Reflection for 26th Sunday in Ordinary Time (26/09/2021) By Bro. Jeoff Patil
सामान्य काळातील सव्विसावा रविवार
दिनांक – २६-०९-२०१८
पहिले वाचन – गणना ११:२५-२९
दुसरे वाचन – याकोब ५:१-६
शुभवर्तमान - मार्क ९:३८-४८
“जो आपल्याविरुद्ध नाही तो आपल्याला अनुकूल
आहे”.
प्रस्तावना
आज आपण सामान्य काळातील सव्विसावा रविवार साजरा करीत आहोत.
आजची उपासना आपल्याला ख्रिस्ताच्या कार्यात सहभागी होण्यास आमंत्रण देत आहे.
आजच्या पहिल्या वाचनात आपण पाहतो कि, देवाने मोशेचे काम हलके करण्यासाठी सत्तर जणांची निवड केली. दुसरे वाचन
आपल्याला धन व त्याचा गैरवापर कशाप्रकारे वाईट मार्गाला घेऊन जाऊ शकतो हे
स्पष्टपणे सांगत आहे. तसेच आजचे शुभवर्तमान आपल्याला ख्रिस्त हा सर्वव्यापी आहे व
त्याचे दर्शन आपल्याला चांगल्या व्यक्तीमध्ये व त्याच्या कार्यामध्ये दिसून येते,
हे सांगत आहे.
दैनंदिन जीवन जगात असताना आपण
अनेक लोकांच्या संपर्कात येतो जी निस्वार्थीपने दुसऱ्यांची सेवा करतात. ह्या लोकांच्या
कार्याचा कधी-कधी चुकीचा अर्थ काढला जातो. आशा लोकांच्या पाठीही उभे राहून त्यांच्या
कार्यास आधार द्यावा व त्याद्वारे ख्रिस्ती लोकांपर्यंत पोहचवण्यास आपणास कृपा
मिळावी, म्हणून आपण विशेष प्रार्थना करूया.
मनन चिंतन
“जो आपल्याविरुद्ध नाही तो आपल्याला अनुकूल आहे”. ख्रिस्ताठायी माझ्या प्रिय
बंधू-भगिनींनो आजची उपासना आपल्याला ख्रिस्ताच्या कार्यात सहभागी होण्यास बोलावत
आहे. ख्रिस्ताचे कार्य हे फक्त ख्रिस्ती लोकांसाठीच मर्यादित नाही तर अख्रिस्ती
लोकांसाठी सुद्धा आहे. ह्याची जाणीव आपल्याला आजच्या शुभवर्तमानात पाहायला मिळते.
जेव्हा आपण एकत्र राहत असतो
तेव्हा तेथे समस्या उद्भवतात कारण आपल्या बहुतेकजनात मत्सर व राग रुजलेला असतो. एक
मनुष्य ख्रिस्ताच्या नावाने भुते काढत होता. कदाचित ह्या मनुष्याने ख्रिस्ताविषयी
ऐकले असेल. कारण येशूची ख्याती सर्व ठिकाणी पसरली होती. म्हणून हा मनुष्य येशू हा
दैवी रूप आहे, हे जाणून येशूच्या नावाने लोकांस बरे करणे व भुते काढण्यास यशस्वी
ठरतो. हे पाहून येशूचे शिष्य थक्क झाले. आपण येशूच्या अधिक जवळ असून सुद्धा
लोकांना बरे करण्यास ते असफल ठरले; ह्या गोष्टीची त्यांना लाज वाटली. योहानाने येशूकडे
तक्रार केली पण येशूने त्याला सरळ शब्दांत त्याच्या चुकीची जाणीव करून दिली. येशू
म्हणाला, “जो आपल्या विरुद्ध नाही, तो आपल्या बरोबर आहे”. ह्याचा अर्थ म्हणजे त्या
मनुष्याला लाभलेलं सामर्थ्य हे देवाकडून आहे. देव त्याच्याद्वारे ख्रिस्ताची
सुवार्ता पसरवित होता.
आपण ख्रिस्ती जीवन जगात
असतांना आपल्या जीवनात बरे व वाईट बोलणारे लोक भेटतात, कारण मत्सर हे मतभेदाचे मूळ
कारण आहे. आपण ख्रिस्तसभेमध्ये नाही तर सर्व ठिकाणी मतभेद करणारे लोक पाहत असतो.
एका गाढवाला झाडाला बांधले होते.
एका रात्री भुताने दोरी कापून गाढव सोडले. गाढवाने जाऊन शेतातील पिके नष्ट केली.
चिडलेल्या शेतकऱ्याच्या बायकोने गाढवाला दगड घालून ठार केले. या गाढवाचा मालक नुकसानीमुळे उध्वस्त झाला. प्रत्युत्तरादाखल त्याने
शेतकऱ्याच्या बायकोला दगड घालून ठार केले. पत्नीच्या मृत्यूमुळे संतप्त झालेल्या
शेतकऱ्याने विळा घेऊन गाढवाच्या मालकाची हत्या केली. गाढवाच्या मालकाच्या पत्नीला
राग आला तिने आणि तिच्या मुलांने शेतकऱ्याच्या घराला आग लावली. शेतकऱ्याने आपल्या घराची राख बघून पुढे जाऊन त्या गाढवाच्या मालकाच्या बायकोला
आणि मुलाला दोघांना ठार मारले.शेवटी जेंव्हा शेतकऱ्याला वाईट वाटले, तेव्हा तो त्या भुताला
म्हणाला "तुझ्यामुळे हे सगळे मेले, तू असं का केलंस?" त्या भूताने उत्तर दिलं "मी कुणालाही ठार मारले नाही, मी फक्त दोरीने
बांधलेले गाढव सोडले."
मत्सर आपल्याला आंधळा बनवू
शकतो आणि आपल्याला वाईटाकडे घेऊन जाऊ शकतो. आणि आपल्यामध्ये असलेला चांगुलपणा
त्याची वाढ थांबू शकतो. येशू ख्रिस्त आपल्याला सांगत आहे कि, देव हा वाईट व बरे
करणाऱ्यावर त्याचा प्रकाश टाकतो. तसेच आपण सुद्धा आपल्या जीवनात ते वाईट व बरे
त्याच्यात मतभेद न करता सर्वांवर देवाचे प्रेम द्यायला पाहिजे व ख्रिस्ताची
सुवार्ता सर्वत्र पसरवली पाहिजे.
ख्रिस्ताचे कार्य हे फक्त
प्रवचन करणे, बाप्तिस्मा देणे किंवा इतरांना ख्रिस्ती धर्मात आनणे ह्यापुरता
मर्यादित नाही, तर त्याही पलीकडे आहे; माणुसकीच्या नात्याने प्रत्येकाला माणूस
म्हणून वागवणे आहे. जेव्हा एखादी अख्रिस्ती व्यक्ती तहानलेल्या व्यक्तीस पाणी पाजते,
रोग्यांना औषध देते, दीन-दुबळ्यांची सेवा करते व दुःखितांचे सांत्वन करते तेव्हा
ती व्यक्ती ख्रिस्ताच्या कार्यात सहभागी होते. दुसऱ्या व्हॅटिकन सभेने ख्रिस्ताचे वास्तव्य
हे सर्वव्यापी आहे; ह्याची जाणीव अखिल ख्रिस्तसभेला करून दिली आहे. आपल्या ह्या
जगात जर देवाचे राज्य प्रस्थापित करायचे असेल तर आपणा सर्वांना एकत्र येऊन देवाचे
सेवाकार्य या पृथ्वीवर प्रस्थापित करावे लागेल.
आजच्या शुभवर्तमानातील दुसरा
महत्वाचा मुद्दा म्हणजे पापी वृत्ती. जर आपला कुठलाही अवयव आपणास पापास प्रवृत्त
करत असेल तर तो आपण काढून टाकावा. कारण आपला संपूर्ण नाश होण्याएवजी आपण अपंग
स्वर्गात गेलेलं बरे. ह्या व्याक्याचा आपण तंतोतंत अर्थ घेऊ नये तर ह्या
वाक्याद्वारे येशू ख्रिस्त आपल्या काय संदेश देत आहे, हे महत्वाचे आहे. आपले
शारीरिक अवयव हे आपल्यासाठी जगातील सर्व संपत्तीहून अधिक अनमोल आहेत. म्हणून जर आपल्या
अनमोल गोष्टी जर आपल्याला पापांकडे नेत असतील, व ख्रिस्त व आपल्यामध्ये दुरी
निर्माण करीत असतील तर त्या पापांचा आपण त्याग करावा. असे येशू ख्रिस्त आपल्याला
ह्या वाक्याद्वारे संदेश देतो.
स्वर्गराज्यापेक्षा अधिक महत्वाची
दुसरी गोष्ट असू शकत नाही हे आपल्याला येशू ख्रिस्त आजच्या उपासनेत पटवून देत आहे.
ख्रिस्ताचे खरे शिष्य बनून त्याचे कार्य करण्यास ईश्वरी प्रेरणा मिळावी म्हणून आपण
प्रार्थाना करूया.
विश्वासू लोकांच्या प्रार्थना
आपला प्रतिसाद – हे प्रभू दया कर व तुझ्या लोकांची
प्रार्थना ऐक.
१. हे परमेश्वरा तुझ्या
सेवेत बोलाविलेले आमचे पोप फ्रान्सिस, बिशप्स, फादर्स व सर्व व्रतस्त बंधू-भगिनी ह्यांना तुझे
कार्य करण्यास शारीरिक व मानसिक आरोग्य मिळावे. व तुझ्याशी एकनिष्ठ राहून जगाला
तुझी ओळख द्यावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. जे लोक देवापासून दूर
गेले आहेत. त्या सर्वाना दैवी दयेचा स्पर्श व्हावा व देवाकडे वळून एक नवीन, विश्वासू जीवन जगावे
म्हणून प्रार्थना करूया.
3. जी कुटुंबे दैनिक वादविवादाला बळी पडून मोडकळीस
आली आहेत, त्या कुटुंबात शांती नांदावी व प्रेमाला उधान यावे म्हणून आपण विशेष प्रार्थना
करूया.
४. जी दापत्ये अजून बाळाच्या
देणगीची वाट पाहत आहेत, त्याची प्रार्थना परमेश्वराने ऐकावी व बाळाच्या
देणगीने त्याचे जीवन आनंदमय व्हावे म्हणून प्रार्थान करूया.
५. थोडावेळ शांत राहून
आपल्या वैयक्तिक व सामाजिक गरजांसाठी प्रार्थना करूया.
Well Written... Keep going... God Bless Your Study and Ministry
ReplyDelete