सामान्य काळातील
बाविसावा रविवार
दिनांक: २९/०८/२०२१
पहिले वाचन: अनुवाद ४:
१-२, ६-८
दुसरे वाचन: याकोबाचे पत्र
१: १७-१८,२१-२२,२७
शुभवर्तमान: मार्क ७:
१-८, १४-१५,२१-२३
बाहेरून माणसाच्या आंत जाऊन त्याला भ्रष्ट करील असें काहीं नाहीं. तर माणसाच्या आंतून जे निघतें तेंच त्याला भ्रष्ट करितें.
प्रस्तावना
आज ख्रिस्तसभा सामान्य काळातील बाविसावा
रविवार साजरा करीत आहे.
आजची उपासना आपणास नियम शास्त्राचे पालन करून त्यांचे आपल्या दैनंदिन
जीवनात पालन करून, पवित्र व सुजानतेचे जीवन जगण्यासाठी बोलावत आहे. परमेश्वराने आपली
निर्मिती एकमेकांना मदत करण्यासाठी, प्रेम करण्यासाठी व इतरांबद्दल आपुलकी ठेवण्यासाठी
केलेली आहे. आजची तिन्ही वाचणे आपणास नियमांचे पालन करून, इतर व्यक्तींना व समाजव्यवस्थेला
हातभार लावण्यासाठी व त्यांचा विकास करण्यासाठी बोलावत आहे.
सम्यक विवरण
पहिले वाचन
आजच्या पहिल्या वाचनात आपण आज्ञा पाळून
व त्यांचे पालन करण्यासाठी, आपणास मोशे उपदेश करत आहे. त्याचप्रमाणे आजचे वाचन त्याच्या
उपस्थितीची जाणीव व देवाचे ज्ञान ह्या आज्ञेद्वारे आपणासमोर व्यक्त केलेली आहेत.
दुसरे वाचन
आजच्या दुसऱ्या वाचनात संत याकोब आपणास
देवाचा शब्द ऐकून तो कृतीमध्ये उतरविण्यासाठी व त्याद्वारे गरजवंतांना मदत करण्यासाठी
सांगत आहे.
शुभवर्तमान
आजच्या शुभवर्तमानात येशू ख्रिस्त आपणास
अंतःकरणापासून देवाची भक्ती, व त्याद्वारे आपले अंतकरण शुद्ध ठेवून निर्जल व निर्मळ
जीवन कशाप्रकारे जगावे ह्या विषयी आपणास सांगण्यात येत आहे.
मनन चिंतन
विल्यम बाकले नावाचे एक स्कॉटीश ईशज्ञानी
विचारवंत त्यांनी एक सुंदर अशी कथा लिहिले आहे की, ज्यामध्ये परुशी धर्मगुरू व त्यांचे
अनुयायी कशाप्रकारे नियम व कायदे पाळत असत. त्या कथेमध्ये ते सांगतात की, रब्बी एक
परुशी धर्मगुरू रोमन कारागृहात बंदिस्त होते. तुरुंगात असताना त्याच्या सर्व गोष्टीची
व्यवस्थितपणे काळजी घेतली जायची. त्यांना वेळोवेळी पाणी जेवण व त्यांच्या आरोग्याची
काळजी व्यवस्थितपणे घेतली जायची.
दिवसामागून दिवस जात असताना रब्बींची प्रकृती हळूहळू कमजोर होत गेली
आणि अचानक त्यांची प्रकृती खालावली. अधिकाऱ्याने ताबडतोब वैद्यांना बोलावले. वैद्यकीय
तपासणी झाल्यावर त्यांना डीहायड्रेट (dehydrate) आहे; म्हणजे
शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन चक्कर, डोकेदुखी सारखे समस्या होतात. हा अहवाल समोर
आल्यावर कारागृहातील प्रशासक विचारात पडू लागले की, हे असे का घडले? वेळोवेळी सर्व
गोष्टींची दखल घेऊन सुद्धा अशा समस्या का निर्माण होऊ लागल्या? व ताबडतोब कारागृहातील
प्रशासकांनी काही शिपाई त्यांच्यावर देखरेख करण्यासाठी पाठविले शिपायांनी निरीक्षण
करून, योग्य ती तपासणी करून त्यांचा अहवाल अधिकाऱ्यासमोर ठेवला. अहवाल वाचल्यानंतर
त्यांना धक्काच बसला की जे पाणी त्यांना पिण्यासाठी दिले होते, त्या पाण्याचा वापर
ते त्याच्या धार्मिक रीतीरीवाजासाठी वापरत होते. प्रार्थनेपूर्वी हात धुणे, तसेच जेवणाअगोदर
हात धुणे याचा परिणाम त्यांना थोडे पाणी त्यावेळेस मिळत असे.
आजची उपासना आपणास हाच संदेश देत आहे
की, रीतीरिवाज व कायदे पाळणे हा धर्माचा मध्यभाग नाही, तर देवावरील प्रीती; त्याचबरोबर
शेजार धर्मावर प्रीती, हा मध्यभाग आहे. आजच्या शुभवर्तमानात येशू ख्रिस्ताच्या अनुयायांना
हात न धुता, कणसे खातांना पाहून परुशांना भीती वाटली व ते स्तब्ध झाले. येशू ख्रिस्तामध्ये
व परुशांत वाद -विवाद निर्माण झाला. देवाने दिलेले नियम खूप चांगले आहेत व त्याची मानवाला
खूप आवश्यकता आहे; कारण नियम हे देवाने मानवाशी असलेले प्रेमळ संबंध व देवाची मानवात
असलेली हजेरी किंवा देवाला मानवाशी असलेले अतूट नातं आहे. त्या नियमाद्वारे आपल्याला
विश्वासू राहायचं आहे, आणि ते केवळ त्यावर प्रेम करून, कारण देवाचे प्रेम हे मूळ आहे
व त्यावर केलेली प्रीति हे त्याचे फळ आहे. देवाचे नियम पाळणे म्हणजे आपण त्याच्याजवळ
येणे. आपण आपल्या अंतःकरणापासून त्याच्या जवळ येणे व आपल्या समोर इतरांना त्याच्यासमोर
सोबत घेऊन येणे, त्याच्याजवळ देणे. मानवजातीची निर्मिती ही देवाची मानवाला दिलेली
फार मोठी देणगी आहे. आणि प्रत्येक मानव एकमेकांविषयी आपुलकीचे नाते संबंध प्रस्थापित
करण्यासाठी व त्या त्याला जीवनात ईश्वराचे प्रेम व्यक्त करण्यासाठी चांगले व प्रेमळ
जीवन जगणे आवश्यक आहे. स्वतःला जपण्यासाठी व इतरांना जपण्यासाठी काही गोष्टी किंवा
मार्गदर्शन आपल्याला पाळावी लागतात. पण त्याचा उपयोग मानवाला देवाकडे घेऊन जाण्यासाठी
असावा ज्याला केवळ एक सुंदर जीवन जगण्यासाठी, पवित्र जीवन जगण्यासाठी व इतरांना येशू
ख्रिस्ताच्या कार्याची दिशा दाखवून त्यांना जीवन देण्यासाठी नियम पाळावे लागतात. जीवनात
सुंदर गोष्टी करायच्या असतील तर त्या फक्त हृदयाने घडू शकतात, कारण देव माणसाच्या हृदयाकडे
पाहतो, त्याला बाहेरून केलेल्या कृतीवर नाही. विश्वास, आशा, प्रीती ह्या तीन गोष्टी
महत्त्वाच्या आहेत, पण त्यामध्ये प्रीती सर्वश्रेष्ठ आहे. संत जेम्स आपणास आठवण करून
देत आहे की, सर्व काही पित्याकडून येते की, त्यांनी आपणास त्याची लेकरे बनवली कारण
आपण त्याला प्रेमाने साक्षीदार व्हावे; त्यामुळे आपण फक्त देवाचा शब्द ऐकून पाळणार
नाही, तर त्या शब्दाचा वापर कृतीमध्ये करावा व आपल्या जीवनात अंगीकारावा. आजच्या शुभवर्तमानाद्वारे
आपण देवाने दिलेल्या आज्ञेचा उपयोग अंतरित जीवनासाठी करावा, बाह्यरुपी नाही. आजच्या
ह्या मिस्साबलिदानात भाग घेत असताना, आपण निश्चय करूया की, आपण ह्या आज्ञेचा पालन,
मानसन्मान करून व त्या आपल्या हृदयात ठेवून त्याला मानवी जीवनाचे कल्याण व त्यांना
ईश्वराकडे घेऊन जाण्यासाठी करूया.
आपले उत्तर: हे परमेश्वरा आम्हाला मदत कर
१. अखिल ख्रिस्त सभेची धुरा वाहणारे आपले
परमचार्य पोप फ्रान्सिस व इतर सर्व बिशप्स, धर्मगुरू, धर्मभगिनी यांना
पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाचा स्वीकार
करून त्याचा वापर ख्रिस्तसभेसाठी करावा, म्हणून आपण प्रार्थना
करूया.
२. आपण आज विशेष करून जे भाविक Covid-19 या विषाणूने ग्रासलेले
आहेत. जे हॉस्पिटलमध्ये आहेत, ज्यांना वेळोवेळी उपचार मिळत नाही,
अशा सर्वांना देवाने बरे करावेत व त्यांना चांगले आरोग्य द्यावे,
म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. डॉक्टर्स, नर्सेस ह्यांना परमेश्वराची
कृपा मिळावी व त्यांच्याद्वारे लोकांना परमेश्वराचा स्पर्श जाणावा व जे डॉक्टर्स नर्सेस
लोकांच्या दबावाखाली घाबरत आहेत, त्यांना योग्य ती शक्ती,
सामर्थ्य मिळावे, म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. जे भाविक लोकांपर्यंत मदतीचा हात देत
आहेत. जे या महामारीचा सामना करत आहेत. अशा सर्वांना पवित्र आत्म्याने बळ द्यावे व
त्यावर परमेश्वराची कृपा असावी,
म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. आपल्या जीवनाद्वारे आपण इतरांना देवाचे
प्रेम व एकमेकांविषयी आदर बाळगावा व त्याद्वारे आपण देवाच्या प्रेमात वाढावे, म्हणून आपण प्रार्थना
करूया.
६. थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक
हेतूंसाठी प्रार्थना करू या.
No comments:
Post a Comment