आगमन काळातील तिसरा रविवार
दिनांक: १३-१२-२०२०
पहिले वाचन: यशया ६१:१-२; १०-११
दुसरे वाचन: १ थेस्सलनीकाकरांस पत्र
५:१६–२४
शुभवर्तमान: योहान १:६-८;
१९-२८
प्रस्तावना:
आज ख्रिस्तसभा आगमन काळातील तिसरा रविवार साजरा करीत आहे.
आजचा हा रविवार आपण ‘गावदेते (gaudete) रविवार’ म्हणून
साजरा करतो. लॅटिन भाषेत गावदेते (gaudete) म्हणजेच आनंद. आज
ह्या आनंदाच्या रविवारी देऊळ माता आपल्याला उल्लाहासाने व आनंदाने येशूच्या
जन्माची तयारी करावयास आमंत्रण देत आहे.
आजची उपासना आपल्याला खऱ्या आनंदाने कसे जगलो पाहिजे,हे दाखवून देते. खरा
आनंद एखाद्याची खरी ओळख स्वीकारल्यामुळे प्राप्त होतो
आणि जेव्हा आपण पवित्र आत्म्यात एक होतो तेव्हा आपल्याला खरी ओळख मिळते. पहिल्या
वाचनात, यशया संदेष्टा आपल्याला दाखवितो की प्रभूचा
आत्मा आपल्याला आपले खरे पाचारण, आपले
वास्तविक कार्य आणि ओळखीकडे घेऊन जातो. दुसर्या वाचनात, संत पॉल आपल्याला नेहमी आनंदात राहण्याची आणि प्रार्थना करण्यास आव्हान
करत आहे; असे केल्याने आपण, प्रभूच्या
आत्म्यास, आपल्या बरोबर राहण्याचे आमंत्रण देतो.
शुभवर्तमानात, बाप्तिस्मा करणारा योहान आपली खरी ओळख जगाला घोषित करीत आहे. तो स्वत: ची तुलना परमेश्वराशी करीत
नाही, तर नम्रपणे देवाने त्याला नेमलेली भूमिका बजावतो.
तो पवित्र आत्म्याने भरला आहे आणि त्याच आत्म्याने तो इतरांना येशूकडे नेतो.
आपण या पवित्र मिस्साबलीदानात, आपली खरी ओळख आणि आनंद शोधण्यासाठी पवित्र आत्म्याची कृपा मागुया व प्रभूच्या पुन्हा येण्यासाठी आपल्या अंतकरणाची तयारी करूया.
सम्यक
विवरण :
पहिले वाचन: यशया ६१:१-२; १०-११
आजच्या पहिल्या वाचनात दोन स्तोत्रे आहेत: अ) अभिषिक्त
लोकांचे स्तोत्र आणि ब) नीतिमानाचे स्तोत्र
अभिषिक्त लोकांच्या स्तोत्रामध्ये प्रेषित आत्म्याविषयी
बोलतात, जो आत्मा तारणाऱ्याला देण्याचे वचन देवाने दिले होते. हाच पवित्र आत्मा
परमेश्वर सर्व लोकांना देण्याचे वचन देतो. तसेच बंदीवानांना तुरुंगातून व अंधारात
असलेल्यांना तेजस्वी प्रकाशापर्यंत बाहेर
काढले जावे असेही तो म्हणतो.
दुसरे स्तोत्र सियोनच्या आनंद विषयी आहे. ते देवाचे तारण व चांगुलपणा व्यापून असलेल्या वधूप्रमाणे आहे. म्हणून दोन्ही स्तोत्रांचे मुख्य विषय म्हणजेच देवाचे संपूर्ण मोक्ष आहे - शारीरिक व आध्यात्मिक सुद्धा.
दुसरे वाचन: १ थेस्सलनीकाकरांस पत्र
५:१६–२४
दुसऱ्या वाचनात पौल, थेस्सलनीका येथील लोकांना, नेहमी आनंदित राहण्यासाठी आमंत्रित करत आहे. तसेच त्यांनी नम्रपणे प्रार्थना करावी व त्यांच्यावरील त्यांच्या चांगुलपणाबद्दल देवाचे आभार मानावे असे त्याने त्यांना आवाहन केले आहे. ते म्हणतात की, देवाची इच्छा हीच आहे. शेवटी संत पौल थेस्सलनीका येथील लोकांच्या पवित्रतेसाठी प्रार्थना करतो की जेणेकरून ते प्रभुच्या पुन्हा येण्याच्या वेळेस पात्र ठरतील.
शुभवर्तमान: योहान १:६-८;
१९-२८
शुभवर्तमान योहान बाप्तिस्मा विषयी सांगत आहे. तो देवाने निवडलेला आहे, ज्याच्या जवळ देवाने कार्य सोपविले आहे. जेव्हा लोक त्याला त्याच्या खऱ्या ओळखीबद्दल विचारतात, तेव्हा तो आपल्या ओळखीबद्दल खोटे बोलत नाही. तो, त्याच्या बद्दल, लोकांच्या मनात असलेली, चुकीची कल्पना नाकारतो आणि तो खरोखर कोण आहे हे स्पष्टपणे सादर करतो. तो वाळवंटात ओरडत असलेला आवाज आहे. देवाने सोपविलेले कार्या सोबत असलेला आवाज. तारणाऱ्याचा मार्ग तयार करणारा आवाज.
मनन चिंतन:
अनोळखी व्यक्तीशी जेव्हा आपली भेट होते, त्या वेळेस “
तुम्ही कोण आहात? तुमचा परिचय काय आहे ?” असे प्रश्न आपल्याला सहसा ऐकायला मिळतात. जे लोक आपल्याला ओळखत नाही त्यांच्याकडून
असे प्रश्न अपेक्षित असतात. आपली स्वः ओळख हे आपल्या प्रत्येकांस महत्वाची असते.
दुसऱ्यान समोर तर आपली ओळख जाहीर करायला लागतेच, पण त्याहून, स्वःताहाची ओळख
स्वताः जाणून घेणे, ती ओळखणे व स्वीकारून घेणे हे त्याहून ही अधिक महत्वाचे आहे.
आजच्या या जगात जर आपण पाहिले तर आपल्याला सगळ्या ठीकाणी दु:ख, नाराजीपणा, निराशा.
ह्याच सगळ्या भावना दिसून येतात. या विषयावर जर आपण थोडा विचारविनिमय केला तर
आपल्याला हे दिसून येते की, बहुतेक वेळेस या सगळ्या भावनांच्या मागच कारण म्हणजे स्वतःहाबद्दल
असलेली गैरसमज, अथवा स्वतःची अनोळखी दाखवणे आहे. जेव्हा आपण स्वतःला जाणून घेतो,
समजून घेतो, तेव्हाच आपल्याला संतुष्ट आणि खरा आनंद प्राप्त होतो.
आजच्या शुभवर्तमानात आपण वाचतो की, लोकसमूदाय योहान
बाप्तीस्माला त्याच्या ओळखी बद्दल प्रश्न विचारतात. पाण्याने बाप्तिस्म देणारा
योहान लोकांना आकर्षित करत आहे, हे त्यांनी पाहिले. हा योहान बाप्तिस्मा तोच आहे ज्याच्यासाठी
इस्रायल लोक आतुरतेने वाट पाहत होते की नाही असा प्रश्न त्यांच्या समोर निर्माण
झाला होता. लोकांच्या नजरेत योहान एक पवित्र, महात्मा, सज्जन व महान व्यक्ती होता.
हे जाणून सुद्धा त्याने त्यांच्या गैरसमजुकतेचा फायदा घेतला नाही. तो त्यांना
पटवून देऊ शकला असता की तोच तारणारा कोणी एक महान व्यक्ती आहे. पण त्याने तसे केले
नाही. कारण त्याला आपल्या स्वतःची ओळख होती, व
हीच ओळख तो नम्रेतेने लोकांसमोर सादर करतो.
परमेश्वराने त्याला एका सिद्ध कार्यासाठी नेमले होते. तारणाऱ्याचा
मार्ग तयार करण्यास तो आवाज होता. देवाने सोपवलेले हे कार्य त्याने आनंदाने
स्वीकारले होते आणि याच कारणाने त्याचे जीवन आदर्शमय होते. हे स्विकारण करण्याची शक्ती
व आशीर्वाद आपणास पवित्र आत्मा देत असतो. जेव्हा आपण पवित्र आत्मा स्वीकारतो
तेव्हा आपण आनंदाने प्रवृत्त होऊन आपण आपल्या शब्दातून आणि कृतीतून हा आनंद
इतरांना सांगण्यासाठी प्रेरित बनतो.
स्वतःला ओळखणे व आपले पाचारण स्वीकारणे, आनंदी असणे व
कृतज्ञता दर्शविणे, हे सगळे एकमेकांशी जुळलेले आहेत. अनेक वेळा आपण स्वतःला,
दुसऱ्या समोर महान बनवण्याचा प्रयत्न करतो आणि ह्याद्वारे आपण स्वतःची ओळख विसरतो-
ती म्हणजे देवाचे प्रिय मुलं. हे विसरल्यावर आपण आनंदित असण्याचे कारण विसरतो आणि
हळू-हळू आपल्या जीवनात दुःख व निराशा निर्माण होतात. दुःखात असलो तर आपण इतरांना आनंद देऊ शकत नाही
व आपले जीवन व्यर्थ होते.
संत पौल व योहान बाप्तिस्मा प्रमाणे आपण ही जीवनाचे हे रहस्य जाणून घेतले पाहिजे. आपल्या सर्वांचे पाचारण म्हणजे हेच- स्वःत आनंदित असणे व दुसऱ्यांना आनंदित ठेवणे. याच आनंदाने, या नाताळ समयी, आपण बाळ येशूचे स्वागत करू या.
विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
आपला प्रतिसाद: हे
प्रभो आमची प्रार्थना ऐक.
१. ख्रिस्तसभेची
धुरा वाहणारे आपले पोप फ्रान्सिस, बिशप्स,
सर्व धर्मगुरु, धर्मबंधु-भगिनी व
प्रापंचिक ह्यांनी जे प्रभू येशूची सुवार्ता पसरवण्याचे कार्य हाती घेतले आहे ते
त्यांनी पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने योग्य प्रकारे करावे म्हणून आपण प्रार्थना
करूया.
२. ह्या आगमन काळात प्रभू येशूचे स्वागत
करण्यास आम्ही आमच्या अंत:करणाची तयारी करावी व आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला
इतरांमध्ये ओळखाव म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. आमच्या सरकारी व राजकीय नेत्यांना त्यांच्या
जबाबदारीची जाणीव व्हावी व त्यांनी आपला देश चांगल्या प्रगतीच्या मार्गावर आणावा
म्हणून आपण प्रभू येशू ख्रिस्ताकडे प्रार्थना करूया.
४. सर्व पालकांनी आपल्या मुलांमध्ये चांगले
गुणधर्म जोपासावेत, त्यांना देवराज्याविषयी शिकवण द्यावी, परमेश्वराच्या
वचनाप्रमाणे व आज्ञेप्रमाणे वागून मुलांपुढे चांगला आदर्श ठेवावा, म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. आपल्या धर्मग्रामात जे लोक दु:खी, आजारी व बेरोजगार आहेत, विशेषतः जे कोरोना सारख्या भयानक रोगाने पिडीत
आहेत अशा लोकांस मदतीचा हात देण्यास तयार असण्यास आणि अशाप्रकारे परमेश्वराच्या
येण्यासाठी तयारी करण्यास परमेश्वराचा आधार मिळावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
६. आता आपण आपल्या सर्व गरजा शांतपणे
प्रभूचरणाशी अर्पण करूया.
No comments:
Post a Comment