Thursday, 10 October 2019


Reflections for the homily for 28th Sunday in Ordinary Time (13-10-2019) by Fr. Wilson D’souza.








सामन्य काळातील अठ्ठावीसावा रविवार 






दिनांक: १३/१०/२०१९
पहिले वाचन:  2 राजे ५: १४-१७
दुसरे वाचन: २ थीमथी २:८-१३
शुभवर्तमान:  लुक १७: ११-१९

प्रस्तावना:

          आजची देवस्तुती आपल्याला देवाचे आभार व उपकार स्तुती करण्यास आमंत्रण देत आहे. देवाने आपल्यावर अनेक गोष्टीत, सुखात-दुःखात, अडी-अडचणीत व समस्यांना सामोरे जात असताना साभांळले आहे.
          आजच्या पहिल्या वाचनात देव संदेष्टा अलिशाद्वारे नामान नावाच्या परराष्ट्रीयाला कृष्ट रोग्यातून मुक्त करतो. दुसऱ्या वाचनात संत पौल अडी-अडचणी, समस्याच्या वेळी  हिमंतीने जीवन जगण्यास आव्हान देत आहे. त्तर आजच्या लुकलिखित शुभवर्तमानात ख्रिस्ताने शोमरोन गावात आपले प्रेषितीय कार्य करत असताना दहा कृष्ट रोग्यांना बरे केले, व त्या दहा जणांपैकी फक्त एकानेच येऊन ख्रिस्ताचे आभार मानले ह्याचे विवेचन केले आहे.
          देवाच्या कृपेचा व आशीर्वादाचा अनुभव आपल्याला आलेला असून सुद्धा अनेक वेळेला आपण देवाचे ऋण फेडले नाही, त्याचे आभार मानले नाहीत. थोडा वेळ शांत राहून देवाने केलेल्या महत्कृताची आठवण करूया व ह्या मिस्साबलीदानात त्याला योग्य तो धन्यवाद देवू या.

सम्यक विवरण

पहिले वाचन: 2 राजे ५: १४-१७

          राजाच्या दुसऱ्या पुस्तकातून आजचे पहिले वाचन निवडण्यात आले आहे. वाचनाचा सारांश म्हणजे देव आपला निवडलेल्या संदेष्टा अलिशाद्वारे नामान नावाच्या परराष्ट्रीयाला कृष्ट रोग्यातून मुक्त करतो. कृष्ट रोग हा सामाजासाठी व प्रत्येक व्यक्तीसाठी देवाचा शाप होता. महारोगातून मुक्त झालेला नामान केवळ देवाची स्तुती-आराधना करत नाही तर उपकार स्तुती म्हणून देवाची सेवा करण्यासाठी शपथ घेतो व दुसऱ्या देवाला न भजण्यास अभिवचन देतो.

दुसरे वाचन:   २ थीमथी २:८-१३

          संत पौल आपल्याला तिमथियीच्या पत्राद्वारे जीवनात अडी-अडचणी, समस्या येतात तेव्हा  हिमंतीने जीवन जगण्यास आव्हान देत आहे. जेव्हा आपण आपले जीवन धीराने सोसतो तेव्हा आपण तारणास प्राप्त ठरत असतो. जीवन धीराने जगण्यासाठी आपल्याला देवाच्या वचनाची, विश्वासाची आणि येशूला स्वीकारण्याची गरज आहे. हे आजच्या दुसऱ्या वाचनात आपणास  ऐकावयास भेटते.

शुभवर्तमान:  लुक १७: ११-१९

          येशूने केवळ शब्दाने नव्हे तर कृतीने आपले राज्य प्रकट केले . तो केवळ इस्रायल लोकांचा तारणारा नसून अखिल मानव जातीचा तारणारा आहे. संत लुक ह्यांनी,  शोमरोन गावात आपले प्रेषितीय कार्य करत असताना त्यांनी दहा कृष्ट रोग्यांना बरे केले ह्याचे विवेचन आहे. पुढे हेच कृष्ट रोगी देवाला धन्यवाद देण्यासाठी विसरले. देवाचा गौरव करण्यास त्यांना वेळ मिळाला नाही अस येशू सांगत आहे.

बोधकथा:

          शरीराच्या कृष्ट रोग्यापेक्षा मनाचा कृष्ट रोग महाघातकी. देवानी केवळ जे शरीराने कृष्ट रोगी होतो त्यांना बरे केले नाही त्यांच्यात असलेल्या मनाचा कृष्टरोग बरा केला. उदाहरण द्यायचे झाले तर संत मार्टिन व संत फ्रान्सिस असिसी.ह्या दोघांनी आपल्या जीवनात कृष्टरोगी पहिले. त्यांना त्रास झाला ते त्याच्यापासून दूर पळाले पण देवानी  त्याच्या वर कृपा केली. कृष्टरोग्याचे त्यांनी चुंबन घेतले आणि त्याच्या मनातला कृष्टरोग देवाने बरा केला.

मनन चिंतन:

            प्रत्येक मनुष्य आपल्या जीवनात देवाचा अनुभव घेत असतो. त्याला किंवा तिला पूर्ण पणे जाणीव असते की देव एक महान शक्ती आहे. तो आपल्या विपरीत वेळेस साह्य आणि आधार देत असतो. मानव जात देवावर केवळ प्रेम करत नसते तर त्याच्या वर विश्वास ठेवत असते.
          मानवी स्वभाव मात्र विचित्र आहे. त्याचा देवाविषयी सर्वकाही जाणून न जाणल्या सारखा करत असतो. कधी कधी त्याला देवाचा विसर पडत असतो. जीवनात दुःखे, अडी-अडचणी आल्या की तो सर्व वैधाकडे धाव घेतो, देव –देवता, वैध, डॉक्टर बघून झाल्यावर आपल्या समस्येवर उतर मिळत नाही तेव्हा तो देवाकडे धावतो.
          देवाचा देव व वैदयाचा वैध प्रेभू-येशू ख्रिस्त ह्याच्याकडे आपण धावून येतो व तो आपल्याला मदत साह्य करत असतो. पहिल्या वाचनात नामान महारोग्याला देवाने अलिशा संदेष्टाद्वारे बरे केले. तो एक व्यक्ती म्हणून देव जाती धर्माच्या पलीकडे जात असतो. देवाच्या महान कृत्याचा अनुभव घेतलेला नामान त्याची पूजा-अर्चना करतो.  त्याची सेवा करण्याची शपथ घेतो.नामनला देवाच्या महत्कार्याचा साक्षात्कार झाला. त्यांनी देवाचे ऋण स्तुती-आराधना करून व देवाची सेवाकरून उपकार फेडले.
          शुभवार्मानात येशू आपलयाला परत आठवण करून देतो की, दहा कृष्टरोगी बरे झाले होते.ते कोणत्या जातीचे, वर्णाचे, धर्माचे होते हे महत्वाचे नाही तर केवळ फक्त एक परराष्ट्रीय देवाचे आभार मानण्यास येतो ह्या गोष्टीवर प्रभूचे ध्यान आहे. देव, येशूद्वारे आपल्या बऱ्यापणासाठी वावरत असतो. त्यांचा चागुंलपण आपण अनुभव घेत असतो व त्याचे आभार , उपकार, ऋण फेडण्यास आपण विसरत असतो. ह्या विचित्र मानवी स्वभावाला प्रभू येशू आठवण करून देतो की दहा जण बरे झाले होते तर मग, नउ कुठे गेले? केवळ एक परतला, अविश्वासू परराष्ट्रीय देवाला धन्यवाद देण्यास आला. इतरांचे काय?
          प्रत्येकाने देवाचे आभार व गौरव केले पाहिजे कारण देवच आपल्या आभारास पात्र आहे. संत पौल म्हणतो की प्रत्येक अनुभवात आपण देवाचे आभार मानले पाहिजे.    

विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद: ‘हे प्रभू आमची प्रार्थना एक’

१) आपले परमगुरुस्वामी फ्रान्सिसमहागुरू, धर्मगुरू, धर्मबंधू व धर्मभगिनी आणि प्रापंचिक ह्यांना प्रभूने चांगले आरोग्य व आयुष्य द्यावे. तसेच त्यांचा विश्वास दृढ व्हावा आणि पूर्ण श्रद्धेने त्यांनी देवाचे कार्य करत रहावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
२)   जे लोक आजारी, दुःखी व संकटात आहेत अश्या सर्वांना देवाचा स्पर्श व्हावा; त्यांच्या इच्छा व आकांशा पूर्ण व्हाव्यात म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
३)  हे प्रेमळ पित्य ख्रिस्ती श्रद्धेमुळे ज्या लोकांवर अन्याय आणि अत्याचार होत आहेत, अश्या लोकांचा विश्वास पक्का ठाम व्हावा व त्यांना ख्रिस्तसभेशी एकनिष्ठ राहण्यासाठी धैर्य व सामर्थ्य लाभावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
४) सर्व भाविकांनी ऋणी कुष्ठरोग्या सारखा, ऋणी व प्रभू येशू वर विश्वास ठेवण्यास कृपा-शक्ती लाभावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया.
५)  आपण शांतपणे आपल्या कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक हेतूसाठी प्रार्थना करूया.    



No comments:

Post a Comment