प्रश्नचिन्ह उभे करण्यास
सुरुवात केली होती. अशावेळी :
१. ख्रिस्तसभा ही पूर्णपणे
स्वतंत्र आहे व
ती कुणाच्या गुलामगिरीत
नाही.
२. इतर देशांनी
व त्यांच्या नेत्यांनी
ख्रिस्ताला योग्य असा आदर
दयावा.
३. सर्व भाविकांनी
समजावे की ख्रिस्त
हा आपल्या सर्वांचा
खरा राजा आहे
व त्याचा आपल्यावर
पूर्णपणे अधिकार आहे, आपण
त्याच्या अधिपत्याखाली येतो. हे समजावून
देण्यासाठी ह्या
सणाची सुरवात करण्यात
आली.
जरी ख्रिस्तराजाचा
सण साजरा करण्यास
विसाव्या शतकात सुरवात झाली
तरी येशू हा
आपला राजा आहे,
तो सर्व राजांचा
राजा आहे हे
नव्या करारात विविध
ठिकाणी विविध प्रकारे नमुद
करण्यात आले आहे.
उदा:- "तू राजा
आहेस काय ?" (योहान
१८:३६-३७),
"सनातन, अविनाशी, अदृश्य राजा
" (१तिमथि १:१७),
"आपण इस्रायेलाचा राजे आहा
" (योहान १:४९,मत्तय २७:४२,मार्क १५:३२),
"यहुद्यांचा राजा जन्मास
आला तो कोठे
आहे?" (मत्तय २:२,मत्तय २७:११,योहान १८:३३-३७), "राजांचा राजा
व प्रभूचा प्रभू" (१ तिमथि ६:१५,प्रकटीकरण १९:१६)
, " विश्वसनीय साक्षी, मेलेल्यांतून प्रथम
जन्मलेला व पृथ्वीवरील
राज्यांचा अधिपती" (प्रकटीकरण१:५).
पहिले ख्रिस्ती लोक
येशूची बरोबरी किंवा तुलना
भाकीत केलेल्या यहुद्यांच्या
तारणाऱ्याशी (मसीहा ) करत. मसीहा
किंवा ख्रिस्त ह्या
शब्दाचा अर्थ 'अभिषिक्त
केलेला' जो इस्राएली
प्रजेला भाकीत केल्याप्रमाणे रोमन
गुलामगिरीतून बाहेर काढणारा व
त्यांचे तारण करणारा
असा होतो. लोकांचा
विश्वास होता की
येशू त्यांची रोमन अधिपत्यातून
सुटका करील, परंतु
येशू लोकांना रोमन
गुलामगिरीतून नाही तर
पापांच्या व मृत्युच्या गुलामगिरीतून काढण्यासाठी
व सर्वांना स्वातंत्र
देण्यासाठी आला होता.
आजच्या एकविसाव्या शतकात
जरी रोमन केथोलिक
चर्च बरोबर इतर
पंथ ख्रिस्तराजाचा सण
साजरा करतात तरी
बहुतेक ख्रिस्ती पंथ हा
सण साजरा करत
नाही. कारण त्यांचे
मत असे आहे
कि एखाद्याचे राजेपद
स्विकारणे म्हणजेच त्याच्या गुलामगिरीचा स्वीकार
करणे. जेव्हा आपण
ख्रिस्त हा आपला
राजा आहे असे
म्हणू तेव्हा आपल्याला
स्वतंत्र नाही व
आपण आपले जीवन
गुलामगिरीत जगत आहोत
असे होईल.(बहुतेकसे
राजे क्रूर असल्यामुळे
गुलामगिरीत असताना अथवा एखाद्या
राजाच्या अधिपत्याखाली असताना लोकांचा छळ
व पिळवणूक होत
असे.) परंतु येशूख्रिस्त
व त्याचे राज्य
ह्या जगातील राज्यांपेक्षा
वेगळे आहे. येशूचे
राजेपद हे सौम्यता,
नम्रता, प्रेम व सेवा
ह्या मुल्यावर आधारीत
आहे. "परराष्ट्रीयांत सत्ताधारी म्हणून जे
मानलेले आहेत ते
त्यांच्यावर जुलूम करितात व
त्यांचे वरिष्ठ लोक त्यांच्यावर
अधिकार चालवितात, हे तुम्हाला
ठाऊक आहे; परंतु
तुमची गोष्ट तशी
नाही; तर जो
तुम्हामध्ये मोठा होऊ
पाहतो त्याने तुमचा
सेवक झाला पाहिजे;
आणि जो कोणी
तुम्हामध्ये पहिला होऊ पाहतो
त्याने सर्वांचा सेवक झाला पाहिजे
कारण मनुष्याचा पुत्रही
सेवा करून घ्यावयास
नाही तर सेवा
करावयास व अनेकांच्या
मुक्तीसाठी आपला जीव
खंडणी म्हणून अर्पण
करावयास आला आहे."(मार्क १०:४२-४५). "तू यहुद्यांचा
राजा आहेस काय?
येशूने उत्तर दिले, माझे
राज्य ह्या जगाचे
नाही, माझे राज्य
ह्या जगाचे असते
तर मी यहुद्यांच्या
स्वाधीन केला जाऊ
नये म्हणून माझ्या
सेवकांनी लढाई केली असती;
परंतु आता माझे
राज्य येथले नाही
. ह्यावरून पिलात त्यास म्हणाला,
तर तू राजा
आहेस काय? येशूने
उत्तर दिले, मी
राजा आहे असे
आपण म्हणता. मी
ह्यासाठी जल्मलो आहे व
ह्यासाठी जगात आलो
आहे की, मी
सत्याविषयी साक्ष द्यावी."(योहान
१८:३३b,३६-३७). येशूख्रिस्ताला
माहीत होते की
ह्या जगाचे राजे
लोकांना छळतात व त्यांची
पिळवणूक करतात. अश्यावेळी येशु
स्वतःच्या राजेपदाने एक राजा
कसा असावा ह्याचा
आदर्श आपल्यासमोर मांडतो. नम्रता,
सौम्यता, सेवा, प्रेम हे
मुल्ये त्याच्या राजेपदाची अविभाज्य
भाग होती. त्याने
आपल्या अनुयायांना दुसऱ्यावर आपला हक्क
न चालवता त्यांची
सेवा करण्याची आज्ञा
दिली. जेव्हा आपण
ख्रिस्तराजाचा सण साजरा
करतो तेव्हा आपण
जो त्याच्या लोकांना
गुलामगिरीत ठेवतो अश्या
राजांचा नव्हे तर जो
त्याच्या प्रजेला स्वातंत्र देतो, त्यांच्यासाठी
मरण पत्करण्यासाठी तयार
असतो व त्यांच्या
सेवेसाठी तत्पर असतो अश्या
राजाचा सण साजरा करतो.
बोध कथा=
१. एकदा
एक राजा एका
गरीब शेतकऱ्याच्या मुलीच्या
प्रेमात पडला. त्याला माहित
होते की त्या
मुलीशी लग्न करणे
हे जवळ जवळ
अशक्य आहे कारण
राजाचे लग्न शाही
कुटुंबात होत असे
व ते साध्या
गरीब मुलीशी लग्न
करत नसत. परंतु
राजाला ह्याचीसुद्धा कल्पना होती की समजा त्याला
पाहिजेच असेल तर
तो त्याच्या अधिकाराने
त्या मुलीशी लग्न
करू शकतो.
परंतु आता प्रश्न
असा होता की
जर राजाने त्या
मुलीशी लग्न केले
तर ते दोघे
सुखी जीवन जगु
शकतील का? त्या
मुलीसाठी तो राजा
असल्यामुळे तीने त्याच्याकडे
आदराने पाहिले असते व एक
प्रियकर ह्या नात्याने
पहिले नसते. दोघांच्या
राहणीमानात सुद्धा जमीन आसमानाचा
फरक असल्या कारणांने
एकमेकांशी जुळवून घेणे कठीण
झाले असते. ह्या
समस्येवर मात करण्यासाठी
राजाला एक युक्ती
सुचली. त्याने ठरवले: 'मी
माझे राजेपद सोडून
एक साधा शेतकरी
बनेन व त्या
मुलीचे प्रेम जिंकीन'. असा
विचार करत असताना
त्याला चांगलेच ठाऊक होते
की एका गरीब,
साध्या मुलीसाठी राजेपद सोडून शेतकरी
बनण्याचा निर्णय त्याला संकटात
टाकू शकतो. एका
बाजूला त्याचे राजेपद जाईल
तर दुसऱ्या बाजूला
ती मुलगी राजाच्या
प्रेमाचा स्विकार करेलच ह्याची
हमी नव्हती. परंतु
त्याचे त्या मुलीवर
इतके प्रेम होते
की तो तिच्याविना
राहू शकला नाही
व त्याने आपले
राजेपद सोडून त्या मुलीचे
प्रेम जिंकण्यासाठी एक
शेतकरी बनला. (ह्या गोष्टीत
तो राजा आपला
देव आहे तर
ती मुलगी आपण
सर्व आहोत .)
२. १९६५च्या
एप्रिल महिन्यात अमेरिकेचे अध्यक्ष
अब्राहम लिंकन ह्यांना मारण्यात
आले व त्यानंतर त्यांचा
मृतदेह Washington ला नेत असताना Giorgione शहरात काही तासांसाठी
ठेवला होता. अब्राहम
लिंकन ह्यांचे शेवटचे
दर्शन घेण्यासाठी बरेचशे
लोक येत होते.
त्या लोकांत एक
गरीब बाई तिच्या
मुलासोबत आली होती. ती बाई जेव्हा
त्या मृतदेहापाशी येते
तेव्हा ती आपल्या
मुलाला वर उचलते
व म्हणते 'माझ्या
मुला ह्या माणसाला
नीट पाहा ह्या
भल्या माणसाने आपला
प्राण तुझ्या व
माझ्यासाठी अर्पण केला.
मनन चिंतन
१. जेव्हा
येशूला वधस्तंभावर खिळले गेले
तेव्हा येशूच्या
दोन्ही बाजूला दोन चोरांनासुद्धा वधस्तंभावर खिळले गेले
होते. प्रत्येकाचा पाहण्याचा
दृष्टीकोन जसा वेगळा
असतो तसाच ह्या
दोन चोरांचासुद्धा येशूकडे
पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा होता.
त्यातील एक चोर
येशूला डीवचत व त्याची
निंदा करत म्हणत
होता, "तू ख्रिस्त
आहेस ना? तर
स्वताला व आम्हाला
वाचव". परंतु दुसरा चोर
त्याचा निषेध करीत म्हणतो,
"तुलाही तीच शिक्षा
झाली असता तु
देवाला सुद्धा भीत नाहीस
काय? आपली शिक्षा
तर यथानायक आहे;
कारण आपण आपल्या
कृत्यांचे फळ भोगीत
आहोत; परंतु ह्यांनी
काहीच अयोग्य केले
नाही". (लूक २३:३९-४१).
दोघे चोर
होते, दोघांना सारखीच
शिक्षा झाली होती.
ह्याचबरोबर त्यांनी येशूविषयी काय
बोलवे ह्याचे पूर्ण स्वतंत्र त्यांच्याकडे होते
परंतु दोघांच्या मुखातून
येशूविषयी निघालेले उदगार पूर्णपणे
वेगळे होते. देवाने
आपल्याला स्वतंत्र दिले आहे
व तो त्या
स्वतंत्र्याचा पूर्णपणे आदर राखतो.
आपला देव आपल्या
सर्वांना पापाबद्दल पश्चाताप
करण्याचा व त्याच्या
राज्यात प्रवेष करण्याचा आवाहन
करतो. परंतु ह्या आवाहनावर
दुर्लक्ष करून आपण
ज्याप्रकारे जीवन जगत
आहोत त्याचप्रकारे जीवन
जगण्याचेही स्वतंत्र देतो. त्यामुळे
प्रभूने दिलेल्या कृपेचा व
दानाचा स्वीकार करून येशूच्या
राज्यात प्रवेश करावा कि
नाही? येशूला आपला
राजा म्हणून स्वीकारावा
कि नाही? हे
आपल्यावर अवलंबून
आहे .
२.
येशूख्रिस्ताविषयी
पिलाताने वधस्तंभावर लिहीले "यहुद्यांचा
राजा नासोरी येशू"
परंतु येशू केवळ
यहुद्यांचा राजा नसून
तो साऱ्या विश्वाचा
व सर्व राजांचा
राजा आहे. लोक सोन्याला
धातूंचा राजा म्हणतात
कारण सोने सर्व
धातूंपेक्षा मौल्यवान आहे. तसेच
सिंहाला प्राण्यांचा राजा म्हणतात
कारण तो सर्वापेक्षा
बेडर व शूर
आहे तसेच सचिन
तेंडुलकरला क्रिकेटचा राजा म्हणतात
कारण त्याने ह्या
खेळावर वर्चस्व गाजवले. थोडक्यात
जो एखाद्या क्षेत्रात
त्याचा सर्वश्रेष्ठपणा सिद्ध करतो त्याला
आपण त्या क्षेत्रातला
'राजा' ही पदवी देतो. त्याचप्रमाणे
ह्या विश्वाचा राजा
येशूख्रिस्तच आहे कारण
तो सर्व बाबतीत
सर्वश्रेष्ठ आहे. तो पापांपासून
अलिप्त आहे, तो निर्माणकर्ता
आहे व ह्या
विश्वात जे काही
आहे त्यावर त्याचा
अधिकार आहे त्यामुळे
तो ह्या विश्वाचा
राजा आहे तसेच सर्व राजांचा राजा
आहे.
विश्वासू लोकांच्या
प्रार्थना
प्रतिसाद = हे
राजांच्या
राजा
आमची प्रार्थना ऐक
१ आपण
परमगुरुस्वामी, महागुरुस्वामी, सर्व धर्मगुरू
व धर्म भगिनींसाठी
प्रार्थना करू या,
जेणेकरून त्यांनी आपल्या श्रध्येत
दृढ होऊन आपल्याला
प्रभूच्या राज्यात प्रवेश करण्यास
मार्गदर्शन करावे.
२ आपण
सर्व राजकीय नेत्यांसाठी
प्रार्थना करू या
जेणेकरून त्यांनी राजांच्या राजा प्रभू
येशू ख्रिस्त ह्याचा
आदर्श घेऊन त्यांचे
जीवन लोकांच्या सेवेसाठी
समर्पित करावे .
३
आज आपण श्रद्धा
वर्षाचा सांगता
करत असताना आपण
आपला राजा प्रभू
येशू ख्रिस्तावरील श्रद्येत अधिक दृढ व्हावे
व आपल्या जीवनात त्याला
पूर्णपणे अनुसरावे .
४ जे
कोणी देवापासून दूर गेले आहेत त्यांच्यासाठी
प्रार्थना करू या,
जेणेकरून त्यांनी मागे वळून
परत एकदा येशूला
आपला राजा म्हणून
स्वीकारावे व आपले
जीवन प्रभूची सुवार्ता
पसरविण्यासाठी समर्पित
करावे.
५ आपण
आपल्या वयक्तिक गरजांसाठी प्रार्थना
करू या .
good one bro. keep it up!
ReplyDeleteCongrats Leon!! Good thoughts Long live Christ the King!
ReplyDeleteWell done! Excellent work. Keep it up. All the best.
ReplyDeleteleon bhau abhinandan keep it up
ReplyDeleteWonderful keep it up
ReplyDeleteGood and well reflected sermon
ReplyDeleteGood Bro.Leon, Very inspiring... Keep it up. God bless you...
ReplyDeleteWELL WRITTEN. CONGRTAS.
ReplyDelete