Thursday 4 April 2024

 Reflection for the Homily of Second Sunday Of Easter (07-04-2024) By Br. Reon Andrades.


पुनरुत्थान काळातील दुसरा रविवार



दिनांक: -०४-२०२४

पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये ४:३२-३५

दुसरे वाचन: १ योहान ५:१-६

शुभवर्तमान: योहान २०:१९-३१


प्रस्तावना

आज आपण पुनरुत्थान काळातील दुसरा रविवार साजरा करीत आहोत. आजच्या रविवाराला "दैवी दयेचा" रविवार म्हणून देखील ओळखला जातो. चे  शुभवर्तमान आपणास विश्वास दृढ व बळकट करण्यास आव्हान करीत आहे. त्याच प्रमाणे आजची दोन्ही वाचने आपणास देवाच्या प्रेमाची साक्ष देत आहे. आपण देवावर प्रेम करावे कारण त्याने आपणावर पहिले प्रेम केले आहे व आपणास त्याच्या मृत्यू‌द्वारे देवार्ची मुळे बनवीली आहेत. देवाची मुले त्या नात्यानी आपणही एकामेकांवर प्रेम करणे व त्यांची काळजी घेणे हे आपले  परम कर्तव्य आहे. आपणही देवावर विश्वास ठेवावा आणि  देवावर व इतरांवर प्रेम करावे म्हणून ह्या मिसाबलिदानामध्ये प्रार्थना करूया.

मनन चिंतन

आपण पुनरूत्थान  काळातील दुसरा रविवार म्हणजेच "दैवी दयेचा" रविवार साजरा करत आहोत. येशुच्या मरणावर मनन चिंतन करत अस्ताना मला एक विचार सहजरित्या येतो की जर की येशु ख्रिस्ता प्रमाणे मला धिक्काराला सामोरे जावे लागले असते तर, त्या सर्वाकडे जाऊन जाब विचारत मी विचारला असता. परंतु येशुने तसे न करता, तो त्याच्या शिष्यांना दर्शन देऊन म्हणतो "शालोम" तुम्हास शांती असो- हया शब्दांनी जणु काहि येशु बिघडलेले नाते सबंध पुनरस्थापित नुतनीकरण केले आहे - तो त्यांच्यावती दया दाखवून क्षमेची भावना आपणा सर्वामध्ये प्रस्थापित आहे. येशु जे काही झाले त्यासाठी दोषाआरोप कुणावर करत नाही किंबहूना दयेने, क्षमेने त्यांना एकत्र आणत आहे व बक्षीस म्हणून त्यांना क्षमेचा आत्मा भेट देत आहे.

आजच्या दोन्ही वाचनामध्ये आपण पाहतो की देवाने आपणास त्याची मुले बनवली आहेत या नात्याने आपण एकामेकार प्रेम केले पाहिजे, त्यांच्या  मदतीस आपण धावून गेलो पाहिले देवाने त्या प्रेमापोटी आपणाला क्षमादान दिली आहे,

तोच देव त्याच्या सर्व मुलांमध्ये सहवास करत असतो, म्हणून आपण सर्वजण एकमेकांवर दया दाखवावी व दयेची कृत्ये आपणाकडून व्हावी अशी परमेश्वराची इच्छा आहे. आपण एक दुसऱ्यांबरोबर प्रेमाने व युतीने राहावे हे आजच्या पहिल्या व दुसऱ्या वाचनामध्ये दर्शवीले आहे.

शुभवर्तमानात आपण संत थोमा हया विषयी ऐकतो . हया थॉमसच्या अनुभवातून आपणास काही शिकायला मिळते.

१)विश्वास वाढण्यासाठी आव्हानाची गरज असते.

ज्या प्रमाणे लहान बाळ पडल्या नंतरच चालायला शिकते, धावायला शिकते, उड्या मारायला शिकते. याच प्रमाणे आपल्या श्रद्धेची वाढ होण्यासाठी अशा अनेक आव्हानांची आपणास गरज भासते जेवेकरून आपण अगदी बिकट परीस्थीतीन देवावरती आपला विश्वास कायम ठेऊ शकू.

२)आपली नास्तिक्यबुद्धी (Skepticism) आपला विश्वास बळकट करण्यास वापरणे.

ज्या प्रकारे संत थॉमस आपली संशयी बुद्धी आपला विश्वास बळकट करण्यास वापरतो त्याच प्रकारे आपणदेखिल असे  नकारात्मक गुण आपल्या आध्यात्मिक वाढीसाठी वापरले पाहिजेत. तो त्या संशयामध्ये राहीले नाही पण त्या संशयद्वारे त्याने त्याचा येशुच्या पुनरुथानावर असलेला विश्वास अगदी बळकट केला. आपणही संशयात न रहाता त्यामधून वरती यावेत हयाचा आपण प्रयत्न केला पाहिजे.

३)विश्वास  इतरांपर्यंत पोहचवणे

जो विश्वास आपण बळकट केला आहे तो विश्वास आपण स्वतःपूर्ती न ठेवता तो इतरांपर्यंत पोहचवणे, अगत्याचे आहे. आपल्या विश्वासाच्या साक्षीने  दुसऱ्यांच्या विश्वासात भर पडावी, म्हणून आपण सतत प्रयत्न केले पाहिजेत

आपण विश्वासात वाढत अस्ताना देवाच्या दयेला विसरता कामा नये कारण हयाच दयेमुळे आपल्याला विश्वासाचे दान मिळाले आहे म्हणून आपण इतरांना दयेने व प्रेमाने पहावे व आपली कृत्ये दयनिय (दयेने भरलेली) असावीत म्हणून आपण प्रार्थना करूया.

 

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: “हे दयावंत प्रभू आम्हाला श्रद्धेचे वरदान दे”

१. ख्रिस्ती श्रद्धेचे विस्तार करणारे आपले पोप, कार्डीनल्स, बिशप्स, धर्मगुरू, धर्मभगिनी ह्यांना सर्वांना पुनरुत्थित ख्रिस्ताचा प्रकाश इतरांना देण्यासाठी कृपा आणि शक्ती लाभावी म्हणून आपण प्रार्थना करू या.

२. थोमाप्रमाणे आपल्या सर्वांच्या मुखातून विश्वासाची घोषणा व्हावी, “माझ्या देवा व माझ्या प्रभो.” आणि त्यांच्याशी विश्वासू राहण्यासाठी कृपा मागूया.

३. आपल्या धर्मग्रामात जे लोक आजारी आहेत, दु:खीत आहेत, अशा सर्वांना परमेश्वराच्या दैवी हृदयाचा अनुभव येवून त्यांना शांती आणि कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करू या.

४. आपण सर्वजण एक कुटुंब व एक ख्रिस्ती समूह आहोत ह्याची भावना आपल्या मनात निर्माण होऊन त्याप्रमाणे वागण्यासाठी पुनरुत्थित ख्रिस्ताची कृपा मागूया.

५. आता आपण थोडावेळ शांत राहून आपल्या कौटुंबिक, वैयक्तिक, व सामाजिक हेतूंसाठी प्रभू कडे प्रार्थना करू या.

No comments:

Post a Comment