Reflection for the Homily of Third Sunday of Advent (11-12-2022) By Br. Trimbak Pardhi.
आगमन
काळातील तिसरा रविवार
दिनांक: ११/१२/२०२२
पहिले वाचन: यशया ३५: १-६,१०
दुसरे वाचन: याकोब ५: ७-१०
शुभवर्तमान: मत्तय ११: २-११
प्रस्तावना:
आज देऊळमाता आगमन काळातील तिसरा रविवार साजरा करीत आहे. आजचा रविवार आपण (Gaudete) गावदेते म्हणजे आनंदाचा रविवार साजरा करीत आहोत. आजची उपासना आपणास सांगत आहे की, जेथे देव आहे ते सौंदर्य आहे, जेथे देव तेथे आनंद आहे. ख्रिस्ताचा आनंद
एका फुलत्या फुलासारखा आहे. ख्रिस्ताचा आनंद एक वाहत्या नदीसारखा आहे आणि त्याकरिता ध्यास धरावयास आज देऊळमाता आपणास बोलावित आहे.
आजच्या पहिल्या वाचनात यशया संदेष्टा वैभवशाली व अलंकारिक भाषा वापरत आहे. यशया संदेष्टा मानतो की, अरण्य, वृक्ष व भूमी ही आनंदित होणार व उल्हासाने भरून
जातील कारण या वाटेने देव येणार आहे. नीराश झालेल्या लोकांना यशया संदेष्टा, येशू ख्रिस्ताच्या जन्माचा व त्यामुळे लोकांना
होणारा आनंदाविषयी वर्णन करीत
आहे. सगळीकडे आनंदी
आनंद पसरेल, अशी आशा निर्माण करीत आहे.
आजच्या दुसऱ्या वाचनात आपणाला संत पौल धीर धरावयास सांगत आहे. याकोब शेतकर्याचे उदाहरण देत आहे. तो म्हणतो की शेतकरी ज्याप्रमाणे आपल्या पिकाची उत्सुकतेने वाट पाहतो तसेच आपण धीराने प्रभूच्या येण्याची वाट पाहिली पाहिजे. कारण खरा आनंद फक्त प्रभू आपणास देऊ शकतो. हा आनंद फक्त जे लोक त्याच्यावर पूर्ण अंतकरणाने स्वीकारता त्यांना मिळतो. आजच्या शुभवर्तमानातही ख्रिस्ताचा मार्ग तयार करण्यासाठी आलेला योहान बाप्तीष्ट हा येशूविषयी आनंदाची बातमी देतो. याविषयी त्याच्या मनात खूपच गोंधळ उडाला होता. येशू हाच खरा मसीहा आहे याची योहानाला खात्री करुन घ्यायची होती. आज आपण त्या ख्रिस्ताच्या जन्माच्या आनंदाची वाट पाहत आहोत. जसे नवीन कपडे किवा नवीन गोष्टी घरात आल्यावर आपल्याला आनंद होतो अगदी तसाच आनंद ख्रिस्ताच्या जन्माने आपणास होणार आहे.
बोध कथा:
एका छोट्याशा गावात 10
ते 12 वर्षाचा मुलगा होता.
लहानपणापासून तो देवाचा प्रेमात होता त्याला नेहमी देवाचा आनंद घ्यायचा होता. एके
दिवशी तो एका गुरुकडे जाऊन म्हणाला की, देवाचा आनंद मिळवण्यासाठी मी काय करावे? गुरुने काही न बोलता त्या मुलाच्या हातात एक चमची दिली. त्या चमचीमध्ये पाणी घातले.
ती चमची त्याला तोंडात पकडण्यास सांगितले. त्यास त्या चमची सोबत पूर्ण राजवाडा
बघून येण्यास सांगितले.
परंतु अट अशी होती कि त्या चाम्चीत्ला पाणी पडता कामा नये. तो मुलगा चमची तोंडामध्ये घेऊन राजवाड्यात गेला. राजवाड्यात गेल्याबरोबर त्याला खूप फुलांची झाडे दिसली. राजवाड्यातील छायाचित्रे त्याला खूप आवडली. राजवाड्याची सुंदरता पाहून
तो गुंग झाला. तो पूर्णपणे विसरून गेला कि, त्याच्या तोंडामध्ये
चमची आहे. चाम्चीतल्या पाण्याकडे त्याचे
दुर्लक्ष झाले आणि ते पाण्याचे थेंब कुठे पडले ते
त्याला ठाऊक झाले नाही.
पूर्ण राजवाडा फिरून परत गुरूकडे जायला निघाला, तेव्हा अचानक त्याचे लक्ष चाम्चीतील पाण्याकडे गेले. ते पाण्याचे थेंब त्याच्यात नव्हते. तो तसाच गुरुकडे गेला. गुरुने बघितले की चाम्चीत पाणी नाही. गुरुने मुलाला विचारले चमच्यातील पाण्याचे थेंब
कुठे आहेत? तेव्हा मुलाने
उत्तर दिले की, मला माहित नाही ते कुठे पडले.
तेव्हा गुरुने मुलाला सांगितले की, जेव्हा आपल्याला देवाचा आनंद पाहिजे असेल तर आपण पूर्णपणे देवाच्या आज्ञेत, देवाच्या प्रेमात असावे. देवाला विसरता कामा नये.
तेव्हाच आपल्याला देवाचा आनंद मिळू शकतो.
जगाचा आनंद क्षणभंगुर आहे. परंतु देवाचा आनंद सदासर्वकाळ आपल्या बरोबर आहे.
मनन चिंतन:
जीवन हे एक तीन
पानांचं पुस्तक आहे. पहिलं पान आणि शेवटचं पान देवाने दिलेलं असतं. मधलं पान मात्र आपल्याला लिहावे लागते. पहिलं पान म्हणजे जन्म आणि शेवटचे पान
म्हणजे मृत्यु आणि मधलं पान म्हणजे आपले जीवन होय. या मधल्या पानावर काय लिहावे, कोणते अनुभव लिहावेत किंवा कोणते चित्र काढावे ही प्रत्येकाच्या
जीवनावर अवलंबून असते.
कारण जीवन म्हणजे सुख-दुःखाची विनलेली एक माळ आहे. जीवनात
योग्य ती निवड करणे आपणावर अवलंबून असते. ख्रिस्ताद्वारे मिळणारा चिरकाळ आनंद स्वीकारावा की
जगद्वारे मिळणारा आनंद स्वीकारावा हे प्रत्येकाच्या
मनावर अवलंबून असते.
दैनंदिन जीवन जगत असताना परिपूर्ण आनंद अनुभवणे खूप कठीण असते. जी लोकं ख्रिस्ताच्या जवळ
असतात किंव ख्रिस्ताचा जवळून अनुभव घेतात,
त्यांनाच हा आनंद मिळत असतो. जीवनामध्ये कितीही दुखे संकटे आली तरीही आपण खचून न जाता त्याचा सामना केला तरच, आपणाला आनंद मिळू शकतो. बोधकथेमध्ये
सांगितल्याप्रमाणे आपण जर ख्रिस्ताला विसरून जगाच्या आनंदाला होकार दिला तर आपण ख्रिस्त जन्माचा आनंद घेऊ
शकत नाही. प्रत्येक मनुष्य मध्यपान व धन-दौलत या गोष्टीत गोंधळून गेला आहे. ज्या गोष्टीकडून आनंद मिळेल त्याच्याकडे धाव घेत आहे.
आजच्या तिन्ही वाचनात आपल्याला देवाच्या आनंद विषयी सांगत आहे. यशया संदेष्टा म्हणतो अरण्य, वृक्ष व भूमी आनंदित होणार व उल्हासाने भरून जाणार कारण, या वाटेने देव येणार आहे. याकोब म्हणतो शेतकरी जसा पावसाची वाट पाहतो त्याचप्रमाणे
आपणसुद्धा प्रभूच्या येण्याची उत्सुकतेने व धीराने वाट पाहिली पाहिजे.
आजच्या
शुभवर्तमानातही योहान बाप्तीष्टा हा येशूविषयी
आनंदाची बातमी देतो कारण, त्याने येशू ख्रिस्त जी कृत्ये करीत होता
त्याविषयी ऐकले होते. त्याची कृत्य पाहून तो मासिया आहे हे त्याला स्पष्ट दिसत होते.
तर माझ्या प्रिय भाविकांनी आजच्या उपासनेद्वारे आपणास कळून येते की, खऱ्या आनंदाची गुरुकिल्ली
फक्त ख्रिस्तामध्येच आहे. दुसरी सर्व कार्ये फक्त क्षणभराचा आनंद देतात. हा आनंद आज अनेक संताना मिळालेला आहे. आज आपण त्या संतांचा सन्मान करत आहोत. उदाहरणार्थ संत मदर
तेरेसा यांनी लोकांची सेवा केली, लोकांच्या
अंगावरच्या जखमा आपल्या हातांनी साफ केल्या कारण तिला त्याच्यामध्ये ख्रिस्त दिसत होता. त्यांची सेवा करून तिला आनंद मिळत होता. दुसरे उदाहरण द्यायचा झाले तर संत फ्रांसिस अस्सिसीकर त्यांनी कुष्ठरोग्यांची सेवा केली कारण त्यामध्ये त्याला आनंद मिळत होता.
म्हणून असे म्हटले
जाते की जरी आपल्याकडे काहीही नसले तरी देव आपल्याला
पुरेसा आहे. सुख हे फक्त महालातच असते असे नाही तर सुख हे झोपडीतही असते. प्रभू येशू ख्रिस्त आपल्या प्रत्येकाच्या
हृदयात वस्ती करीत असतो देव आपल्या मानव जातीवर प्रेम करीत असतो.
आज प्रत्येकजण या देवाच्या दर्शनासाठी आतुरलेला आहे व्याकूळलेला आहे. परमेश्वर हा आपल्या प्रत्येकाच्या जीवनात येत आहे. ज्याप्रमाणे तो मरीया व अलीशिबा ह्यांच्या जीवनात आला त्याचप्रमाणे तो आपल्या आयुष्याच्या प्रत्येक क्षणात मानवी रूपात तो येत असतो. त्यामुळे आपल्याला मनाची तयारी करणे खूप गरजेचे आहे.
विश्वासू लोकांच्या
प्रार्थना
प्रतिसाद: हे प्रभू दया कर आणि तुझ्या लोकांची प्रार्थना
ऐक.
१.आपले पोप महाशय, बिशप्स, धर्मगुरू व सर्व व्रत्स्त ह्यांना परमेश्वराने चांगले आरोग्य द्यावे व त्यांनी
परमेश्वराच्या राज्याचा अनुभव लोकांना द्यावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
२.आपल्या पॅरिश मधील जे लोक परमेश्वराच्या
वचनावर, त्याने केलेल्या महान कृत्यावर विश्वास ठेवत नाहीत आणि अन्य देवावर विश्वास
ठेवतात व आनंद मानतात अश्या सर्वांना परमेश्वराने आपला गुणकारी स्पर्श करावा व ते
पुन्हा एकदा देवा जवळ वळावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
३.परमेश्वराच्या येण्याची तयारी आपण सर्वांनी
आनंदाने करावी व त्याच्या दर्शनासाठी सज्ज व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
४.पॅरिशमधील जे लोक आजारी आहेत, दुःखात,संकटात, त्रासात आहेत. अशा सर्वांना परमेश्वराने धीर द्यावा आणि त्यांच्या गरजा
पुरवाव्यात. म्हणून आपण प्रार्थना करूया.
५.एक आनंदी, समाधानी, जीवन जगण्यासाठी आज आपणा सर्वांना ख्रिस्त सभा आमंत्रण देत आहे. आपल्या
मधील नैराश्य दूर करून, ख्रिस्तात आपले जीवन आनंदमय
करण्यास विशेष प्रार्थना करूया.
No comments:
Post a Comment