Wednesday, 11 December 2013



Valerian Patil hails from our Lady of Lourdes, Uttan Palli. He belongs to the St. Bonaventure Capuchin Province, Maharashtra. Presently, he is pursuing his theological studies at JDV, Pune. This homily is a blend of spirituality and theology. While intertwining both these aspects he presents the reader a practical follow up in this beautiful homily. 






आगमन काळातील तिसरा रविवार
१५/१२/२०१३
वर्ष-
यशया; ३५:-,१०.
याकोब; :-१०.
मत्तय; ११:-११.
''धीर धरा भिऊ नका पाहा तो येईल व तुमचा उध्दार करील.''
प्रस्तावना:

आज आपण आगमन काळातील तिसरा रविवार साजरा करीत असताना परत एकदा ख्रिस्तसभा आपल्या हृदयात प्रभू येशूच्या आगमनाचा दिप प्रज्वलित करत आहे. आजच्या पहिल्या वाचनामध्ये यशया संदेष्टा आपणास सांगतो, 'धीर धरा भिऊ नका, पाहा तो येईल व तुमचा उध्दार करील तेव्हा आंधळ्याचे नेत्र उघडतील, बहि-यांचे कान खुले होतील.' दुस-या वाचनाद्‌वारे याकोब आपणास सागंतो की, ''तुम्ही धीर धरा, आपली अंतकरणे स्थिर करा, कारण प्रभूच्या आगमनाची वेळ आली आहे.'' आजच्या शुभवर्तमानाद्‌वारे यशया संदेष्टाच्या भविष्यवाणीची सत्यता प्रभू येशूने योहानाच्या शिष्यांस दिलेल्या उत्तरावरून अनुभवयास मिळते. प्रभू येशू म्हणतो, ''जे तुम्ही ऐकता व पाहता ते योहानाला जाऊन सांगा; आंधळे पाहतात, पागंळे चालतात, कुष्टरोगी शुध्द होतात, बहिरे ऐकतात, मेलेले उठविले जातात व गरिबांस सुवार्ता सांगण्यात येते.'' ह्या सर्व घटना देवाच्या सामर्थ्यशाली प्रकटीकरणाचा संदेश आणि आपल्या तारणाचा संदेश आपल्याला देत आहेत. देवाच्या ह्या तारणदायी योजनेत आपण सुध्दा सहभागी होण्यास पात्र ठरावे म्हणून ह्या पवित्र मिस्साबलिदानात विशेष प्रार्थना करू या.

सम्यक विवरण:

संत योहानाने येशू ख्रिस्त जी कृत्ये करीत होता (मत्तय ११:४) त्याविषयी ऐकले होते.  जुन्या करारात यशया संदेष्टाने सांगितल्याप्रमाणे तारणारा हा पारतंत्र्यातून व शत्रूपासून मुक्त करणारा असेल तसेच दुष्टाई नष्ट करत पापांबद्दल न्याय करणारा व आपले राज्य प्रस्थापित करणारा असेल(यशया;२:२-४; ९:६-७) ह्या अभिवचनाची योहानास जाणीव होती.
तुरूंगात बंदिस्त असताना (मत्तय ४:१२)योहान येशूविषयी खूप ऎकत होता. आपल्यानंतर येणारा हाच असावा याबाबतीत त्याची पूर्णपणे खात्री होती. तरीही या गोष्टीची शहानिशा करावी म्हणून तो आपल्या शिष्यास येशुकडे पाठवतो. जेव्हा योहानाचे शिष्य येशू ख्रिस्तास विचारतात, ''जे येणार आहेत ते आपणच, की आम्ही दुस-याची वाट पाहावी?''(मत्तय ११:३) तदक्षणी येशूने गर्वपणा न करता, सौम्यतेने योहानाच्या शिष्यांना सांगतो, ''जे तुम्ही ऐकता व पाहता ते योहानाला जाऊन सांगा; आंधळे पाहतात, पागंळे चालतात, कुष्टरोगी शुध्द होतात, बहिरे ऐकतात, मेलेले उठविले जातात व गरिबांस सुवार्ता सांगण्यात येते.''(मत्तय११:४-५). ह्या प्रतिसादाद्‌वारे प्रभू येशूने योहानाच्या शिष्यांचे लक्ष तारणा-याविषयी देवाच्या वचनातील भविष्ये कशी पूर्ण होत होती ह्याकडे वळविले(यशया३५:५-६; ६१:१). ''प्रभू परमेश्वराचा आत्मा मजवर आला आहे; कारण दीनास शुभवृत्त सांगण्यास परमेश्वराने मला अभिषेक केला आहे भग्न हृदयी जनांस पट्‌टी बांधावी, धरून नेलेल्यांस मुक्तता व बंदिवानांस बंधमोचन विदित करावे.''(यशया ६१:१). जे जुन्या करारात सागण्यात आलेले ते नव्या करारात येशूने पूर्ण केले.
- आंधळ्याला दृष्टी दिली (मार्क१०:४६-५२).
- मुक्याला वाचा दिली, बहि-याचे कान बरे केले (मार्क७:३१-३७).
- लगड्याला पाय दिले (लूक १२:-१४).
- रोग्याला आरोग्य दिले (लूक :१२-१६).
- मेलेले जिवंत झाले (योहान ११:३८-४४).
ह्या पूर्ण केलेल्या कार्याद्‌वारेच तारणाच्या वचनदत्त युगाच्या चिन्हांचे आश्वासन मिळते. येशू ख्रिस्त हा केवळ नव्या युगाची म्हणजेच मानवाच्या उध्दाराच्या योजनेची घोषणा करणारा संदेष्टा नव्हता तर हे युग प्रत्यक्षात आणणारा होता हेच वरील वचनांमधून स्पष्ट होते.
प्रभू येशू म्हणतो, ''जो कोणी माझ्या सबंधात अडखळत नाही तो धन्य होय''(मत्तय ११:६). 'माझ्या सबंधात अडखळत नाही' म्हणजेच प्रभूविषयी समजलेल्या सत्याविषयी अविश्वास किंवा संशय प्रकट करीत नाही ती व्यक्ती धन्य होय. ह्या संदेशामुळे योहानाचा विश्वास दुढ झाला की नाही हे सांगितले नाही परंतु येशूने योहानाची प्रशंसा केली; प्रभू येशूच्या मते, ''योहान हा सुखविलासी व खुशामतखोर नव्हता कारण तो बोरुप्रमाणे, वारा यॆइल तसा वाकणारा नव्हता.'' (मत्तय ११:७). योहान स्वत: ऐशारामात राहून आपल्या लोकांच्या सुख विरक्त जीवन क्रमाकडे डोळेझाक करणारा नव्हता (मत्तय ११:८). तो सर्व संदेष्ट्यांमध्ये थोर होता  कारण तो प्रभू येशू ख्रिस्ताच्या अग्रगामी होता (मत्तय ११:१०).
योहानाने एकनिष्ठेने व प्रामाणिकपणे आपल्या देवाची सेवा केली. त्याने त्याकडे सोपवलेले कार्य पूर्ण केले व त्याच्यानंतर येणा-या येशू ख्रिस्ताला वाट मोकळी करून दिली. योहानाने हे सर्व कार्य धीराने व कुठल्याही भीतीली न जुमानता केले. हाच संदेश याकोब सुध्दा आपणांस सांगत आहे, ''तुम्हीही धीर धरा, आपली अंतकरणे स्थिर करा कारण प्रभूच्या आगमनाची वेळ आली आहे.'' (याकोब; ५:८). आपण सर्वांनी धीर धरून सोसावे, ख्रिस्त पुन्हा येईपर्यंत थांबावे, त्याची वाट पाहावी, म्हणजेच धीरातून उमटलेल्या सहनशीलता ह्या सदगुणाची जोपासना करणे हेच याकोबाचे सांगणे आहे. (याकोब; ५:७). इस्राएल देशात पेरणी करण्यासाठी शरद ऋतुतील पाऊस येईपर्यत वाट पाहावी लागे. हा त्यांच्यासाठी पहिला पाऊस असे. त्यानंतर शेतकरी वसंत ऋतुतील पावसाची आशेने वाट पाहत. हा त्यांच्यासाठी शेवटचा पाऊस असे.  ह्याच वेळी कणसाचे रुपांतर दाण्यामध्ये होते व ते कापणीसाठी परिपक्व होते. अर्थातच ख्रिस्ती प्रतीक्षा ही एका आशादायी ताराणा-याची प्रतीक्षा आहे.

बोध कथा:

.     फोर्ड कंपनीची कार चालवत एक मनुष्य प्रवासाला निघाला होता. वाटेत त्याची कार अचानक बिघडली. त्यामुळे वाटेने येणाजाणा-यांना तो ती कार दुरुस्त करण्याची विनंती करु लागला. अनेकांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली पण त्यांच्याने ती कार दुरुस्त झाली नाही. सरतेशेवटी रस्त्याने येणा-या एक कार चालकाला त्याने थांबवले व त्याच्या परिस्थितीची जाणीव करून दिली व पुढच्या हॉटेलपर्यंत नेण्याची विनंती केली. परंतु तो कारचालक क्षणार्धात बाहेर पडला व ती नादुरुस्त कार दुरुस्त करु लागला. तेव्हा हा गृहस्थ म्हणाला, ' गेले कित्येक तास अनेक जणांनी ती कार दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला पण त्यांना अपयश आले. आता आणखी तुम्ही काय करणार आहात?' परंतु त्या माणसाने काही मिनिटीतच ती कार दुरुस्त केली तेव्हा त्या गृहस्थाला आश्चर्य वाटले. तेव्हा तो माणूस म्हणाला, ''मी स्वत: जर ही कार दुरुस्त करण्यास अपयशी ठरलो तर आणखी कोण ती दुरुस्त करु शकणार? कारण मी ह्या फोर्ड कार उत्पादन कंपनीचा मालक खुद्द हेनरी फोर्ड आहे.'' (ज्याप्रमाणे तो  मनुष्य हेनरी फोर्ड ला ओळखण्यास असमर्थ ठरला त्याचप्रमाणे आपण येशूला ओळखण्यास कधी कधी अपयशी ठरतो.).

.     चौथ्या शतकातला कॉनस्टनटाइन हा राजा निधर्मी होता. तरीसुद्धा त्याने त्याच्या हाताखालील अधिका-याकडे काही ख्रिस्ती लोकांना काम दिले होते. राजाला ह्या ख्रिस्ती लोकांच्या धीराची व धैर्याची परीक्षा घ्यायची होती म्हणून त्याने त्यांना मुद्धामहून सांगितले कि, 'येशूच्या अनुयायांत वाढ होत आहे आणि मी निधर्मी असल्यामुळे, मी त्यांचा नाश करणार आहे, जर का ह्या नाशापासून तुम्हाला मुक्त व्हायचे असेल तर तुम्हाला माझ्या देवाची पूजा करावी लागेल.' हे ऐकून काही भित्रे ख्रिस्ती मूर्तीपूजेला तयार होऊन ख्रिस्ती धर्माचा त्याग करण्यास तयार झाले. तरीपण काही धीरवान ख्रिस्ती नाशाला सामोरे जाण्यास तयार झाले. ते म्हणाले, 'तुम्ही आमचा शीरछेद करू शकता परंतु आम्ही ज्या श्रद्धेची देवाबरोबर शपथ घेतली आहे तिचा मालक तोच आहे आणि व सर्व  राजांचा राजा आहे'. हे धीरवान शब्द ऐकून राजा एकदम खुष झाला आणि म्हणाला, "मला अशाच निष्टावंत धीरवान आणि श्रद्धामय लोकांची गरज आहे, तुम्ही माझ्या राज्यात परत या. तुम्ही जर ईश्वराशी इतके निष्ठावंत आहात तर तुमच्या राजाशी देखील निष्ठावंत राहाल." राजाने त्या धीरवान ख्रिस्ती लोकांवर निरनिराळ्या मानाचा वर्षाव केला आणि जे पळपुटे व भित्रे होते त्यांना तुरुंगात टाकले.

मनन चिंतन:
लुकलुकणा-या ता-याचा सौम्य प्रकाश पाहण्यासाठी रात्रीची आणि सूर्याचा प्रखर प्रकाश  पाहण्यासाठी दिवसाची धीराने वाट पाहावीच लागते. त्याचप्रमाणे जमिनीत पुरलेल्या बीजाला नवीन अंकुर येईपर्येंत त्या बीजास काही दिवस काळ्याकुट्ट अंधाराला सामोरे जावेच लागते. हाच संदेश यशया संदेष्टा आपल्याला पहिल्या वाचनाद्वारे देत असताना सांगतो की,'धीर धरा, भिऊ नका, पाहा तो येईल व तुमचा उध्दार करील'. हयाच यशया संदेष्टाच्या भविष्यवाणीस अनुकरून संत याकोब आपल्याला दुस-या वाचनाद्वारे सांगतो की,'तुम्हीही धीर धरा, आपली अंतकरणे स्थिर करा कारण प्रभूच्या आगमनाची वेळ आली आहे'.
दु:खे, संकटे, यातना आणि मोह हे मानवी जीवनाचे अविभाज्य घटक आहेत परंतु ह्या सर्वं निराशमय आणि पापमय जीवनास आपण ख्रिस्ती ह्या नात्याने धीराने, संयमाने आणि विश्वासाने कशाप्रकारे सामोरे जातो हे अत्यंत महत्वाचे आहे. जर का आपण आपल्या जीवनात धीराची आस धरली तर नक्कीच यशया संदेष्टाने सांगितल्याप्रमाणे आपल्या दुख:दायक जीवनरूपी रानात जलप्रवाह व वाळवंटात झरे फुटतील, वाळवंट उल्हासेल व कमळाप्रमाणे फुलेल, आंधळ्याचे नेत्र उघडतील, बहिरयाचे कान खूले होतील, लंगडा हरिणीप्रमाणे उड्या मारील व मुक्याची जीभ गजर करील.'
आजच्या शुभवर्तमानात येशु ख्रिस्त योहानाच्या शिष्यांस तारणदायी संदेश देत असताना म्हणतो की,"आंधळे पाहतात, पागंळे चालतात, कुष्टरोगी शुध्द होतात, बहिरे ऐकतात, मेलेले उठविले जातात व गरिबांस सुवार्ता सांगण्यात येते.'' ह्या प्रभू येशु ख्रिस्ताच्या तारणदायी कार्याद्वारे, येशु ख्रिस्त संपुर्ण मानव जातीच्या तारणाची घोषणा करतो. ह्या आगमनकाळात जर का आपण धीरानेसंयमाने, आणि विश्वासाने सर्वं पापमय प्रवुत्तीपासून दुर राहुन प्रभू मार्गावर प्रस्थान केले तर आपला तारणारा  आपल्या जीवनातील अंधा-राचे साम्राज्य संपुष्टात आणून आपल्याला प्रकाशाचे साम्राज्य बहाल करील आणि ह्याच प्रकाशाच्या साम्राज्यात आंधळ्याचे नेत्र उघडतील, बहिरयाचे कान खूले होतील, कुष्टरोगी शुध्द होतील, लंगडा हरीनीप्रमाणे उड्या मारील व मुक्याची जीभ गजर करील.

विश्वासू लोकाच्या प्रार्थना.
प्रतिसाद: हे प्रभो आमची  प्रार्थना स्विकारून घे.
. हे देवा आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो की आमचे पोप फ्रन्सिस, बिशप्स, धर्मगुरू, धर्मबंधू धर्मभगिनी जे तुझ्या मळ्यात काम करत आहेत त्यांना तू चांगले आरोग्य दे सर्व जगात तुझा संदेश पोहचवण्यास त्याना शक्ती दे, म्हणून आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो.
. आज आपण आगमन काळातील तिसरा रविवार साजरा करत आहोत. हे परमेश्वरा आम्ही तुझी वाट पाहत आहोत. तू आमच्या हृदयात पुन्हा जन्म घेशील म्हणून आम्ही तुझ्या येण्याची तयारी योग्यप्रमाणे करावी म्हणून आम्ही म्हणून आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो.
. जे आजारी आहेत त्याना चांगले आरोग्य लाभावे, जे दु:खी आहेत त्याचे दु: दूर व्हावे, जे एकटे  आहेत त्याना तुझ्या प्रेमाचा सहवास मिळावा, म्हणून आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो.
. हे देवा, आम्ही तूझ्याकडे प्रार्थना करतो की तू आमचे रक्षण कर, आमच्या काम धंदयावर तुझा आर्शिवाद दे, आम्हाला आमची दररोजची भाकर दे, आमचे सर्व सकंटापासून संरक्षण कर   आमचा साभाळ कर, म्हणून आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो.
. थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक कौटुंबिक गरजा प्रभू चरणी ठेऊ या.

6 comments:

  1. wow bro. superb inspiring sermon. may god bless you...keep it up....

    ReplyDelete
  2. Dear Valerian
    Well done
    I am proud of you
    May God always be your inspiration and enlightenment

    ReplyDelete
  3. very good Homily...keep it up...

    ReplyDelete