Reflection for the Homily of 5th Sunday of Easter (14-05-2017) By Br Camrello Dimekar
पुनरुत्थानकाळातील पाचवा रविवार
पुनरुत्थानकाळातील पाचवा रविवार
दिनांक: १४-०५-२०१७
पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये ६:१-७
दुसरे वाचन: १ पेत्र २:४-९
शुभवर्तमान: योहान १४:१-१२
‘मार्ग, सत्य व जीवन मीच आहे.’
प्रस्तावना:
ख्रिस्ताठायी जमलेल्या भाविकांनो, आज ख्रिस्तसभा
पुनरुत्थानकाळातील पाचवा रविवार साजरा करीत आहे. आजची उपासना आपल्याला येशुचे अनुकरण करण्यास
पाचारीत आहे, कारण येशु हा मार्ग, सत्य आणि जीवन आहे.
प्रेषितांची कृत्ये हे पुस्तक सांगते की, ख्रिस्ती
समुदायात वादविवाद आणि तणावाचे वातावरण होते. ह्या गोष्टीवर नियंत्रण ठेवण्यासाठी
व ख्रिस्ती समाजात शांती आणि ऐकीचे वातावरण निर्माण करण्यासाठी पवित्र आत्म्याने
परिपूर्ण असे सात पुरुषांची निवड करण्यात आली आहे. पेत्राचे पहिले पत्र सांगते की,
आपल्या जीवनात येशुवर श्रद्धा असली तर आपण येशु ख्रिस्ताच्या वंशात एक याजकगण,
निवडले लोक असे होणार. योहानलिखीत शुभवर्तमान आपल्याला येशु ख्रिस्ताचे अनुकरण
करण्यास आह्वान करत आहे. येशु ख्रिस्त हा मार्ग, सत्य आणि जीवन आहे. येशू
ख्रिस्ताला अनुसरणे म्हणजे येशु ख्रिस्ताची मुल्ये तंतोतंत पाळणे हे होय.
आपले
जीवन जेव्हा येशु ख्रिस्ताच्या शिकवणुकीनुसार चालते तेव्हा आपले आचार आणि विचार
स्वर्गीय गोष्टीकडे वळतात आणि आपल्या जीवनाला नवीन वळण लाभते. आजच्या ख्रिस्तयागामध्ये
योग्य रीतीने सहभागी होण्यासाठी आपण येशूची कृपा मागुया जेणेकरून आपण त्याच्या
शिकवणुकीचे अनुकरण करून त्याच्या मार्गावर चालू आणि सत्याचे जीवन जगून सार्वकालिक
जीवनाचा अनुभव स्वीकारू.
सम्यक विवरण
पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये ६:१-७
इब्री व ग्रीक भाषा बोलणारे यांच्यात काही
गोष्टीवरून वाद सुरु झाला होता. सर्वांच्या गरजेप्रमाणे मालमत्तेची (वस्तूंची) वाटणी
होत असे. आम्ही ग्रीक बोलतो म्हणून आंम्हाला कमी मिळते अशी ग्रीक बोलणाऱ्या
विधवांची तक्रार होती. या कारणाने त्या मोठ्या जमावात फुट पडत होती. या प्रश्नाकडे
प्रेषितांनी ताबडतोब लक्ष दिले. त्यांनी सर्व मंडलीळा जमविले आणि मंडळीसमोरचा
प्रश्न त्यांच्या समोर मांडला. आणि हा प्रश्न कसा सोडवायचा याबद्दल विचारपूस केली.
येशु
ख्रिस्ताने प्रेषितांना प्रार्थना करावयास शिकविले होते. दररोजचे रेशन वाटप करणारी माणसे पवित्र
आत्म्यावर अवलंबून राहत असे. जे पवित्र आत्म्यावर अवलंबून राहतात त्यांच्यात
ख्रिस्ताचे गुण दिसतात. कारण हे पवित्र आत्म्याचे कार्य आहे.
दुसरे वाचन: १ पेत्र २:४-९
विश्वास असणाऱ्या लोकांना देवाची योजना काय
आहे याचे वर्णन या वाचनात आढळते. या योजनेचचा कोनशिला ‘जीवंत ख्रिस्त’ हा आहे.
त्याच्याजवळ येत असता........ याचा अर्थ आपण त्याच्याजवळ नेहमी स्व:त होऊन येत
असल्यामुळे आपण अधिक ख्रिस्तासारखे बनत जातो. ख्रिस्ताची मंडळी आध्यामिक मंदिर आहे
आणि सर्व विश्वास ठेवणारे पवित्र म्हणजे देवासाठी वेगळे केलेले याजक आहेत. या याजकांना
देवाला आवडणारे यज्ञ करायचे आहते. ते यज्ञ म्हणजे ख्रिस्ताद्वारे देवाची स्तुती
करणे.
कोनशिला: ज्या दगडावर इमारतीचे बांधकाम टेकलेले असते त्या
दगडाला कोनशिला म्हणतात. ख्रिस्त कोनशिला आहे. विश्वास ठेवणारे त्याच्यावर अवलंबून
राहतात. त्यांची कधीच फजिती होणार नाही. त्यांना ख्रिस्त फारच मोलवान वाटतो.
शुभवर्तमान: योहान: १४:१-१२
पित्याचे घर हि अंतकरणातील गौरवी आशा आहे.
देवाची सर्व मुले पित्याच्या घराकडे चालली आहेत. तेथे जागेचा तुटवडा नाही. ख्रिस्त
त्यांच्यासाठी जागा तयार करण्यासाठी गेला आहे. पित्याच्या घरी गेल्यावर तेथे कायम
राहायचे आहे. प्रभू येशु ख्रिस्त स्वत: येईल व देवाच्या सर्व मुलांना पित्याच्या घरी
नेईल. मग ते ख्रिस्ताबरोबर स्वर्गीय सुखात राहतील. आपण पित्याच्या घराकडे जाणाऱ्या
मार्गावर आहात का याची खात्री करून घेऊन जीवन जगले पाहिजे. ख्रिस्त सत्य आणि
जीवनाचा मार्ग आहे. ख्रिस्ताचा स्वीकार करणाराच पित्याकडे येतो व तोच पित्याच्या
घराकडे चालला आहे. पित्याच्या घरी जाणाच्या मार्गावर पित्याची ओळख होते.
ख्रिस्ताला ओळखणे म्हणजे देवपित्याला ओळखणे.
मनन चिंतन
प्रभू येशु ख्रिस्त हा आमचा उत्तम मेंढपाळ
आहे. इतकेच नव्हे तर तो मेंढवाड्याचे दार आहे आणि त्या दारातून आम्ही त्याच्याकडे
पोहोचयाचे आहे आणि इतरांनाही त्याच्याद्वारे आम्ही त्याच्याकडे आणण्यासाठी आम्हांला
पाचारण करण्यात आले आहे. आजच्या वाचनातून प्रभू येशु आम्हाला अधिक खोलात नेत आहे.
आणि मार्ग, सत्य व जीवन मीच आहे हे आम्हाला ठासून सांगत आहे.
आधी सत्य काय आहे ते पाहू. सत्य म्हणजे स्वत:मध्ये
जीवन असणारा, खरोखरी अस्तिवात असणारा, फक्त परमेश्वरच सत्य आहे, स्वत:चे जीवन
जगणारा, स्वबळावर अस्तिव असणारा असा आहे. सर्व निर्मित वस्तू, पशुपक्षी मानव
त्याने निर्माण केले म्हणून जीवनासाठी त्यावर अवलंबून असतात. प्रभू येशु ख्रिस्त
सत्य आहे म्हणजेच पिता आणि पुत्र एक आहेत. विभक्त नाहीत. दैवी जीवन म्हणजे पवित्र
आत्मा त्याच्या ठायी आहे. यालाच आपण परमपवित्र त्रेक्य असे म्हणतो. म्हणूनच तर
प्रभू येशु फिलिपला म्हणतो, ज्याने मला पाहिले आहे त्याने पित्याला पहिले आहे. मी
पित्यामध्ये व पिता माझ्यामध्ये आहे (योहान १४:९-११).
प्रभू येशु ख्रिस्त जीवन आहे. ते कसे हे आता
लगेच लक्षात आहे पाहिजे कारण परमेश्वर पिता आणि पुत्र प्रभू येशु ख्रिस्त पवित्र
आत्म्यामध्ये एकच आहेत. त्यांना आपण वेगळे करु शकत नाही. याचाच अर्थ, सत्य म्हणजे
जीवन आहे हे एकदा आपण मान्य केले तर प्रभू येशु ख्रिस्त मार्ग कसा याचे सहज आकलन
होते. परमेश्वर पिता आत्मा आहे, तो दिसत नाही, त्याला आपण पाहू शकत नाही. त्याचे
बोलणे ऐकू शकत नाही. परंतु येशु ख्रिस्ताला त्याच्या काळाच्या लोकांनी पाहिले,
त्याचे बोलणे ऐकले, त्याला स्पर्श केला, त्याबद्दल साक्ष दिली.
त्यांनी
लिहिलेले शुभवर्तमान आम्ही वाचतो व ऐकतो. परमेश्वर पित्याला आम्ही पाहू शकत नाही,
त्याचे ऐकू शकत नाही, स्पर्श करून शकत नाही ते सर्व प्रभू येशु ख्रिस्ताद्वारे
शक्य होते. मार्गाचे एक वैशिष्ट्य म्हणजे या मार्गावरून आम्हाला लांबचा प्रवास
करावा लागत नाही, वेळ खर्च करावा लागत नाही. प्रभू म्हणतो त्याप्रमाणे जो त्याला
पाहतो, त्यावर विश्वास ठेवतो, त्याला शरण जातो तो पित्याला पाहतो, पित्यावर
विश्वास ठेवतो, पित्याला शरण जातो आणि त्याद्वारे त्याला पित्याच्या दैवी जीवनाचा
साक्षात्कार होतो.
असे दैवी साक्षात्कार झालेले ते तुम्ही तर देवाचा
निवडलेले वंश, राजकीय याजकपण, पवित्र राष्ट्र, देवाचे लोक असे आहात, असे संत पेत्र
आम्हांला आजच्या दुसऱ्या वाचनातून सांगत आहे. तर पहिल्या वाचनात देवाचे कार्य व सेवा
करण्यासाठी पवित्र आत्मा व ज्ञानाने पूर्ण असे स्थान प्रतिष्टीत पुरुष शिष्यांनी शोधून
काढले असे वर्णन आले आहे. त्यांस त्यांनी त्यांच्यावर हात ठेवले मग देवाच्या वचनाचा
प्रसार होत गेला आणि येरुशलेमेत शिष्यांची संख्या फार वाढत गेली.
विश्वासू लोकांच्या
प्रार्थना
प्रतिसाद: हे प्रभू, आम्हाला तुजे साक्षीदार बनव.
१. आपल्या ख्रिस्तसभेचे
पोप महाशय फ्रान्सिस, सर्व
बिशप्स, धर्मगुरू व व्रतस्थ जे ख्रिस्ताच्या मळ्यात कार्य
करत आहेत, त्यांना प्रभूचा आशीर्वाद मिळावा व त्यांनी परमेश्वराची सेवा खऱ्या
अंतःकरणाने करून प्रभूची साक्ष संपूर्ण जगाला दयावी म्हणून आपण प्रार्थना करुया.
२. पापी, जकातदार व
समाजाने बहिष्कृत केलेल्या व्यक्तीबरोबर प्रभू तुझे कार्य आम्हाला प्रेरणा देवो जेणेकरून
आम्ही तुज्या सुर्वार्तेची घोषणा सर्व ठिकाणी पसरू म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना
करूया.
३. आपल्या
धर्मग्रामात जे लोक वेगवेगळ्या आजाराने ग्रासलेले आहेत त्यांना पुनरुत्थित प्रभू
परमेश्वराच्या कृपेचा स्पर्श व्हावा आणि नवीन जीवनाची वाट त्यांना दिसावी म्हणून
आपण प्रार्थना करू या.
४. जे वासना, व्यसन
यांच्या आधीन गेले आहेत, जे मृत जीवन जगत आहेत त्यांना आमच्या सेवेद्वारे नवजीवन
प्राप्त व्हावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
५. पर्यावरणाची
काळजी घेऊन स्वच्छ व सुंदर विश्व बनविण्यासाठी आम्ही झटावे म्हणून आपण प्रभूकडे
प्रार्थना करूया.
No comments:
Post a Comment