Reflections for the 20th Sunday in Ordinary Time (20/08/2023) by Br. Rackson Dinis
सामान्य काळातील विसावा
रविवार
दिनांक: २०/०८/२०२३
पहिले वाचन: यशया ५६:१, ६-७
दुसरे वाचन: रोमकरांस पत्र ११:१३-१५, २९-३२
शुभवर्तमान: मत्तय १५:२१-२८
"विश्वास तुम्हाला वाचवणार"
प्रस्तावना:
आज
सामान्य
काळातील
विसावा
रविवार
आपण
साजरा
करीत
आहोत.
आजची
तिन्ही
पवित्र
वाचनातून
आपल्याला
कळून
चुकते
की
परमेश्वर
हा
सर्वांचे
तारण
करण्यासाठी
या
भूतलावर
आला
आहे.
परमेश्वराला
जात-पात
धर्म
नाही.
तो
सर्वांवर
एकसमान
प्रेम
करतो.
परमेश्वर
सर्वांवरती
सूर्य
उगवतो.
त्याच्या
प्रेमाला
अंत
नाही.
आजच्या
वाचनातून
आपल्याला
कळून
चुकेल
की
देवाला
सर्वच
प्रिय
आहेत.
आणि
देवाची
एकच
इच्छा
आहे
ती
म्हणजे
सर्व
मनुष्याचे
धर्मीय
- अधर्मीय सर्वच
लोकांचे
तारण
व्हावे
व
ह्या
तारणासाठी
इलाज
(औषध) फक्त
विश्वास
आहे.
पहिल्या
वाचनात
यशया
सांगतो
की, देवाच्या
प्रेमापासून
कोणीही
वंचित
नाही.
कोणालाही
वगळले
नाही.
दुसऱ्या
वाचनात
संत
पौल
आम्हांस
आठवण
करून
देतो
की, देवाच्या
करूणेला
अंत
नाही, ती
अटळ
आहे.
तसेच
शुभवर्तमानात
एक
विधर्मी
बाई
प्रभू
येशूच्या
परीक्षेत
पास
होते, विश्वासास
पात्र
ठरते.
आपण
सुद्धा
या
पवित्र
मिस्सात
सहभागी
होत
असताना, श्रद्धेने
त्याच्या
पदकमली
जाऊया
व
त्याच्या
प्रेमाचा
अनुभव
घेऊ
या.
मनन चिंतन
अनेक
धर्म
- अनेक प्रथा
अनेक
जाती
- अनेक भाषा
एकच
झाड
- अनेक भाग
एकच
देव
- भिन्न विश्वास
इलाज
"विश्वास" - नवजीवनाचा
बघणार चमत्कार तारणाचा…
ख्रिस्ता
ठायी
जमलेल्या
माझ्या
प्रिय
बंधू
आणि
भगिनींनो.
ह्या
संपूर्ण
जगात
अनेक
जाती
-
धर्माचे
लोक
वस्ती
करत
आहेत.
आपण
पाहतो
आपल्या
शेजारी
हिंदू
किंवा
मुस्लिम
असे
कुटुंब
राहत
असणार
आणि
त्यांचा
विश्वास
आपला
विश्वासापासून
भिन्न
असणार.
अशाच
प्रकारचे
चित्र
आपल्याला
आजच्या
वाचना
मध्ये
दिसून
येते.
प्रभू
येशू
पहिल्या
वाचनात
म्हणतो, जो
कोणी
माझ्या
न्यायाचे
पालन
करतो.
व विदेशी
असून
पवित्र
जीवन
जगतो
व
अपवित्रपणा
टाळतो
त्या
सर्वांचे
मी
प्रार्थना
मंदिरात
स्वागत
करीन
कारण
माझे
मंदिर
हे
सर्व
राष्ट्रांसाठी
प्रार्थना
मंदिर
आहे.
तसेच
दुसऱ्या
वाचनात
आपण
पाहतो
संत
पॉल
हा
सुद्धा
परराष्ट्रियांचा
प्रेषित
होता.
तो
विदेशी
लोकांच्या
तारणासाठी
झटत
होता.
तसेच
आजच्या
शुभ
वर्तमानात
आपण
पाहतो
प्रभू
येशू
ख्रिस्त
एक
कनानी
बाई, म्हणजेच
परराष्ट्रीय
बाईच्या
मुलीला
तिच्या
विश्वासाप्रमाणे
बरे
करतो.
होय
माझ्या
प्रिय
बंधूं
आणि
भगिनींनो
प्रभू
येशू
हा
जाती-धर्म
ह्याच्या
पलीकडे
आहे.
कारण
देवाने
प्रत्येक
मनुष्याला
त्याच्या
प्रतिमेप्रमाणे
बनवले
आहे.
मग
तो
हिंदू
मुस्लिम
किंवा
ख्रिश्चन
असो.
कारण
प्रत्येक
व्यक्ती
ही देवाची
आहे, धर्माची
नाही
.
कारण
देवाने
धर्म
बनवला
नाही.
तर
मनुष्य
बनवला
आहे.
व
तो
प्रत्येक
व्यक्तीवर
भरपूर
प्रेम
करतो.
त्याच्या
प्रेमाला
अंत
किंवा
मर्यादा
नाही.
फक्त
एवढेच
प्रत्येक
मनुष्याचे
तारण
ज्याच्या
- त्याच्या विश्वासाप्रमाणे
होईल.
तर
मग
तो
हिंदू
मुस्लिम
किंवा
विदेशी
असो.
कारण
विश्वासाला
सुद्धा
जात
किंवा
धर्म
नाही.
विश्वास
हे
प्रत्येक
व्यक्तीला
दिलेले
अमूलय
दान
(शस्त्र) आहे.
म्हणूनच
आपल्या
तारणासाठी
इलाज
फक्त
“विश्वास”
आहे.
अनेक
धर्माची
वेगवेगळी
शिकवण
आहे
उदाहरणार्थ
करुणा, दया, क्षमा, एकत्रितपणा
आशा
वैगैरे.
परंतु
ह्या
सर्व
धर्मीय
शिकवणुकीचा
निष्कर्ष
(conclusion)
"प्रेम" आहे.
कारण
देव
प्रेम
आहे.
आणि
प्रेमळ
देव
ह्या
अन्न
जातीच्या
धर्माचे
तारण
ज्याच्या
- त्याच्या विश्वासाप्रमाणे
करणार. आमेन.
विश्वासू लोकांच्या प्रार्थना
आपला प्रतिसाद : हे प्रभू दया करून आमची प्रार्थना ऐक.
१) आपल्या धर्माची धुरा वाहणारे आपले परमगुरुस्वामी, महागुरूस्वामी, धर्मगुरू आणि धर्मभागिनी ह्या सर्वाना देव राज्यांची मुल्ये आपल्या शब्दाद्वारे व कृतीद्वारे जगजाहीर करता यावी व त्यासाठी त्यांना परमेश्वराची कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
२) आपण आपल्या कुटुंबातील व मित्र परिवारातील प्रत्येक व्यक्तीला प्रेमाने व सहनशीलतेने समजून घ्यावे व एक आदर्श ख्रिस्ती जीवन जगावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
३)
आमच्या
स्वतःच्या
गरजांसाठी
विश्सेकरून
ज्यांनी
आपल्याला
प्रार्थनेची
विनंती
केली
आहे
अशा
सर्वांची आपण
आता
आठवण
करुया
आणि
त्यांना
प्रभूचा
आशीर्वाद
लाभावा
म्हणून
आपण
विशेष
प्रार्थना
करूया.
४) ख्रिस्ताच्या मळ्यात कार्य करण्यासाठी आपल्या परिसरातील अनेक तरुण-तरुणींना पुढे येण्यास पवित्र आत्म्याची प्रेरणा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
५)
आपण
आपल्या
वैयक्तिक
हेतूसाठी
प्रभूकडे
प्रार्थना
करूया.
No comments:
Post a Comment