दिनांक: १८/१२/२०२२
पहिले वाचन: यशया ७:१०-१४
दुसरे वाचन: रोमकरांस पत्र १:१-७
शुभवर्तमान: मत्तय १:१८-२४
विषय: ‘इम्मानुएल’ देव आम्हां
बरोबर.
प्रस्तावना:
आज आपण आगमन काळातील चौथा रविवार साजरा करीत आहोत. आजची उपासना आपले लक्ष येणाऱ्या तर्णाऱ्याकडे
केंद्रित करते. आजच्या शुभवर्तमानाद्वारे आपणास प्रार्थनामय, संयमी व नम्र जोसेफाचे दर्शन घडते. जेव्हा योसेफाला
समजले की मरिया गर्भवती आहे तेव्हा त्याने तिला गुप्तपणे सोडण्याचे ठरवले परंतु
जेव्हा त्याला प्रभूच्या दूताद्वारे समजले की, हे सर्व देवाच्या आज्ञेप्रमाणेहोत आहे तेव्हा
त्याने स्वतःचा मीपणा बाजूला ठेवून देवाच्या हाकेला होकार दिला. योसेफने स्वतःच्या
इच्छेला प्राधान्य दिले नाही तर देवच्या
कार्याला आणि इच्छेला प्राधान्य
दिले. आपण
सुद्धा आपल्या जीवनात नम्रता, संयमता व प्रार्थनेची
आस
धरून देवाच्या इच्छेला प्राधान्य द्यावे म्हणून या मिसाबलिदान प्रार्थना करूया.
मनन चिंतन:
आगमन काळ हा तयारीचा काळ म्हणून ओळखला जातो. ही
तयारी ख्रिस्ताच्या येण्यासाठीची तयारी होय. या
आगमन काळाच्या शेवटच्या रविवारी आजची उपासना आपणा समोर परमेश्वराच्या येण्याविषयी, किंबहुना त्याची आपल्यामध्ये असलेली
उपस्थितीविषयी सांगत आहे. हा परमेश्वर कोठे दूर आकाशात राहणारा परमेश्वर नाही; परंतु एका
हाकेच्या अंतरावर असलेला देव आहे. कारण यिर्मया संदेष्ट्याच्या पुस्तकात आपण वाचतो की, परमेश्वर म्हणतो, “मला
हाक मार;
म्हणजे मी तुला उत्तर देईन.” (यिर्मया ३३:३) तसेच इस्रायेल प्रजेचा हाच अनुभव होता, ते म्हणतात, “कारण आमचा देव परमेश्वर याचामई धावा
करतो, तेव्हा तो आमच्याजवळ असतो.
त्याच्यासारखे कामदेवजवळ असणारे महान राष्ट्र दुसरे कोणते आहे?” (अनुवाद ४:७) शेवटी आजच्या वाचनात
सांगितल्याप्रमाणे हा परमेश्वर “ईम्मानुएल” म्हणजे आमच्या सानिध्य देव असा आहे. (यशया ७:१४, मत्तय १:२४)
ईश्वराचा शब्द झाला माणूस।।
जनामध्यें वास त्याने केला।।
ह्या सुंदर अशा गीताच्या ओवी आजच्या उपासनेचा सारांश आपल्या समोर ठेवतात.
आजची तिन्ही वाचने
आपणास ह्याच
गोष्टीची आठवण करून देतात. तसेच आजची उपासना आपल्या समोर तीन गोष्टी ठेवत आहेत.
१) परमेश्वर त्याच्या वेळेनुसार त्याचे
वचन पूर्ण करतो.
सुमारे ई.स.पूर्व
साडेतीनशे वर्षापूर्वी परमेश्वराने यशया
संदेष्ट्याद्वारे एक अभिवचन दिले होते की, ‘एक
कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल.’ ते वचन देवाचा किवा ती भविष्यवाणी साडेतीनशे वर्षानंतर
प्रभू येशूचा येण्याने पूर्ण झाली आहे. तसेच जेव्हा लाजारस मरण पावला होता, तेव्हा प्रभू येशू त्याच्या थडग्याजवळ चार दिवसानंतर पोहोचतो, आणि लाजारसला मेलेल्यातून उठवितो. (योहान ११:३९-४४) म्हणजेच मनुष्याच्या योजनेनुसार नव्हे, तर देव त्याच्या योजनेनुसार व वेळेनुसार सर्व
गोष्टी पूर्ण करीत असतो. म्हणून देवाचा योजनेस आपण सतत तयारीत राहाणे फार गरजेचे
आहे. विशेषत: जेव्हा आपली आशा निराशा होते, देवा देवावर विश्वास किंवा श्रद्धा ठेवणे फार महत्त्वाचे आहे कारण असे
म्हणतात,
“भगवान के घर मे देर है, अंधेर नही”
२)
परमेश्वर त्याची योजना पूर्ण करण्यास मानवाची निवड करत असतो.
आपण
आताच ऐकल की, नाझरेथ गावातील मरीयेची परमेश्वराने
त्याच्या पुत्राची आई होण्यास निवड केली होती. अनेक अशा कुमारीका नाझरेथ गावात राहत होत्या, परंतु परमेश्वराने मरीयेची निवड केली व योसेफास सुद्धा मरियेचा पती व ख्रिस्ताचा पिता होण्यास निवडले होते. तसेच सुवार्तिक होण्यासाठी पौलाची निवड केली होती. अशा प्रकारे अनेक अशा
व्यक्तींची परमेश्वराने त्याची योजना पूर्ण करण्यास निवड केली होती. काही
व्यक्तींची यादी मी आपल्या समोर ठेवू इच्छितो:
रूथ विधवा होती, एस्थेर परदेशी स्त्री होती, पेत्र कोळी होता, थोमा संशयी होता, सारा असहनशील होती, मोशेने खून केला होता, योना परमेश्वरापासून दूर पळाला होता, पौल खुणी होता, अब्राहम वयस्कर होता, आणि मरिया कुमारी होती. सर्वांजवळ काही ना काही निमित्त होते. आज परमेश्वर आपणा प्रत्येकाची त्याची
सुवार्ता पसरविण्यासाठी पाचारण करीत आहे, त्याच्या योजनेला होकार देण्यास आपण तयार
आहोत का? असा प्रश्न आपण प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. कारण वर दिलेल्या
उदाहरणांद्वारे आपल्या लक्षात येईल की, परमेश्वराच्या योजना आपल्या आकलना पलीकडे असतात. त्या
आपल्याला बहुतेक वेळी समजत नाही. अशा वेळी, ह्या सर्व व्यक्तीप्रमाणे व विशेषता: मरीये व योसेफ प्रमाणे विश्वासाने
देवाच्या योजने होकार देणे गरजेचे असते.
३) वैवाहिक जीवनात मरिया व योसेफचा आदर्श.
तिसरी गोष्ट म्हणजे योसेफ व मरिया आपणासमोर वैवाहिक जीवनाचा आदर्श ठेवत
आहेत. ज्याप्रमाणे मरिया व
योसेफने परमेश्वराच्या इच्छेस
त्यांच्या जीवनात प्राधान्य दिले. त्यांनी एकमेकाला मरेपर्यंत साथ दिली, व एक
सुखी, शांततामय व प्रार्थनामय कुटुंब घडवून आणले. त्याचप्रमाणे देवळाच्या
आज्ञेत राहून प्रत्येक पती पत्नीने एक आदर्श कुटुंब घडविण्याचा प्रयत्न करण्यास
आजची उपासना आपणास पाचारण करत आहे.
अनेक वेळा जेव्हा कुटुंबात संसयाचे, अशांततेचे, निराशेचे
प्रसंग उद्भवतात; तेव्हा परमेश्वराच्या
योजनेस प्राधान्य देण्यास, त्याच्या योजनेची
ओळख करण्यास, पवित्र
कुटुंबं आपणासमोर आदर्श ठेवत
आहे.
शेवटी देव हा प्रभू येशूच्या रूपाने आपल्यामध्ये हजर आहे. ज्याने युगाच्या समाप्तीपर्यंत प्रत्येक दिवस आपल्यासोबत राहण्याचे अभिवचन दिलेले आहे. (मत्तय २८:२०) तर त्या ख्रिस्तावरील आपली श्रद्धा दृढ होण्यासाठी आणि योग्य रीतीने त्या परमेश्वराच्या आगमनास आपण तयार असण्यासाठी परमेश्वराची कृपा मागुया.
विश्वासू लोकांच्या प्रार्थना:
प्रतिसाद: ‘हे प्रभू तुझ्या स्वागतासाठी आम्हास सज्ज बनव.’
१.
आपले पोप फ्रान्सिस, सर्व कार्डीनल्स, बिशप्स, धर्मगुरु
आणि सर्व व्रतस्थ ह्यांना प्रभूचा विपुल आशीर्वाद मिळावा व त्यांनी देवाच्या
वचनाप्रमाणे जीवन जगून जगाला ख्रिस्ताचा शुभसंदेश द्यावा म्हणून आपण प्रार्थना
करूया.
२.
लवकरच आपण ख्रिस्त जयंती साजरी करणार आहोत. म्हणून आपण सर्वांनी योग्यरित्या मनाची
व अंतःकरणाची आध्यात्मिक तयारी करावी आणि ख्रिस्त आपला तारणारा ह्याला आपल्या
जीवनात स्वीकारावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
३.
नव-विवाहित दांपत्यांमध्ये घटस्फोट घेण्याचे प्रमाण फार वाढत आहे, अशा
देवाविरोधक निर्णयाला परमेश्वराचा स्पर्श व्हावा व त्यांनी पुन्हा एकदा
परमेश्वरामध्ये एक होऊन त्यांच्या जीवनाची नवीन सुरुवात करावी म्हणून आपण
प्रार्थना करूया.
४. ‘पिक
भरपूर आहे परंतू कामकरी थोडेच आहेत’ म्हणून मरीयेचा
आदर्श डोळ्यांसमोर ठेऊन अनेक तरुण तरुणींनी ईश्वराच्या हाकेला प्रतिसाद देऊन
प्रभूमळ्यात सेवा करण्यास स्व-ईच्छेने पुढे
यावे, म्हणून आंपण प्रार्थना करूया.
५.
आपला सर्वांचा देवावरील विश्वास अधिकाधिक बळकट व्हावा व आपण सर्वांनी देवाच्या
वचनाप्रमाणे जीवन जगून ख्रिस्त आपला तारणारा आहे ह्याची साक्ष आपण इतरांना दयावी
म्हणून आपण प्रार्थना करूया.
६.
थोडा वेळ शांत राहून आपल्या कौटुंबिक व वैयक्तिक गरजा प्रभूचरणी मांडूया.
No comments:
Post a Comment