Reflection for the Homily of 18th SUNDAY IN ORDINARY TIME (4-8-19) By Br. Lipton patil
सामन्य काळातील अठरावा रविवार
दिनांक: ४/८/२०१९
पहिले वाचन: उपदेशक: १:२; २:२२-२३
दुसरे वाचन: कलस्सैकरांस पत्र ३:१-५; ९-११.
शुभवर्तमान: लुक १२:१३-२१
“सर्व प्रकारच्या लोभापासून दूर रहा”
प्रस्तावना:
आज आपण
सामान्य काळातील अठरावा रविवारात प्रदार्पण केले आहे. आजच्या उपासनेद्वारे देऊळ
माता आपल्याला लोभापासून दूर राहण्याचे आव्हान देत आहे. आजच्या तिन्ही वाचनांवर
सखोल विचार केल्यास आपल्याला असे शिकावयास मिळते की, लोभापासून दूर रहावे हे अतिशय महत्वाचे आहे. अर्थात स्वर्गाकडच्या गोष्टीकडे लक्ष दिले पाहिजे.
आजच्या पहिल्या वाचनात उपदेशक ठामपने सांगतो कि, मनुष्य जे
काही परिश्रम करितो व आपला जीव उलथापालथा करून या भूतलावर खटाटोपी करितो त्याचा त्याला काय लाभ? दुसऱ्या
वाचनात पौल कल्स्सैकरांस लिहिलेल्या पत्रात सांगतो की, वरील स्वर्गीय गोष्टीकडे
लक्ष लावा पृथ्वीवरील गोष्टीकडे लावू नका, कारण ख्रिस्त सर्व काही आहे आणि सर्वात
ख्रिस्त आहे. तसेच लुक लिखित शुभवर्मानात ख्रिस्त धनवान व श्रीमंत मूर्ख मनुष्याचा
दुष्टांत देतो व सांगतो जो कोणी स्वत:साठी द्रवसंचय करितो व देवा विषयक बाबतीत
धनवान नाही त्याचा काही फायदा नाही.
आज आपण
प्रभू ख्रिस्ताच्या भोजनात सहभागी होत असताना प्रत्येकांनी स्वत:ला प्रश्न विचारला
पाहिजे की, मी ख्रिस्ताच्या बाबतीत धनवान आहे. जर आपण कुठे चुकलो असाल तर
देवपित्याकडे क्षमा मागुया व ख्रिस्ताच्या बाबतीत धनवान होण्यास यश मिळावे म्हणून
या ख्रिस्तयागात भक्ती भावाने प्रार्थना करूया.
सम्यक विवरण:
पहिले वाचन: उपदेशक: १:२; २:२२-२३
उपदेशक ह्या पुस्तकात ‘आपण का जगतो’ ह्यावर चिंतन केलेले आहे. उपदेशक ज्ञान, मनोरंजन,
व्यवसाय, सत्ता, धन,
धर्म, व इतर गोष्टींचे बारकाईने निरीक्षण
करतो. या सर्व गोष्टींना विशिष्ट प्रसंगी किंवा वेळी काय महत्व आहे व त्या कशा
उपयोगी आहेत; जर देव मानवाच्या आयुष्याच्या केंद्रस्थानी
असेल तरच ह्या गोष्टींना टिकणारे मोल आहे. देवाविषयीचा आदर, देवाचा
सन्मान व देवाची सेवा करण्यासाठी वाहिलेले आयुष्य यामुळेच एखाद्याच्या जीवनाचे
सार्थक होते. देवावाचून सारे व्यर्थच आहे असे उपदेशक म्हणतो.
या पुस्तकाचा
लेखक शलमोन स्वत:ला म्हणतो, ‘सर्वकाही व्यर्थ आहे’. तो जे घडत आहे त्याकडे पाहून विचार करतो व या निराशेच्या उद्गारांनी तो
सुरुवात करतो. "व्यर्थ" याचा अर्थ वाफ-समान, क्षणभंगुर,
आयुष्यभर परिश्रम केल्यावर काही शिल्लक राहत नाही असा होतो.
दुसरे वाचन: कलस्सैकरांस पत्र ३:१-५;९-११
विश्वासणारे
ख्रीस्ताबरोबर मेले आहेत व ख्रीस्ताबरोबर जिवंत झालेले आहेत. आपले लक्ष आता
स्वर्गात असलेल्या येशुख्रीस्तावर केंद्रित करा. तो देवाच्या उजवीकडे आपला प्रमुख
याजक आहे. प्रभू येशू ख्रिस्त आज आपल्याला दिसत नाही, त्याच्यावर आपण विश्वास
ठेवतो व त्याच्या पुनरुत्थानाच्या सामर्थ्याने जगतो. पृथ्वीवरील गोष्टी क्षणभंगुर
आहेत. आपण या जगात दुर्बल आहोत तरी ख्रिस्तात जिवंत, सबळ व सुरक्षित आहोत. आपणास
नवा स्वभाव मिळालेला आहे. तो स्वभाव ख्रीस्ताप्रमाने आचरण करतो व तुमचे शील या
प्रकारे बदलत चालले आहे.
शुभवर्तमान: लुक १२:१३-२१
सर्व
प्रकारच्या लोभापासून दूर रहा. एखद्या गोष्टीबद्दल लोभ सुरणे हा प्रत्येकाचा
स्वभाव आहे. संपतीमुळे आपण सुखी होऊ अशी कल्पना करणारे शेवटी मूर्ख ठरतात. या
जगातील गोष्टी काही काळ शारीरिक सुख देतात तरी त्याच्याद्वारे अंतःकरणात शांती
मिळत नाही . जगातील शारीरिक सुखामागे लागणारे मरणांनंतर दुःख भोगतात. धनवान
माणसाने काय केले? त्याने देवाचे आभार
मानले नाहीत. त्याने आपल्या सुस्थिताचा
विचार केला नाही, त्याने मूत्यूनंतरच्या काळाचा विचार केला नाही. जगातल्या
गोष्टीनी हवे ते मिळते असे त्याने मानले. या सर्व कारणामुळे देवाने त्याला मूर्ख
म्हटले. तो स्वतःसाठी द्रव्याचा संचय करण्यासाठी आपले आयुष गुंतवीत होता. देवाच्या
सेवा करण्यासाठी बाबतीत तो दरिद्री होता.
मनन चिंतन:
“लोभात
गुंतू नका सूजनहो
लोभात
गुंतू नका”
होय माझ्या ख्रिस्ती बांधवांनो वाईट लोभाचा अंत शेवटी
दुःखातच होतो. त्यामुळे आजच्या उपासनेतून आपल्याला सांगण्यात येते की, लोभापासून
दूर राहण्याला हवे. वाचनात सांगण्यात आले आहे की, वाईट लोभ कधीही कायमस्वरूपी आनंद
देत नाही, काही काळासाठी किंवा क्षणासाठी आपण आनंद घेतो. आज कितीतरी लोक वाईट
लोभाला बळी पडलेले आहेत. या वाईट लोभामुळे चांगले व वाईट यांच्यातील साम्य विसरून
गेले आहेत. आज सांगायचे झाले तर आजच्या घडीचे लोभ आहेत मोबाईल, फसवणूक, काळाबाजार,
अनैतीक्ता व इत्यादी. आज आपल्याला मोबाईलचा इतका लोभ आहे की, घरातील व्यक्तीबरोबर
बसायला किंवा बोलायला वेळ नाही. कुंटुंबात व्यवस्थित प्रार्थना होत नाही.त्यामुळे
साहजिकच कुंटुंबात अशांतीचे वातावरण निर्माण होते. तरून-तरुणी जास्त वेळ मोबाईलवर
घालवतात. आज खूप ठिकाणी फसवणूक व अत्याचार होत आहेत. माणूस स्वतः आनंदी राहण्यसाठी
वाईट मार्गाचा अवलंब करतो. तसेच दुसऱ्याचे वाईट करतो. माणूस पैसे व संपती मध्ये धनवान व्हायला पाहत आहे. पैसे व धन
दौलत कधीही आपली प्रतिष्ठा वाढवत नाही तर आपण कसे जीवन जगतो यावरून आपली ओळख कळते.
आपण सर्वजण ख्रिस्तधन जोपासले पाहिजे;
म्हणून संत पौल म्हणतो, “मी कुठेही कसा ही असे
ख्रिस्त माझ्यामध्ये दिसो.” खरोखर तो ख्रिस्त आपल्यामध्ये दिसत आहे का?
ख्रिस्ती लोकांना ख्रिस्ती तत्वांचा लोभ
असला पाहिजे.
जेंव्हा आपण ‘लोभ’ हा शब्द ऐकतो तेंव्हा
आपल्या मनात नकारत्मक विचार येतो. लोभ हा वाईट शब्द आहे असे म्हणतो. परंतु लोभ
आपला हा वाईट शब्द आहे असे नाही, तर आपल्याला चांगल्या गोष्टीचा लोभ असला पाहिजे.
वाईट लोभ सोडून चांगला लोभ आपण आत्मसात करू शकतो. आपल्या ख्रिस्तसभेत खूप संत होऊन
गेले जे आपल्यासारखे होते. त्यांनी सर्वस्वाचा त्याग करून पापी, निर्दयी व वाईट
कृत्ये करणारे ख्रिस्ताला अनुसरायचा ध्यास घेतला. ते ख्रिस्तामध्ये इतके तल्लीन झाले की, त्याच्यामध्ये
ख्रिस्त दिसून आला. ते ख्रिस्तमय झाले. असिसिकार संत फ्रान्सिस ह्यांनी ख्रिस्ताला
तंतोतंत अनुसरले, ख्रिस्तासारखे तो जीवन
जगला आणि म्हणूनच आज देऊळ माता त्यांना दुसरा ख्रिस्त म्हणून संभोधते. दुसरा ख्रिस्त संत फ्रान्सिस एका दिवसाने किंवा
महिन्याने झाला नाही तर त्याच्यासाठी त्याच्यामध्ये असलेले वाईट गुण काडून घेतले.
संत जॉन मारी व्हीयानी आज आपण त्यांचा सण साजरा करीत आहोत. त्यांचे जीवन चरित्र्य
आपल्याला माहीतच आहे. अभ्यासत कमी परंतु ख्रिस्ताचे प्रेम देण्यास हुशार होते. ज्यांनी
अधिकतम वेळ प्रायश्चित्त संस्कारासाठी देऊन लोकांना ख्रिस्ताकडे आणले. लोकांना जिवंत
ख्रिस्त दिला.
आपण सुद्धा
सर्वजण तो जिवित ख्रिस्त दुसऱ्याला देऊ शकतो. जर आपल्यामध्ये वाईट कृत्ये
सोडण्याची ताकद असेत तर दारुड्या दारूचा लोभ सोडून त्याचे कुंटूंब आनंदात ठेऊ
शकतो. जे लोक दुसऱ्याला नाश करतात ते हे सर्व
सोडून दुसऱ्याच्या कुंटूंबात प्रेमाचा वर्षाव करू शकतात. दुसऱ्याचे वाईट न
करता चांगले करता येते.
विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: “हे
प्रभू दया कर व तुझ्या लोकांची प्रार्थना ऐक”
१. आपले पोप फ्रान्सिस, कार्डीनल, बिशप्स, धर्मगुरू व सर्व
व्रतस्थ ज्यांनी आपले आयुष्य प्रभूकार्यासाठी अर्पण केले आहे, अशाना पवित्र
आत्म्याच्या कृपेने तारण व्हावे व त्यांना प्रभूपरमेश्वराचे प्रेम, कृपा व आंनद
मिळावा तसेच प्रभूची सुवार्ता जोमाने पसरावी म्हणून आपण प्रार्थना करू या.
२. जे लोक, युवक चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत, या सर्वाना
परमेश्वराच्या कृपेने चांगली नोकरी मिळावी म्हणून आपण प्रार्थाना करूया.
३. जे लोक देवावर श्रद्धा ठेवत नाहीत तसेच पैशाच्या किंवा
जगातील आर्थिक गोष्टीवर लक्ष देत आहेत अशा सर्व लोकांना चांगले मार्गदर्शन मिळून
देवाच्या अधिका-अधिक जवळ यावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. आज कितीत्तरी लोक आजारी, दुःखात व एकटेपणाचे जीवन जगत आहेत.
अशा लोकांना देवाची साथ मिळावी व सर्व अडचणीत मुक्त व्हावे म्हणून आपण प्रार्थना
करू या.
५. जगामध्ये कितीतरी अन्नाची नाशदूष केली जाते. गरीब लोकांना
एक वेळेचे अन्न मिळत नाही. जे लोक अन्नाची नासाडी करतात अशाना बुद्धी मिळून
गरिबांना द्यावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
६. थोडावेळ शांत राहून आपल्या सामाजिक, कौटुंबिक व वैयक्तिक
गरजासाठी प्रार्थना करूया.
Good job bro
ReplyDelete