Reflections for the homily of 21st Sunday in Ordinary Time (21-08-2022) by Br. Justin Dhavade.
सामान्य काळातील एकविसावा रविवार
पहिले वाचन: यशया ६६:१८-२१
दुसरे वाचन: ईब्री लोकांस पत्र १२:०५-१३
शुभवर्तमान: लूक १३:२२-३०
प्रस्तावना
आपल्या प्रत्येकाच्या मरणानंतर न्याय होणार
आहे, आणि त्या न्यायाद्वारे
आपण स्वर्गात जावे अशी प्रभू येशू
ख्रिस्ताची इच्छा आहे म्हणूनच ख्रिस्त
आजच्या वाचनामध्ये आपल्या प्रत्येकाला अरुंद दरवाजाने आज जाण्यास
सांगत आहे तो अरुंद दरवाजा म्हणजे नीतीचा आणि पवित्रतेचा मार्ग आहे. तो मार्ग
स्वीकारण्यास आणि त्याद्वारे वाटचाल करण्यास प्रभू येशूने आपणाला कृपाशक्ती व
सामर्थ्य द्यावं म्हणून ह्या पवित्र मिस्साबलिदानामध्ये आपण प्रार्थना करूया.
मनन चिंतन
येशूचे अनुकरण करणे सोपे
नाही. परंतु त्याच्या कार्यासाठी मजबूत होण्यासाठी आपण स्वतःला प्रशिक्षित केले
पाहिजे. जर आपण येशूच्या काळात त्याचे अनुसरण
करणाऱ्या लोकांकडे पाहिले तर आपणास कळून चुकेल कि, त्याच्या
प्रेमाच्या संदेशाकडे आकर्षित झालेल्या अनेक लोकांना त्याने बरे केले आणि
एका नवीन जीवनाची आशा त्यांच्यामध्ये निर्माण केली. परंतु जेव्हा त्यांनी येशू ख्रिस्ताची कठीण शिकवण ऐकली, विशेष करून स्वतःचा
क्रूस उचलून त्याला अनुसरणे, तेव्हा अनेकजणांनी त्याच्या शिक्षणाला
सकारात्मक उत्तर दिले नाही तर त्याच्या पासून दूर गेले. कारण खऱ्या शिष्यत्वाची शिकवण कठीण आहे असे त्यांना
वाटले. जे त्याला खरोखर ओळखतात आणि प्रेम करतात तेच त्याच्या आजूबाजूला
राहिले.
जे लोक येशूला
सोडून गेले किंवा विरोध करून गेले, त्यांना खरोखर त्याचे शिष्य व्हायचे नव्हते. येशूने
पित्याची इच्छा पूर्ण करणे हेच त्याचे ध्येय
आणि त्याच्या शिष्यांचे कार्य म्हणून प्रचार केला. परंतु काहीजणांच्या स्वतःच्या इच्छा आकांशा होत्या. अनेकजण येशूच्या
मागे फक्त काहीतरी मिळवण्याच्या इच्छेने आले होते, तर काहीजण त्यांच्या वाईट
परिस्थितीतून सुटका मिळावी म्हणून.
आजच्या लुकलिखित
शुभवर्तमानात १३ व्या अध्यायातील तीन बोधकथांपैकी तिसरी बोधकथा म्हणजे अरुंद
मार्ग. जी देवाच्या राज्याद्वारे आणलेल्या अनपेक्षित बदलांच्या विषयाशी संबंधित आहे.
इतर दोन बोधकथा मोठ्या झाडात वाढणारया मोहरीच्या छोट्याश्या दाण्याबद्दल
आणि थोड्या प्रमाणात पीठ वाढवणाऱ्या
खमिराबद्दल आहेत. ह्या तिन्ही बोधकथा देवाच्या राज्याबद्दल आहेत.
आजच्या
शुभवर्तमानातील कथेद्वारे आपणाला कळून चुकते की येशू
जेरुसलेमला जात असताना लोकांना शिकवत आहे. आणि तिथेच जमावाच्या एका
प्रश्नामुळे येशूला भविष्यसूचक विधान करण्याची संधी मिळते. संत लुक आपल्या शुभवर्तमानात
या प्रश्नाचे साधन अनेक वेळा वापरतो. उदाहरणार्थ, एक
व्यक्ती जी येशूला विचारते, “सार्वकालिक जीवनाचा वारसा मिळण्यासाठी
मी काय केले पाहिजे?” तेव्हा त्याला येशू चांगल्या शमरोनीची कथा सांगतो आणि
म्हणतो कि, जाऊन तुही तसेच कर.
प्रभू येशूला आपणास एवढेच
सांगायचे आहे की, अरुंद
दरवाजातून आत जाण्यासाठी उरलेल्या वेळेत प्रयत्न करणे आवश्यक आहे कारण बरेच लोक आत
जाण्याचा प्रयत्न करतील. परंतु ते पुरेसे मजबूत नसतील. त्यानंतर तो दुसर्या
दरवाजाबद्दलच्या दृष्टांताविषयी सांगतो कि, एकदा घर मालकाने घरात प्रवेश करून जर आतून
दार लावले की इतरांना आत जाण्याचा कोणताही मार्ग राहणार नाही आणि जर तुम्ही
दार ठोठावले तरी तो आतून म्हणेल की , “मी
तुम्हांला ओळखत नाही”.
पोप फ्रान्सिस
यांनी एका मुलाच्या संमतीने त्याचा प्रश्न प्रेक्षकांसोबत मांडला, “मुलगा म्हणाला, ‘थोड्या वेळापूर्वी माझे वडील मरण पावले. माझे वडील अविश्वासू होते. परंतु
त्यांनी चारही मुलांचा बाप्तिस्मा करून घेतला. ते चांगले होते. तर माझे वडील स्वर्गात
आहेत का?’’ पोप साहेबांनी त्या मुलाला उत्तर दिले कि, जो
स्वर्गात जातो तो देव आहे. पोप साहेब पुढे मुलांना म्हणाला, “देव कसा आहे याचा
विचार करा. विशेषतः देवाचे हृदय कोणत्या प्रकारचे आहे: तुम्हाला काय वाटते?
देवाला वडिलाचे हृदय आहे का? आणि तुमचा पिता जो विश्वास ठेवणारा
नव्हता, परंतु त्याने आपल्या मुलांचा बाप्तिस्मा केला आणि एक
चांगला माणूस बनला. देव त्याला स्वतःपासून दूर सोडू शकेल, असे तुम्हाला वाटते का?
आपली मुले चांगली असताना देव सोडून देतो का?”
तेव्हा सर्व मुले ओरडली, “नाही”. तेव्हा पोपने मुलाला
सांगितले, ‘तेथे, इमॅन्युएल, हेच उत्तर
आहे,’ म्हणजे आम्हा बारोबर देव. देवाला तुमच्या वडिलांचा
नक्कीच अभिमान होता आणि तुम्हालाही असायला पाहिजे, कारण तो
एक चांगला माणूस होता ज्याने आपल्या मुलांसाठी काय चांगले हवे होते ते केले.’
पोप फ्रान्सिस आपल्याला
आठवण करून देतात की, स्वर्गात कोण जाणार हा प्रश्न आपण देवावर
सोडला पाहिजे. हा आमच्यासाठी उत्तर देण्याचा प्रश्न नाही. देवाला आपल्याकडून काय
हवे आहे याची आपल्याला काळजी वाटली पाहिजे. तो आपल्यासमोर कोणता प्रवेशद्वार ठेवत
आहे हे आपल्याला जाणून घेतले पाहिजे.
आपण स्वतःस
प्रश्न विचारू या: मी माझ्या विश्वासाच्या जीवनात जाणीवपूर्वक प्रयत्न कसे करत
आहे? येशूचे अनुसरण
करताना मला कोणत्या अडचणी आल्या? माझ्या
आयुष्यात असे कोणी आहे की ज्याला त्याच्या विश्वासाच्या प्रवासात
काही प्रोत्साहनाची गरज आहे?
विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: हे प्रभू आमची प्रार्थना ऐक.
१. हे प्रभू ख्रिस्तसभेचे अधिकारी पोप महाशय, बिशप्स व सर्व धर्मगुरू ह्यांना तुझ्या पवित्र हृदयी सुरक्षित
ठेव. आध्यात्मिक व शारीरिक अशा सर्व आपत्तीपासून तू त्यांचे संरक्षण कर व सर्वांशी
प्रेमाने, नम्रतेने व आपुलकीने वागण्यासाठी तू त्यांना
आध्यात्मिक शक्ती दे.
२. हे दयावंत परमेश्वरा, तुझा
चांगुलपणा अमर्याद आहे, आज आम्ही जे लोक आजारी, दुखी कष्टी, निराशी व संकटग्रस्त आहेत अशा सर्व
लोकांना परमेश्वरी कृपेचा अनुभव यावा त्यांचे जीवन पुन्हा एकदा प्रभू प्रेमाने
बहरावे म्हणून प्रार्थना करतो.
३. हे येशू तू कामगारांचा मित्र व सोबती आहेस म्हणून जे सर्व प्रकारच्या
शारीरिक व बौद्धिक कामात गुंतलेले आहेत त्यांच्या सर्व गरजा व योजना पूर्णत्वास
नेण्यास त्यांना मदत कर, व
जे लोक वैफल्य, नैराश्य आणि संघर्ष ह्यांनी ग्रस्त झालेले
आहेत त्यांना तुझ्या सार्वकालिक शांतीचे वरदान दे.
४. हे प्रभू स्वर्गाकडे जाणारा अरुंद मार्ग जरी कठीण असला तरी त्यावर चालण्यास
आम्हां सर्वाना तुझी कृपाशक्ती आणि सामर्थ्य दे जेणेकरून आम्हाला तारणप्राप्ती होईल.
५.आता आपण थोडावेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक व कौटुंबिक हेतूंसाठी ईश्वरचरणी
प्रार्थना करूया.
No comments:
Post a Comment