Thursday, 10 October 2019


Reflections for the homily for 28th Sunday in Ordinary Time (13-10-2019) by Fr. Wilson D’souza.








सामन्य काळातील अठ्ठावीसावा रविवार 






दिनांक: १३/१०/२०१९
पहिले वाचन:  2 राजे ५: १४-१७
दुसरे वाचन: २ थीमथी २:८-१३
शुभवर्तमान:  लुक १७: ११-१९

प्रस्तावना:

          आजची देवस्तुती आपल्याला देवाचे आभार व उपकार स्तुती करण्यास आमंत्रण देत आहे. देवाने आपल्यावर अनेक गोष्टीत, सुखात-दुःखात, अडी-अडचणीत व समस्यांना सामोरे जात असताना साभांळले आहे.
          आजच्या पहिल्या वाचनात देव संदेष्टा अलिशाद्वारे नामान नावाच्या परराष्ट्रीयाला कृष्ट रोग्यातून मुक्त करतो. दुसऱ्या वाचनात संत पौल अडी-अडचणी, समस्याच्या वेळी  हिमंतीने जीवन जगण्यास आव्हान देत आहे. त्तर आजच्या लुकलिखित शुभवर्तमानात ख्रिस्ताने शोमरोन गावात आपले प्रेषितीय कार्य करत असताना दहा कृष्ट रोग्यांना बरे केले, व त्या दहा जणांपैकी फक्त एकानेच येऊन ख्रिस्ताचे आभार मानले ह्याचे विवेचन केले आहे.
          देवाच्या कृपेचा व आशीर्वादाचा अनुभव आपल्याला आलेला असून सुद्धा अनेक वेळेला आपण देवाचे ऋण फेडले नाही, त्याचे आभार मानले नाहीत. थोडा वेळ शांत राहून देवाने केलेल्या महत्कृताची आठवण करूया व ह्या मिस्साबलीदानात त्याला योग्य तो धन्यवाद देवू या.

सम्यक विवरण

पहिले वाचन: 2 राजे ५: १४-१७

          राजाच्या दुसऱ्या पुस्तकातून आजचे पहिले वाचन निवडण्यात आले आहे. वाचनाचा सारांश म्हणजे देव आपला निवडलेल्या संदेष्टा अलिशाद्वारे नामान नावाच्या परराष्ट्रीयाला कृष्ट रोग्यातून मुक्त करतो. कृष्ट रोग हा सामाजासाठी व प्रत्येक व्यक्तीसाठी देवाचा शाप होता. महारोगातून मुक्त झालेला नामान केवळ देवाची स्तुती-आराधना करत नाही तर उपकार स्तुती म्हणून देवाची सेवा करण्यासाठी शपथ घेतो व दुसऱ्या देवाला न भजण्यास अभिवचन देतो.

दुसरे वाचन:   २ थीमथी २:८-१३

          संत पौल आपल्याला तिमथियीच्या पत्राद्वारे जीवनात अडी-अडचणी, समस्या येतात तेव्हा  हिमंतीने जीवन जगण्यास आव्हान देत आहे. जेव्हा आपण आपले जीवन धीराने सोसतो तेव्हा आपण तारणास प्राप्त ठरत असतो. जीवन धीराने जगण्यासाठी आपल्याला देवाच्या वचनाची, विश्वासाची आणि येशूला स्वीकारण्याची गरज आहे. हे आजच्या दुसऱ्या वाचनात आपणास  ऐकावयास भेटते.

शुभवर्तमान:  लुक १७: ११-१९

          येशूने केवळ शब्दाने नव्हे तर कृतीने आपले राज्य प्रकट केले . तो केवळ इस्रायल लोकांचा तारणारा नसून अखिल मानव जातीचा तारणारा आहे. संत लुक ह्यांनी,  शोमरोन गावात आपले प्रेषितीय कार्य करत असताना त्यांनी दहा कृष्ट रोग्यांना बरे केले ह्याचे विवेचन आहे. पुढे हेच कृष्ट रोगी देवाला धन्यवाद देण्यासाठी विसरले. देवाचा गौरव करण्यास त्यांना वेळ मिळाला नाही अस येशू सांगत आहे.

बोधकथा:

          शरीराच्या कृष्ट रोग्यापेक्षा मनाचा कृष्ट रोग महाघातकी. देवानी केवळ जे शरीराने कृष्ट रोगी होतो त्यांना बरे केले नाही त्यांच्यात असलेल्या मनाचा कृष्टरोग बरा केला. उदाहरण द्यायचे झाले तर संत मार्टिन व संत फ्रान्सिस असिसी.ह्या दोघांनी आपल्या जीवनात कृष्टरोगी पहिले. त्यांना त्रास झाला ते त्याच्यापासून दूर पळाले पण देवानी  त्याच्या वर कृपा केली. कृष्टरोग्याचे त्यांनी चुंबन घेतले आणि त्याच्या मनातला कृष्टरोग देवाने बरा केला.

मनन चिंतन:

            प्रत्येक मनुष्य आपल्या जीवनात देवाचा अनुभव घेत असतो. त्याला किंवा तिला पूर्ण पणे जाणीव असते की देव एक महान शक्ती आहे. तो आपल्या विपरीत वेळेस साह्य आणि आधार देत असतो. मानव जात देवावर केवळ प्रेम करत नसते तर त्याच्या वर विश्वास ठेवत असते.
          मानवी स्वभाव मात्र विचित्र आहे. त्याचा देवाविषयी सर्वकाही जाणून न जाणल्या सारखा करत असतो. कधी कधी त्याला देवाचा विसर पडत असतो. जीवनात दुःखे, अडी-अडचणी आल्या की तो सर्व वैधाकडे धाव घेतो, देव –देवता, वैध, डॉक्टर बघून झाल्यावर आपल्या समस्येवर उतर मिळत नाही तेव्हा तो देवाकडे धावतो.
          देवाचा देव व वैदयाचा वैध प्रेभू-येशू ख्रिस्त ह्याच्याकडे आपण धावून येतो व तो आपल्याला मदत साह्य करत असतो. पहिल्या वाचनात नामान महारोग्याला देवाने अलिशा संदेष्टाद्वारे बरे केले. तो एक व्यक्ती म्हणून देव जाती धर्माच्या पलीकडे जात असतो. देवाच्या महान कृत्याचा अनुभव घेतलेला नामान त्याची पूजा-अर्चना करतो.  त्याची सेवा करण्याची शपथ घेतो.नामनला देवाच्या महत्कार्याचा साक्षात्कार झाला. त्यांनी देवाचे ऋण स्तुती-आराधना करून व देवाची सेवाकरून उपकार फेडले.
          शुभवार्मानात येशू आपलयाला परत आठवण करून देतो की, दहा कृष्टरोगी बरे झाले होते.ते कोणत्या जातीचे, वर्णाचे, धर्माचे होते हे महत्वाचे नाही तर केवळ फक्त एक परराष्ट्रीय देवाचे आभार मानण्यास येतो ह्या गोष्टीवर प्रभूचे ध्यान आहे. देव, येशूद्वारे आपल्या बऱ्यापणासाठी वावरत असतो. त्यांचा चागुंलपण आपण अनुभव घेत असतो व त्याचे आभार , उपकार, ऋण फेडण्यास आपण विसरत असतो. ह्या विचित्र मानवी स्वभावाला प्रभू येशू आठवण करून देतो की दहा जण बरे झाले होते तर मग, नउ कुठे गेले? केवळ एक परतला, अविश्वासू परराष्ट्रीय देवाला धन्यवाद देण्यास आला. इतरांचे काय?
          प्रत्येकाने देवाचे आभार व गौरव केले पाहिजे कारण देवच आपल्या आभारास पात्र आहे. संत पौल म्हणतो की प्रत्येक अनुभवात आपण देवाचे आभार मानले पाहिजे.    

विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद: ‘हे प्रभू आमची प्रार्थना एक’

१) आपले परमगुरुस्वामी फ्रान्सिसमहागुरू, धर्मगुरू, धर्मबंधू व धर्मभगिनी आणि प्रापंचिक ह्यांना प्रभूने चांगले आरोग्य व आयुष्य द्यावे. तसेच त्यांचा विश्वास दृढ व्हावा आणि पूर्ण श्रद्धेने त्यांनी देवाचे कार्य करत रहावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
२)   जे लोक आजारी, दुःखी व संकटात आहेत अश्या सर्वांना देवाचा स्पर्श व्हावा; त्यांच्या इच्छा व आकांशा पूर्ण व्हाव्यात म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
३)  हे प्रेमळ पित्य ख्रिस्ती श्रद्धेमुळे ज्या लोकांवर अन्याय आणि अत्याचार होत आहेत, अश्या लोकांचा विश्वास पक्का ठाम व्हावा व त्यांना ख्रिस्तसभेशी एकनिष्ठ राहण्यासाठी धैर्य व सामर्थ्य लाभावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
४) सर्व भाविकांनी ऋणी कुष्ठरोग्या सारखा, ऋणी व प्रभू येशू वर विश्वास ठेवण्यास कृपा-शक्ती लाभावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
५)  आपण शांतपणे आपल्या कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक हेतूसाठी प्रार्थना करूया.    



Friday, 4 October 2019


Reflections for the homily of 27th Sunday in Ordinary Time (06-10-2019) by Br. Aaron Lobo.



सामान्य काळातील सत्ताविसावा रविवार



दिनांक: १०२०१९
पहिले वाचन: हबक्कुक १:२-३;२:२-४              
दुसरे वाचन:  थीमथी १:६-८,१३-१४
शुभवर्तमान: लूक १७:५-१०

प्रस्तावना:

          ख्रिस्ताठायी माझ्या प्रिय बंधुभगिनींनो आज देऊळमाता सामान्य काळातील सत्ताविसावा रविवार साजरा करीत आहे. आजची उपासना ही आपल्याला विश्वासाच्या रहस्यावर मनन चिंतन करण्यास आमंत्रण देत आहे. विश्वास हा चांगले ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी अत्यंत महत्वाचा  असतो. विश्वास हा शब्द लहान असला व त्याचे शब्दलेखन जरीहि सोपे असले तरीही आपल्या अनुभवातून आपल्याला समजते की  विश्वास अंगी बाळगणे तितकेच कठीण आहे.   
          आजच्या पहिल्या वाचनात संदेष्टा हबाक्कुक म्हणतो की,  देवाची योजना परिपूर्ण होण्यासाठी वेळ लागतो पण नक्कीच पूर्ण होते. आपण फक्त ती वाट पाहायची असते. आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौल आपल्याला आपला विश्वास जतन करायला व त्याच्यात दृढ राहण्यासाठी आग्रह करीत आहे. तर शुभवर्तमानात ख्रिस्त त्याच्या शिष्यास पटवून देतो कि महान कार्य व चमत्कार करण्यास एका मोहरीच्या दाण्याऐवडा विश्वास असणे गरजेचे आहे. 
          आजच्या ह्या मिस्साबालीदानासाठी एकत्र जमलो असताना आपण आपल्या विश्वासात व देवावरील प्रेमात बळकट होऊन देवाची मुले होण्यासाठी पात्र बनावे म्हणून विशेष कृपा मागूया.

सम्यक विवरण:

पहिले वाचन: हबाक्कुक १:२-३;२:२-४

          संदेष्टा हबक्कुक याच्या पुस्ताकातून घेतलेल्या आजच्या पहिल्या वाचनात आपण संदेष्टाला, देवाकडे मदतीची याचना करताना तसेच पापी जणांना, अन्यायकारक  विशेष करून जे नीतिमान व प्रामाणिक लोकांचा छळ करतात व त्यांच्यावर अत्याचार करतात त्यांना शिक्षा देण्याची विनवणी करीत आहे. देव आपल्या संदेष्टाला धीराने वाट पाहायला सांगतो व जाहीर करतो की जरी ही त्याचे न्याय संपन्न होण्यास वेळ होत असेल तरीही ते अपरिहार्य आहे.

दुसरे वाचन:  थीमथी १:६-८,१३-१४

          आजच्या दुसऱ्या वाचनात, संत पौल थीमथीला आपल्या विश्वासात दृढ राहण्यास अथवा आपला विश्वास आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या संदेशाचे पाचारण स्वीकारण्यास प्रोस्ताहान करत आहे. बळकट राहण्यास ज्या प्रेमाची व विश्वासाची आपल्याला गरज आहे, ती आपल्याला आपल्या अंतकरणात वस्ती करणाऱ्या पवित्र आत्म्या कडून प्राप्त होत असते.

शुभवर्तमान: लूक १७:५-१०

          आजच्या शुभवर्तमानात शिष्य येशू जवळ त्यांचा विश्वास वाढण्यास प्रार्थना करतात. येशू त्यांना पटवून देतो कि, महान कार्य करण्यास मोठ्या किवा महान विचारांची गरज नसते तर एका मोहरीच्या दाण्या  ऐवडा विश्वास असणे महत्त्वाचे असते. आपल्या विश्वासाचे समर्थन व त्याचे सौरक्षण हे आपणा प्रत्येकाची ख्रिस्ताचे अनुयायी असलेल्या कारणा निमीत्त, कर्तव्य व जबाबदारी आहे.

मनन चिंतन:

        येशू ख्रिस्ताचे शिष्य त्यास म्हणाले, “प्रभुजी आमचा विश्वास वाढवा!”
          विश्वास ही एक अशी देन आहे जी आपल्या प्रत्येकांस आपल्या जन्मा पासूनच दिलेली असते. एका लहान बाळाला जेव्हा त्याला उंच उडविले जाते तेव्हा ते बाल मुळीच घाबरत नाही, उलट ते आनंदाने हसते कारण त्यास ठाऊक असते की आपले आई-वडील आपल्याला कुड्लीही इजा होऊ देणार नाही.
          प्रिय बंधू-भगिनीनो, आजची तिन्ही वाचणे आपल्या विश्वासा बद्दल सांगत आहेत. आजच्या पहिल्या वाचनात आपल्याला एक असे दृष्य पाहावयास मिळते जे आपल्या प्रात्यक्षिक जीवन स्थिती पेक्षा विपरीत आहे. आपल्यावर अन्यास घडत असताना, देवा समोर रडणे किंवा आरडाओरडा करणे, आपल्यासाठी नवीन गोष्ट नाही आहे. अनेक वेळा आपण देवा कडे तक्रार करीत असतो की या जगात, दृष्ट व भ्रष्टाचाऱ्याना यश व समृद्धी मिळत आहे परंतु नीतिमान व सरळ मार्गावर चालणाऱ्यांना खूप संघर्ष करावा लागतो आणि तरी सुद्धा आपली परिस्थिती अगदी मद गतीने बदलती पाहून ते निराश व हताश होत असतात. दृष्ट व भ्रष्टाचारी लोकांना त्याच्या आकाशाची उंची जरी प्राप्त होत असली तर त्याचा नाश ही त्याच वेगाने होत असतो. आपला देव हा न्यायाचा देवा आहे; तो न्याय करत असतो व तो प्रत्येकाचा त्याच्या कर्मा नुसार न्याय करीत असतो.
          दुसऱ्या विश्व महायुद्धाच्या वेळी घडलेली एक खरी घटना संगितली जाते. एकदा एक ख्रिस्ती शिपाही होता व त्याचा देवावर खूप विश्वास होता. परंतु त्याच्या सैन्यातील इतर शिपाह्यांना देवावर अजिबात विश्वास नव्हता ह्या कारणास्तव ते सतत ह्या शिपाह्याचे हास्य उडवत असत. ऐके दिवशी त्याच्या सहकार्यांनी त्याची गंमत करवयाची ठरविले. सकाळी त्याचा परेड चालू असताना त्याच्या  अधिकार्यांनी त्याला बोलावून मैदानात असलेली घाडी बाहेर नेण्यास सांगितले. शिपाही नम्रतेने त्या अधिकार्याला म्हणाला की त्याला घाडी चालवता येत नाही. त्या अधिकार्याला हे ठाऊक होते तरी सुद्धा आपला आवाज वाढवून ज्या देवावर तुझा एवढा विश्वास आहे त्याचे नाव घेऊन आदेश पाळण्यास सांगितले.
          त्या शिपाह्या कडे दुसरा कुठलाच पर्याय नव्हता तर त्याने हळुवार घाडी चालू केली व मैदाना बाहेर नेली व हे सर्व करताना त्याने फक्त येशूचे नामस्मरण केले. परंतु जेव्हा तो घडीतून बाहेर उतरला त्याला वेगळेच दृष्य पाहावयास मिळाले. जे त्याचे मित्र हसत होते ते अगदी शांत झाले होते. तो अधिकारी सुद्धा सुन्य झाला होता. कोणीही काहीच बोलत नव्हते. इतक्यात तो अधिकारी त्या शिपाह्यास म्हणाला की तूझा देव खरा आहे व तुझा विश्वास ही खूप महान आहे कारण तू जी घाडी चालविली त्यात तर इंजीनच नव्हते.
          होय माझ्या प्रिय बंधू-भगिनीनो आजच्या शुभवर्तमानात येशू हेच आपल्याला सांगत आहे. मोहरीच्या बिया इतका जरी आपला विश्वास असेल तर आपण अशक्य कार्य सुद्धा देखील शक्य होऊ शकते. येशू आपल्या समोर एक सुंदर असे भिन्नताचे चित्र मांडतो. एका वेळेस तो मोहरीच्या दाण्या ऐवडे विश्वासाचे वर्णन करतो तर दुसऱ्या विळेस तो तृतीच्या प्रचंड वृक्ष जे आपल्या जीवनातल्या अडीअडचनींचे चिन्ह आहे त्या बद्दल  सांगतो. जगातील सर्वात लहान अशी ही बी आपल्याला  सर्वात मोठया अडथळयाना आपले शब्द पाळण्यास पुरे आहे असे म्हणतो.
          आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौल, आपण आपला  हा विश्वास कसा जगला पाहिजे, हे विस्तुत करतो. आपला विश्वास आपल्याशीच ठेवावा, हे पुरे नाही तर आपण इतरांना आपल्या शब्दाद्वारे, विचाराद्वारे आणि कृती द्वारे,  साक्ष दिली पाहिजे. आपला विश्वास झोपावा आणि त्याच प्रमाणे त्याचा प्रचार ही करावा.  जे बरोबर आहे त्याच्या वर घट्ट राहणे, वाईट कार्यांना नकार देणे, आपल्याजवळ कमी असूनही गरजवंताना मद्दत करणे, घुसखोरी, भ्रष्टाचार, धूम्रपान, ड्रग्ज या सर्वाना  नकार देणे हे सगळे लहान पण आपल्या विश्वासातील देवाला इतरांना समोर आणण्यासाठी प्रभावी मार्ग आहे.
           एक खरे ख्रिस्ती जीवन जगणे हे सुद्धा त्या तुतीच्या झाडाला मुळा सकट हालवण्यासारखे आहे. इतर लोकांसाठी असे जीवन जगायची पद्धत, एक रहस्यच आहे. ते अजून ही समजू नाही शकत. आजच्या या काळात सुद्धा आपण असे प्रामाणिक जीवन जगणे अशक्य आहे असे त्यांना वाटते परंतु  आपल्याला  याची जाणीव आहे की हे अशक्य नाही, कठीण नक्कीच पण पार पाडण्यासाठी ज्याची गरज आहे ते मात्र एका मोहरीच्या बिया ऐवढा आपल्या प्रभू येशू ख्रिस्तावर आपला विश्वास असणे गरजेचे आहे. 

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: हे प्रभू आमचा विश्वास वाढव.

१. ख्रिस्तसभेचे धुरा वाहणारे पोप महाशय, सर्व बिशप्स, धर्मगुरू व व्रतस्थ बंधू व भगिनी जे ख्रिस्ताच्या मळ्यात कार्य करतात त्यांचा विश्वास बळकट व्हावा व त्यांनी इतरांचा विश्वास बळकट करावा म्हणून प्रार्थना करूया.
२. कुटुंब हे विश्वासाचे जडण घडण करणारे ठीकाण आहे. प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीने विश्वास वाढवण्याची जबाबदारी पार पाडावी म्हणून प्रभूकडे प्रार्थना करूया.
३. आपल्या धर्माग्रामातील जी कुटुंबे विश्वासात डळमळले आहेत व चर्चला येत नाही अशा कुटुंबावर परमेश्वराचा पवित्र आत्मा यावा व त्यांच्या विश्वासात वाढ व्हावी म्हणून प्रभूकडे प्रार्थना करूया.
४. आपल्या ध्रामाग्रामातील जे लोक आजारी, दुःखी व कष्टी आहेत त्यांना प्रभूचा गुणकारी स्पर्श मिळावा म्हणून प्रभूकडे प्रार्थना करूया.
५. आपण शांतपणे आपल्या सामाजिक व व्यैयक्तिक हेतूसाठी प्रार्थना करूया.









Wednesday, 2 October 2019


Reflection for the Homily of Feast of St. Francis of Assisi (04-10-2019) By Br Brijal Lopes.







असिसिकर संत फ्रान्सीसचा  सोहळा





दिनांक: ४ /१० /२०१९
पहिले वाचन: बेनसिरा ५०: १,३-४,६-७
दुसरे वाचन: गलतीकारास पत्र -६:१४-१८ 
शुभवर्तमान: मत्तय ११:२५-३०

प्रस्तावना:

          आजची उपासना आपल्याला देवा विषयी आस्था व देवाच्या अधिक समीप येण्यासाठी पाचारण करीत आहे. त्याच बरोबर असिसीकर संत फ्रान्सीस ह्याचा सोहळा साजरा करीत आहे.
          ख्रिस्ताच्या पाउलांवर पाउल ठेऊन व ख्रिस्ताचे अनुकरण करून त्याने संपूर्ण जगाला देवाच्या प्रेमाची साक्ष व जगाला ख्रिस्ताकडे आणण्याचे कार्य केले. आजच्या पहिल्या वाचनात ओनियसचा पुत्र सिमोन ह्याने आपल्या काळात संपूर्ण मंदिराची दुरुस्ती करून  तटबंदी केली व आपल्या प्रजेचे संपूर्ण रक्षणाची जबाबदारी घेतली. आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौल आपणास वधस्तंभाचे महत्व व त्याचे ख्रिस्ती जीवनाशी असलेले अतूट नाते आपल्या समोर प्रकट करीत आहे. आजच्या शुभवर्तमानात येशू ख्रिस्त कष्टी व भाराक्रांत झालेल्या लोकांना विश्रांतीचा अनुभव घेण्यासाठी बोलावीत आहे.
          ख्रिस्ताद्वारे आपण सुद्धा देवाची आपुलकी व शांती, कष्टी व भाराक्रांत  लोकांच्या जीवनात पसरावीत म्हणून  ह्या मिस्साबलिदानात विशेष प्रार्थना करूया.

सम्यक विवरण:

 पहिले वाचन: बेनसिरा ५०: १,३-४,६-७

          पहिले वाचन हे बेनसीरा ह्या पुस्तकातून घेतलेले आहे. बेनसीराचा पुत्र सिमोन ह्यानी लोकांच्या उपासनेसाठी व आध्यात्मिकतेसाठी मंदिराचे चांगले बांधकाम करून उत्तम प्रकारे ते मंदिर सजवले त्याच्या  चांगल्या व्यक्तिमत्वाचे दर्शन आपणास घडते अश्याप्रकारे ओनियसचा पुत्र सिमोन ह्याने आपल्या काळात संपूर्ण मंदिराची दुरुस्ती करून  तटबंदी केली व आपल्या प्रजेच्या  संपूर्ण रक्षणाची जबाबदारी घेतली.

दुसरे वाचन: गलतीकारास पत्र -६:१४-१८ 

          यहुदी शिक्षक तारणासाठी यहुदी होण्यास गरज शिकवत होते व यहुदी होण्यासाठी सुंता करूनघेण्यास सांगत होते.आध्यात्मिकतेपेक्षा बाहेरील गोष्टीवर त्यांचे फार लक्ष होते. बाह्य गोष्टीवर लक्ष देऊन प्रसिद्धी मिळविण्यास ते पाहत होते.  परंतु संत पौल मात्र आपणास वधस्तंभाचे महत्व व त्याचे ख्रिस्ती जीवनाशी असलेले अतूट नाते आपल्या समोर प्रकट करीत आहे. वधस्तंभ हा जणू ख्रिस्ती जीवानाचे एक अशी आशा आहे कि, ज्या द्वारे आपण जगाला ख्रिस्ताचा प्रकाश देतो हे जणू काही संत पौल आपणासमोर व्यक्त करत आहे.

शुभवर्तमान: मत्तय ११:२५-३०

          आजच्या शुभवर्तमानात येशू ख्रिस्ताने परमेश्वराचे आभार मानून त्याची स्तुती केलेली आहे कारण त्याने देवाचे कार्य व त्याची योजना हि बालकांस प्रगट केली आहे. बालाकांप्रमाने निरागस जीवनप्राप्तीद्वारे आपण देवाकडे आले पाहिजे. लोकांचा नम्रपणा व त्यांची ख्रिस्तावरील असलेली श्रध्दा ह्यावरून ख्रिस्त आपल्या पित्याचे स्तवन करीत आहे. प्रेमाच्या व सत्याच्या प्रकाशात आल्यावर देवाचा अनुभव येतो हे ख्रिस्त आपणास सांगत आहे.  तसेच ख्रिस्ताने कष्टी व भाराक्रांत झालेल्या लोकांना विश्रांतीचा अनुभव घेण्यासाठी बोलावीत आहे.

मनन चिंतन:

          एक अरेबियन व्यक्ती वाळवंटा मधून प्रवास करताना आपला मार्ग पूर्णपणे विसरून गेला व अनोळखी अशा जागेवर तो आला त्या ठिकाणी दुसरे कोणीही नोव्ह्ते. तो तो त्याठिकाणी एकटाच होता, श्वास घेण्यापलीकडे त्याच्याकडे जीवनासाठी लागणारे आवश्यक वस्तू नोव्ह्त्या. तो भरपूर भुकेला होता परंतु खायला काहीही नोव्ह्ते व पिण्यासाठी पाणी नोव्ह्ते. अशा परीस्थितीत तो आपला अंतिम श्वास घेण्यापर्यंत येऊन ठेपला होता. पिण्यासाठी पाणी आणि खाण्यासाठी खाऊ नसल्याने त्याचा जीव कासाविस झाला होता. अशा अवस्थेत त्याची नजर एका कपड्याने आच्छादलेल्या वस्तूवर पडली. तो कसाबसा त्या जागेवरून उठला आणि त्या कपड्याने  आच्छादलेल्या  वस्तू जवळ पोहचला. त्याने ती वस्तू उघडली व पाहिले तर त्यात बॅग होती. त्याला वाटले कि, त्या बॅगेत काहीतरी असेल त्या आशेने त्याने ती बॅग उघडली व त्याला त्यात हिरे व दागिने आढळून आले. 
          ख्रीस्ताठायी माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, आजचे युग हे अशांत, थकलेले व उदासिन आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी, समस्या आणि संकटे हे माणसाला उदासीन करत आहेत. शांती सुख समाधान मिळविण्यासाठी आपण आध्यात्मिक लोकांची भेट घेतो व त्यांच्याशी ह्या समस्या सोडविण्याबाबत संवाद करतो. परंतु आजच्या शुभवर्तमान आपणास ह्या प्रश्नांचे  व अडी-अडचणीचे उत्तर देत आहे. ख्रिस्त म्हणतो कि, “अहो कष्टी आणि भाराक्रांती जनहो तुम्ही मज कडे या म्हणजे मी तुम्हांला विसावा देईन. ह्या वाक्याद्वारे जणू काही ख्रिस्त आपणास त्याकडे येण्यासाठी आमंत्रित करीत आहे. त्याच्या लीनतेद्वारे व सौम्य हृदयाद्वारे आपणास आध्यात्मिक शक्ती देत आहे.
          आज ख्रिस्तसभा आपणासमोर एका महान संताचा आदर्श ठेवत आहे.ते महान संत म्हणजे असीसीकर संत फ्रान्सीस. असिसीकर संत फ्रान्सीस ह्यांचा जन्म ११८२ साली इटली देशातील असिसी या शहरात झाला, श्रीमंत  घराण्यामध्ये त्यांनी जीवन जगले. जगी श्रीमंतीमध्ये त्यांचे मन रमले होते. सेनापती होण्याचे त्याचे स्वप्न होते. परंतु परमेश्वराच्या योजना मात्र  मानवाच्या योजनेपेक्षा निराळ्या असतात. संत दमीयानोच्या कृसाजवळ प्रार्थना करत असताना त्याला ईश्वरी वाणी ऐकू आली ती म्हणजे ‘मोडकळीस आलेले माझे चर्च दुरुस्त कर.’ खर तर चर्चमध्ये असलेले  वाईट मार्ग, भ्रष्ट्राचार ह्यामुळे चर्च मोडकळीस आले होते. पंरतु ईश्वारवाणीने फ्रान्सिसचे परिवर्तीत झाला व हे   वाक्य जीवनात गिरवले व प्रभूच्या मळ्यात त्यांनी स्वतःला झोकून घेतले. विटा मातीच्या बांधकामाची गरज नव्हती तर दुरावलेल्या ख्रिस्ती जणांना एकत्र आणून ख्रिस्ताचे अनुकरण करून व त्यांचे कार्य अविरत चालू ठेवून त्यांनी चर्च दुरुस्तीचे कार्य चालू केले. परमेश्वराचे कार्य व त्याचे प्रेम त्यांनी कृष्ठरोग्यांना दिले. त्यांची मनापासून सेवा केली. परमेश्वराची दया, प्रेम, शांती व त्याची आपुलकी हि त्यांनी सर्व जगाला त्यांच्या जीवनाद्वारे दिली. ख्रिस्ताशी एकरूप होऊन तो दुसरा ख्रिस्त बनला. गरिबामध्ये व कृष्ठरोग्यात त्यांनी ख्रिस्ताला पाहिले व त्याद्वारे त्यांनी त्यांची सेवा केली. निसर्ग व मानव ह्याला निर्माता म्हणजे ख्रिस्त पर्यावरनाच्या ह्या बंधू-भगिनीच्या नात्याद्वारे त्यांनी जगाला एक मोठा संदेश दिला.
          ख्रिस्तसभा ह्या महान संताचा सोहळा साजरा करीत असताना त्या परमेश्वराची प्रतिमा व त्याची दया, प्रेम व शांती ही आपणाला इतरांमध्ये दिसावी व त्याद्वारे ख्रिस्त आपणाला इतरांना देता यावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
          ख्रिस्ताच्या आमंत्रणाद्वाते आपण त्याच्याकडे काही मार्गाने जाऊ शकतो.
१)    त्याच्या पवित्र वचनाद्वारे त्याचे वचन हे शाश्वत जीवन आहेव त्याचे शब्द जो कोणी ऐकूण  त्याला अनुसरतो तो अंधारांत चालणार नाही. ख्रिस्ताचे शब्द आपल्याला खरा मार्ग दाखवतात. 
२)    संस्कारद्वारे पवित्र ख्रिस्तशरीर व कुमसाराद्वारे आपण ख्रिस्ताकडे जाऊ शकतो. ज्यात ख्रिस्त स्वतः उपस्थित असतो व त्याला कृपेने व आशीर्वादाने तप आपली पाठराखण कारीत असतो.
३)    पवित्र ख्रिस्तशरीराद्वारे: ख्रिस्त शरीर हे ख्रिस्ती जीवनाचे उगमस्थान आहे. या प्रार्थनेत आपल्याला पापांची क्षमा मिळवून ख्रिस्ताची एकरूप होण्यास मदत होते.
अशा प्रकारे ख्रिस्तसभा आपणास नवजीवन जगण्यासाठी प्रेरित करीत असते. ख्रिस्ताच्या आज्ञेत राहून व त्याच्याकडे नित्यनेमाने केलेल्या प्रार्थनेत तो आपल्याला नवीन आशा दाखवीत असतो.

विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद:  ‘ऐक प्रार्थना प्रभू देवा’

१)    ख्रिस्तसभेचा कारभार पाहणारे पोप, कार्डीनल्स, बिशप्स, धर्मगुरू- धर्मभगिनी व व्रतस्त लोकांना पवित्र आत्म्याची प्रेरणा मिळावी व ख्रिस्तासारखे जीवना जगून त्यांनी जगाला ख्रिस्ताकडे आणावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
२)    सर्व फ्रान्सिसकन बंधू भगिनींनी देवाच्या कार्यासाठी व त्याच्या गौरवासाठी अविरत झटत राहावे, असिसीकर संत फ्रान्सिसद्वारे त्यांनी जगाला प्रेमाचा, शांतीचा व बंधुत्वाचा संदेश द्यावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
३)    पर्यावारण व मानव ह्यात नात अतूट आहे परंतु स्वार्थासाठी पर्यावरणाची ऱ्हास होत आहे. ह्या पर्यावरणाची जोपासना करण्यासाठी व तिचे रक्षण करण्यासाठी अधिकाधिक लोकांनी व नेत्यांनी पुढाकार घ्यावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
४)    जे लोक आजारी आहेत थकलेले, उदासीन आहेत अशाना परमेश्वराने सत्कार्य लाभावे व पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने ते लवकरात लवकर बरे व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
५)    शेतकरी व मासेमारी बंधू-भांगिनीसाठी त्यांच्या ह्या काळात परमेश्वराने रक्षण करावे व त्यांना त्याच्या कामात भरपूर यश मिळावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
६)    थोडा वेळ शांत राहून आपल्या व्यक्तिक गरजासाठी प्रार्थना करूया.