सामन्य
काळातील एकोणिसावा रविवार
दिनांक: ११/०८/२०१९
पहिले वाचन: शालमोनाचा ज्ञानग्रंथ १८: ६-९
दुसरे वाचन: इब्रीलोकांस पत्र ११: १-२ ; ८-१०
शुभवर्तमान: लुक १२: ३२-४८
प्रस्तावना:
आज आपण
सामन्य काळातील एकोणीसावा रविवार साजरा करीत आहोत. आजची उपासना आपल्याला नेहमी तत्पर व तयार राहून देवाच्या सेवेत मग्न राहण्यास
आमंत्रण करीत आहे.
आजच्या
पहिल्या वाचनात आपण ऐकतो की, परमेश्वर आपले शत्रूपासून तारण करतो जेणेकरून आपण
त्याच्या आनंदात सहभागी होऊ शकू. दुसऱ्या वाचानात इब्रीलोकांस पत्र ह्यात आपल्याला
विश्वासाच्या दोन बाजू आहेत असे सांगण्यात येते आणि त्या म्हणजे, “आशा आणि भरवसा”.
हि गोष्ट प्रत्येक श्रद्धावंतासाठी अतिशय आनंददायक व आशादायक आहे असे आपणास सांगण्यात आले आले आहे.
शुभवर्तमानात प्रभू येशू म्हणतो, नेहमी
चांगल्या सेवकाप्रमाणे आपल्या धण्याची सेवा करा व पुढे येशू म्हणतो, “ज्या कोणाला
पुष्कळ दिले आहे त्याच्याकडून पुष्कळाची अपेक्षा केली जाईल.
तर आपणही
आपल्या दैनंदिन जीवनात चांगल्या सेवाकाप्रमाणे सतत देवाची सेवा करावी व पुष्कळ
पटटीने आपल्या कर्मादवारे फळे द्यावी म्हणून लागणारी कृपा शक्ती ह्या पवित्र
मिस्साबलिदानात एक चित्ताने मागुया.
सम्यक विवरण
दुसरे
वाचन: इब्रीलोकांस पत्र ११:
१-२ ; ८-१०
देवावर विश्वास ठेवणे म्हणजे काय? या
वाचनाचा अर्थ ह्या अध्ययात स्पष्ट केला आहे व त्यासाठी जुन्या करारतील देवाच्या
सेवकांची उदाहरणे घेतली आहेत. विश्वासाने मनात खात्री उत्पन्न होते. ख्रिस्तामुळे
जे मिळाले आहे व पुढे मिळणार आहे व ज्या स्वर्गास आपण जाणार आहोत या सर्व गोष्टी
आपल्या डोळ्यांनी पाहिल्या नाहीत. मात्र विश्वासामुळे त्या आपल्याला मिळाल्या आहेत
असा आपल्याला भरवसा आहे व मिळणार आहेत अशी खात्री आहे. हि खात्री व भरवसा ज्यांना
ज्यांना होती त्यांची उदाहरणे या अध्यायात आहेत.
शुभवर्तमान: लुक १२: ३२-४८
आजचे
शुभवर्तमान हे प्रामुख्याने दोन भागात विभागते. पहिल्या भागात आपली वृत्ती या जगात
कशी असावी याचे शिक्षण येशूने आपल्या शिष्यांना दिले आहे. पुढे येशू म्हणतो
तुमच्या कडे जे काही आहे ते गोर गरिबांना दया व स्वर्गात आपली संपत्ती साठवण्यास
आव्हान येशू आपल्या शिष्यांना करत आहे.
तर दुसऱ्या
भागात येशू म्हणतो तुम्ही सतत तत्पर व विश्वासू बना कारण प्रभू येशू ख्रिस्त
अकस्मात येणार आहे. निष्काळजी व बेफिकीर होऊ नका. तर त्याच्या येण्याची उत्सुकतेने
वाट पाहा. जो अशा प्रकारे वाट पाहिलं तोच
शेवटपर्यंत त्याची सेवा करीत राहील.
तुम्हांला
प्रभू येशूने जी सेवा दिली आहे ती करीत जा. प्रभू येशू आपणाकडून प्रामाणिक
व्यवहाराची अपेक्षा करतो. कारभारी म्हणजे व्यवस्था पाहणारा. हे काम धन्याची इच्छा
काय आहे ते समजून करावयाचे आहे हे लक्षात राहू दया. जो माणूस अविचारी व अविश्वासू
असतो तो जुलूम करतो. खाण्याविषयी जास्त बोलतो व खादाड असतो. तो वाट पाहणारा नसतो.
त्याला शिक्षा चुकणार नाही. मला कोणी विचारणार नाही असे त्या मनुष्याने समजू नये.
बोधकथा: उबंतू
आफ्रिकेत उबंतू नावाची एक गोष्ट आहे व त्या मागचे प्ररेणास्थान ही त्यांची
उबंतू
संस्कृती आहे. एकदा एका मानववंशशास्त्रज्ञानी आफ्रिकन मुलांसाठी खेळ ठेवला.
संस्कृती आहे. एकदा एका मानववंशशास्त्रज्ञानी आफ्रिकन मुलांसाठी खेळ ठेवला.
त्याने झाडाजवळ मिठाईची एक टोपली ठेवली आणि मुलांना १००
मीटर अंतरावर उभे केले. मग
घोषित केले की जो प्रथम पोहोचेल त्याला टोपलीतील सर्व मिठाई मिळेल. जेंव्हा त्या व्यक्तीने त्यांना जा म्हटले तेंव्हा
माहिती आहे काय झाले असेल? त्या सर्व मुलांनी एक दुसऱ्याचे हात पकडले व सर्व एकत्र
त्या मिठाई जवळ पळाले व सर्वानी बरोबरीने वाटून आनंदाने खाले. जेव्हा त्या महाशयाने विचारले त्यांनी असे का
केले तेंव्हा ते म्हणाले ‘उबंतू’ म्हणजेच इतर जेंव्हा दुखी असतील तेव्हा मी
कसा काय आनंदी राहू शकतो?
उबंतू
त्याच्या भाषेत म्हणजे, “मी आहे कारण आम्ही आहोत.”
मनन चिंतन:
नेहमी प्रमाने आजही येशू आपल्या शिष्यां समोर एक नवीन
आव्हान व कठिण असा पर्याय ठेवत आहे. ख्रिस्ताने त्याच्या कडून एक मुलभूत जीवन शैली
निवडण्याची अपेक्षा केली. कारण आज काल
समाज्यात पाहता प्रत्येक व्यक्ती जीवनात अल्प कालावधीत, शक्य तितकी संपती जमवण्याचा मोह करतो. जेव्हा येशूने आपले
शिष्य निवडले तेव्हा त्याने त्यांच्या समोर कठीण पर्यायच ठेवले होते. लोकांचा
पैश्यासाठी, संपत्तीसाठी, अधिकार गाजवण्यासाठी चाललेली धडपड पाहून ख्रिस्त आपल्या
शिष्यांना सर्व काही त्याग करावयास सांगतो व गरिबांना द्यावयास सांगतो आहे. “तुमच्याकडे असलेले सर्व विका आणि
गरिबांना पैसे दया. जुन्या न होणाऱ्या व
स्वर्गातही न संपणाऱ्या अशा थैल्या स्वतःसाठी करा कारण तेथे चोर जाऊ शकणार नाही व
कसरही त्याचा नाश करू शकणार नाही.”- लुक १२: ३३.
असिसिकार
संत फ्रान्सिस ह्यांनी येशूला तंतो अनुकरण केले व त्यामुळेच त्यांना आज आपण आलतेर
ख्रिस्तूस किंवा दुसरा ख्रिस्त म्हणून संभोदित करतो. त्याने आपले कपडे काडून फेकून
दिले व आपले जे काही होते नव्हते ते गोर गरिबांना देऊन टाकले. इतकेच नव्हे तर
त्याने आपले आई-वडील,घरदार सोडून येशूची सुवार्ता लोकांना सांगितली व इतरांची सेवा
केली.
महात्मा
गांधी ह्यांनी सुद्धा आपले चांगले कपडे टाकून धोतीचा स्वीकार केला. कारण भारतात
असंख्य लोक गरिब आहेत व त्यांच्याकडे घालावयास पुरेसे कपडे नाहीत म्हणून
त्यांच्याशी एकरूप होऊन त्याच्या बरोबरीने जीवन जगण्यास त्यांनी धोती परिधान केली.
आपले सर्व
विका आणि गरिबांना दया म्हणजे नक्की काय? स्वर्गात संपत्ती गोळा करणे म्हणजे काय?
जेव्हा आपण गरिबांच्या सेवेसाठी आपले काही देतो तेंव्हा देव आपल्याला आनंदाने व
पूर्णतेने भरतो. आपले दिल्याने आपले कधीच कमी होत नाही तर त्यात अधिक भर पडते.
गरिबांसाठी केलेला त्याग आपल्याला एक प्रकारचे आंतरिक आनंद देतो. त्यामुळे शेकडो
कोल आपल्याला बघून प्रेरित होतात व त्यांना सुद्धा तसे दान किंवा त्याग करावयास प्रेरणा मिळते व आपला एक वारसा बनून
जातो. आपण लोकांकडून प्राप्त केलेली चांगली इच्छा आणि प्रशंसा श्रीमंत
संपत्तीसारखे आहे जे भविष्यासाठी केलेली एक प्रकारची गुंतवणूक आहे.
येशूने
शिष्यांस नेहमी सावध व जागृत राहण्यास सांगितले. कायम सज्ज व तयारीने राहा ज्या
प्रमाणे एखादा नोकर आपल्या मालकाच्या परत येण्याची वात पाहात असतो. देव कुठल्याही
वेळी आपल्या भेटीला येउ शकतो. ज्याप्रमाणे येशू आपल्या शिष्यांना म्हणतो,
“मनुष्याचा पुत्र कुठल्याही वेळी येईल, जेंव्हा तुम्ही त्याची अपेक्षा करीत नाही.”
आध्यात्मिक मनुष्य नेहमी तत्पर व देवाच्या येण्यासाठी तयार असतो. तो देवाला
प्रत्येक गोष्टीमध्ये स्विकार करतो.
ज्याप्रमाणे
येशू आपल्या शिष्यांस सांगतो तो आपणास सुद्धा सांगत आहे. शिष्यांस हे कळणे गरजेचे
होते की देवाने त्यांचे कार्य फक्त त्यांच्या हाती सोपविले होते. एखाद्या दासाची
किंवा सेवकांची निष्ठा त्यांच्या कामातून दिसून येते. परंतु जो सेवक आपले कर्तव्य,
आपले काम सोडून खाण्या-पिण्या मध्ये मग्न असेल त्याला देव शिक्षा देतो. जो सेवक
आपल्या मोज मजेत व्यस्त आहे तो आपल्या कर्तव्यावर लक्ष केंद्रित करू शकणार नाही व जेव्हा घर धनी येईल
तेव्हा तो त्याच्या समोर आपली बाजू मांडू शकणार नाही. दुदैवाने आज येशूचे शिष्य
मानले जाणारे लोक अशाच जगाच्या मोह मध्ये गुंतून गेले आहेत व ते आपले कर्तव्य,
प्राधान्य, प्रेषितीय कार्य विसरून गेले आहेत.
ज्या
सेवकाचे आयुष्य आध्यात्मिकतेवर आधारित आहे तो नेहमी देवाच्या राज्ययावे म्हणून
कार्यरत राहील, त्यामुळेच आजच्या शुभवर्तमानात येशू म्हणतो ज्यांना पुष्कळ दिले
आहे त्याच्या कडून पुष्कळाची अपेक्षा करत आहे. आपल्याला पुष्कळ दिले आहे व
आपल्याकडून सुद्धा पुष्कळाची अपेक्षा आपला देवा करत आहे. आपल्याला दिलेले दान व
वस्तू हे आपले वर्चस्व गाजवण्यास आणि स्वतःसाठी बनविण्यासाठी नसतात तर चांगल्या
सेवाकाप्रमाणे देवावर प्रेम व त्याची सेवा करण्यास असतात.
आपणही
येशूचे चांगले शिष्य बनून सतत देवाची सेवा करावी म्हणून ह्या पवित्र
मिस्साबलिदानात मागुया.
विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: “हे प्रभो दया कर व तुझ्या लोकांची प्रार्थना ऐक”.
१. ख्रिस्त सभेची दूरा वाहणारे आपले परमगुरु स्वामी, महागुरू
स्वामी, धर्मगुरु –धर्मभगिनी व व्रतस्त ह्यांना प्रभूची सेवा करावयास निरोगी
आरोग्य लाभावे व त्यांच्या कडून जास्तीत जास्त प्रभू सेवा घडून यावी म्हणून आपण
प्रार्थना करूया.
२. आपल्या धर्मग्रामात जे कोणी आजारी व पिडीत आहेत, खाटेला
खिळलेले आहेत ह्यांना प्रभूचा प्रेम दायी स्पर्श व्हावा व त्याचे दुःख सहन करण्यास त्यांना प्रभूची कृपा
मिळावी म्हणून अओन प्रार्थना करूया.
३. आज बर्याच ठिकाणी
अतिवृष्टी मुळे बरीचसी जीवित हानी व नुकसान झाले आहे त्यांना धीर मिळावा व
सरकार कडून योग्य ती मदत मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. आज बरेचसे युवक पीडी वाम मार्गाला जात आहे, बेरोजगारी वाढत
आहे अश्यांना प्रभूचा आशीर्वाद मिळावा आणि त्यांनी त्याच्या आयुष्यात चांगले कार्य
करून आपला व समाजाचा विकास करावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. थोडा वेळ शांत राहुण आपल्या वैयक्तिक गरजासाठी प्रभू कडे
मागुया.
Good job brother
ReplyDelete