सामान्य काळातील तिसरा रविवार
दिनांक: २२/०१/२०२३
पहिले वाचन: यशया ८: २३ - ९: ३
दुसरे वाचन: पौलचे करिंथकरांस पहिले पत्र १: १-३
शुभवर्तमान: मत्तय ४: १२- २३
विषय: “माझ्या मागे या.”
प्रस्तावना:
माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो आज देऊळमाता
सामान्य काळातील तिसरा रविवार साजरा करीत आहे. आज पवित्र ख्रिस्तसभा प्रभूशब्द रविवार साजरा करत आहे.
आजची
उपासना ही सूचना कार्यावर विश्वास ठेवण्यास
पश्चाताप करूण चांगल्या मार्गावर चालण्यास बोलावित आहे.
स्नान-संस्कारद्वारे आपण
सर्वजण देवाच्या राज्यात सहभागी झालो आहोत. त्यासाठी
देवाच्या शब्दाप्रमाणे वागण्यास आणि देवाचा शब्द दुसऱ्यांपर्यंत
पसरविण्यास व
तशीच लोकांची सेवा कार्य करण्यासाठी पाचारण करत
आहे. आज आपण ह्या पवित्र मिस्साबलीदानात सहभागी होत असता आपली अंतकरणने
साफ करू;
आपण देवाचा शब्द ऐकण्यास आणि ख्रिस्ताचे अनुयायी बनण्यासाठी
परमेश्वराकडे प्रार्थना करूया.
मनन चिंतन:
देवाचें पाचारण
सर्वाना लाभले आहे.
परंतु आपले कार्य वेगळ्या प्रकारचे असून सर्वांचा हेतु एकच आहे आणि
ते म्हणजे
गोरगरिबांची सेवा. देवाचे कार्य मनापासून केल्यामुळे जीवन बदलून जाते. जेव्हा
आपल्या जीवनाला प्रेरणा लाभते तो आनंद आपण पैशाने विकत घेऊ शकत
नाही. हाच उपदेश
आजच्या
या तीनही वाचानाद्वारे मिळतो. आजच्या पहिल्या वाचनात
यशया संदेष्ठा
इस्रायली लोकांच्या जीवनातील अंधारी बाजू सादर करीत आहे. या अंधारात बसलेले लोक
लवकरच मोठा प्रकाश पाहणार आहेत, असा आशीर्वाद
यशया संदेष्टा देतो. त्यानंतर
मात्र त्याच्या वाट्याला जो परिपूर्ण आनंद येणार आहे त्यांची तुलना शत्रूंवर विजय, गुलामगिरीतून
मुक्तता या सर्व प्रसंगीं होणाऱ्या आनंदाशी करण्यात आलेला आहे. असा आनंद खाजगी
स्वरूपाचा नसतो;
तो इतरांबरोबर राहूनच मिळविता येतो. परमेश्वर मानवाला अशा सामुदायिक आनंदासाठी
पाचारण करतो.
दुसऱ्या वाचनात करिंथ येथल्या ख्रिस्ती
लोकांमध्ये पडलेली फूट आपण पाहतो. संत पौलाने त्यांना येशूची सुवार्ता सांगितल्यानंतर अपोलो नावाचा प्रभावी वक्ता
अवतरला. त्यानंतर जेरुसलेममधून संत पेत्राच्या अधिकाराचा बोंबाटा करणारी
मंडळी आली.
पेत्र, पौल,
अपोलो यांना माननारे तीन गट पडले. चौथ्या गटाने ख्रिस्ताच्या झेंड्याखाली रहाणे पसंत केले. ह्या
सर्वांना सुवार्ता प्रसाराचा यशासाठी एकत्र द्यावे असे आव्हान पौलाने
केलेले आहे.
आजच्या
शुभवर्तामानामध्ये दोन भाग आहेत. पहिल्या भागात
येशु सर्वांना अंधार आणि प्रकाशाबद्दल सांगितले आहे. मरणाचे सावट असलेल्या
प्रदेशात राहणाऱ्या लोकांसाठी प्रकाश उतरला आहे. एक अंधकारमुक्त
जीवन जगण्याची आणि ज्या गोष्टीमुळे आपलं जीवन अंधूकमय प्रकाशरहित
बनतात अशा गोष्टींपासून मुक्त अस जीवन जगण्याची आशा आपल्याला सर्वांमध्ये, आपल्या
हृदयात खोल दडलेली आहे. परंतु आपल्या जीवनावर अंधकाराचे वर्चस्व सुद्धा आहे. आणि
हा अंधकार वेगवेगळ्या तर्हेने आणि वेगवेगळ्या रूपात आपल्या जीवनाचा ताबा घेतो.
अनेक वेळा आपण इतर लोकांविषयी विचार करतो व ते जगत असलेल्या
जीवनाविषयी बोलताना सांगतो की, ही लोकं
अंधकारात पाप करून गरीबांचा छळ करतात.
अंधकारात राहता त्यांच्या जीवनावर मृत्यूरूपी अंधकाराचे
सावट आहे.
दुसऱ्या भागात प्रभू येशू
शिष्यत्वासाठी पाचारण करतो. इतरांचे नेतृत्व करण्यासाठी त्यांना स्वतःचा व्यवसाय
सोडून देण्यास सांगत आहे. प्रभू येशू लोकांना
स्वर्गीय शांती प्रदान करून त्याद्वारे एकमेकांना स्वर्गीय पित्याची लेकरे
बनविण्यासाठी आलेला होता. लोकांना तारणाचा प्रकाशाचा अनुभव यावा म्हणून प्रभू येशू
लोकांना पश्चातापाबद्दल उपदेश करतो, “पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले
आहे.” आणि लोकांना
त्याच्या उपदेशाचा बोध व्हावा म्हणून प्रभू येशू त्यांना फक्त शब्दांद्वारे बोलत
नाही, तर देवच राज्य ह्या जगात कस येऊ शकते हे तो त्यांना दाखवतो.
त्याला आजार्याबद्दल, गरीब आणि अपेक्शितांबद्दल आस्था वाटतो. तो लोकांमध्ये
आपण सर्व एक कुटुंब – बंधू- भगीणी आहोत अशी भावना
जोपासतो.
अशा प्रकारे प्रभू येशू स्वर्ग राज्य या जगात प्रस्थापित करतो आणि अंधारात चाचपडत असलेल्या
जगाला प्रकाश देतो. जेथे अंधार आहे तेथे प्रकाश आणणे, हाच प्रभू येशूचा मिशन
कार्याचा हेतू होता. आपल्या जीवनातील अंधकारावर मात करून आपण प्रभू येशूचा प्रकाश
त्याच्या प्रेमाचा संदेश आणि त्याचा तारणाचं दान आपल्या जीवनात यावं म्हणून आपण आजच्या मिस्साबलिदानामध्ये
प्रभू येशू ख्रिस्ताकडे प्रार्थना करूया.
विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: “हे
प्रभो, तुझ्या
पाचारणास होकार देण्यास आम्हांला शिकव!”
१) आपल्या ख्रिस्तसभेची आध्यात्मिक काळजी घेणारे आपले पोप
महाशय, कार्डीनल्स, बिशप्स, धर्मगुरू-धर्मभगिनी आणि सर्व प्रापंचिक
ह्या सर्वावर देवाच्या कृपेचा वर्षाव व्हावा व त्यांच्या कृतीतून देवाचे प्रेम
लोकांकडे पोहचावे म्हणून आपण प्रार्थना करू या.
२) आपल्या धर्मग्रामात जे कोणी आजारी आहेत. अशा सर्व आजारी
लोकांना परमेश्वरी कृपेचा स्पर्श होऊन त्यांची आजारातून सुटका व्हावी म्हणून आपण
प्रार्थना करू या.
३) आज आपण आपल्या देशासाठी प्रार्थना करूया की, देशभर पसरलेली अशांतता नष्ट व्हावी व
सर्वत्र शांतता व सलोखा नांदावा म्हणून आपण प्रार्थना करू या.
४) आपल्या सर्व राजकीय पुढाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी आपला
स्वार्थ बाजूला ठेऊन सतत देशाच्या उन्नतीसाठी व प्रगतीसाठी झटावे म्हणून आपण
प्रार्थना करू या.
५) येशू ख्रिस्त आपल्या आई-वडीलांच्या आज्ञेत राहिला व
त्यांना मान व सन्मान दिला. आज मुल-मुली आई-वडिलांना अपशब्द बोलतात व दु:खवितात
अशा मुला-मुलींना ईश्वराचे प्रेम मिळावे, जेणेकरून ही मुल-मुली आपल्या आई-वडिलांचा आदर राखतील म्हणून आपण प्रार्थना
करू या.
७) आता थोडा वेळ शांत राहून आपल्या आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक व सामाजिक गरजांसाठी
प्रार्थना करूया.
No comments:
Post a Comment