Thursday, 14 July 2022

REFLECTION FOR THE HOMILY OF 16TH SUNDAY IN ORDINARY  TIME (17/07/2022) BY BR. Brijal LOPES

सामान्य काळातील सोळावा रविवार



दिनांक: १७-०७ -२०२२ 

पहिले वाचन: उत्पत्ती: १८: १-१६

दुसरे वाचन: कलस्सैकरांस पत्र  १:२४-२८

शुभवर्तमान: लुक १०:३८-४२

प्रस्तावना:

 

          आज आपण सामन्य काळातील सोळावा रविवार साजरा करीत आहोत. आज देऊळमाता आजच्या उपासनेत आपण नेहमी प्रभू येशू ख्रिस्ताच्या स्वागतासाठी त्याच्या सानिध्यात राहण्यास व  त्याची मौल्यवान वचने ऐकावयास आमंत्रण करीत आहे.

          आजच्या पहिल्या वाचनात आपण ऐकतो, आब्राहाम हा त्याच्या घरी आलेल्या तीन पाहुण्यांचे आदराने स्वागत करतो व आदरतीथ्य करून त्यांची शाररीक भूक भागवतो. ह्या त्याच्या चांगुलपणामुळे आनंदित होऊन ते आब्राहामाला पुत्र प्राप्तीचे दान देतात. दुसऱ्या वाचनात संत पौल स्वतःच्या दुःख सहना विषयी सांगत आहे; आणि हे दुःख आपल्या जीवनाचा एक भाग आहे व ह्या दुखातुनच येशूने आपल्याला तारणप्राप्त करून दिले आहे असे तो म्हणतो. तर आजच्या शुभवर्तमानात  येशू ख्रिस्ताचे, मार्था व मरिया ह्यांच्या घरी गेलेल्या भेटीचे वर्णन ऐकावयास मिळते.

          मरिया जशी प्रभू येशूचे वचन ऐकावयास त्याच्या सानिध्यात  राहिली तशाच प्रकारचे सामर्थ्य व ध्येर्य  आपल्याला प्रभू येशूने ख्रिस्ताने द्यावे म्हणून आपण ह्या पवित्र ख्रिस्तयागात प्रार्थना करूया.


पहिले वाचन: उत्पत्ती: १८: १-१६

 

          पहिल्या वाचनात आपण पाहतो की परमेश्वराने आब्राहामाला दर्शन दिले होते. त्यावेळी आब्राहाम एलोन नावाच्या झाडाखाली राहात होता. आब्राहामाचा देवावर खुप विश्वास होता. प्रत्येक मनुष्य जो आब्राहामाकडे येतो तो आब्राहामासाठी देव माणूस असतो.

          एके दिवशी आब्राहाम त्याच्या दारापाशी बसला असता तीन यात्रीकरू जात होते. आब्राहामाने त्यांना ओळखले की हे नक्कीच देवमाणसं असतील म्हणून आब्राहामाने त्यांना आत येऊन विश्रांती घ्यावयास विनंती केली व जेवायला दिले.

          जो पर्यंत ते तीन पाहुणे त्यांच्या घरात होते तिथ पर्यंत त्यांनी त्यांचा सहवास सोडला नाही आणि त्याचे फळ त्याला त्यांनी साराला पुत्र होईल असे सांगून दिले.

 

दुसरे वाचन: कलस्सैकरांस पत्र  १:२४-२८

 

पौल ख्रिस्ताच्या मंडळी साठी किंवा लोकांसाठी दुख सहन करीत होता. मानवाच्या तारणासाठी ख्रिस्ताने जे दुख सहन केले त्यांचा तो या वाचनात उल्लेख करीत आहे. ख्रिस्ताच्या लोकांचा छळ होतो तेव्हा ख्रिस्ताला क्लेश होतात व या क्लेशात सहभागी होण्यास पौल तयार होता. देवाच्या वचनात  देवाची परिपूर्ण योजना प्रगट झाली आहे. हे सत्य इतरांना कळविण्याची सेवा देवाने पौलाला दिली. ती पूर्ण करण्यास पौल आतुर झाला होता. तो लोकांचा सेवक होता ख्रिस्तामधील देवाची योजना त्या काळापर्यंत गुप्त ठेवली होती. ती आता या कृपेच्या काळात देवाने प्रगट केली आहे. ती योजना ख्रिस्ताचे लोक हीच आहे.

          यहुदी व परराष्ट्रीय एक नवा गट कसे होतील हे रहस्य ख्रिस्त येईपर्यंत गुप्त होते. आता ख्रिस्ताच्या सुवार्तेद्वारे देव केवढी गौरवी संपतीच परराष्ट्रीयांना देत आहे हे प्रगट होत आहे. विश्वास ठेवणाऱ्यात जो ख्रिस्त वस्ती करीत आहे तोच या गौरवी संपत्तीची आशा आहे. देवाला ख्रिस्तामध्ये त्याच्याकडे येणाऱ्या सर्वांना ध्यान करायचे आहे.

 

शुभवर्तमान: लुक १०:३८-४२

 

मार्था व मारिया या दोन बहिणी व लाजर हा त्यांचा भाऊ. यांच्या घरात प्रभू येशू नेहमी जात असे. एक दिवस प्रभू येशू त्याच्या गावी गेला  मार्था येशू ख्रिस्ताचा पाहुणचार करण्यास फार उत्स्तुक असे. त्या दिवशी तिने जास्त स्वयपाक बनविण्याचे ठरवले. पण काही वेळातच तिची ताराबंळ   उडाली कारण ते तिला एकटीला जमत नव्हते. आपली नक्कीच फजिती होणार हे तिने ओळखले आणि त्याचा दोष प्रभू येशूला दिला. त्यात तिने तिच्या बहिनिवरही आरोप केला. प्रभू येशूने तिला शांतपणे उत्तर दिले. या गोधंळाला तिच जबाबदार होती. प्रत्येक गोष्टी विषयी काळजी करून धावपळ करणे व स्व:ताला त्रास करून घेणे हा मार्थाचा स्वभाव होता. या स्वभावाप्रमाणे ती वागत होती. यामुळे तिने प्रभूयेशुला व आपल्या बहिणीला दोष दिला. प्रभू म्हणाला भाजी भाकर चालली असती पक्वाने करायची गरज नव्हती, कशाची गरज आहे त्याचा विचार कर विनाकारण डोक्यावरचा भार वाढवू नकोस.

          मारियेला आध्यात्मिक  भूक होती. ती प्रभूचे ऐकण्यास व त्याची महानता ओळखण्यास उत्सुक होती. तिने आपली आध्यात्मिक गरज ओळखली होती. प्रभूचे भाषण एकूण तिचे अंत:करण प्रफुल्लीत झाले तिने चांगला वाटा निवडला होता.

 

मनन चिंतन:   

 

प्रिय बंधू भगिनीनो आजची उपासना आपल्याला परमेश्वराच्या  सानिध्यात राहून, त्याचे पवित्र शब्द ऐकण्यास बोलावत आहे. आपले लक्ष नेहमी परमेश्वरावर  केंद्रित असले पाहिजे व  प्रभू येशुख्रिस्त आपला केंद्रबिंधू बनला पाहिजे. आपल्या दररोजच्या जीवनात आपले लक्ष योग्य त्या गोष्टीवर, योग्य त्या दिशेने व  योग्य त्या ठिकाणी  असणे खूप महत्वाचे आहे. एकदा एक व्यक्ती डिजिटल कॅमेरा घेऊन फोटो काढत होता त्याने एका मुलाला बोलावले आणि त्याला सांगितले कि मी तुझा फोटो काढतो तेव्हा तो मुलगा तयार झाला व जेव्हा तो व्यक्ती फोटो काढत होता तेव्हा तो त्याने कॅमेरा त्याच्या बाजूने फिरवला व फोटो काढला. फोटो बघताच त्याच्या लक्षात आले कि त्याने त्याचा कॅमेरा फोटो काढताना त्याच्याकडे फिरवला होता त्यामुळे त्याचा स्वताचा फोटो आला, त्या मुलाचा नाही. थोड्या वेळाने  त्याने पुन्हा प्रयत्न केले. व या वेळेला, त्याने कॅमेरा मुलाकडे फिरवला व त्यामुळे त्या मुलाचा चांगला असा फोटो आला. सांगायचे तात्पर्य इतकेच कि आपला कॅमेरा कोणाकडे फिरलेला  असतो योग्य गोष्टीकडे अथवा दुसऱ्याठिकाणी? आजच्या शुभवर्तमानात  आपल्याला हेच पाहण्यास भेटते. मरीयेचा केंद्र बिंदू हा प्रभू येशू होता, त्यामुळे तिचे संपूर्ण लक्ष प्रभू येशू ख्रिस्तावर केंद्रित होते. खूप वेळा आपण योग्य त्या गोष्टीला प्राधान्य न देता चुकीच्या गोष्टीकडे वळतो. मरिये प्रमाणे आपण नेहमी प्रभू येशू जो सर्वगुण संपन्न आहे त्याला प्राधान्य दिले पाहिजे.

                   

          आजच्या शुभवर्तमानातून आपल्याला दुसरा संदेश भेटतो तो म्हणजे आपण नेहमी परमेश्वराचा शब्द ऐकण्यास तयार असलो पाहिजे. मरीयेने प्रभूचा शब्द ऐकण्यास प्राधन्य दिले. काही वेळेला आपण पाहतो कि काही मुले त्यांच्या आई वडिलांना त्यांच्या वाढदिवसाचे गिफ्ट देण्यासाठी खूप मेहनत करतात त्यांचा बहुतेक वेळ त्या गिफ्टसाठीच जात असतो. परंतु आई वडिलांना किंवा एखद्या मित्राला गिफ्ट शिवाय त्यांना साथ हवी असते. कोणी तरी आपल्या बरोबर बोलावे व आपले ऐकावे ह्याची गरज जास्त असते.

एक मुलगी तीच्या वडिलांबरोबर दररोज वॉक घेण्यासाठी जात असे. काही दिवसांनी त्या मुलीने तिच्या वडिलांना सांगितले कि तिला काम आहे ती वाक साठी येऊ शकणार नाही. जेव्हा तिचे वडील वॉकला जात होते तेव्हा ती मुलगी तिच्या वडिलांसाठी वाढदिवसा निमीत्ताने गिफ्ट देण्यासाठी ती स्वेटर  विकत आणायला जाते. वडिलांच्या वाढदिवसी ती मुलगी आपल्या वडिलांना ते स्वेटर देते. तेव्हा वडिलांना माहित पडते कि हि माझ्या बरोबर वॉकला न येता माझ्यासाठी स्वेटर विकत आणायला गेली होती. त्यावर तिचे वडील तिला म्हणाले कि, तू हे जे गिफ्ट मला दिलेले आहे ते खूप चांगले आहे. परंतु मला ह्या स्वेटर पेक्षा, तुझ्या सहवासाची  जास्त गरज आहे. तु माझ्या बरोबर बोलत असते हेच माझ्या साठी जास्त मोलाचे आहे.

आशाप्रकारे आपण अनेक वेळेला मार्था प्रमाणे जास्त काम करण्यात गुंतून जातो परंतु आपण मरीये प्रमाणे दुसऱ्यांचे ऐकणारे, दुसऱ्यांना वेळ देणारे बनलो पाहिजे.   

 

विश्वासु लोकांच्या प्रार्थना

 

प्रतिसाद: हे प्रभो तुझी सेवा करावयास आम्हाला सहाय्य कर.

 

१. ख्रिस्त सभेची धुरा वाहणारेपोप महाशयबिशप्सकार्डीनल्ससर्व धर्मगुरु व व्रतस्त जे ख्रिस्ताच्या मळ्यात कार्यरत आहेतह्या सर्वाना परमेश्वराचा आशीर्वाद लाभावा व त्यांनी देवाचे कार्य अखंडित चालू ठेऊन एक उत्तम जीवनाचा धडा लोकांपर्यंत पोहचवावा म्हणून आपण प्रार्थना करुया.

२. प्रत्येक ख्रिस्ती बांधवाने देवाची मुले म्हणून जीवन जगावे व ख्रिस्ताच्या वचनांचे आज्ञाधारकपणे पालन करून देवाच्या इच्छेला प्रथम प्राधान्य द्यावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

३. उत्तम ख्रिस्ती ह्या नात्याने आपणास एक दुसऱ्यांची सेवा करण्यास व देवाच्या नावाने दुसऱ्यांचा स्वीकार करण्यास शक्ती व कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

४. यंदाच्या वर्षी परमेश्वराने आपल्यावर चांगली पर्जन्यवृष्टी केली आहेत्याबद्ल आपण परमेश्वराचे आभार मानत असताजेथे वाजवीपेक्षा अधिक पर्जन्यवृष्टी होऊन पुराचे वातावरण निर्माण झाले आहेअशा ठिकाणच्या लोकांचे परमेश्वराने संरक्षण करावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

५. जे कोणी बेरोजगार आहेत व नोकरीच्या शोधात आहेत त्यांना प्रभूच्या आशिर्वादाने त्यांच्या योग्यतेप्रमाणे चांगली नोकरी मिळावी व त्याचा संसार सुखाने चालावा म्हणून आपण प्रार्थना करूया.

६. आता थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक व सामाजिक हेतूंसाठी प्रार्थना करूया.






No comments:

Post a Comment