Reflections for the homily for 22nd Sunday
in Ordinary Time (01-09-2019)
by Br. Julius Rodrigues.
सामान्य
काळातील बाविसावा रविवार
दिनांक: १ /०९ /२०१९
पहिले वाचन: बेनसिरा
३: १९–२१, ३०–३१
दुसरे वाचन: इब्री
लोकांस पत्र १२: १८–१९, २२–२८
शुभवर्तमान: लूक
१४ : १,७–१४.
प्रस्तावना:
आज
पवित्र ख्रिस्तसभा सामान्य काळातील बाविसावा रविवार साजरा करीत आहे. आजची उपासना
आपल्यास नम्र बनण्यास आमंत्रित करीत आहे.
बेनसिराच्या
पुस्तकातून घेतलेल्या आजच्या पहिल्या वाचनात सांगण्यात येत आहे कि, परमेश्वर कितीही सामर्थ्यवान व महान असला तरीही तो नम्र लोकांचा पूज्यभाव
स्वीकारतो व आपली रहस्ये विनयशील जनांस प्रकट करतो. दुसऱ्या वाचनात संत पौल इब्री
लोकांस ऐहिक सिओन व स्वर्गींय सिओन ह्यामधील फरक स्पष्ट करून देत आहे. तर लुककृत शुभवर्तमानात
ख्रिस्त नम्रता व आदरातिथ्याचा दाखला देऊन म्हणतो कि, ‘जो
कोणी आपणाला उंच करीतो तो नमविला जाईल व जो आपणाला नमवितो तो उंच केला जाईल’.
ह्या मिस्साबलीदानात भाग घेत
असताना आपण ख्रिस्ताकडे नम्रतेचे कृपादान मागूया.
सम्यक विवरण
पहिले वाचन: बेनसिरा
३: १९–२१, ३०–३१.
बेनसिरा
ह्यांची बोधवचने हा ग्रंथ ‘एक्लेझीयास्तस’ या नावाने देखील ओळखला जातात. ह्यामध्ये परमेश्वर आपला प्रेमळ पिता ह्या
नात्याने तो त्याच्या मुलांना नम्रपणे वागण्याचा सल्ला देत आहे. कारण तो आपला
निर्माणकर्ता परमेश्वर आहे आणि म्हणून आपली जी काही प्रतिष्ठा, मानसन्मान व आदर आहे हे आपलं नसून परमेश्वराकडून मिळालेले दान आहे.
म्हणूनच परमेश्वर सांगतो कि प्रतिष्ठीत व नामांकित पुष्कळ आहेत, परंतु तो आपली रहस्ये विनयशील जनांस प्रगट करितो.
दुसरे वाचन: इब्री
लोकांस पत्र १२: १८–१९, २२–२८
इब्री
लोकांस लिहिलेल्या पत्राचा लेखक हा यहुदी धर्मातून ख्रिस्ती झाला होता. जो ह्या
वाचनात आपल्यासमोर दोन दृश्य ठेवत आहे. १) परमेश्वराने इस्राएल लोकांबरोबर सिओन
पर्वतावर केलेला करार म्हणजेच ‘ऐहिक सिओन’ किंवा जुना करार. २) स्वर्गीय जेरुशलेम म्हणजेच नवीन करार किंवा ‘स्वर्गीय सिओन’.
परमेश्वराने इस्राएल
लोकांबरोबर केलेल्या जुन्या करारात इस्राएल लोकांत भय दडलेले होते. परंतु नवीन
करारात परमेश्वराविषयी प्रेम समाविष्ट होते.
शुभवर्तमान: लूक
१४ : १,७–१४.
शास्त्री
व परुशांना भर बाजारात नमस्कार घेणे आवडत असे तसेच त्यांना प्रतिष्ठेने व मानाने
दिलेल्या नमस्काराने ते भारावून जात. त्यांना सभागृहात मानाची आसने पटकावण्यासाठी
आवडत असे. तसेच मेजवानीच्या प्रसंगी मुख्य बैठ्कांवर आरूढ होणे त्यांना आवडत असे.
म्हणूनच ख्रिस्त आजच्या दाखल्यात सांगत आहे कि, कोणी
तुम्हाला लग्नाच्या मेजवानीचे आमंत्रण दिल्यास मुख्य आसनावर बसू नका तर अगदी शेवटच्या
जागेवर जाऊन बसा.
या
अध्यायातील सर्व प्रसंग भोजनाशी निगडीत आहेत. त्याकाळी विविध प्रश्नांवर चर्चा
करण्याचे भोजनावळ हे एक व्यासपीठ होते. भोजनाच्या निमित्ताने येशूने आध्यात्मीक
आणि सामाजिक जीवनासबंधी महत्वाचे भाष्य केले. येशूला उपेक्षितांबद्दल विशेष प्रेम
होते. समाजात श्रीमंत आणि कंगाल याच्यांत भेदभाव केला जातो, हि गोष्ट त्याला आवडली नाही. त्याने नेहमी
सामाजिक समतेचा आग्रह धरला म्हणूनच हा दाखला सांगत असताना ख्रिस्त आपणास बोध देतो
कि, ‘जो कोणी आपणाला उंच करितो तो नमविला जाईल’. ख्रिस्त स्वतः देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ
आहे असे त्याने मानले नाही, त्याने स्वतःला रिक्त केले.
म्हणजे मनुष्याच्या प्रतिमेचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले. (फ़िलिप्पैकरांस पत्र
२: ६-८ ) ख्रिस्त आपणासाठी नम्रतेचा एक उत्तम आदर्श आहे. तो सांगतो कि, मी मनाचा सौम्य व लीन आहे. (मत्तय ११: २९ ) उपेक्षित, पिडीत, कंगाल, आंधळे – पांगळे ह्यांना त्या वेळी सामाजिक जीवनात स्थान नव्हते. त्यांची जागा
तळागाळात होती. परंतु ते येशूचे, लाडके होते. अनेकदा गरजूंना
मानासिकदृष्ट्या पांगळे करण्यासाठी देणग्या दिल्या जातात, अन्नछत्रे
उघडली जातात. दुर्बलांवर अधिकार गाजवण्याचे हे एक साधन बनते. परंतु, येशुने, त्यालाही विरोध केला. ‘गोरगरीबांना जेवणावळी
दया’. असे येशूने सांगितले नाही, तर त्यांना आपल्याबरोबर
एकाच मेजावर भोजन करण्यासाठी आमंत्रित करा’ असा आग्रह त्याने
धरला.
मनन चिंतन:
माणसाचा स्वभाव हा विचित्र
आहे. जे आपण करायला नको तेच आपण करत असतो. जो आपल्याला आवडत नाही ते कुरुण आपण
आपल्याच स्वभावाचे गुलाम होत असतो. आजच्या पहिल्या वाचनावर आणि शुभवर्तमानावर जर
आपण नजर टाकली तर आपणास दिसून येते कि आपण कधी-कधी काही गोष्टी देखाव्या साठी करत
असतो. दुसऱ्यांची आपल्यावर नजर असावी, दुसऱ्यांनी आपल्याला मान-सन्मान द्यावा,
आपली स्तुती- सुमने गावी दोघा-चौघात आपणास शाबासकी मिळावी ह्यासाठी आपली धड-पड चालू
असते. ह्या मानवी देखाव्या स्वभावाला रामबाण औषध हे आजच्या वाचनात आपणास ऐकावयास मिळते.
पहिल्या वाचनात बेनसिरा आपणास होईल तेवडे नम्र व विनंम्र होण्यास
आव्हान देत आहे. माणसाचा मोठेपणा पदवीत, किमतीत, देखण्यात किवा मालमत्तेत अवलंबून
नसून माणूस जितका मोठा तितकाच त्याने आपल्याला नम्र, लहान, सौम्य केल्यास
परमेश्वराच्या दृष्टीत तो महान होऊन त्याची कृपा दृष्टी त्या व्यक्तीवर पडत असते.
पुढे आपल्याला सांगण्यात आले आहे कि देखावा, गर्विष्ट ह्यांना कोणत्या प्रकारच्या
वेदना भोगाव्या लागणार आहे आणि ह्या स्वभावाला औषध तर नाहीच पण ते आपल्या सर्वनाश
करत असतात.
शुभवार्मानात
येशू दाखल्याच्या स्वरूपात आपल्याला महान संदेश देत आहे. तो आपल्याला सांगत आहे,
की आपणास आमंत्रण मिळाले असेल तर आपण कसे वागावे. एखाद्या गर्विष्ट व
नावलौकीकतेसाठी हापापला असेल तर पहिले आणि मुख्य आसन घेतो पण योग्यतेचा मनुष्य
आल्यानंतर आपलाच अपमान करू घेतो.पण जो स्वत:ला नम्र लहान करून खालच्या जागी जावून
बसतो तेव्हा चार-चौगात, जर ती व्यक्ती योग्यतेची असेल तर उंचावली जाईल.
पुढे
येशू सांगत आहे कुठल्या प्रकारच्या लोकांना भोजनाला बोलवावे. जे आपला आदर सन्मान
करतील आपल्याला त्यांच्या घरी बोलावून घेतील अश्यांना आमंत्रण देणे म्हणजे परत
फेडीची अपेक्षा करणे. गोरगरीबांना दीन-दुबळ्याना, लुळ्या-पागल्यांना बोलावणे
म्हणजे त्यांच्या सारखे लहान व नम्र होणे, ते नक्कीच परत फेड करू शकत नाही पण
आपणाला आशीर्वादित करतात. ज्यांच्या अंगी नम्रपणा व लहानपणा असतो तेच असे करू शकतात. गर्विष्टपणा
आणि दिखाऊ वृत्तीची माणसे मान-सन्मानासाठी जगत असतात चार चैघामध्ये नाव कमावू
पाहतात. म्हणून खरोखर जो स्वत:ला नामवितो तो उंच केला जातो आणि जो स्वताला उंच
करतो तो नमविला जातो.
बोधकथा:
संतान डिसोजा नावाची बाई ह्याचा पंच्याहातरावा
वाढ दिवस होता, तिचा वाढदिवस आनंदात आणि मैंज-मजेत साजरा करण्यास तिची मुले-मुली व
नातवंड-परतुंड उत्साहित होते आईचा वा आजीचा वाढदिवस कसा साजरा करायचा ह्यासाठी सभा
बोलवण्यात आली.ह्या सभेमध्ये काही विषयावर चर्चा करण्यात आली. उदाहरनार्थ कोणाला
आमंत्रित करायचे, कोणत्या प्रकारचे जेवण करायचे, आई-आजीचा मान-सन्मान कसा करायचा
कि ज्याद्वारे सांतान बाईला आनंद होईल.
चर्चेसाठी पहिला विषय होता तो म्हणजे सांतान बाईचा फोटो
सुवार्ता व नीरोप्या मासिकात देऊन नामलौकीक्ता करायची. ह्यावर नातवंड-पोत्वंड
ह्यांनी आक्षेप घेतला. देखाव्यासाठी, माणासाठी व नावासाठी आपण वाढदिवस साजरा ण
करता ते पैसे गोर-गरिबासाठी, अनाथ आश्रमाला द्यावे अशी सूचना देण्यात आली.
पुढे आमंत्रण कोणाला द्यायचे ह्या विषयावर चर्चा सुरु झाली.
आपण अमुक नातेवाईकाला आमंत्रण अश्या अनेक सूचना आल्या. पण अमुक व्यक्तीला बोलावले
तर दुसऱ्याला राग येईल. कोणाला आमंत्रित करावे व कोणाला सोडावे हे मात्र कळत
नव्हते, बघता-बघता ९०० च्या वर नावे गेली होती. साध्या स्वरूपात वाढदिवस साजरा
करण्याचा विचार केला असता त्याचे रुपांतर मोठ्या सेलेब्रेशन मध्ये झाले. ह्या
गोष्टीतून एक गोष्ट त्यांच्या निदर्शनास आली कि जेवढे आपण साधे सेलेब्रेशन करू
इच्छितो तेवढेच आवाक्या बाहेरच ते होत असते.
विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: ‘हे परमेश्वरा, आमची प्रार्थना ऐक’
१)
आपले पोप
फ्रान्सीस, सर्व बिशप्स, धर्मगुरू व व्रतस्थ बंधुभगिनी यांना त्यांच्या प्रेषितीय
कार्य करण्यासाठी तुझी कृपा दे त्याच प्रमाणे त्यांना नम्र हृद्य दे.
२)
आपल्या
समाज्यात, कुटुंबात व धर्मग्रामात प्रत्येक व्यक्तीला समानतेची व सन्मानाची वागणूक
मिळावी म्हणून प्रार्थना करूया.
३)
समाजात
वावरत असताना, आपण ख्रिस्ती म्हणून इतरापर्यंत नम्रतेची शिकवण आपल्या
वागन्याद्वारे द्यावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
४)
आपल्या
धर्मग्रामात जे कोणी आजारी असतील, त्यांना परमेश्वराने स्पर्श करावा, त्यांना
चांगले आरोग्य द्यावे म्हणून प्रार्थना करूया.
५)
अति
पावसामुळे कितेकांची घरे उद्वस्त झाली
आहेत, परमेश्वराने त्याच्या सांभाळ करावा आणि त्याच्या गरजा पुरवाव्यात म्हणून आपण
प्रार्थना करूया.
६)
थोडा वेळ शांत राहून आपल्या
वैयक्तिक, कौटुंबिक
व सामाजिक हेतूंसाठी प्रार्थना करूया.