Reflection for the 16th
Sunday in Ordinary Time by Br. Criston Marvi
सामान्य काळातील सोळावा रविवार
दिनांक : २१/०७/२०२४
पहिले वाचन : यिर्मया २३: १-६
दुसरे वाचन : इफिसकरांस पत्र २: १३-१८
शुभवर्तमान : मार्क ६: ३०-३४
प्रस्तावना
आज आपण सामान्य काळातील सोळावा रविवार साजरा करित आहोत.
आजच्या पहिल्या वाचनात, यिर्मया
संदेष्टा सांगतो की, प्रभूच्या
कळपाचा विनाश करणाऱ्या मेंढपाळांना हाय हाय. प्रभूच्या कळपाची काळजी घेणारे
मेंढपाळ प्रभू परमेश्वर नियुक्त करील, असे प्रभू परमेश्वर म्हणतो. तसेच आजच्या दुसऱ्या वाचनात संत
पौल सांगतो की, येशू आपला सलोखा आहे.
त्यानेच आपल्याला देहाने एक केले आहे. येशूने देवापासून दूरालावलेल्या आम्हाला
तसेच त्याच्याजवळ असलेल्यांना शांतीचा शुभसंदेश सांगितला. तसेच शुभवर्तमानात आपण
पाहतो की,
लोकांचा एक मोठा समुदाय येशूकडे आला. हा समुदाय मेंढपाळ नसलेल्या
मेंढरांच्या कळपासारखा होता. परंतु येशू ख्रिस्त स्वतः त्यांचा मेंढपाळ होऊन
त्यांची काळजी घेतो.
आपणालासुद्धा स्नानसंस्काराद्वारे एक मेंढपाळ होण्याचे वरदान लाभले आहे. आपणा प्रत्येकाला दिलेल्या जबाबदाऱ्या एका उत्तम मेंढपाळाप्रमाणे आपण पार पाडण्यासाठी या ख्रिस्तयागात प्रार्थना करूया.
मनन चिंतन
एकमेकांची काळजी
वाहणे
संपूर्ण आठवडा काम केल्यानंतर येशूकडे विसावा घेण्यासाठी
आलेल्या प्रिय भाविकानो आज आपण सामान्य काळातील सोळावा रविवार साजरा करीत आहोत.
आजची उपासना ही एकमेकांची काळजी वाहण्यास आमंत्रित करीत आहे आणि आजची वाचणे
मेंढपाळा विषयी सांगत आहे.
यिर्मया प्रवक्त्याच्या पुस्तकात आपण ऐकले कि, “मी त्यांना मेंढपाळ देणार. मेंढपाळ जो त्या सर्वाना एकत्र
करणार व त्याच्यी काळजी घेणार आणि त्यांना कसलीच भीती वाटणार नाही.” आणि संत पौल
इफिसकरास सांगतो की, “एके काळी
दुरावलेल्या तुम्हाला आता ख्रिस्तामुळे आणि त्याच्या रक्ताद्वारे जवळ करण्यात आले
आहे.” तसेच आजच्या शुभवर्तमानात आपण ऐकले की, येशूला लोकांचा कळवळा आला.
प्रिय भाविकांनो एखाद्याला कळवळा येणे म्हणजेच दुसऱ्यांची
गरज ओळखून घेणे व त्यांना हवी असलेली मदत करणे. किंवा एकमेकाविषयी असलेले काळजी.
प्रभू येशू ख्रिस्ताला त्या लोकांचा कळवळा
आला आणि तो त्या लोकांचा मेंढपाळ बनून त्या लोकांना चांगला मार्ग दाखवला. आपण
सुद्धा एक चांगले मेंढपाळ होऊ शकतो. जर आपल्याला दुसऱ्यांचा कळवळा व काळजी वाटत
असेल तरच.
आज आपण जगात पाहतो की, कितीतरी लोक मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखी आहेत. आणि
संपूर्ण ख्रिस्तसभा अशा लोकांना एक मेंढपाळ होऊन त्यांची काळजी वाहत असते. संपूर्ण
जगभरात आपण पाहतो की, ख्रिस्तसभा
वेगवेगळ्या प्रकारची काळजी घेत आहे. उदाहरणार्थ शाळा, कॉलेज चालवून विद्यार्थ्यांना शाळेय शिक्षण देऊन त्यांची
शैक्षणिक काळजी घेत आहे. हॉस्पिटल, दवाखाने उघडून आजारी लोकांची सेवा करून त्यांची काळजी घेत
आहे. तसेच वृद्धाश्रमाध्ये वृद्धांची सेवा करत आहे. अनाथ आश्रम व वसतिगृहामध्ये
मुलांची काळजी घेत आहे समाजसेवेद्वारे गोरगरिबांची काळजी घेत आहेत.
संत मदर तेरेसा सांगतात की, "आपण सर्वच महान गोष्टी करू शकत नाही, परंतु आपण लहान गोष्टी मोठ्या प्रेमाने करू शकतो."
परंतु मी त्या लोकांचा मेंढपाळ आहे का? असा प्रश्न आपणास पडत असेल. पण प्रिय भाविकांनो देवाच्या
हाकेनेच आपली एक मेंढपाळ बनण्याची निवड झाली आहे. आपल्याला एखाद्या समाजाचे मेंढपाळ
म्हणून निवडले असेल तर त्या समाजाला सर्वप्रथम आपण सैतानाच्या व वाईट कृत्यांच्या
गुलामगिरीतून सोडविले पाहिजे.
प्रिय भाविकांनो आजसुद्धा आपण आपल्या आजू-बाजूला पाहतो की, कितीतरी लोक मेंढपाळ नसलेल्या मेंढरासारखे जीवन जगत आहे.
परंतु मी जेव्हा अशी लोक के पाहतो तेव्हा मला त्यांचा कळवळा येतो का? हे आपण स्वतःला विचारले पाहिजे. कळवळा येणे म्हणजेच
परिवर्तनाला सुरुवात होणे किंवा उगम होणे अशातच आणि मेंढपाळ बनवण्याचे एक बी रुजत
असते.
एक मेंढपाळ म्हणून सर्वप्रथम आपण स्वतः एक शिस्तबद्ध असले
पाहिजे आणि येशूचे प्रेमचरित्र प्रतिबिंबित केले पाहिजे. एक विश्वासू मेंढपाळ या
नात्याने आपल्याला खालील गोष्टींची गरज असणे आवश्यक आहे:
१
दुसऱ्यांसाठी नेहमी उपलब्ध असले पाहिजे
२
सेवक बनले पाहिजे
३ विश्वासाने जीवन जगले पाहिजे.
विश्वासू लोकांची प्रार्थना
आपला प्रतिसाद :- हे प्रभू आमची प्रार्थना
ऐक.
१.
आपल्या ख्रिस्त सभेचे पोप फ्रान्सिस, बिशप्स, धर्मगुरू
आणि धर्मभागिनी ह्यांना ख्रिस्ताच्या मेंढरांची काळजी घेण्यास चांगले आरोग्य आणि
पवित्र आत्म्याची प्रेरणा मिळावी म्हणून आपण प्रभूचरणी प्रार्थना करूया.
२.
आपले पालक वर्ग जे आपल्या मुलाचे पालनपोषण करून त्यांना चांगले शिक्षण देऊन
घडवण्याचे कार्य करतात, त्यांनी
आपल्या मुलांना चांगली मुल्ये आणि शिक्षण देऊन त्यांना भविष्यात सुसंस्कृत नागरिक
होण्यास प्रोस्ताहान करावे म्हणून प्रार्थना करूया.
३.
आपल्या देशाचे कार्य सांभाळणारे कार्यकर्ते ह्यांनी लोकांची सेवा करून आपले काम
जबाबदारीने पार पाडावे आणि समाजात शांतीचे वातावरण निर्माण करण्यास त्यांना
प्रेरणा मिळावी म्हणून आपण प्रार्थन करूया.
४.
आपल्या धर्मग्रामातील गरीब, आजारी
आणि गरजवंत लोकांना मदत करण्यास त्यांना चांगले जीवन जगण्यास आणि मानवप्रिती
दर्शविण्यास जास्तीत जास्त लोकांनी पुढे यावे आणि त्यासाठी लागणारे धैर्य त्यांना
मिळावे म्हणून प्रार्थना करूया.
५.
यंदाच्या वर्षी चांगला पाऊस पडून शेतकऱ्यांच्या काम-धंद्यात कोणतेही व्यत्यय येऊ
नयेत आणि पुढच्या काळासाठी पाण्याची साठवण करून पाणी योग्य प्रकारे वापरला जावा
म्हणून आपण प्रार्थना करूया.
No comments:
Post a Comment