Reflection
for the Homily of Christmas Vigil Mass (25/12/2022) By: Br. Jeoff
Patil
ख्रिस्त जयंती – नाताळ (मध्यरात्रीची मिस्सा)
दिनांक: २५/१२/२०२२
पहिले वाचन: यशया ९:१-६
दुसरे वाचन: तीमतीला पत्र २:११-१४
शुभवर्तमान: लुक २:१-१४
तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे (लुक २:११)
प्रस्तावना:
आज
संपूर्ण पृथ्वी आनंद आणि हर्ष करीत आहे. कारण तिला तिचा तारणारा लाभलेला आहे. संदेष्ट्यानी केलेल्या भविष्यवाणीची पूर्तता आज
झाली आहे. देवाने आपला एकुलता एक पुत्र मानव जातीच्या प्रीती करीता या भूतलावर पाठवून, प्रीतीचा कळस गाठला आहे.
आजच्या
पहिल्या वाचनात आपण ऐकतो की यशया संदेष्टा म्हणतो, “अंधारात व मृत्यु शाळेत चालणाऱ्या लोकांनी दिव्य तारा पाहिला आहे”. दुसऱ्या वाचनात संत पौल येशू ख्रिस्ताविषयी साक्ष लोकांना देत
आहे. ख्रिस्ताप्रमाणे झपाटलेला हा प्रेषित सर्व माणसांना तारण देणारी देवाची कृपा
प्रकट झाली आहे असे सांगत आहे.
पाहुणा आला हो माझ्या दारी, हे गीत गात असताना शुभवर्तामानात देवदूत मेंढपाळा प्रमाणे आपल्यासाठी सांगत आहे की तुमच्यासाठी आज दविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे. तो ख्रिस्ता प्रभु आहे. आज ह्या मिस्साबलीदानात सहभागी होत असताना बाळ येशूने आपल्याला आशीर्वादित करून आपल्या अंतकरणात जन्म घ्यावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
मनन चिंतन:
प्रेम
हा शब्द
फक्त दोन अक्षराचा.
नुसता ऐकला तरी हर्ष होतो आणि उच्चारला तर दोन ओठांमध्ये स्पर्श होतो. प्रभू येशू
ख्रिस्ताचा संदेश हा प्रेमाचा होता. त्याची भाषा प्रेमाची होती आणि म्हणूनच त्याने
संपूर्ण जगाला फक्त प्रेम व शांतीचा संदेश दिला.
आज
आपण नाताळचा सण साजरा करत आहोत. नाताळचा सण हा हौसेचा आणि आनंदाचा सण आहे. आजच्या दिवशी देवाने मानव रूप
घेऊन आपल्याला दाखवून दिले आहे की, देव आपल्यावर प्रेम करत आहे. असे म्हणतात जेव्हा
जेव्हा या पृथ्वीवर
नवीन बाळ जन्माला येते ते आपल्याला देवाच्या प्रेमाची जाणीव करून देते.
संत आगोस्तीन म्हणतात “देव मनुष्य झाला जेणेकरून मनुष्य दैवी होऊ
शकेल”. ख्रिस्त या भूतलावर येण्याचा मुख्य हेतू हाच की पाप्याचें व सर्व मानवजातीचे
तारण व्हावे.
नाताळाच्या
दिवशी आपल्याला दिसून
येते की देव जो सर्व सामर्थ्य आहे तो आपल्या प्रेमा करीता या
गव्हाणीमध्ये जन्म घेतो. ह्या कृतीने तो आपल्याला नम्रतेचा धडा देतो. येशू या गाईच्या गव्हाण्यात जन्माला आला व आपल्याला तो नम्रतेचे जीवन जगण्याचे आव्हान करत आहे.
देव
मनुष्य का झाला आहे?
देव कबूल करतो कि “मी नग्न जन्मला आहे, जेणेकरून तुम्ही स्वतःला कसे बनवायचे
ते शिकू शकाल.
मी गरीब जन्मला आहे, जेणेकरून तुम्ही
मला तुमचे धन म्हणून घेऊ शकता.
मी प्रेमासाठी जन्माला आलो आहे, जेणेकरून
तुम्ही माझं तुमच्यावरील प्रेमावर काही शंका घेऊ नये.
मी रात्री जन्माला आलो, जेणेकरून मी माझ्या प्रकाशाने सर्व
वास्तविकता स्पष्ट करू शकतो.
मी साधेपणात जन्मला आहे, जेणेकरून तुम्ही गुंतागुंतीचे होऊ नये.
मी तुमच्या जीवनात जन्मलो आहे, जेणेकरून तुम्हाला सर्वांना मी
पित्याच्या घरी नेण्यासाठी.
होय
माझ्या प्रिय भाविकांनो या कारणासाठी
आपला देव आपल्याला या नाताळच्या
सणाच्या दिवशी आपल्या सर्वांसाठी जन्मला आहे.
आई तिच्या बाळाला दूध पाजते त्यापेक्षा अधिक पवित्र काही ही घडू
शकत नाही. हा मानवतेचा पहिला ख्रिस्त बलिदान आहे. जो येशूच्या आईने आपल्या मुलांसाठी अर्पण केला
आहे. आपणही या नाताळच्या दिवशी देवाचे प्रेम व त्याची शांती इतरांना द्यावी व
इतरांबरोबर प्रेमाने व शांतीने वागावे असा संदेश आपल्याला देत आहे.
दुर्दैवाने आजच्या आधुनिक जगात असंख्य
लोक आज क्षणिक सुखाच्याकडे जास्त आकर्षित होतात व देवाच्या प्रेमा पासून दूर जात
आहेत. आपल्या मनाची शांती गमावून बसले आहे. आज या नाताळचा सण साजरा करताना आपण देवाच्या प्रेमाचा व शांतीचा संदेश
दुसऱ्या द्यावा व इतरांनी नाताळचा आनंद द्यावा व आपला आनंद द्विगुणीत व्हावा म्हणून आपण प्रार्थना करू या.
विश्वासू लोकांच्या
प्रार्थना
प्रतिसाद : हे प्रभू तुझ्या प्रेमाने आम्हाला भरून टाक.
१. आज आपण पवित्र ख्रिस्त महासभेचे सर्व
ख्रिस्ती बंधू-भगिनी साठी प्रार्थना करूया की जसे बाळ येशू आज शांती व प्रेमाचा संदेश
घेऊन जन्माला आला आहे तसेच आपणही त्याच्या प्रेमाचा
व शांतीचा संदेश जगात पसरावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. आज आपण विशेष करून सर्व राष्ट्रांसाठी
प्रार्थना करूया ज्या राष्ट्रांमध्ये युद्ध व अशांती आहे तेथील सर्व अधिकारी व
पुढारी लोकांनी येशूच्या शांतीचा अनुभव घेऊन सतत शांती साठी झटावे म्हणून आपण
प्रार्थना करूया.
३. आज आपण सर्व कुटुंबांसाठी प्रार्थना करू या
विशेष करून, जे कुटुंब काही कारणास्तव विभक्त झाले आहेत अशा
कुटुंबानी पवित्र कुटुंबाचा आदर्श घेऊन घरात शांतीचे वातावरण निर्माण करावे म्हणून
आपण प्रार्थना करूया.
४. जे कोणी जीवनात निराश आहेत, अशांती
व अंधकारात आहेत त्यांनाही बाळ येशूच्या प्रेमाचा व शांतीचा अनुभव यावा व त्यांचे
जीवन आनंदाने भरावे तसेच त्यांच्या जीवनात बद्दल घडून यावा म्हणून आपण प्रार्थना
करूया.
५. आज आपल्या सर्वाना इथे जमले असताना बाळ येशूच्या प्रेमाचा व शांतीचा अनुभव यावा व आपले जीवन संपन्न व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
No comments:
Post a Comment