Reflection for the Homily of Palm Sunday (09-04-2017) By Br Sadrick Dapki
झावळ्यांचा
रविवार
दिनांक
– ०९-०४-२०१७
पहिले
वाचन – यशया ५०:४-७
दुसरे
वाचन – फिलीपकरांस पत्र २:६-११
शुभवर्तमान
– मत्तय २६:१४-२७:६६
"माझी वेळ जवळ आली आहे."
प्रस्तावना
आज ख्रिस्तसभा
झावळ्यांचा रविवार साजरा करीत आहे. हा आठवडा येशूच्या दुःखसहनाचा किंवा पवित्र
आठवडा असा मानला जातो. ह्या दिवशी सर्व ख्रिस्तसभा राज्यांचा राजा, आपला प्रभू
येशू ह्याच्या नावाने मिरवणूक काढून मोठ्या जल्लोषाने त्याचे गुणगान गाते.
आजची तिन्ही वाचणे
आपणास दुःख सहनाबाबत सांगत आहेत. पहिल्या वाचनात यशया प्रवक्ता आपल्या दुःखद्वारे
ख्रिस्ताच्या दुःखसहनाची शेकडो वर्षा आधी पूर्वतयारी करतो आणि स्वतःच यातनामय
ख्रिस्ताचा आवाज होतो. दुसऱ्या वाचनात संत पौल आपणाला आपले ख्रिस्ती जीवन कशा
प्रकारे जगावे ह्याविषयी मौलिक मार्गदर्शन करतो. शुभवर्तमानात येशू ख्रिस्त वल्हांडण
भोजन करून आपल्या दुःख सहनाची तयारी करतो. म्हणून आजची ख्रिस्तसभा आपणास ह्या
पवित्र आठवड्यात ख्रिस्ताच्या दुःखसहन, मरण व पुनरुस्थानात सहभागी होण्यासाठी
बोलावत आहे.
सम्यक
विवरण
पहिले
वाचन – यशया ५०:४-७
यशयाचे हे तिसरे गीत
म्हणून मानले जाते. ह्या गीतामध्ये यशया दुःखित व शोषित सेवकाचे वर्णन करीत आहे.
परंतू हा सेवक कशाचीच भीती न बाळगता आपले सर्वस्व देवासाठी अर्पण करतो व त्याचा
देवावरील विश्वास अधिक बळकट करतो.
दुसरे
वाचन – फिलीपकरांस पत्र २:६-११
पौलाने हे पत्र
तुरुंगात असतांना लिहिले आहे. संत पौल ह्या पत्राद्वारे फिलीपकरांचे आभार मानतो.
ख्रिस्ती जीवन जगणे म्हणजे काय याचा अर्थ पौल स्वतःच्या जीवनावरून देतो. ख्रिस्ती
जीवन कसे जगावे याचे उत्कृष्ठ वर्णन या पत्रात आढळते.
शुभवर्तमान
– मत्तय २६:१४-२७:६६
वल्हांडणाचा सण जवळ आला होता
म्हणून येशू ख्रिस्त वल्हांडण भोजनाची तयारी करतो. येशू ख्रिस्ताला त्याच्या
दुःखसहनाची व मरणाची पूर्ण माहिती होती म्हणून तो त्या तयारीनेच आला होता. येशूचे
दुःखसहन हे येरुशलेम नगरीत शिरताच सुरु झाले. येशूने सर्वप्रथम वल्हांडण भोजन केले
व मिस्साबलीदानाची स्थापना केली. म्हणूनच आपण रोज मिस्साबलिदान साजरे करतो व
ख्रिस्ताला आपल्या जीवनात सहभागी करतो.
आजचा दिनविशेष
म्हणजेच आज प्रभू येशूची मिरवणूक काढून त्याचे सर्व लोकांनी हातात झावळ्या घेऊन
येरुशलेम नगरीत स्वागत केले. आज हि येरुशलेम नगरी दुसरे व तिसरे काहीही नसून आपण
स्वतःच आहोत. आपले हृदय हे येरुशलेम आहे आणि तिथे आपण येशू ख्रिस्ताचे स्वच्छ
मनाने स्वागत करतो.
बोधकथा
“जगतो जीवन नव्हे मी
माझे, ख्रिस्त जगत असे मम जीवनी” संत पौलाचे हे बोल पुढील सत्य घटनेस अनुरूप आहेत.
उस्मानाबाद
जिल्ह्यामध्ये एका मुलाला देशाची सेवा करायची होती यासाठी तो सैन्यामध्ये भरती
होतो. त्या मुलाचे प्रशिक्षण चालू असताना एक दिवस त्याचा अपघात होऊन तो मेंदूमृत
होतो. हि घटना त्या मुलाच्या वडिलांना कळते तेव्हा तो त्याच्या मुलाचा स्वीकार
करतो. व सरते शेवटी त्या मुलाचे अवयव दुसऱ्या व्यक्तींना दान करतो. अश्याप्रकारे
त्या मुलाने चार जणांना जीवनदान दिले.
मनन
चिंतन
आपल्या स्वर्गीय
पित्याने आपल्यावरील प्रेम दर्शविण्यास आपल्या एकुलत्या एक पुत्रास या धरतीवर
पाठवले. व त्याची नियती ठरवली कि त्याने आपल्या प्रेमाखातीर ख्रुसावर मरण पत्करावे
आणि आपणास पापापासून सर्वकाळ मुक्त करावे. येशू ख्रिस्ताने आपल्या पित्यास होकार
देऊन स्वतःचा प्राण देऊन आपणास पापांपासून केले.
येशूचा येरुशलेमेत
प्रवेश
वल्हांडण सणाआधी येशू
ख्रिस्त येरुशलेम नगरीत गाढवावर बसून प्रवेश करतो. येशू ख्रिस्ताचे गाढवावर बसणे
महत्वाचे होते, कारण तो शांतीचा राजा आहे. येशू ख्रिस्त नगरी मध्ये प्रवेश करताना
लोकांनी आपली वस्त्रे रस्त्यावर पसरवली आणि झाडांच्या डहाळ्या हातात घेऊन येशूचे
स्वागत करून म्हटले, “होसान्ना, दाविदाच्या
पुत्राला प्रभुच्या नावाने येणारा धन्यवादित असो, स्वर्गीय
देवाला होसान्ना!” (मत्तय २१:९) होसान्ना या शब्दाचा अर्थ
‘आमचे तारण कर’ असा होतो.
वल्हांडणाचा सण व
प्रभू येशू
वल्हांडणाचा सण हा पूर्वी
साजरा केला जात असे आणि त्याचा उल्लेख आपल्याला निर्गम ह्या पुस्तकात पहावयास
मिळतो. इजिप्त देशातून इस्रायल लोकांची सुटका आणि मरणापासून त्यांचे रक्षण व्हावे
म्हणून हा वल्हांडणाचा सण साजरा केला जात असे आणि ह्या सणात कोकरू अर्पण केले जात
असे (निर्गम १२:१-३०). येशूचे वल्हांडणाचे भोजन हे ऐतिहासिक बनले. येशू स्वतः
कोकरू बनला व स्वताःस अर्पण केले, आणि आज सुद्धा आपण ते प्रभू भोजन मिस्सावेळीस
करीत असतो. हे भोजन ख्रिस्ती उपासनेतील प्रमुख भाग बनले आहे. वल्हांडणाच्या भोजनातील
भाकर व द्राक्षरस हे त्याच्या शरीर व रक्ताचे प्रतिक बनले आहे. येशू ख्रिस्त
म्हणतो, “हे तुम्ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आणि रक्त आहे” (मत्तय २६:२६-२७).
तसेच त्याने शिष्यास म्हटले कि, “असे माझ्या आठवणीत रोज करावे, जोपर्यंत मी माझ्या
गौरवामध्ये परत येईन.”
येशू ख्रिस्ताचा
विश्वासघात करणारे, त्याला विकणारे, त्याची मारहाण व निंदा करणारे सुद्धा आपल्या
पैकीच होते. परंतु तिथे असे सुद्धा लोक होते जी येशुसाठी सर्व काही करण्यास तत्पर
असत. पवित्र मरिया जी येशुपासून कधीच दूर गेली नाही; सिरेनिकर सिमोन ज्याने आपल्या
पापांचा भार वाहण्यास येशूची मदत केली; वेरोनिका जिने आपली पापे येशूच्या
चेहऱ्यावरून पुसली; आणि दुसरे काही लोक ज्यांनी येशूचा जयजयकार करत येरुशलेम नगरीत
स्वागत केले.
ह्या पवित्र
आठवड्यात येशूच्या दुःख सहनात सहभागी होत असतांना आपण खऱ्या मनाने स्वतःला पडताळून
पाहूया कि, आपण कोणत्या लोकांप्रमाणे वागतो. ज्या लोकांनी येशूचा विश्वासघात केला
कि ज्यांनी येशूला सहकार्य केले. आपण खरे ख्रिस्ती जीवन जगतो का? येशूचा भार आपण
हलका करतो का? ह्याचा विचार करून खऱ्या अंतःकरणाने प्रभूच्या दुःख सहनात सहभागी
होऊन प्रभूच्या पुनरुत्थानाची तयारी करूया.
विश्वासू
लोकांच्या प्रार्थना
प्रतिसाद
: हे दयावंत पिता आमची प्रार्थना ऐकून घे.
१. ख्रिस्त सभेची धुरा
वाहणारे, पोप
महाशय, बिशप्स, कार्डीनल्स, सर्व धर्मगुरु व व्रतस्त जे ख्रिस्ताच्या मळ्यात कार्यरत आहेत, ह्या सर्वाना परमेश्वराचा आशीर्वाद लाभावा व त्यांनी देवाचे कार्य अखंडित
चालू ठेऊन एक उत्तम जीवनाचा धडा लोकांपर्यंत पोहचवावा म्हणून आपण प्रार्थना करुया.
२. जे लोक देऊळ
मातेपासून दुरावलेले आहेत त्यांनी जगाची पापे दूर करणाऱ्या देवाच्या कोकराला
ओळखावे व ख्रिस्ताच्या प्रकाशात त्यांचे मनपरिवर्तन व्हावे म्हणून आपण प्रार्थना
करूया.
३. हा पवित्र आठवडा
चांगल्या रीतीने व्यतीत करावा व येशूच्या दुःखसहनात सहभागी होऊन दुसऱ्यांना
येश्याच्या जवळ बोलावून घ्यावे म्हणून प्रार्थना करूया.
४. जे लोक दुःखी, कष्टी
व आजारी आहेत त्यांना प्रभूच्या स्पर्शाने चांगले आरोग्य लाभावे व त्यांचे जीवन
सुखी व समाधानी बनावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. आपण आपल्या वैयक्तिक
व कौटुंबिक गरजांसाठी प्रार्थना करूया.
No comments:
Post a Comment