Wednesday, 15 March 2023

 



Reflections for the homily of the Fourth Sunday in the Holy Season of Lent (19/03/2023) by Br. Reon Andrades.




प्रायश्चित काळातील तिसरा रविवार


दिनांक: १९/०३/२०२३

पहिले वाचन: १ शमूएल १६:१ब, ६-७,१०-१३अ

दुसरे वाचन: एफीसकरांस पत्र ५:८-१४

शुभवर्तमान: योहान ९:१-४१


विषय: अंधकाराचा धिक्कारप्रकाशाचा स्विकार.



प्रस्तावना:

आज आपण प्रायश्चित काळातील चौथा रविवार साजरा करत आहोत. आजची वचने आपल्याला जगासाठी प्रकाश बनण्यास पाचारण करीत आहेत. पहिल्या वाचनात आपण ऐकतो की शमूएल दावीद राज्याला देवाच्या आज्ञेनुसार अभिषिक्त करीत आहे. जणू काही दावीद राजा ह्यापुढे इस्राएली लोकांसाठी प्रकाश बनत आहे. शुभवर्तमानात प्रभू येशू ख्रिस्त खुद म्हणतो कि, मी ह्या जगात असेपर्यंत जगाचा प्रकाश आहे. ख्रिस्त आज आपणास आव्हान करत आहे कि आपणही प्रकाशाची मुले बनू शकतो. परमेश्वराचा प्रकाश इतरापर्यंत पोहोचविण्यास आपण त्याचे साधन बनावेत व त्याचे प्रकाशाचे राज्य ह्या जगात प्रस्थापित करण्यास आपण कार्गत व्हावे म्हणून आपण या मिस्साबलिदानात प्रार्थना करूया.


बोध कथा:

कार्डिनल जॉन हेन्री न्यूमाँन ॲंग्लिकन धर्मगुरु, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीले नावाजलेले शिक्षक होते. त्यांनी हाती घेतलेली समाजसुधारणेची चळवळ चालू असताना त्यांची प्रकृती बिघडली व त्यांना युरोपमध्ये उपचारास जावे लागले. वयाच्या अवघ्या ३२ व्या वर्षी आजाराशी झुंज देत असताना परदेशात उपचार घेत असताना त्यांची प्रकृति अगदीच खालावली व अतिशय दयनीय परिस्थितीत त्यांना आपल्या मायदेशी परतण्याची इच्छा त्यांना झाली. परंतु वाहतूक परिस्थिती अनुरूप नसल्याने ते सहजरीत्या घरी परतू शकत नव्हते. त्यावेळेस त्यांना इंग्रजीत अतिशय हृदय स्पर्ष गाणं लिहिले, Lead kindly light amid the encircling gloom, lead thou me on… the night is dark and I am far from home, lead thou me on. अशी त्यांनी प्रकाशाच्या देवाकडे प्रार्थना केली, की अंधार खूप आहे व मी घरापासून दूर आहे तुझ्या प्रकाशाने तू मला मार्ग दाखवा. परमेश्वराने त्यांची प्रार्थना ऐकली ते बरे झालेते सुखरूप पणेआपल्या मायदेशी परतले. तद्नंतर ते रोमन ख्रिस्ती धर्माचे धर्मगुरू झाले व आज संत म्हणून घोषित केले आहेत.


मनन चिंतन:

आपण प्रायश्चित काळाला सुरुवात केलेली आहे व आज आपण चौथ्या आठवड्यात पदार्पण करत असताना, आजची उपासना ख्रिस्त हा जगाचा प्रकाश आहे याची ओळख आपणास करून देत आहे. आजच्या शुभवर्तमानात प्रभू ख्रिस्त म्हणतो की, मी जगाचा प्रकाश आहे (योहान ९:५). इतकेच नव्हे तर त्याने आपल्या कृत्याने आपणास उदाहरण हे घालून दिले आहे. एका आंधळ्या मनुष्याला दृष्टी देऊन जणू काही त्याला प्रकाशाची अनमोल अशी देणगी बहाल केली आहे. दृष्टी देऊन शारीरिक प्रकाश नव्हे तर आपण पुढे वाचलं तर करून येईल कि त्याला  आध्यात्मिक दृष्टीही दिली आहे. त्याच्या विश्वासाला बहर आणली आहे.

आजच्या पहिल्या वाचनात आपण ऐकतो की शमूएल दावि या लहान मेंढपाळाला इस्रायेलचा राजा म्हणून देवाच्या आज्ञे अनुसार अभिषिक्त करत आहे. जणू काही आता सौल नाही तर दावीद इस्राएली लोकांचा प्रकाश बनणार आहे व त्यांना दिशा दाखवणार आहे. ह्या विषयावर संत पौल कसा गप्प बसेल ? म्हणूनच तो इफिसीकरास पत्र यात लिहितो की, कारण तुम्ही एकेकाळी अंधारात होता; तरी आता प्रभुमुळे प्रकाश झाला आहात, म्हणून प्रकाशाच्या मुलांना शोभेल असे तुमचे आचारण असू द्या (इफी ५:८).  पुढे तो म्हणतो प्रकाशात चालणाऱ्यांची लक्षणे, चांगुलपणा, नीति व सत्य ही आहेत. यावर आणखी भाष्य करणे गरजेचे नाही कारण हा संदेश पारदर्शक आहे.

जर का आपण शुभवर्तमानात पाहिलं तर, आपल्याला कळून चुकेल की प्रभू ख्रिस्त आज असामान्य रीतीने आंधळ्या माणसाला बरे करीत आहे. आज तो शब्दांनी नव्हे तर कृतीचा वापर करत आहे. प्रकाश हा अंधकार दूर करत असतो, तर दुसरीकडे न दिसणाऱ्या गोष्टी आपल्याला स्पष्टपणे दाखवत असतो. अज्ञानता, गैरसमाज यासारख्या नकारात्मक गोष्टींना तो दूर करत असतो. त्याचप्रमाणे प्रभू येशूला ठाऊक होते की तो दिवस शब्बाथाचा होता व त्या दिवशी काम करणे नियमाविरुद्ध होते. याचे औचित्य साधून प्रभु येशू माती उचलून व आपल्या थुंकीने त्याचा चीख्खल बनवून त्या माणसाच्या डोळ्या लावतो व त्यास शिलोहचा कुंडावर धुण्यास सांगतो.  या कृत्याद्वारे प्रभू येशू शास्त्री व परुशी व सर्व इस्राएल जनतेला त्यांच्या परंपरेवर पुनर्विचार करण्याचे आव्हान करत आहे. समाजातील काही परंपरा आपल्या व इतरांच्या जीवनात अडचणी निर्माण करतात. या परंपरा आपणास व इतरांस अंधाराकडे घेऊन जात असतात किंबहुना जात आहेत. अशा काही परंपरे मुळे आपली व आपल्या समाजाजी प्रगती होण्याऐवजी दुर्गती होत आहे. आज आपल्या समाजात आपल्याला अनेक गरीब दिसत आहे. कुणीतरी खरेच म्हटले आहे की, गरीब जन्मत नाही तर समाज गरीबांना जन्म देत असतो. आज आपण समाजात गरीब व श्रीमंत, शिक्षित व अशिक्षित, स्वतंत्र व बंधिस्त, जात-पात पाळणारे, नावाजलेले व समाजाने बहिष्कृत केलेले, मेहनत करणारे व लाच-लुबाडी करणारे इत्यादि पहायला मिळतात. या सामाजिक असमान्तेला कारणीभूत कोण? आपला समाज? आपल्या परंपरा? अथवा आपली विचारसरणी व अंधारामध्ये राहायची आपली वाईट सवय?

आज प्रभू ख्रिस्त आपणास यावर प्रकाश घालण्यास सांगत आहे आपण ख्रिस्ताचा प्रकाश परिधान करून, या सर्व सामाजिक प्रश्नांवर प्रकाश घालण्यास देवमाता व दैव शब्द आपणास पाचारण करीत आहे. ज्या रीती, परंपरा वाईट सवयींमुळे गरीबांचा छळ होत असेल अथवा इतरांची जीवन अवघड बनत असेल तर त्यासर्व परंपरा व वाईट सवयी आपण ख्रिस्ताच्या प्रकाशात पाहायला हवा. ते पाहून त्यांतील आपल्या सर्वांच्या प्रगतीआड येणारे घटक ओळखून त्यात सुधारणा करूया. हे सर्व करण्यासाठी कार्डिनल जॉन हेन्री न्यूमाँन सारखी परमेश्वरावर श्रद्धा ठेवणे प्रार्थना करणे गरजेचे आहे.


श्रद्धावंतांच्या प्रार्थना

प्रतिसाद: “हे प्रभू, आम्हाला तुझ्या प्रकाश्याची मुले बनव.”

१. आपण प्रार्थना करूया आपले पोपे महाशय, सर्व धामागुरू, धर्माभागिनी व सर्व धार्मिक पुढार्यांसाठी कि त्यांना परमेश्वराचे राज्य या जगात पसर्विण्य्साठी शारीरिक बळ व पवित्र आत्म्याचे समर्त्या लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

२. आज जगात तणावाचे वातावरण पसरत आहे, आर्थिक समस्या व मंदी, युद्ध व नैसर्गिक आपत्तींना सर्व सामान्य माणूस बळी पडत आहे, ह्या सर्वांपासून आपले रक्षण व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

३. जगाचा प्रकाश आपणास बनता यावे व समाजात एकोपा, प्रेम व शांतीचे वातावरण पसरविण्यास आपण कणखर व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

४. अनेक युवक युवती देवापासून दुरावलेले आहेत, त्यांना परमेश्वराचे पाचारण लाभावे व ख्रिस्ताच्या प्रकाशयत त्यांनी त्यांच्या जीवनाची वाटचाल करावी म्हणून आपण प्रार्थना करुया.

५. आपल्या गाव, वाड्यात, कुटुंबात शांतीचे वातावरण प्रस्थापित व्हावे व ख्रिस्ताच्या प्रकाश्याची मुले म्हणून आपण ओळखली जावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

६. थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक व सामाजिक गरजांसाठी प्रार्थना करूया. 


Wednesday, 8 March 2023

 



Reflections for the homily of the Third Sunday in the Season of Lent (12/03/2023) by Br. Trimbak Pardhi.



प्रायश्चित काळातील तिसरा रविवार


दिनांक: १२/०३/२०२३

पहिले वाचन: निर्गम १७:३-७

दुसरे वाचन: रोमकरांस पत्र ५:१-२,५-८

शुभवर्तमान: योहान ४:५-४२




प्रस्तावना:

आज आपण उपवासकाळातील तिसरा रविवार साजरा करीत आहोत. आजची उपासना आपल्याला जीवंत पाण्याविषयी सांगत आहे. आजच्या पहिल्या वाचनामध्ये मोशे परमेश्वराच्या वचनानुसार खडकातून पाणी काढून इस्रायली लोकांची तहान भागवित आहे. तर दुसऱ्या वाचनात संत पौल म्हणतो की, आपण विश्वासामुळे नीतिमान ठरलेलो आहोत. येशू ख्रिस्ताद्वारे आपणाला शांती मिळालेली आहे. आणि पवित्र आत्मयाद्वारे आपल्या अंतकरणात देवाच्या प्रीतीचा वर्षाव झाला आहे.

आजच्या शुभवर्तमानात येशू ख्रिस्त शमरोनी स्त्री यांच्यामधील एक अर्थपूर्ण असा संवाद प्रस्तुत करत आहे. येशू एक शमरोनी स्त्रीला जीवंत पाण्याविषयी सांगत आहे. येशू ज्या पाण्याचा उल्लेख करतो तो जीवंत पाणी म्हणजे देवाचा शब्द होय. देवाचा शब्द ऐकून आत्मिक तहान भागविण्यासाठी आज प्रभू ख्रिस्त आपणास बोलावित आहे. ख्रिस्ताची आत्मिक तहान पुन्हापुन्हा रिकामी होत नाही तर ती जीवनाचा वाहता झरा आहे. हा झरा जीवंत आहे आणि त्याचे पाणी सतत खळखळत असतो. त्याचे पोषण स्वर्गातून होत असते. अंतरंगातील/अंत:कर्णातील हा जीवंत झरा कधीच मरणार नाही, कारण येशू ख्रिस्ताच्या नदीशी तो जोडलेला आहे.


बोध कथा:

एका अत्यंत धार्मिक अशा मध्यमवर्गीय कुटुंबातील एक मुलगा बुद्धीने अत्यंत तल्लख होता. सर्वच परीक्षेमध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होत असे. तो पुढे एक मोठा सरकारी अधिकारी बनला. त्याच्या ऑफिसमधील जवळजवळ सर्वच अधिकारी ला घेणारे होते. त्यामुळे या प्रामाणिक माणसाची त्यांना अडचण वाटू लागली. त्यांनी चक्रे फिरवलीत्याची बदली अतिशय गरीब व दुर्गम अशा खेड्यात करून घेतली. देवाचीच ही इच्छा असे मानून काही कुरकुर न करता तो तेथे जाण्यास राजी झाला. तिथे गेल्यावर त्याने त्या प्रदेशाची पाहणी केली. गाव अतिशय गरीब होता. गावामध्ये काहीच सुधारणा झालेली नव्हती.

त्या प्रामाणिक माणसाने त्या गावाचे मागे राहण्याचे/ प्रगती न झाल्याचे कारण शोधून काढले. त्याला आढळले की, तेथे एक धरण होते. त्याला कालवेही (canal) काढलेले होते, पण त्यांना भगदाडे पाहून धरणातून कालव्यात सोडलेले पाणी शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहचत नव्हते. ते वाटेतच झिरपून जात होते. त्याचे कालवे सुधारण्यास सरकारकडे निधी मागितला, पण तेथे त्याची दाद कोण घईना. शेवटी देवावर भरवसा ठेवून त्याने एक युक्ती लढवली. जवळ असलेल्या तुटपुंज निधीत स्वतःच्या पगारातील काही रक्कम घालून त्याने कालव्यात सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत जाड प्लास्टिकचा कपडा अंथरला. खुद्द त्याच्या हाताखालच्या अधिकार्यांनी त्याला वेड्यात काढले. शेवटी काम पूर्ण होऊन पाणी सोडण्यात आले आणि काय आश्चर्य पाण्याचा एक थेंबही वाया न जाता शेतकऱ्यांच्या शेतात पाणीपुरवठा झाला. सर्वत्र सुजलाम सुफलाम झाले. सर्व वर्तमानपत्रांत त्याचा गौरव करण्यात आला. एका अधिकार्याचा देवावरील व स्वतःवरील विश्वासामुळे तहानलेला गाव पाण्याने तृप्त झाला. आज आपण अशाच एका आगळ्यावेगळ्या तृप्तीची गोष्ट आजच्या उपासनेत ऐकणार आहोत.


मनन चिंतन:

पाणी हा मानवाला निसर्गाकडून मिळालेली एक अनमोल देणगी आहे. सर्व सजीवांना जगण्यासाठी पाणी अत्यंत आवश्यक आहे. पाण्याशिवाय जीव-जंतू, झाडे-झुडपे जीवंत राहू शकत नाही. आपणास पाणी हे विहीर, तलाव, पाऊस, नदी आणि समुद्रापासून मिळत असते. पाण्याचा फरक एकच की समुद्राचे पाणी खारट असते आणि नदीचे पाणी मात्र गोड असते. पाण्याला भावना नसतात, मरण नसते स्वतःच्या हालचालीसुद्धा नसता आणि त्याची आपणाला रात्रंदिवस गरज भासते. अधिक करून पिण्यासाठी, अंघोळीसाठी, स्वच्छतेसाठी किंवा बागायतीसाठी आपणास पाण्याची गरज भासते.

येशू हा जीवंत पाण्याचा झरा आहे. ज्याप्रमाणें आपणास पाण्याची गरज भासते त्याचप्रमाणे जीवनातील विविध प्रसंगी आपणास येशूची गरज भासते. ज्या प्रमाणे नदीच्या काठावर असलेले सर्व वृक्ष-वेलींना पाणी टवटवीत व तेजस्वी ठेवते, त्याचप्रमाणे ख्रिस्ताचा पवित्र आत्मा जेव्हा आपल्यामध्ये वस्ती करतो तेव्हा आपल्या जीवनाचा कायापालट होतो आपणास आध्यात्मिकता प्राप्त होते.

आजच्या उपासनेत आपल्याला ह्या जीवंत पाण्याविषयी सांगत आहे. आजच्या पहिल्या वाचनात मोशेने देवाच्या आज्ञेप्रमाणे इस्रायली लोकांना मिसर देशातून सफीदि म्हणजे पठार या गावी घेऊन आला़. तेथे पाण्याची फारच टंचाई होती. तेव्हा लोक कंटाळले व मोशेविरुद्ध कुरकुर करू लागले. ते म्हणाले “आम्हाला व आमच्या मुलाबाळांना तहानेने मारण्यासाठी तू आम्हाला ह्या रानावनात आणले आहेस काय?” तेव्हा मोशेने परमेश्वराचा धावा केला, परमेश्वर मोशेला म्हणाला नाईल नदीच्या पाण्यावर जि काठी तू आपटली होती ती काठी घेऊन होरे पर्वत ज्याँला सिनाई पर्वत असेही म्हणतात, तेथे जा. ज्या खडकावर मी सांगेल त्या खडकावर ती काठी आपट म्हणजे त्यातून पाणी निघेल. मोशेने तसे करताच त्या खडकातून धो धो पाणी वाहू लागले व इस्रायली जनता त्या पाण्याने ती तृप्त झाली.

आजच्या शुभवर्तमानात येशू जुडेया प्रांतातील गालीला जात असताना शमरोन येथील सुखार नावाचा गावापाशी आला. दुपार झाल्याने शिष्य अन्न/जेवण आणण्यासाठी नगरात गेले होते. येशू गावाबाहेरच्या विहिरीपाशी बसला होता. तेथे एक शमरोनी बाई पाणी भरण्यासाठी आली. येशूने तिच्याजवळ पाणी मागितले. ह्या येशूच्या तिच्या सोबत व्यवहारावर तिला अतिशय नवल वाटले, कारण त्याकाळी यहुदी लोक शम्रोनी लोकांशी कोणतेही संबंध ठेवीत नसत. तीने आपले आश्चर्य व्यक्त केले, त्यावर येशू तिला म्हणाला, तू मला ओळखले असते तर तूच माझ्याकडे पाणी मागितले असते व मी तुला जीवंत पाणी दिले असते. जे पिल्याने तुला पुन्हा कधी तहान लागणार नाही.

येशू शम्रोनी स्त्रीला टप्याटप्याने देवळाकडे वळवितो व पुढे ती स्त्री ख्रिस्ताची सुवार्तिका होते.  ख्रिस्तावर श्रद्धा ठेवते व गावातील सर्वांना येशूबद्दल सांगते. ख्रिस्ताची साक्ष इतरांना देण्यासाठी ईश्ज्ञानाची गरज नाही फक्त त्याला वैयक्तिक जीवनात ओळखणे महत्वाचे आहे.

येशूच्या काळात शास्त्री व परुशी सामान्य जनतेला देवाचा शब्द सांगायचे सोडून अवजड नियम मात्र त्यांच्यावर लादत होते. लोक देवाचा शब्दासाठी तहानलेले होते.  ते मेंढपाळ नसलेल्या मेंढरासारखे बहकलेले होते. म्हणून आज येशूचे बोलणे ऐकण्यासाठी ते हजारोंच्या संख्येने जमतात. आजही देव शब्दाच्या रूपात असलेले जीवंत पाणी तहानलेल्या आत्म्यांना तृप्त करत आहे. सदोदित खळखळ करत आहे. जीवंत पाण्याचा झरा कधीच वाहायचा थांबत नाही व मरतहि नाही. कारण हा झरा येशूच्या नदीशी जोडलेला आहे म्हणूनच आजोबानी नदीत पाणी पाहिले, वडिलांनी विहिरीत पाहिले, मी नळात पहिले, माझ्या मुलाने बाटलीत पाहिले, परंतु पुढची पीढी कुठ बघणार हा विचार करा.


श्रद्धावंतांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: “हे प्रभू आमची प्रार्थना ऐक.”

१. आपल्या ख्रिस्तसभेचे दूरा वाहणारे पोप फ्रान्सिस, बिशप, धर्मगुरू, धर्मभगिनी व व्रतस्थ यांना परमेश्वराने शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक आरोग्य द्यावे व योग्य निर्णय घेण्यासाठी त्यांना पवित्र आत्म्याची शक्ती मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

२. जे कोणी जीवनात निराश आहेत, हताश आहेत, अशांना परमेश्वराच्या प्रेमाचा स्पर्श व्हावा व आपले ख्रिस्ती जीवन त्यांनी विश्वासाने जगावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

३ जे कोणी देवापासून दुरावलेले आहेत; त्यांना ह्या प्रायश्चित काळात देवाने स्पर्श करावा व त्यांनी देवाच्या प्रेमाचा अनुभव घेऊन देवाजवळ परत यावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

४. या प्रायश्चित काळात आपण आपल्या जीवनाला एक नवीन वळण देऊन परमेश्वराच्या शाश्‍वत जीवनाच्या पाण्याचा आस्वाद दुसऱ्यांना द्यावा व ह्याद्वारे परमेश्वराची प्रचिती आपल्या जीवनाद्वारे दुसऱ्यांना व्हावी म्हणून आपण प्रभुचरणी प्रार्थना करूया.

५. थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या सामाजिक, वैयक्तिक व कौटुंबिक हेतू प्रभू चरणी मांडूया.