Reflection for the 2nd Sunday in Ordinary Time (14/01/2024) by Br. Rockson Dinis.
दिनांक: १४-०१-२०२४
पहिले वाचन: १ शमुवेल ३:३-१०, १९
दुसरे वाचन: १ करिंथ ६:१३-१५, १७-२०
शुभवर्तमान: योहान १:३५-४२
सामान्य काळातील दुसरा रविवार
प्रस्तावना:
आज आपण सामान्य काळातील दुसरा राविवार साजरा करीत आहोत. आजच्या वाचनात
आपण देवाच्या पाचारणाविषयी ऐकत आहोत. आजच्या
पहिल्या वाचनात, परमेश्वराचे शमुवेलाला पाचारण करत
आहे. दुसऱ्या वाचनात संत पौल करिंथ येथील देवाच्या मंडळीस सांगतो की, “तुमची शरीरे ख्रिस्ताचे
अवयव आहेत, हे तुम्हास ठाऊक नाही काय?” अशा प्रकारचा संदेश संत पौल आपल्याला आज देत आहे. आजच्या शुभवर्तमानात, योहानाच्या शिष्यांना,
येशू कोण आहे व तो कोठे राहत आहे, याची ओळख आपणास करून
देत आहे.
प्रत्येक
व्यक्ति खऱ्या देवाच्या शोधात आहे, जसे योहानाचे शिष्य जणूकाही खऱ्यादेवासाठी
तहानलेले होते. अशाच प्रकारची श्रद्धा आपल्याला कॅथोलिक ख्रिस्तासभा शिकवत (CCC) आहे ती म्हणजे,
“ईश्वरी उत्कंठा मानवी हृदयावर लिहून ठेवलेली
आहे. कारण परमेश्वराने स्वतःसाठी मनुष्यनिर्मिती केली. परमेश्वर
मनुष्याला स्वतःकडे ओढून घेत असतो. सत्याचा आणि सुखाचा शोध घेणाऱ्या मनुष्याला सत्य
आणि सुख केवळ परमेश्वरामध्येच सापडते. (CCC 27).
मनन चिंतन:
आजच्या उपासनेत
परमेश्वर आपणा सर्वांना एकजीव होण्याचे आमंत्रण देत आहे. एकजीव
होणे म्हणजे परमेश्वराशी सुसंवाद करणे. आपण पाहतो, प्राचीन इतिहासापासून ते आजपर्यंत मानवाने आपली परमेश्वरासंबंधीची उत्कंठा आपल्या
धार्मिक जीवनातून अथवा वर्तणुकीतून आणि श्रद्धेतून व्यक्त केली आहे.
आजच्या पहिल्या
वाचना आपण पाहतो की, शमुवेलाच्या पाचारणात परमेश्वराचा
सिंहाचा वाटा होता. प्रभूने त्याला बालपणात बोलावले, “शमुवेल शमुवेल” त्याने ही हाक ऐकली
तेव्हा तो झोपेत होता. एलिया त्याला
बोलावीत आहे असे त्याला वाटले. परमेश्वर मात्र शमुवेलाच्या
उत्तराला थांबला होता. शमुवेलचे उत्तर त्याला ठाऊक होते. तरीही शमुवेलला तो तीन वेळा
हाक मारतो. तीन वेळा हाक येणे हे शमुवेलाच्या पाचारणाची ठाम हमी होती.
ज्या प्रकारे शमुवेलाच्या पाचारणात आव्हान
होते,
तशाच प्रकारे योहानाच्या शिष्यांना सुद्धा खऱ्या देवाच्या शोधाची तहान लागली होती.
जेव्हा योहान त्याच्या शिष्यांना म्हणतो, “पहा देवाचा कोकरा”, तेव्हा त्या शिष्यांना
कळून चुकते की, खरोखर ख्रिस्ता मध्ये जीवन आहे. म्हणूनच ते ख्रिस्ताला सांगतात, “गुरुजी आपण कोठे
राहता?” जेव्हा शिष्य ख्रिस्ताबरोबर राहिले, तेव्हा त्यांना कळून चुकले की, खरोखरच जीवनाचे उगमस्थान हा प्रभू
येशू ख्रिस्त आहे. हा कोणी नसून मसीहा आहे. त्याच्याठायी जीवन आहे,
जीवनाची भाकर आहे. त्याच्याठायी विसावा आहे. म्हणूनच संत आगस्तीन म्हणतात, “जोपर्यंत आपण
ख्रिस्तामध्ये विश्रांती घेत नाही तोपर्यंत आपली अंतःकरणें आश्वस्त राहतील.”
ज्या प्रकारे मुंगी दिवसभर
साखरेच्या शोधात असते, तसे आपण दिवसभर ख्रिस्ताच्या शोधात असावेत. कारण ख्रिस्ताच्या
आध्यात्माचा झरा जिथे वाहतो
तिथे जीवन आहे, विपुल सुख आहे. या विपुल सुखाचे उत्कृष्ट उदाहरण
योहानाच्या शुभवर्तमानात सांगितली आहे ते म्हणजे, शिमोन पेत्राचा भाऊ
आंद्रिया हा शिमोनाला म्हणाला, “मसीहा आम्हाला सापडला आहे.” अश्या ह्या आनंदाची उंची कोणीही मोजू शकत नाही,
कारण परमेश्वराला ओळखणे हे मनुष्याला आपल्या बुद्धीने कमावता येणार नाही. म्हणूनच
परमेश्वर ते स्वेच्छेने स्वतः प्रकट करतो. आणि अशाप्रकारे आपल्या प्रत्येकाला
प्रभू येशूच्या पाचारणाची हाक येत असते.
आज जगामध्ये, देवाच्या राज्यात कार्य करण्यासाठी प्रभू येशू अनेक लोकांना पाचारण करत आहे. ज्या प्रकारे शमुवेलला प्रभूची हाक आली, तशा प्रकारे अनेक लोकांना परमेश्वर त्याच्या मळ्यामध्ये कार्य करण्यासाठी बोलावत आहे. पाचारण ही खरी ईश्वरी हाक आहे. या ईश्वरी हाकेत परमेश्वर नेहमी बोलत असतो व जीवनात येणाऱ्या समस्यांना व अडी अडचणीला सामोरे जाण्यास दिलासा देत असतो. देवाच्या हाकेस भरपूर शक्ती आहे म्हणून आपण एकदा नांगराला हाथ घातला की मागे वळून पाहायचे नाही, फक्त परमेश्वर आपल्या बरोबर आहे इतकी कल्पना करून आपले जीवन प्रभुला समर्पित करावे.
विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: हे प्रभो, आमची प्रार्थना
ऐक.
१. आपले परमगुरु, इतर सर्वं महागुरु, धर्मगुरू, व्रतस्थ, आणि
प्रापंचिक ह्यांनी देवाच्या हाकेला योग्य तो प्रतिसाद देऊन येशूच सतत अनुकरण करावं
म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. आपल्या देशातील सर्वं राजकीय नेत्यांनी त्यांच्यावर जनतेने दिलेली जबाबदारी
योग्य मार्गाने पार पाडावी, कसल्याही प्रकारचा भ्रष्टाचार न करता
लोकांची सेवा करावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. जे कुणी देवाच्या मार्गातून दूर गेलेले आहेत, जे
मार्गभ्रष्ट झालेले आहेत अशांना त्यांच्या चुकीची जाणीव होऊन त्यांनी पुन्हा योग्य
मार्गावर चालावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. जगभरातील युवक-युवतींना प्रभूच्या मळ्यात कार्य करण्यासाठी प्रेरणा व्हावी
म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. जे कोण आजारी आहेत व गंभीर आजाराने त्रस्त आहेत
त्यांना प्रभूचे आरोग्यदायी स्पर्श व्हावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
६. थोडा
वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक विनंत्या प्रभूचरणी ठेवूया.
No comments:
Post a Comment