सामान्य काळातील बाविसावा रविवार
दिनांक: २८ /०८ /२०२२
पहिले वाचन: बेनसिरा ३: १९–२१, ३०–३१
दुसरे वाचन: इब्री लोकांस पत्र
१२: १८–१९, २२–२८
शुभवर्तमान: लूक १४ : १,७–१४.
प्रस्तावना:
आज देऊळ माता सामान्य काळातील बाविसावा रविवार साजरा करत आहे. आजची उपासना
आपल्याला नम्रतेचा उत्तम असा धडा शिकवत आहे. नम्रता म्हणजे काय, व ती आपण आपल्या जीवनात कशा प्रकारे आचरणात आणावी, नम्र कसे बनावे व त्याचे होणारे फायदे याबद्दल आज आपल्याला आजच्या उपासनेतून
ऐकावयास मिळत आहे.
बेनसिराच्या
पुस्तकातून घेतलेल्या आजच्या पहिल्या वाचनात सांगण्यात येत आहे कि, या धरतीवरती पुष्कळ असे
नामांकित लोक आहेत, जे जगामध्ये खूप प्रसिद्ध आहेत परंतु अशा लोकांना प्रभू येशूचे
रहस्य प्रकट होत नाही. तर ती रहस्ये विनयशील व नम्र जनांस प्रकट होतात. दुसरे वाचन
हे इब्री लोकांस पत्र यातून घेतलेले आहे. हे वाचन आपल्याला जीवनात येणारे दुःख आणि छळ ह्यांना ख्रिस्ताच्या शिकवणुकीप्रमाणे फायद्याच्या
प्रकाशात कसे पाहिले पाहिजे हे स्पष्ट करते. लुककृत शुभवर्तमानात प्रभू येशू आपल्याला नम्रता ह्या गुणाचे होणारे फायदे ह्या विषयी
सांगत आहे. अशीच नम्रता आपण आपल्या जीवनात अनुसरून ख्रिस्ताची शिकवण जगभरात पसरावी
म्हणून ह्या मिस्साबलिदानात प्रार्थना करूया.
मनन चिंतन :
“जो
ऐकतो व ते आचरणात आणतो त्याचे जीवन किती आनंदी आहे. कारण आपले ऐकणे हे बीज पेरणे
आहे, आणि आपली कृती हे त्या बीजाचे फळ आहे”. (संत ऑगस्टीन)
ख्रिस्ताठायी
माझ्या प्रिय भाविकांनो, आज आपल्याला प्रभू येशू ख्रिस्त नम्रतेचा धडा शिकवत आहे.
येशू म्हणतो “जो कोणी स्व:ताला उंच करतो, तो नमवला जाईल आणि जो कोणी स्व:ताला नमवतो तो उंच केला जाईल”. ह्याचे स्पष्ट उदाहरण
म्हणजेच पौलाचे फिलीप्पेकरांस पत्र २;६-७:
“तो
देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही, तर त्याने स्व:ताला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतीरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले”. आपन नवीन करारात
पहिले तर आपल्याला कळून चुकेल कि परुशी नियमशास्त्रात चांगले हुशार होते व देवाचे योग्य असे त्यांना ज्ञान होते. आजचे शुभवर्तमान वाचल्यानंतर
आपल्याला कळणार कि परुशी जे येशूचा विरोध करत होते त्यांनीच येशूला भोजनासाठी आमंत्रण दिले होते. परंतु
प्रभू येशूने परुशाचे आमंत्रण नाकारले नाही. कारण तो सर्वांसाठी तारण आणण्यासाठी
या धरतीवर आला होता. परुशाच्या भोजनाच्या वेळी पाहुण्यांना वयोमानानुसार नव्हे तर
त्यांच्या मानाने व दर्जानुसार बसवण्याची प्रथा त्या काळी होती. येशूने पाहिले की
सर्व पाहुण्यांनी प्रथम स्थान घेण्याचा कसा प्रयत्न केला. विशेष करून परुशी, कारण
त्यांना खात्री होती की त्यांचा प्रथम स्थानांवर अधिकार आहे व त्यांच्या
मानानुसार व दर्जानुसार देवाच्या
राज्यात प्रवेश होणे हे खात्रीचे आहे. एक
प्राचीन म्हण आहे. “महत्त्वाच्या व्यक्तींसाठी ठेवलेली राखीव जागा केव्हा घेऊ नका”. अशीच शिकवण आपण नितीसुत्रे पुस्तकात वाचतो. (नितीसुत्रे २५:७)
“तुला खालच्या जागी बसविण्यात यावे, त्यापेक्षा वर येवून बैस असे तुला म्हणावे हे
बरे”.
आज
प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला संदेश देत आहे कि गर्व आपल्याला स्वार्थी बनवतो. कोण
कोणापेक्षा महान, हुशार, अशी आपण
एकमेकाबरोबर तुलना करायला लागतो. आपण नैसर्गिकरित्या इतरांकडून ओळख आणि सन्मान मिळवण्याचा प्रयत्न करतो आणि
याचा परिणाम म्हणून आपण आपल्या जीवनात अपयशआणतो. परंतु येशू म्हणतो की जे स्वत:ची
प्रशंसा शोधतात त्यांना नम्र केले जाईल, तर जे इतरांना प्रथम स्थान देतात ते उच्च केले जातात. ख्रिस्ती धर्माची सर्वोच्च शिकवण किंवा आवाहन म्हणजे प्रथम
इतरांना, स्वतःहून अधिक महत्त्व देणे, व लोकांना त्यांच्या जीवनात प्रोत्साहित करणे. म्हणूनच शास्त्र म्हणते,
(याकोबाचे पत्र ४:६) देव गर्विष्टांना विरोध करितो, आणि लीनांवर कृपा करितो. आजचे
शुभवर्तमान आपल्याला सांगते, देवाच्या शक्तिशाली हाथाखाली स्वतःला नम्र करा,
जेणेकरून तो तुम्हाला योग्य वेळी उंच करेल. करुणा, दयाळूपणा,
नम्रता, सौम्यता आणि संयम धारण करा. कारण
जेव्हा जीवनात गर्विष्ठपणा येतो तेव्हा त्याच्याबरोबर बदनामी सुद्धा येते. प्रभू येशूच्या
शिकवणुकीत प्रेम आणि नम्रपणा ह्यांना सर्वात उच्च स्थान आहे. म्हणून आज प्रभू येशू
ख्रिस्त आपल्याला नम्र होण्यासाठी बोलावत आहे. नम्र माणूस कधीही उतावीळ, किंवा अस्वस्थ नसतो, परंतु नेहमी शांत असतो. नम्र मनुष्य नेहमी निश्चिंत असतो कारण असे काहीही
नाही जे त्याचे मन हलवू शकेल.
विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद:
‘हे परमेश्वरा, आमची प्रार्थना ऐक’
१) आपले पोप
फ्रान्सीस, सर्व बिशप्स,
धर्मगुरू व व्रतस्थ बंधुभगिनी यांना त्यांच्या प्रेषितीय कार्य
करण्यासाठी तुझी कृपा दे त्याच प्रमाणे त्यांना नम्र हृद्य दे.
२) आपल्या
समाज्यात, कुटुंबात व धर्मग्रामात प्रत्येक व्यक्तीला
समानतेची व सन्मानाची वागणूक मिळावी म्हणून प्रार्थना करूया.
३) समाजात वावरत
असताना, आपण ख्रिस्ती म्हणून इतरापर्यंत नम्रतेची
शिकवण आपल्या वागन्याद्वारे द्यावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
४) आपल्या
धर्मग्रामात जे कोणी आजारी असतील, त्यांना
परमेश्वराने स्पर्श करावा, त्यांना चांगले आरोग्य द्यावे
म्हणून प्रार्थना करूया.
५) अति पावसामुळे
कितेकांची घरे उद्वस्त झाली आहेत, परमेश्वराने त्याच्या सांभाळ करावा आणि
त्याच्या गरजा पुरवाव्यात म्हणून आपण प्रार्थना करूया.
६) थोडा वेळ
शांत राहून आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक
व सामाजिक हेतूंसाठी प्रार्थना करूया.
No comments:
Post a Comment