Reflection for the Homily of Feast of St.
Francis of Assisi (04-10-2019) By Br Brijal Lopes.
असिसिकर संत फ्रान्सीसचा सोहळा
दिनांक: ४ /१० /२०१९
पहिले वाचन: बेनसिरा
५०: १,३-४,६-७
दुसरे वाचन: गलतीकारास
पत्र -६:१४-१८
शुभवर्तमान: मत्तय
११:२५-३०
प्रस्तावना:
आजची
उपासना आपल्याला देवा विषयी आस्था व देवाच्या अधिक समीप येण्यासाठी पाचारण करीत
आहे. त्याच बरोबर असिसीकर संत फ्रान्सीस ह्याचा सोहळा साजरा करीत आहे.
ख्रिस्ताच्या
पाउलांवर पाउल ठेऊन व ख्रिस्ताचे अनुकरण करून त्याने संपूर्ण जगाला देवाच्या
प्रेमाची साक्ष व जगाला ख्रिस्ताकडे आणण्याचे कार्य केले. आजच्या पहिल्या वाचनात
ओनियसचा पुत्र सिमोन ह्याने आपल्या काळात संपूर्ण मंदिराची दुरुस्ती करून तटबंदी केली व आपल्या प्रजेचे संपूर्ण रक्षणाची
जबाबदारी घेतली. आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौल आपणास वधस्तंभाचे महत्व व त्याचे
ख्रिस्ती जीवनाशी असलेले अतूट नाते आपल्या समोर प्रकट करीत आहे. आजच्या
शुभवर्तमानात येशू ख्रिस्त कष्टी व भाराक्रांत झालेल्या लोकांना विश्रांतीचा अनुभव
घेण्यासाठी बोलावीत आहे.
ख्रिस्ताद्वारे
आपण सुद्धा देवाची आपुलकी व शांती, कष्टी व भाराक्रांत लोकांच्या जीवनात पसरावीत म्हणून ह्या मिस्साबलिदानात विशेष प्रार्थना करूया.
सम्यक विवरण:
पहिले वाचन: बेनसिरा ५०: १,३-४,६-७
पहिले
वाचन हे बेनसीरा ह्या पुस्तकातून घेतलेले आहे. बेनसीराचा पुत्र सिमोन ह्यानी
लोकांच्या उपासनेसाठी व आध्यात्मिकतेसाठी मंदिराचे चांगले बांधकाम करून उत्तम
प्रकारे ते मंदिर सजवले त्याच्या चांगल्या
व्यक्तिमत्वाचे दर्शन आपणास घडते अश्याप्रकारे ओनियसचा पुत्र सिमोन ह्याने आपल्या
काळात संपूर्ण मंदिराची दुरुस्ती करून
तटबंदी केली व आपल्या प्रजेच्या संपूर्ण रक्षणाची जबाबदारी घेतली.
दुसरे वाचन: गलतीकारास
पत्र -६:१४-१८
यहुदी
शिक्षक तारणासाठी यहुदी होण्यास गरज शिकवत होते व यहुदी होण्यासाठी सुंता
करूनघेण्यास सांगत होते.आध्यात्मिकतेपेक्षा बाहेरील गोष्टीवर त्यांचे फार लक्ष
होते. बाह्य गोष्टीवर लक्ष देऊन प्रसिद्धी मिळविण्यास ते पाहत होते. परंतु संत पौल मात्र आपणास वधस्तंभाचे महत्व व
त्याचे ख्रिस्ती जीवनाशी असलेले अतूट नाते आपल्या समोर प्रकट करीत आहे. वधस्तंभ हा
जणू ख्रिस्ती जीवानाचे एक अशी आशा आहे कि, ज्या द्वारे आपण जगाला ख्रिस्ताचा
प्रकाश देतो हे जणू काही संत पौल आपणासमोर व्यक्त करत आहे.
शुभवर्तमान: मत्तय
११:२५-३०
आजच्या
शुभवर्तमानात येशू ख्रिस्ताने परमेश्वराचे आभार मानून त्याची स्तुती केलेली आहे
कारण त्याने देवाचे कार्य व त्याची योजना हि बालकांस प्रगट केली आहे. बालाकांप्रमाने
निरागस जीवनप्राप्तीद्वारे आपण देवाकडे आले पाहिजे. लोकांचा नम्रपणा व त्यांची
ख्रिस्तावरील असलेली श्रध्दा ह्यावरून ख्रिस्त आपल्या पित्याचे स्तवन करीत आहे.
प्रेमाच्या व सत्याच्या प्रकाशात आल्यावर देवाचा अनुभव येतो हे ख्रिस्त आपणास
सांगत आहे. तसेच ख्रिस्ताने कष्टी व
भाराक्रांत झालेल्या लोकांना विश्रांतीचा अनुभव घेण्यासाठी बोलावीत आहे.
मनन चिंतन:
एक
अरेबियन व्यक्ती वाळवंटा मधून प्रवास करताना आपला मार्ग पूर्णपणे विसरून गेला व
अनोळखी अशा जागेवर तो आला त्या ठिकाणी दुसरे कोणीही नोव्ह्ते. तो तो त्याठिकाणी
एकटाच होता, श्वास घेण्यापलीकडे त्याच्याकडे जीवनासाठी लागणारे आवश्यक वस्तू
नोव्ह्त्या. तो भरपूर भुकेला होता परंतु खायला काहीही नोव्ह्ते व पिण्यासाठी पाणी
नोव्ह्ते. अशा परीस्थितीत तो आपला अंतिम श्वास घेण्यापर्यंत येऊन ठेपला होता. पिण्यासाठी
पाणी आणि खाण्यासाठी खाऊ नसल्याने त्याचा जीव कासाविस झाला होता. अशा अवस्थेत
त्याची नजर एका कपड्याने आच्छादलेल्या वस्तूवर पडली. तो कसाबसा त्या जागेवरून उठला
आणि त्या कपड्याने आच्छादलेल्या वस्तू जवळ पोहचला. त्याने ती वस्तू उघडली व
पाहिले तर त्यात बॅग होती. त्याला वाटले कि, त्या बॅगेत काहीतरी असेल त्या आशेने
त्याने ती बॅग उघडली व त्याला त्यात हिरे व दागिने आढळून आले.
ख्रीस्ताठायी
माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, आजचे युग हे अशांत, थकलेले व उदासिन आहे. वेगवेगळ्या
प्रकारच्या अडचणी, समस्या आणि संकटे हे माणसाला उदासीन करत आहेत. शांती सुख समाधान
मिळविण्यासाठी आपण आध्यात्मिक लोकांची भेट घेतो व त्यांच्याशी ह्या समस्या
सोडविण्याबाबत संवाद करतो. परंतु आजच्या शुभवर्तमान आपणास ह्या प्रश्नांचे व अडी-अडचणीचे उत्तर देत आहे. ख्रिस्त म्हणतो
कि, “अहो कष्टी आणि भाराक्रांती जनहो तुम्ही मज कडे या म्हणजे मी तुम्हांला विसावा
देईन. ह्या वाक्याद्वारे जणू काही ख्रिस्त आपणास त्याकडे येण्यासाठी आमंत्रित करीत
आहे. त्याच्या लीनतेद्वारे व सौम्य हृदयाद्वारे आपणास आध्यात्मिक शक्ती देत आहे.
आज ख्रिस्तसभा
आपणासमोर एका महान संताचा आदर्श ठेवत आहे.ते महान संत म्हणजे असीसीकर संत
फ्रान्सीस. असिसीकर संत फ्रान्सीस ह्यांचा जन्म ११८२ साली इटली देशातील असिसी या
शहरात झाला, श्रीमंत घराण्यामध्ये
त्यांनी जीवन जगले. जगी श्रीमंतीमध्ये त्यांचे मन रमले होते. सेनापती होण्याचे
त्याचे स्वप्न होते. परंतु परमेश्वराच्या योजना मात्र मानवाच्या योजनेपेक्षा निराळ्या असतात. संत दमीयानोच्या
कृसाजवळ प्रार्थना करत असताना त्याला ईश्वरी वाणी ऐकू आली ती म्हणजे ‘मोडकळीस
आलेले माझे चर्च दुरुस्त कर.’ खर तर चर्चमध्ये असलेले वाईट मार्ग, भ्रष्ट्राचार ह्यामुळे चर्च
मोडकळीस आले होते. पंरतु ईश्वारवाणीने फ्रान्सिसचे परिवर्तीत झाला व हे वाक्य जीवनात
गिरवले व प्रभूच्या मळ्यात त्यांनी स्वतःला झोकून घेतले. विटा मातीच्या बांधकामाची
गरज नव्हती तर दुरावलेल्या ख्रिस्ती जणांना एकत्र आणून ख्रिस्ताचे अनुकरण करून व
त्यांचे कार्य अविरत चालू ठेवून त्यांनी चर्च दुरुस्तीचे कार्य चालू केले.
परमेश्वराचे कार्य व त्याचे प्रेम त्यांनी कृष्ठरोग्यांना दिले. त्यांची मनापासून
सेवा केली. परमेश्वराची दया, प्रेम, शांती व त्याची आपुलकी हि त्यांनी सर्व जगाला
त्यांच्या जीवनाद्वारे दिली. ख्रिस्ताशी एकरूप होऊन तो दुसरा ख्रिस्त बनला.
गरिबामध्ये व कृष्ठरोग्यात त्यांनी ख्रिस्ताला पाहिले व त्याद्वारे त्यांनी
त्यांची सेवा केली. निसर्ग व मानव ह्याला निर्माता म्हणजे ख्रिस्त पर्यावरनाच्या
ह्या बंधू-भगिनीच्या नात्याद्वारे त्यांनी जगाला एक मोठा संदेश दिला.
ख्रिस्तसभा ह्या महान संताचा सोहळा
साजरा करीत असताना त्या परमेश्वराची प्रतिमा व त्याची दया, प्रेम व शांती ही
आपणाला इतरांमध्ये दिसावी व त्याद्वारे ख्रिस्त आपणाला इतरांना देता यावा म्हणून
आपण प्रार्थना करूया.
ख्रिस्ताच्या आमंत्रणाद्वाते आपण
त्याच्याकडे काही मार्गाने जाऊ शकतो.
१) त्याच्या
पवित्र वचनाद्वारे त्याचे वचन हे शाश्वत जीवन आहेव त्याचे शब्द जो कोणी ऐकूण त्याला अनुसरतो तो अंधारांत चालणार नाही.
ख्रिस्ताचे शब्द आपल्याला खरा मार्ग दाखवतात.
२) संस्कारद्वारे
पवित्र ख्रिस्तशरीर व कुमसाराद्वारे आपण ख्रिस्ताकडे जाऊ शकतो. ज्यात ख्रिस्त
स्वतः उपस्थित असतो व त्याला कृपेने व आशीर्वादाने तप आपली पाठराखण कारीत असतो.
३) पवित्र
ख्रिस्तशरीराद्वारे: ख्रिस्त शरीर हे ख्रिस्ती जीवनाचे उगमस्थान आहे. या
प्रार्थनेत आपल्याला पापांची क्षमा मिळवून ख्रिस्ताची एकरूप होण्यास मदत होते.
अशा प्रकारे ख्रिस्तसभा
आपणास नवजीवन जगण्यासाठी प्रेरित करीत असते. ख्रिस्ताच्या आज्ञेत राहून व
त्याच्याकडे नित्यनेमाने केलेल्या प्रार्थनेत तो आपल्याला नवीन आशा दाखवीत असतो.
विश्वासू लोकांच्या प्रार्थना
प्रतिसाद: ‘ऐक प्रार्थना प्रभू
देवा’
१)
ख्रिस्तसभेचा कारभार पाहणारे
पोप, कार्डीनल्स, बिशप्स, धर्मगुरू- धर्मभगिनी व व्रतस्त लोकांना पवित्र आत्म्याची
प्रेरणा मिळावी व ख्रिस्तासारखे जीवना जगून त्यांनी जगाला ख्रिस्ताकडे आणावे
म्हणून आपण प्रार्थना करूया.
२)
सर्व फ्रान्सिसकन बंधू
भगिनींनी देवाच्या कार्यासाठी व त्याच्या गौरवासाठी अविरत झटत राहावे, असिसीकर संत
फ्रान्सिसद्वारे त्यांनी जगाला प्रेमाचा, शांतीचा व बंधुत्वाचा संदेश द्यावा
म्हणून आपण प्रार्थना करूया.
३)
पर्यावारण व मानव ह्यात नात
अतूट आहे परंतु स्वार्थासाठी पर्यावरणाची ऱ्हास होत आहे. ह्या पर्यावरणाची जोपासना
करण्यासाठी व तिचे रक्षण करण्यासाठी अधिकाधिक लोकांनी व नेत्यांनी पुढाकार घ्यावा
म्हणून आपण प्रार्थना करूया.
४)
जे लोक आजारी आहेत थकलेले,
उदासीन आहेत अशाना परमेश्वराने सत्कार्य लाभावे व पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने ते
लवकरात लवकर बरे व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
५)
शेतकरी व मासेमारी
बंधू-भांगिनीसाठी त्यांच्या ह्या काळात परमेश्वराने रक्षण करावे व त्यांना
त्याच्या कामात भरपूर यश मिळावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
६)
थोडा वेळ शांत राहून आपल्या
व्यक्तिक गरजासाठी प्रार्थना करूया.
nice sermon br.
ReplyDelete