Thursday, 27 June 2019


Reflection for the Homily of 13th SUNDAY IN ORDINARY TIME (30-06-19) By Br. David Godinho











सामान्य  काळातील  तेरावा रविवार




दिनांक: ३०/ / २०१९
पहिले वाचन : राजे १९:१६,१९-२१
दुसरे वाचन :  गलतिकारास पत्र : ,१३-१८
शुभवर्तमान : लूक : ५१-६२





माझ्या मागे या

प्रस्तावना :

आज देऊळमाता सामान्य काळातील तेरावा रविवार साजरा करीत आहे आणि आजची उपासना शिष्यत्व (DISCIPLESHIP) ह्या विषयावर मनन चिंतन करण्यास आपणांस पाचारण करीत आहे.
 राज्याच्या पहिल्या पुस्तकातुन घेतलेल्या पहिल्या वाचनात अलिशाला झालेल्या पाचरणाविषयी आपणांस ऐकावयास मिळते. गलतिकरास लिहिलेल्या पत्रात संत पौल आपणांस सांगत आहे कि, जर आपण पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आणि मार्गदर्शनाने चाललो, तर आपण खरोखर प्रभू ख्रिस्ताचे खरे शिष्य बनू शकतो. तर शुभवर्तमानात   प्रभू येशू ख्रिस्त आपणांस त्याचे शिष्य  होण्यास पाचारण करीत आहे. परंतु ख्रिस्ताचे एकनिष्ठ शिष्य होणे तेवढे सोपे नाही, त्यासाठी विनाअट आणि दृढ निश्चयाची नितांत गरज आहे.
ख्रिस्ताने दिलेल्या हाकेस स्वखुशीने आणि दृढ निश्चयाने होकार देण्यास पवित्र आत्म्याची कृपा आपण ह्या पवित्र मिस्साबलिदाना मध्ये आपण मागुया.

सम्यक विवरण:

पहिले वाचन : राजे १९: १६,१९-२१

अलिशाला झालेल्या पाचारण विषयी आपण राजे ह्या पुस्तकातून घेतलेल्या  उताऱ्यात आपणांस ऐकावयास मिळते. अलिशाला खरोखरी अभिषेक केला नसला तरी, एलियाचा झगा आपल्याला मिळेल हेच त्याच्यामागे जाण्याचे निमंत्रण आहे असे समजून अलिशाने घरच्या लोकांचा निरोप घेण्यासाठी थोडा अवधी मागून घेतला. त्यावर एलियाने थोडक्यात गूढ उत्तर दिले. त्यातून त्याची विनंती मान्य केल्याचे दिसते. अशा प्रकारे एलियानंतर परमेश्वराचा शिष्य होण्यास  अलिशाला झालेले  पाचारण ह्या उताऱ्यात मुद्रित केले आहे.

दुसरे वाचन:  गलतिकारास पत्र : ,१३-१८

          पौलाचे गल्तीकरांस लिहिलेले पत्र त्याच्या स्वतंत्र्याची आठवण करून देत आहे. तो म्हणतो, “तुम्हांला स्वायत्तता करीता पाचारण झाले” आणि म्हणून गुलाम गिरित पडू नका असा इशारा संत पौल गलतीकरांस करीत आहे. देहस्वभावाच्या ताब्यात राहू नका. ख्रिस्तामधील स्वातंत्र्य म्हणजे मनास येईल तसे वागण्यास मोकळीक असे नसून; एकमेकांची प्रीतीने सेवा करणे होय. कारण देहस्वभाव हा अत्यंत स्वार्थी व विध्वंसक आहे आणि ह्या स्वभावाने वागणे म्हणजे मंडळीचा नाशच आहे असे होय.
म्हणून आपले रोजचे जीवन जगत असताना पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनावर आणि सामर्थ्यावर अवलंबून राहिल्या खेरीज पवित्र आत्मा आपणास चालवीत नाही. जो मनुष्य पवित्र आत्म्याच्या नियंत्रणाचा आपल्या इच्छेने स्वीकार करतो तो देह्वासनेने चालणारच नाही. म्हणून या नियंत्रणाचा दररोज व क्षणोक्षणी स्वीकार करीत राहण्याची गरज आहे.  

शुभवर्तमान : लूक : ५१-६२

          वधस्तंभावरचे लज्जास्पद दुःखसहन व मरण यासाठीच ख्रिस्त येशू या जगात आला होता. हि त्याच्या पित्याची इच्छा होती. त्याप्रमाणे करण्याचा त्याने दृठ निश्चय केला व यरुशलेमेच्या दिशेने आपल्या शिष्यांसह तो प्रवासाला निघाला. लुकचा अध्याय ९:५१ ते १९:४४ हा भाग यरुशलेमेच्याकडे वाटचाल ह्या शीर्षकाने ओळखला जातो. ह्या भागात दोन महत्वाचे मोठे विषय आहेत.
१)    येशु आणि धार्मिक अधिकारी ह्याच्या मधील ताणतणावाचे वातावरण
२)    येशूला त्याच्या शिष्यांना त्याच्या (येशूच्या) मरणासाठी तयार करण्याची आवश्यकता.
  येशू येरुश्लेमच्या दिशेने म्हणजेच त्याच्या क्रूसावरील मरणाच्या दिशेने वाटचाल करीत असताना त्याच्या शिष्यांना कशाप्रकारे खरे शिष्य ते होऊ शकतात ह्या विषयी मार्ग दर्शन करतो. येशूचा खरा शिष्य होण्यासाठी स्वतःला रिक्त केले पाहिजे.  स्वतःच्या इच्छा-आकांक्षा बाजूला सारून ख्रिस्ताने शिकविलेल्या मूल्यावर चालणे गरजेचे आहे व हे करताना आपल्याला कितीतरी समस्यांना सामोरे जावे लागेल हे मात्र निश्चित आहे.

बोधकथा:

          युनायटेड स्टेटच्या civil war (नागरी उद्धाला) सुरु होते तेंव्हा अब्राह्म लिंकन ने काही नेत्यांना प्रार्थनेसाठी आणि तदनंतर नाश्त्यासाठी बोलावले होते. लिंकन हे जरी चर्चमध्ये प्रार्थनेला जात नसत तरी सुद्धा ते एक अंधश्र्दावंत ख्रिस्ती व्यक्ती होता. त्याचा देवावर दृढ विश्वास होता. जेव्हा अब्राह्म लिंकन ने प्रार्थनेला सुरुवात केली तेव्हा त्यातल्या एका नेत्याने मध्येच लिंकनला म्हटले, “राष्ट्रपती, परमेश्वर आपल्या बाजूला असावा म्हणून आपण प्रार्थना करूया.” एवढ्यात राष्ट्रपती लिंकन ने त्या नेत्याला प्रतिसाद देत म्हटले, “नाही, आपण तशी प्रार्थना न करता, आपण देवाच्या बाजूने असावे अशी प्रार्थना  करूया.”
          प्रार्थना झाल्यानंतर जमलेल्या नेत्यांना सल्ला देत असताना लिंकन म्हणाले, ‘ धर्म हे असे साधन नाही कि ज्याद्वारे देव आपल्या इच्छेप्रमाणे सर्व काही करतो; परंतु आपणास देवाच्या इच्छेप्रमाणे वागण्यास आणि जगण्यासाठी एक आमंत्रण आहे. त्याचप्रमाणे ख्रिस्ताचे खरे अनुयायी होण्यासाठी ख्रिस्ताच्या मूल्याप्रमाणे जगण्यास आणि वागण्यास आपण शिकलो पाहिजे.      

मनन चिंतन :

“आम्ही शिष्य प्रभूचे
एक शरीरी, एकच आत्मा
त्याच्याच प्रती प्रतीछायेचे”


सुंदर अशा गीताच्या ह्या काही ओवी आहेत आणि ह्या ओवी शिष्त्वा बद्दल भरपूर अस काही आपणांस शिकवतात किवा बोध करतात. ख्रिस्ताचे शिष्य होण्यासाठी म्हणजेस प्रतीख्रिस्त होण्यास आमंत्रण करतात. ख्रिस्ताचे शरीर आणि त्याचा आत्मा होणे म्हणजे जणू ख्रिस्तालाच धारण करणे होय.
आजची वाचणे आपणास शिष्यत्वा किवा अनुयाया विषयी बोलत आहेत. येशू ख्रिस्ताला अनुसरणे म्हणजे नक्की काय? असा प्रश्न बऱ्याच वेळा आपल्या मनात घर करून बसतो. कदाचित आपल्यापैकी काही लोकांना ख्रिस्ताच्या मार्गावरून चालणे  किवा शिष्य होणे म्हणजे ख्रिस्तसभेचे नियम पाळणे किवा पाप न करण्याची दक्षता घेणे होय. जरी नियम पाळणे किवा पाप करण्याच्या संधी टाळणे हे ख्रिस्ताचा मार्ग अवलंब करण्याचे किवा शिष्य होण्याचे एकमेव साधन आहे असे आपण खात्रीपूर्वक सांगू शकत नाही.
नवीन करारात आपणांस पुन्हा पुन्हा सागण्यात आलेले आहे कि, आपण ख्रिस्ताशी एकरूप झालो पाहिजे त्याच्याशी सलग्न असलो पाहिजे. कारण तो आपल्याशी एकरूप आहे. अनेक वेळा विशेष करून ख्रिस्ताच्या स्नानसंस्कारा वेळी आणि त्याच्या रूपांतरावेळी आकाशातून पित्याची वाणी ऐकण्यास त्याचा संदेश आपल्या जीवनात अवगत करण्यास, त्याने दिलेल्या शिकवणुकीचा कित्ता आपण गिरवण्यास आपणांस आजची उपासना जागृत आहे. ख्रिस्ता बरोबर चालण्यास, त्याचे ऐकण्यास त्याच्या वाणीनुसार आमचे जीवन घडविण्यास आपणास आमंत्रित  केले आहे. ख्रिस्ताचा शिष्य बनणे किवा त्याचा मार्ग अनुसरणे म्हणजे ख्रिस्ताला आपल्या जीवनात प्रत्येक गोष्टीत म्हणजेच आपले विचार, शब्द, किंबहुना आपले संपूर्ण जीवन ख्रिस्ताच्या सारखे झाले पाहिजे ह्या साठी आपण प्रयत्नशील राहिलो पाहिजे.
ख्रिस्ताला अनुसरणे इतके सोपे नाही. अनेक वेळा आपण ख्रिस्ती आहोत किवा ख्रिस्ताचे शिष्य आहोत म्हणून आपल्याला नाकारले जाईल. हे प्रभू ख्रिस्त स्वत: आपणास सांगत आहे. ख्रिस्ताचा शिष्य होण्यास किवा त्याचा पाठलाग करण्यासाठी आपल्या समोर काही अटि ठेवण्यात आलेल्या आहेत.
१. पहिली अट: लुक ९:५७ -५८
वाटेने जात असता एक मनुष्य येशूला म्हणाला, “आपण जाता तेथे मी आपल्या मागे येईन” येशूचे उत्तर सरळ आणि स्पष्ट होते. जो मनुष्य येशूच्या मागे जाऊ इच्छितो त्याने एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे, ती म्हणजे ऐश्वर्यात जगणे नव्हे तर गरिबीत जगणे म्हणजेच जीवनात देवावर अवलंबून राहणे होय.
२. दुसरी अट: लुक ९:५९-६०
दुसऱ्या एकाला तो म्हणाला, “माझ्या मागे ये” हेच शब्द ख्रिस्ताने त्याच्या पहिल्या शिष्यासाठी उद्गारले होते (मार्क: १:१७,२०; २:१४). ह्या आमंत्रणाला त्या वक्तीचा प्रतिसाद सकारात्मक होता. परंतु तो म्हणतो, “प्रभुजी अगोदर माझ्या वडिलांचं मृत देह दफन कारायला मला जाऊ दया”. परंतु येशूचे उत्तर थोडे कठोर आहे. तो म्हणतो, “जे स्वतः मेलेल्यांत जमा आहेत अशांनी मेलेल्यांना पुरावे. तू मात्र देवराज्याची घोषणा करू लाग. ह्याचा अर्थ असा कि, प्रभू येशूचा शिष्य होण्याचा निर्णय हा ठाम असला पाहिजे. त्याने पुन्हा मागे वळून पाहता कामा नये.
३.तिसरी अट:लुक ९:६१-६२
मग आणखी एकजण म्हणाला, “मी आपला अनुयायी होतो पण प्रथम मला घरच्यांचा निरोप घेऊ दया” आणि पुन्हा एकदा येशूचा प्रतिसाद हा स्पष्ट व सरळ आहे. तो म्हणजे “एकदा नांगर हातात धरल्यावर मागे पाहत राहणारा देवराज्याच्या उपयोगाचा नाही. येथे हा एलिया प्रवकत्या पेक्षा खूपच आव्हानात्मक आहे हे आपणांस दिसून येते.
ख्रिस्ताच्या मागे जाणे म्हणजे स्वतःला विनाअट, येशूच्या कार्यात झोकावून देणे. ह्या जगातील कोणत्याही भौतिक गोष्टी पेक्षा प्रभू येशूला सर्वात प्रथम स्थान देणे. त्याच्या हाकेला जीवनातील प्रत्येक प्रसंगी (चांगल्या किवा वाईट) होकार देणे व प्राधान्य देणे होय. 

विश्वासु लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: हे प्रभू, आम्हाला तुझे शिष्य बनव.

१. आपल्या ख्रिस्तसभेचे अधिकारी पोप फ्रान्सीस, सर्व बिशप्स, धर्मगुरू आणि व्रतस्थ बंधू-भगिनी ह्यांनी येशू ख्रिस्त हा खरा गुरु आहे आणि आपण सर्वजण त्याचे शिष्य आहोत ह्याची जाणीव लोकांना करून द्यावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. अनेक तरुण-तरुणींनी ख्रिस्ताची “माझ्या मागे या” हि हाक एकूण त्याचा शिष्य होण्यास स्व:खुशीने पुढे यावे व ह्या त्याच्या निर्णयाला आई-वडिलांनी प्रोत्साहन दयावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. जी मुलं शाळेत आणि कॉलेजात शिकत आहेत अशांना त्यांच्या अभ्यासात प्रभूने सहाय्य करावे आणि चांगले नागरिक होण्यास त्यांना योग्य ती कृपाशक्ती लाभावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. जी तरुण पीडी आपल्या भावी आयुष्याची तैयारी करीत आहेत, त्यांनी आपल्या कलागुणा व क्षमते नुसार योग्य त्या करियरची निवड करावी जेणेकरून ते जीवनात सुखी-समाधानी राहू शकतील म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. आपणास ह्या वर्षी चांगला पाउस मिळावा व आपल्या प्राथमिक गरजा भागवल्या जाव्यात म्हणून आपण विशेष प्रार्थना करूया.
६. येथे जमलेल्या आपणा प्रत्येकाला येशूचे खरे व विश्वासू शिष्य होण्यासाठी आपणांस प्रेरणा मिळावी म्हणून आपण परमेश्वराकडे प्रार्थना करूया.
७. थोडा वेळ शांत राहून आपल्या व्यक्तीक आणि सामाजिक गरजा ख्रिस्ता समोर मांडूया.