Reflection for the
Homily of 17th SUNDAY IN ORDINARY TIME (28-07-19) By Br. Godfrey
Rodriques
सामान्य काळातील सतरावा रविवार
दिनांक: २८/०७/२०१९
पहिले वाचन: उत्पत्ती १८:२०-३२.
दुसरे वाचन: कलस्सैकरांस पत्र २:१२-१४.
शुभवर्तमान: लुक ११:१-१३
आज आपण सामान्य काळातील
सतरावा रविवार साजरा करीत आहोत. आजची उपासना आपल्याला प्रार्थनेचे महत्व पटवून देत
आहे.
आजच्या पहिल्या वाचनात
आपण ऐकतो कि, अब्राहाम देवाकडे सदोम आणि गमोरा ह्या देशांसाठी प्रार्थना करत आहे
आणि त्याच्या प्रार्थने मुळेच परमेश्वर एका नितीमानासाठी सुद्धा पूर्ण शहराचा नाश
करणार नाही असे वचन अब्राहामाला देत आहे. संत पौलाचे कलस्सैकरांस लिहिलेल्या
पत्रात पौल सांगतो कि तुमच्या बाप्तिस्मा द्वारे आणि देवावरील विश्वासामुळे
तुम्हांला तारण प्राप्त झाले आहे. तर आजच्या शुभवर्मानात येशू ख्रिस्त त्याच्या शिष्यांना परमेश्वर
पित्याकडे प्रार्थना करण्यास शिकवतो व प्रार्थनेचे महत्व ख्रिस्त त्यांस पटवून
देतो. ख्रि
स्ताने शिकविलेल्या
प्रार्थने द्वारे ख्रिस्त आपल्या निदर्शनास आणतो कि प्रार्थना हि देवाने मानवाला
दिलेली अमुल्य असे दान आहे. म्हणून आजच्या ह्या पवित्र मिस्साबालीदानात सहभागी होत
असताना, आपल्याला शिकविलेली प्रार्थना आपण सातत्याने करावी व त्यांचे महत्व
इतरांना पटवून द्यावे म्हणून आपण स्वतासाठी आणि एकदुऱ्यासाठी विशेष प्रार्थना करूया.
सम्यक विवरण
पहिले वाचन: उत्पत्ती १८:२०-३२
उत्पत्ती ह्या पुस्तकातून घेतलेल्या पहिल्या वाचनात, आब्राहाम हा आपल्या देवपित्याकडे सदोम आणि गमोरा ह्या
देशासाठी प्रार्थना करतो. ह्या दोन्ही प्रांतामध्ये फार वाईट कृत्ये घडली होती, हे दोन्ही प्रांत देवा पासून दूर गेले होते.त्यामुळे
देवाला त्या देशांचा नाश करायचा होता. पंरतु आब्राहामाची त्या
देशांचा नाश न व्हावा अशी इच्छा होती, कारण त्याच्या भावाचे कुटुंब त्या देशात वस्ती करत होते म्हणून त्याने देवाची
दया त्या प्रांतांवर व्हावी म्हणून प्रार्थना केली. परमेश्वराने त्याची
प्रार्थना एकली व परमेश्वर त्याला म्हणला कि ‘त्या देशात दहा
माणसे जरी नीतिमान असली तरी मी त्यांचा नाशकरणार नाही’. आब्राहामाने देवाशी साधलेल्या सततच्या
संवादामुळे व प्रार्थनेमुळे त्या
प्रांतांचे संरक्षण झाले.
दुसरे वाचन: कलस्सैकरांस पत्र २:१२-१४
आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौल कलस्सैकरांस लिहिलेल्या
पत्रातून आपल्या आठवणीस आणून देतो कि, आपल्या देवावरील विश्वासामुळे आपले तारण झाले आहे, कारण
ज्यावेळी प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणाने आपल्या सर्वाचा बाप्तिस्मा झाला तेंव्हाच
आपण त्याच्याबरोबर मरण पावलो व पुरले गेलो आहोत व ज्याने त्याला मेलेल्यांतून
उठविले त्याच देवाने आपल्यालादेखील आपल्या मरणातून उठविले आहे, म्हणून देवाच्या
सतत सानिध्यात व प्रार्थनेत राहून त्याचे विश्वासू सेवक होण्यास व त्याची साक्ष
बनण्यास संत पौल आपणास आमंत्रण करीत आहे.
शुभवर्तमान: लुक ११:१-१३
आजच्या शुभवर्तमानात नमूद केलेल्या उताऱ्यातून आपल्या
निदेर्शनास येते कि, प्रभू येशू ख्रिस्त प्रार्थना करताना त्याच्या शिष्यांनी
त्याला अनेकदा पाहिले होते व त्यांच्या मनांत प्रार्थना करण्याची इच्छा उत्पन्न
झाली. म्हणून येशूच्या शिष्यांनी येशूला प्रार्थना शिकविण्यांस विनंती केली. प्रार्थना
म्हणजे आपल्या स्वर्गीय पित्यावर भरवसा ठेऊन सर्व गोष्टीकरिता त्याच्यावर अवलंबून
राहणे. आपला देवपिता अति प्रेमळ व ज्ञानी आहे.
तो आपल्या मुलांच्या प्रार्थना नेहमी ऐकतो. त्यांच्या पूर्ण ज्ञानाने तो
तुमची प्रत्येक मागणी पूर्ण करीत आहे हे खरे, तरी आपली अडचण त्याला कळते. तो आपली
काळजी घेतो. त्याच्याकडे चांगले ते मागणाऱ्यान तो कधीच वाईट देत नाही.
मनन चिंतन :
छत्री पावसाला थांबवू शकत नाही पण पावसात थांबण्याचे धाडस मात्र
देऊ शकते.आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही परंतु सघर्ष करण्याची
प्रेरणा नक्कीच देऊ शकते. त्याच प्रमाणे दु:खात केलेली प्रार्थना आपल्याला कधी-कधी
लगेच उत्तर देत नाही परंतु दु:ख सहन करण्याचे धाडस मात्र नक्कीच देते. म्हणून प्रत्येक परिस्थितीत
प्रार्थनेची साथ असणे अतिशय महत्वाचे आहे. कारण प्रार्थना हि सुख-दु:खाचा आधार, अधंकारात दिप, असाह्य
लोकांचे सहाय्य, निराशितांची आशा, दुर्बळांचे
बळ, थकलेल्या मनाचा विसावा, हृदयाची आस
आहे. प्रार्थना ही देवाने मानवाला दिलेली अमुल्य अशी देणगी आणि शक्ती आहे.
प्रार्थना आपण कोणसाठीही व कोणत्याही हेतुसाठी करू शकतो; मात्र
हे हेतू देवाच्या वचनाशी सबंधित असावेत.
आजच्या पहिल्या वाचनात आपण ऐकले की, देवाने मोशेची प्रार्थना ऐकली. मोशे हा
फक्त देवाचा ‘निवडलेला भक्त’ होता.
परंतु येशूख्रिस्त हा देवाचा ‘एकुलता एक’ पुत्र,आपल्या तारणासाठी, देवाने
ह्या धरतीवर पाठवला. मग ख्रिस्त जो आपला तारणारा आहे,त्याच्या
नावाने केलेली प्रार्थना देव कधीच नाकारू शकत नाही. कारण ख्रिस्त ह्याविषयी स्वत:च
साक्ष देताना म्हणतो, “पुत्राच्या ठायी पित्याचा गौरव व्हावे
म्हणून तुम्ही जे काही माझ्या नावाने मागाल ते मी करीन”.
म्हणून आपल्या दररोजच्या जीवनात आपण ख्रिस्ताच्या नावाने
सातत्याने स्वर्गीय पित्याजवळ प्रार्थना करणे अगत्याचे आहे. म्हणूनच प्रभू येशू
म्हणतो, ‘सातत्याने खचून न जाता,नित्य करावी आपण प्रार्थना’. त्यासाठी ह्या
मिस्साबलिदानात एकत्र जमलो असताना विशेष प्रार्थना करूया कि, दु:खांना घाबरून न
जाता व संकटांत डगमगून न जाता ख्रिस्ताने त्याच्या शिष्यांना शिकवलेल्या
प्रार्थनेद्वारे स्वत:साठी व एकदुसऱ्यासाठी प्रार्थनामय आधार बनूया.
विश्वासु लोकांच्या प्रार्थना
प्रतिसाद: हे
प्रभू आमची प्रार्थना एकूण घे.
१ .ख्रिस्त सभेचे पोप महाशय, सर्व बिशप्स, धर्मगुरू व व्रतस्थ जे
ख्रिस्ताच्या मळ्यात कार्य करत आहेत त्यांची ख्रिस्ताने शिकाविलेलेया
प्रार्थनेद्वारे त्यांची श्रद्धा बळकट व्हावी व इतरांची श्रद्धा त्यांनी बळकट करावी म्हणून
आपण प्रार्थना करूया.
२. जे
तरुण-तरुणी देवापासून दूर गेलेले आहेत त्यांना प्रार्थनेची गोडी लाभून प्रभु
प्रेमाचा स्पर्श होऊन, त्यांनी अंधाराचा मार्ग सोडून प्रकाशाचा मार्ग निवडण्यास
त्यांस प्रेरणा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. आजच्या
उपासनेमध्ये सहभागी झालेल्या सर्व भाविकांनी ख्रिस्ताने शिकविलेल्या
प्रार्थनेद्वारे जीवनावर मनन-चिंतन करून
सर्व वाईटांपासून व मोहांपासून दूर रहावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. जे
आजारी व दु:खी कष्टी आहेत त्यांना त्यांच्या जीवनात प्रार्थनेद्वारे ख्रिस्ताचा
स्पर्श लाभाव व प्रार्थना त्यांचा आधारस्तंभ
बनावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. ओरिसातील
पुरग्रस्तात जे लोक मरण पावले आहेत त्यांच्या आत्म्यांना चिरकाळ शांती लाभावी व
ज्या लोकांची आर्थिक व इतर हानी झाली आहे अश्यांना आर्थिक मदत मिळावी व पुन्हा
त्यांचे जीवन सुरळीतपणे चालावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
६. थोडावेळ
शांत राहून आपल्या वैयक्तिक, सामाजिक व कौटुंबिक हेतूंसाठी प्रार्थना करूया.
No comments:
Post a Comment