Reflection for the 18th SUNDAY IN ORDINARY TIME (04/08/2024) By
Fr. Benjamin Alphonso
सामान्य काळातील अठरावा रविवार
दिनांक – ०४-०८-२०२४
पहिले वाचन: निर्गम १६:२-४, १२-१५
दुसरे वाचन: इफिसकरांस ४: १७, २०-२४
योहान ६: २४-३५
प्रस्तावना
ख्रिस्ताठायी
माझ्या प्रिय बंधू भांगिनिनो, आज
आपण सामान्य काळातील अठरावा रविवार साजरा करीत आहोत. तसेच आज पवित्र देऊळमाता संत
जॉन मेरी वियानीचा सण, (जे सर्व
धर्मगुरूचे आश्रयदाता आहेत) त्याचा सण साजरा करीत आहेत. आजची उपासना आपणास येशू
जीवनाची भाकर आहे ह्यावर विश्वास ठेवून आपली आध्यात्मिक तहान व भूक भागविण्यासाठी
आमंत्रित करत आहे. आजचे पहिले वाचन निर्गम या पुस्तकातून घेतलेले आहे पिता
परमेश्वर इस्त्रायल लोकांची फारोच्या गुलामगिरीतून सुटका करतो. परंतु हीच देवाने
निवडलेली प्रजा परमेश्वराने केलेल्या सर्व उपकाराची आठवण न ठेवता देवाविरुद्ध
तक्रार करतात. इफिसिकरास पत्र ह्या दुसऱ्या वाचनात संत पौल
येशूच्या शिकवणी प्रमाणे चालावे म्हणून सांगत आहे. योहानलिखित शुभवर्तमान
आपणास सांगते की, येशू ख्रिस्त जीवनाची भाकर आहे आणि जो कोणी त्याच्यावर
विश्वास ठेवतो त्याला सर्वकालिक जीवन प्राप्त होते. आजच्या या पवित्र मिस्साबलिदानात आपण
सर्वांसाठी प्रार्थना करूया की, प्रभूयेशू हीच खरी जीवनाची भाकर आहे. यावर आपला विश्वास (दृढ) मजबूत व्हावा. तसेच आज विशेष करून
जगातील सर्व धर्मगुरूंसाठी प्रार्थना करूया.
मनन चिंतन
काही वर्षांपूर्वीची, आपल्या देशात घडलेली सत्य घटना ज्यावेळी म्हणजे 1971 साली जेव्हा
आदरणीय इंदिरा गांधी जेव्हा आपल्या भारत देशाच्या पंतप्रधान होत्या. सन्माननीय इंदिरा
गांधी यांना मदर तेरेजाच कार्य आवडायचं म्हणून एकदा त्या कलकत्त्याला गेल्या
होत्या. तेव्हा त्यांनी अचानक मदर तेरेजा यांच्या
आश्रमाला भेट दिली. मदर तेरेजांना याविषयी कल्पना नव्हती. म्हणून त्या आपल्या
कामात मग्न होत्या इंदिरा गांधी जेव्हा मदरच्या आश्रम मध्ये पोहोचल्या, तेव्हा मदर तेरेजा
कुष्ठरोग्यांच्या घायांची मलमपट्टी करत होत्या व सर्वत्र वाईट दुर्गंधी पसरलेली
होती. त्या दुर्गंधीमुळे तेथे थांबणे कठीण होते. परंतु इंदिरा गांधी त्या ठिकाणी थांबल्या. जेव्हा मदर तेरेजाच काम संपले
तेव्हा इंदिरा गांधी मदर तेरेजांना भेटल्या. तेव्हा इंदिरा गांधी यांनी मदर तेरेसा यांना प्रश्न
विचारला की, हे सर्व कार्य करण्यासाठी तुम्हाला शक्ती कुठून मिळते? तेव्हा मदर तेरेजा
म्हणाल्या, ही शक्ती मला भाकरीतून मिळते. तेव्हा इंदिरा गांधी
यांनी सांगितले मला ती कोणती भाकर आहे ती सांगा म्हणजे मी पाहिजे तर परदेशातून ती
भाकर बनवण्यासाठी गहू आणीन म्हणजे मलाही तुमच्यासारखे कार्य करण्यास शक्ती मिळेल. तेव्हा मदर तेरेजा
म्हणाल्या की ती भाकर साधी नाही, तर आमच्या प्रभू येशूचे शरीर आहे.
मानवी जीवनात शारीरिक गरजे व्यतिरिक्त, आध्यात्मिक गरजा
पूर्ण करण्याची फार गरज आहे. शारीरिक गरजांच्या उपभोगनासाठी सर्वकाही आपल्याकडे आहे. पैशांच्या बळावर आपण
सर्व काही साध्य करू शकतो. परंतु आध्यात्मिक गरजांच्या पूर्ततेसाठी आपल्याला पैशाची
आवश्यकता नाही. बाजारात आपल्याला प्रेम, शांती, क्षमा व आशा मिळत
नाही. या गोष्टी फक्त परमेश्वराच्या सानिध्यात राहूनच मिळू शकतात. आध्यात्मिक
गरजांच्या पूर्ततेसाठी भाविक वेगवेगळ्या धार्मिक स्थळांना भेट देत असतात. बहुतेक वेळा आपण आध्यात्मिक गरजाऐवजी शारीरिक गरजाकडे लक्ष
केंद्रित करत असतो. शारीरिक गरजांच्या आधारावर सर्व काही साध्य होते असा आपला
समज असतो. आपण कधी कधी शारीरिक गरजांनी एवढे भारावून जातो की
परमेश्वराची आठवण आपल्याला येत नाही. आजच्या पहिल्या वाचनात आपण ऐकतो की, प्रभू परमेश्वर पिता
इस्त्रायल लोकांची फारोच्या
गुलामगिरीतून सुटका करतो. परंतु इस्त्रायल प्रजा देवाने केलेला सर्व उकाराची
आठवण न करता देवा विरुद्ध तक्रार करतात. तरीही कृपाळू व दयाळू
देव त्यांना स्वर्गातून मान्ना देतो. त्यांची भूक आणि तहान भागवतो योहानलिखित शुभवर्तमानात आपण
ऐकतो की, यहुदी लोक आपली शारीरिक भूक व तहान भागविण्यासाठी
येशूच्या मागे येतात. येशू त्यांना सांगतो की, स्वर्गीय मान्ना मोशेने नव्हे तर
माझ्या स्वर्गीय पित्याने दिला होता. हा स्वर्गीय मान्ना साधारण नसून, तो मीच आहे. येशू त्यांना समजावून सांगतो की, मीच जीवनाची भाकर
आहे आणि जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो, त्याला सर्वकालिक जीवन प्राप्त होते. येशू म्हणतो मी
मार्ग सत्य आणि जीवन आहे. (योहान १४:६) रोज पवित्र मिस्साबलिदानाच्या वेळेला भाकरीच्या रूपाने येशू आपल्यासमोर येत असतो.ह्यावर आपण
पूर्णपणे विश्वास ठेवतो का? आपण पूर्ण मनाने व
तनाने आणि पवित्र मिसबलिदानात सहभाग घेतो का? पवित्र मिस्साबलीदानात सहभाग घेणे, प्रायश्चित
संस्कार घेणे, गरजू व्यक्तींना मदत करणे इत्यादी अध्यात्मिक गरजा आहेत ह्या
आध्यात्मिक गरजा पूर्ण केल्या तर खरोखर देवाचे दर्शन आपल्याला होऊ शकते.
आज पवित्र देऊळ माता सर्व धर्मगुरूंचा आश्रयदाता संत जॉन मारी वीयाणी याचा सण साजरा करत आहे. त्याचा जन्म ६ मे १७८६ साली फ्रान्स देशाच्या दारदिली येथे एका देवभिरु चांगल्या कुटुंबात झाला. धर्मगुरूचे शिक्षण घेत असताना त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. परंतु त्यांनी विश्वास आणि चिकाटी सोडली नाही. ते उत्तम धर्मगुरू झाले. तसेच फ्रान्सतील आर्क या ठिकाणी लोकांची सेवा केली. ते प्रार्थना व प्रायश्चितासाठी भरपूर वेळ द्यायचे. आज त्याच पवित्र शरीर आर्क या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. आज आपण सर्व धर्मगुरूंसाठी प्रार्थना करूया की त्यांनी आपल्या जीवनात संत जॉन मारी वीयाणीचे उदाहरण पाळावे.
विश्वासू लोकांची प्रार्थना
आपला प्रतिसाद :- दयावंत प्रभू, आमची प्रार्थना ऐक.
१.
सर्व समर्थ प्रेमळ पित्या आज आम्ही तुझ्याकडे आमचे परमगुरू पोप
फ्रान्सिस, सर्व बिशप महागुरु धर्मगुरू, धर्मबंधु, व्रतस्थ बंधू व भगिनी
यांच्यासाठी खास प्रार्थना करतो. त्यांचा विश्वास मजबूत कर. तसेच त्यांनी आपल्या
शिकवणीद्वारे लोकांना अध्यात्मिक जीवनाचे महत्त्व पटवून द्यावे म्हणून त्यांना
सहाय्य कर म्हणून प्रार्थना करूया.
२.
हे सर्व समर्थ दयाळू पित्या आम्ही तुझ्याकडे आज सर्व धर्मगुरूंसाठी विशेष करून आमच्या प्रमुख धर्मगुरू
व सहाय्यक यांच्यासाठी प्रार्थना करतो. त्यांना मार्गदर्शन व सहाय्य कर तसेच तुझे प्रेम
सर्वत्र विशेष करून आमच्या धर्मगामात सर्वाना देवाच्या प्रेमाचा अनुभव त्यांच्याद्वारे येऊ दे म्हणून
प्रार्थना करूया.
३.
हे प्रिय देवा, आज आम्ही, वायनाड
आपत्तीग्रस्त लोकांसाठी प्रार्थना करतो. त्यांच्या शारीरिक आणि मानसिक गरजा पूर्ण करण्यासाठी
दयाळू लोकांना प्रेरित कर. या कठीण काळात
त्यांच्या बाजूने उभा रहा. त्यांना शक्ती आणि धीर दे. त्यांच्या जीवनात पुन्हा
शांती आणि आनंद आणण्यासाठी मार्गदर्शन कर. म्हणून प्रार्थना करूया.
४.
हे प्रिय देवा, आपल्या अपार करुणेने, आजारी आणि शारीरिक लोकांना तुझा आधार दे. त्यांच्या वेदना
लवकरात लवकर कमी व्हाव्यात. त्यांच्या बाजूने उभे रहा आणि त्यांना तुझ्या प्रेमाची
जाणीव करून दे. त्यांना बरे होण्याची आशा मिळूदे आणि त्यांची काळजी घेणाऱ्यांना
शक्ती व सामर्थ्य दे. म्हणून प्रार्थना करूया.
५.
थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या सामाजिक व वैयक्तिक
गरजांसाठी प्रार्थना करूया.
No comments:
Post a Comment