Reflection for THE SOLEMNITY OF MARY, MOTHER OF GOD AND NEW YEAR 2023 (01/01/2023) By Bro. Elias Itur.
मरिया देवाची माता – नवीन वर्ष
पहिले वाचन: गणना ६:२२-२७.
दुसरे वाचन: गलतीकरांस पत्र ४:४-७.
शुभवर्तमान: लुक २:१६-२१.
नव्या स्वप्नाची नवी लाट, नवा आरंभ, नवा विश्वास, नव्या वर्षाची हीच तर खरी सुरुवात…
प्रस्तावना
आज आपण नवीन वर्षाला सुरुवात करत असताना, आज आपली देवूळमाता हर्ष्याने, आनंदाने व उत्साहाने " मरिया देवाची आई" ह्या विषयावर चिंतन करत नवीन वर्षात
पदार्पण करीत आहेत. मरिया जरी साधी व भोळी स्त्री असली तरी ख्रिस्तसभेचे तिचे
स्थान महत्वाचे आहे.
आजची उपासना आपल्याला देवाने
दिलेल्या आशीर्वादा विषयी सांगत आहे. आजच्या पहिल्या वाचनात परमेश्वर इस्राएली
लोकांना म्हणजेच; निवडलेल्या प्रजेला त्याचा भव्य - दिव्य आशीर्वाद देतो. तसेच
आजच्या दुसऱ्या वाचनात आपण ऐकतो कि, आपल्याला देवाला अब्बा, बाप या नावाने हाक
मारायला हक्क प्रभू येशू द्वारे मिळाला आहे. त्याच प्रमाणे आजच्या शुभवर्तमानात
आपल्याला संत लूक प्रभु येशूचे पहिले साक्षीदार व सुवार्तिक; म्हणजेच 'पवित्र
मरिया, संत योसेफ, व मेंढपाळ' ह्यांच्या सुवार्तिक कार्याविषयी सांगत आहे.
आजच्या
मिसाबलिदान सहभागी होत असताना, आपण प्रभूकडे प्रार्थना करूया की, हे नवीन वर्ष त्याच्या मातेच्या मध्यस्थीने
सुख
- समाधानाचे, समृद्धीचे, आनंदाचे आणि एकमेकांवर परमेश्वराची
दया,
प्रेम,आणि स्नेह दाखविण्याचे जावो.
बोधकथा :
प्रसिद्ध फ्रेंच लेखक व्हिक्टर ह्यूगो यांनी ही कथा सांगितली
आहे.
इ.स १७०० मध्ये फ्रेंच राज्यक्रांती झाली. एक आई आणि तिच्या दोन मुलांना त्यांच्या
घरातून हाकलण्यात आले होते. म्हणून ती आई आपल्या मुलांना घेवून दिवसभर जंगलात आणि
शेतात भटकत होती. तिसऱ्या दिवशी सकाळी ते काही झुडपात लपले होते परंतु दोन
सैनिकांनी त्यांना शोधून बाहेर काढले. अधिकाऱ्याने पाहिले की ते उपाशी आहेत, म्हणून त्याने त्यांना फ्रेंच ब्रेडची
एक लांब भाकरी दिली. आईने ते भुकेल्या प्राण्यासारखे पकडले, त्याचे दोन तुकडे केले आणि प्रत्येक
मुलाला एक एक पावाचा तुकडा तोडून त्यांच्या हाताशी दिला. एका अधिकाऱ्याने ते पाहिले आणि दुसऱ्याला
विचारले, "त्या आईला भूक लागली नाही का?"
“नाही,” अधिकाऱ्याने उत्तर दिले, “कारण ती आई आहे.”
मनन चिंतन
ख्रिस्ताठायी जमलेल्या माझ्या
प्रीतीच्याभाविकांनो, आपल्या सर्वाना ठाऊक आहे कि मरिया माता ही येशूची आई, आपली आई आणि ती देऊळमातेची आई आहे.
मरिया माता जगावेगळी माता आहे व ती आपल्या जीवनात काम करत असते. ती आपल्या
आईप्रमाणे मार्गदर्शन करते, आपले हात धरते आणि पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने
आपली विनती नेहमी येशू आणि पित्याकडे घेवून जाते. आपण नवीन वर्षाच्या सुरुवातीला आलेलो आहोत. आणि हे
नवीन वर्ष सुरुवात करण्यासाठी आपल्या प्रत्येक जणांना एक सुंदर वेळ भेटलेली आहे. गेलेल्या वर्षातील दु:ख, चुका, विसरून नवीन वर्षेला नवीन वाट
देवून, आशा
देवून ह्या नवीन वर्षाला सुरुवात करूया. कदाचित आपल्यापैकी बरेच जण फटाक्यांच्या
स्फोटाने किंवा जोर जोरात वाजवून वर्षाची सुरुवात करत असाल? परंतु धन्य व्हर्जिन मेरीने
आम्हाला नवीन वर्षाची सुरुवात या प्रार्थनेने करण्यास सुचावत आहे, “…. मरीयेने या सर्व गोष्टी आपल्या
हृदयात ठेवल्या आहेत.”
आजच्या पहिल्या वाचनात परमेश्वराच्या
सांगण्यावरून आशिर्वादाची प्रार्थना आहारोन व त्याचे पुत्र लोकांना देतात. कारण ते देवाने निवडलेले लोक होते; म्हणून देवाची पवित्र कृपा त्यांच्यावर
होती. हीच
प्रार्थना आज ख्रिस्तसभा आपल्या सर्वांना करण्यास प्रेरित करत आहे, तसेच संत पौल स्पष्ट करतो कि, आपल्या सर्वांना नवजीवन मिळाले आहे. म्हणूनच आपण आतापासून गुलाम नाही, देवाचे फक्त पुत्र नाही तर देवाद्वारे
वारस ही आहोत. कारण
देवाला अब्बा, बापा
अशी हाक मारणाऱ्या आपल्या पुत्राच्या आत्म्याला तुमच्या आमच्या अंतःकरणात पाठविले आहे. आजच्या शुभवर्तमानात देवदुताने पवित्र
मरीयेला कशाप्रकारे संदेश दिला व मेंढपाळांनी येशू ख्रिस्ताला कशी भेट दिली ह्याविषयी
आपण ऐकतो. ह्या
संपूर्ण अध्यायामध्ये आपण विश्वासाचे अनेक गुण पाहत आहोत, ज्यामध्ये पवित्र मरीयेच्या विश्वासाला
उत्तम स्थान प्राप्त होते; म्हणूनच आज ख्रिस्तसभेमध्ये पवित्र मरीयेला उत्तम स्थान
दिले आहे.
ख्रिस्ती धर्मसभेचा श्रद्धाग्रंथ (CCC ५०१) ह्यावर आपल्याला सुंदर अशी शिकवण देते क, देवाने मरिया मातेचे मातृत्व हे
जगात देलेली सुंदर बक्षीस आहे तो भेट आपण सगळ्यांना दिली पाहिजे. मरिया माता एक नैसर्गिक
आई म्हणून, येशू
हा तिचा एकुलता एक पुत्र आहे, तिच्या आध्यात्मिक मातृत्वात तिचा पुत्र येशू ज्यांना
वाचवण्यासाठी आला ते सर्व लोक तिची मुले बनले आहेत. दुसऱ्या शब्दांत, मरीया ही केवळ येशूची आईच नाही तर आपली
आई देखील आहे.
आज आपण देखील या नवीन वर्षेच्या सुरवातीला
निश्चय करूया की मरिया मातेच्या पावलावर पावूल टाकून तिचे अध्यात्मिक गुण आपल्या
मध्ये घेवूया. या
मिस्सा बलिदानात भाग घेत असताना आपण नेहमी विश्वासाने मारीया मातेच्या हाकेला प्रतिसाद
देवूया...
विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: हे पवित्र देवामाते, आम्हासाठी विनंती
कर.
१. ख्रिस्त
सभेचे पोप महाशय, सर्व बिशप्स, धर्मगुरू व व्रतस्थ जे ख्रिस्ताच्या
मळ्यात कार्य करत आहेत त्यांची श्रद्धा बळकट व्हावी व इतरांची श्रद्धा त्यांनी बळकट
करावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. हे
नवीन वर्ष २०२३ आपल्या सर्वांना सुखा-समाधानाचे, आनंदाचे, भरभराटीचे व चागल्या आरोग्याचे जावो म्हणून आपण मारिया
मातेसह प्रभूकडे प्रार्थना करूया.
३. ह्या
वर्षी आपल्या सर्वांना चांगले हवामान मिळावे व सर्व शेतीबागा पिकांनी व फळा-फुलांनी बहरून याव्यात म्हणून आपण प्रार्थना
करूया.
४. सर्व
स्थानिक कार्यकर्त्यांनी शांतता व न्यायासाठी एकत्र यावे तसेच संपूर्ण जगात शांतता
पसरविण्यासाठी प्रयत्न करावेत म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. थोडा
वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक आणि कौटुंबिक गरजा प्रभूचरणी मांडूया.