Reflections for the homily of 26th Sunday in Ordinary Time (28-09-2025) by
Fr. Brijal Lopes
सामान्य काळातील सव्विसावा रविवार
दिनांक: २८/०९/२०२५
पहिले वाचन: अमोस: ६:१,४-७
दुसरे वाचन: १तीमथि:
६:११-१६
शुभवर्तमान: लूक:
१६:१९-३१
प्रस्तावना:
आज ख्रिस्तसभा सामान्य काळातील सव्वीसावा
रविवार साजरा करीत आहे. ही उपासना सामाजिक जबाबदारी आणि शाश्वत जीवन या विषयावर
मनन-चिंतन करण्यास आमंत्रित करते. काळजी घेणे म्हणजे घाबरणे नाही; ह्याद्वारे गरजूंना मदत करणे हा
आमच्यासमोर असलेला आव्हान आहे. भविष्यातील वैभवावर लक्ष केंद्रीत न करता गरजू
लोकांच्या गरजा आणि त्यांच्या उदारतेविषयी लक्ष देण्याचे महत्त्व या उपासनेत
स्पष्ट केले आहे.
पहिल्या वाचनात आमोसचा संदेश
आत्मसंतुष्टता व उदासीनतेविरुद्ध एक कडक इशारा देतो;
विशेषतः सियोनमधील
श्रीमंत लोकांनी गरिबांच्या दुःखाकडे दुर्लक्ष करून, त्यांच्या दाखविलेल्या
स्वार्थी वृत्तीबद्दल त्यांचा तिरस्कार व्यक्त केला गेला आहे.
दुसऱ्या वाचनात विश्वास असणाऱ्यांना
नीतिमत्ता, श्रद्धा,
विश्वास
प्रेम, सहनशीलता आणि सौम्यता याचा पाठलाग करण्यास सांगितले जाते आणि त्यांना
शाश्वत जीवन धारण करण्यास प्रोत्साहित करण्यात आले आहे.
आजच्या शुभवर्तमानात येशू श्रीमंत व लाजरसचा
दाखला सांगतो. देवाच्या राज्यात असलेले लोक देवावर अवलंबून असलेल्या श्रीमंत आणि गरीबबावर
कसे संकट ओढवतात हे दाखवून देते, ही बोधकथा एक शक्तिशाली आठवण करून देते की आपण संपत्तीला
धरून न राहता देवावर पूर्ण विश्वास ठेवणे हेच खऱ्या आध्यात्मिक प्रकाशाचे चिन्ह
आहे. आपली संपत्ती इतरांच्या सेवेत वापरली तरच ती आशीर्वादित ठरते. आत्मसंतुष्टतेऐवजी
करुणा आणि नम्रता स्वीकारूया. देवाच्या राज्याकडे वाटचाल करण्यासाठी हेच खरे
आमंत्रण आहे. ह्याची कृपा या मिस्साबलीदानात मांगुया.
मनन चिंतन
गेल्या रविवारच्या उपासनेत दिलेले इशारे
दर्शवतात की संपत्ती कशी माणसावर दबाव आणते आणि संपत्ती हाताळताना कोणते धोके
उद्भवू शकतात. आमोसच्या वाचनात संपत्ती व सामाजिक न्याय हे केंद्रस्थ विषय आहेत.
देवाने आमोसला इस्रायलमधील श्रीमंत लोकांना इशारा करण्यासाठी बोलावले, हे लोक
अनेकदा गरिबांच्या खर्चावर श्रीमंत झाले होते. आमोस सांगतो की संपत्ती समप्रमाणाने
वाटली नाही तर समाजाला नाश होऊ शकतो.
श्रीमंतांना त्यांच्या कृत्यांचे परिणाम
समजावून सांगितले गेले; तरीही अनेकांनी आपले वर्तन बदलले नाही.
शहरातील लोक महागडी अन्नधान्य आणि द्राक्षारस इत्यादींचा वापर करून आनंद साजरा करत
होते; ते देव आणि गरिबांकडे पाहत नव्हते. परंतु
ही उधळपट्टी किंवा उद्योजने दीर्घकाळ टिकली नाहीत.
पहिले वाचन दैवी न्याय आणि सामाजिक
जबाबदारी या मध्यवर्ती विषयांवर प्रकाश टाकते. ज्यांनी देवावर अवलंबून न राहता
भौतिक संपत्तीवर अवलंबून राहून देव (यहोवा) आणि आपल्या समुदायातील गरिबांचा
तिरस्कार केला, त्यांना भयानक परिणाम भोगावे लागले. दैवी
इच्छा आणि सामाजिक न्यायाकडे दुर्लक्ष केल्यामुळे दुःखद परिणाम घडले.
पौलाने तिमोथ्तीला पाठवलेल्या पत्रात, संपत्तीत रमून न जाता संपत्तीबद्दल
ख्रिश्चन दृष्टिकोन विकसित करण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. पौलचे शब्द
श्रीमंत आणि गरिबांसाठी मार्गदर्शक आहेत;
संपत्तीबद्दल
संयमी आणि जबाबदार दृष्टिकोन ठेवावा,
असे ते
सूचित करतात.
आजच्या शुभवचनातून ख्रिस्तसभा खालील
गोष्टींवर चिंतन करण्यास सांगते: लाजरस आणि श्रीमंत माणसाच्या दृष्टांताद्वारे
गरिबांविषयी काळजी न घेण्यामुळे होणाऱ्या परिणामांबद्दल स्पष्ट धडा दिला जातो.
श्रीमंत व्यक्तीच्या एखाद्या विशिष्ट गुन्हापेक्षा गरिबांविषयी काळजी न
घेतल्यामुळे त्याला स्वर्गात प्रवेश नव्हता. लाजरस स्वर्गात फक्त दरिद्री
असल्यामुळे गेला नाही; तर दुःखाच्या वेळेस त्याने देवावर
ठेवलेला विश्वास हे त्याचे कारण होते.
संपत्ती आणि
गरिबी: संपत्ती व
स्वार्थ आणि स्वावलंबीकडे नेऊ शकते,
त्याची
तुलना केली आहे. ते धीर ठेवून गरिबी/दरिद्री सहन केल्याने देवावर विश्वास ठेवण्यास
प्रोस्ताहन मिळते.
डोंगरावरील
प्रवचनात (Sermon on the Mount) येश्रीमंत माणसाची बोधकथा डोंगरावरील
प्रवचनात येशूला शिकवणीला म्हणून सादर केली. गरीबांना आणि परित्यक्तांना आशिर्वाद
दिले. विशेषतः “गरीब लोकांनी तुम्ही किती धन्य आहात, स्वर्गाचे राज्य तुमचे आहे.” (लुक
६:२०)
आध्यात्मिक
संपत्ती: ख्रिस्ती
व्यक्तीने प्राथमिक लक्ष ख्रिस्ताने दिलेल्या आध्यात्मिक संपत्तीवर ठेवले पाहिजे.
संपत्ती धोकादायक म्हणून सादर केली जाते;
ती अभिमान, स्वार्थ आणि इतरांच्या गरजांबद्दल
असंवेदनशीलता वाढवू शकते, ज्यामुळे ख्रिस्ती जीवनाला हानी पोहोचू
शकते. देवाच्या राज्यात प्रवेश मिळविण्यासाठी दोन मुख्य अटी आवश्यक आहेत: नम्रता
आणि गरिबांविषयी खरी काळजी.
संपत्तीचा
योग्य वापर आणि गरिबांविषयी खरी करुणा हेच ख्रिस्ती जीवनाचे खरे मोल आहे. नम्रता
आणि देवावर विश्वास ठेवून आपण शाश्वत जीवनाकडे वाटचाल करूया. आध्यात्मिक संपत्तीचे
आपल्याला खऱ्या आनंदाचे वरदान देते.
देवाच्या
राज्यासाठी आपले अंत:करण उघडून प्रेमाने सेवा करण्याचे आव्हान आपण स्वीकारूया.
विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: ‘हे प्रभू, तुझ्या लेकरांची प्रार्थना ऐक.’
१. आपले परमगुरु, महागुरू, सर्व धर्मगुरू व व्रतस्थ यांच्यात, ऐकीची भावना निर्माण होऊन, ती इतरांना देता यावी व इतरांना
त्याप्रमाणे मार्गदर्शन करता यावे, म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. सर्व राजकीय नेत्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताचा आदर्श आपल्या
डोळ्यासमोर ठेवून, त्यांचे जीवन लोकांच्या सेवेसाठी
समर्पित करावे, म्हणून आपण प्रार्थना.
३. "त्यांनी सर्वांनी एक व्हावे" अशी ही
प्रभू येशूची भावना आपल्यामध्ये निर्माण व्हावी व आपल्यामधील असलेला भेदभाव नष्ट
व्हावा, म्हणून आपण प्रार्थना करू या.
४. जे कोणी देवापासून दुरावलेले आहेत, त्यांनी मागे वळून परत येशूला आपला
राजा म्हणुन स्विकारावे व आपले जीवन प्रभूची सुवार्ता पसरविण्यासाठी समर्पित करावे, म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. आपण ख्रिस्ताला स्विकारावे व त्याच्या मुंल्यावर
आपले जीवन जगून, तोच ख्रिस्त इतरांच्या जीवनात आणण्याचा
सदैव प्रयत्न करावा, म्हणून आपण प्रार्थना करूया.
६. थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक हेतूंसाठी प्रार्थना करूया.