Friday 4 October 2019


Reflections for the homily of 27th Sunday in Ordinary Time (06-10-2019) by Br. Aaron Lobo.



सामान्य काळातील सत्ताविसावा रविवार



दिनांक: १०२०१९
पहिले वाचन: हबक्कुक १:२-३;२:२-४              
दुसरे वाचन:  थीमथी १:६-८,१३-१४
शुभवर्तमान: लूक १७:५-१०

प्रस्तावना:

          ख्रिस्ताठायी माझ्या प्रिय बंधुभगिनींनो आज देऊळमाता सामान्य काळातील सत्ताविसावा रविवार साजरा करीत आहे. आजची उपासना ही आपल्याला विश्वासाच्या रहस्यावर मनन चिंतन करण्यास आमंत्रण देत आहे. विश्वास हा चांगले ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी अत्यंत महत्वाचा  असतो. विश्वास हा शब्द लहान असला व त्याचे शब्दलेखन जरीहि सोपे असले तरीही आपल्या अनुभवातून आपल्याला समजते की  विश्वास अंगी बाळगणे तितकेच कठीण आहे.   
          आजच्या पहिल्या वाचनात संदेष्टा हबाक्कुक म्हणतो की,  देवाची योजना परिपूर्ण होण्यासाठी वेळ लागतो पण नक्कीच पूर्ण होते. आपण फक्त ती वाट पाहायची असते. आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौल आपल्याला आपला विश्वास जतन करायला व त्याच्यात दृढ राहण्यासाठी आग्रह करीत आहे. तर शुभवर्तमानात ख्रिस्त त्याच्या शिष्यास पटवून देतो कि महान कार्य व चमत्कार करण्यास एका मोहरीच्या दाण्याऐवडा विश्वास असणे गरजेचे आहे. 
          आजच्या ह्या मिस्साबालीदानासाठी एकत्र जमलो असताना आपण आपल्या विश्वासात व देवावरील प्रेमात बळकट होऊन देवाची मुले होण्यासाठी पात्र बनावे म्हणून विशेष कृपा मागूया.

सम्यक विवरण:

पहिले वाचन: हबाक्कुक १:२-३;२:२-४

          संदेष्टा हबक्कुक याच्या पुस्ताकातून घेतलेल्या आजच्या पहिल्या वाचनात आपण संदेष्टाला, देवाकडे मदतीची याचना करताना तसेच पापी जणांना, अन्यायकारक  विशेष करून जे नीतिमान व प्रामाणिक लोकांचा छळ करतात व त्यांच्यावर अत्याचार करतात त्यांना शिक्षा देण्याची विनवणी करीत आहे. देव आपल्या संदेष्टाला धीराने वाट पाहायला सांगतो व जाहीर करतो की जरी ही त्याचे न्याय संपन्न होण्यास वेळ होत असेल तरीही ते अपरिहार्य आहे.

दुसरे वाचन:  थीमथी १:६-८,१३-१४

          आजच्या दुसऱ्या वाचनात, संत पौल थीमथीला आपल्या विश्वासात दृढ राहण्यास अथवा आपला विश्वास आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या संदेशाचे पाचारण स्वीकारण्यास प्रोस्ताहान करत आहे. बळकट राहण्यास ज्या प्रेमाची व विश्वासाची आपल्याला गरज आहे, ती आपल्याला आपल्या अंतकरणात वस्ती करणाऱ्या पवित्र आत्म्या कडून प्राप्त होत असते.

शुभवर्तमान: लूक १७:५-१०

          आजच्या शुभवर्तमानात शिष्य येशू जवळ त्यांचा विश्वास वाढण्यास प्रार्थना करतात. येशू त्यांना पटवून देतो कि, महान कार्य करण्यास मोठ्या किवा महान विचारांची गरज नसते तर एका मोहरीच्या दाण्या  ऐवडा विश्वास असणे महत्त्वाचे असते. आपल्या विश्वासाचे समर्थन व त्याचे सौरक्षण हे आपणा प्रत्येकाची ख्रिस्ताचे अनुयायी असलेल्या कारणा निमीत्त, कर्तव्य व जबाबदारी आहे.

मनन चिंतन:

        येशू ख्रिस्ताचे शिष्य त्यास म्हणाले, “प्रभुजी आमचा विश्वास वाढवा!”
          विश्वास ही एक अशी देन आहे जी आपल्या प्रत्येकांस आपल्या जन्मा पासूनच दिलेली असते. एका लहान बाळाला जेव्हा त्याला उंच उडविले जाते तेव्हा ते बाल मुळीच घाबरत नाही, उलट ते आनंदाने हसते कारण त्यास ठाऊक असते की आपले आई-वडील आपल्याला कुड्लीही इजा होऊ देणार नाही.
          प्रिय बंधू-भगिनीनो, आजची तिन्ही वाचणे आपल्या विश्वासा बद्दल सांगत आहेत. आजच्या पहिल्या वाचनात आपल्याला एक असे दृष्य पाहावयास मिळते जे आपल्या प्रात्यक्षिक जीवन स्थिती पेक्षा विपरीत आहे. आपल्यावर अन्यास घडत असताना, देवा समोर रडणे किंवा आरडाओरडा करणे, आपल्यासाठी नवीन गोष्ट नाही आहे. अनेक वेळा आपण देवा कडे तक्रार करीत असतो की या जगात, दृष्ट व भ्रष्टाचाऱ्याना यश व समृद्धी मिळत आहे परंतु नीतिमान व सरळ मार्गावर चालणाऱ्यांना खूप संघर्ष करावा लागतो आणि तरी सुद्धा आपली परिस्थिती अगदी मद गतीने बदलती पाहून ते निराश व हताश होत असतात. दृष्ट व भ्रष्टाचारी लोकांना त्याच्या आकाशाची उंची जरी प्राप्त होत असली तर त्याचा नाश ही त्याच वेगाने होत असतो. आपला देव हा न्यायाचा देवा आहे; तो न्याय करत असतो व तो प्रत्येकाचा त्याच्या कर्मा नुसार न्याय करीत असतो.
          दुसऱ्या विश्व महायुद्धाच्या वेळी घडलेली एक खरी घटना संगितली जाते. एकदा एक ख्रिस्ती शिपाही होता व त्याचा देवावर खूप विश्वास होता. परंतु त्याच्या सैन्यातील इतर शिपाह्यांना देवावर अजिबात विश्वास नव्हता ह्या कारणास्तव ते सतत ह्या शिपाह्याचे हास्य उडवत असत. ऐके दिवशी त्याच्या सहकार्यांनी त्याची गंमत करवयाची ठरविले. सकाळी त्याचा परेड चालू असताना त्याच्या  अधिकार्यांनी त्याला बोलावून मैदानात असलेली घाडी बाहेर नेण्यास सांगितले. शिपाही नम्रतेने त्या अधिकार्याला म्हणाला की त्याला घाडी चालवता येत नाही. त्या अधिकार्याला हे ठाऊक होते तरी सुद्धा आपला आवाज वाढवून ज्या देवावर तुझा एवढा विश्वास आहे त्याचे नाव घेऊन आदेश पाळण्यास सांगितले.
          त्या शिपाह्या कडे दुसरा कुठलाच पर्याय नव्हता तर त्याने हळुवार घाडी चालू केली व मैदाना बाहेर नेली व हे सर्व करताना त्याने फक्त येशूचे नामस्मरण केले. परंतु जेव्हा तो घडीतून बाहेर उतरला त्याला वेगळेच दृष्य पाहावयास मिळाले. जे त्याचे मित्र हसत होते ते अगदी शांत झाले होते. तो अधिकारी सुद्धा सुन्य झाला होता. कोणीही काहीच बोलत नव्हते. इतक्यात तो अधिकारी त्या शिपाह्यास म्हणाला की तूझा देव खरा आहे व तुझा विश्वास ही खूप महान आहे कारण तू जी घाडी चालविली त्यात तर इंजीनच नव्हते.
          होय माझ्या प्रिय बंधू-भगिनीनो आजच्या शुभवर्तमानात येशू हेच आपल्याला सांगत आहे. मोहरीच्या बिया इतका जरी आपला विश्वास असेल तर आपण अशक्य कार्य सुद्धा देखील शक्य होऊ शकते. येशू आपल्या समोर एक सुंदर असे भिन्नताचे चित्र मांडतो. एका वेळेस तो मोहरीच्या दाण्या ऐवडे विश्वासाचे वर्णन करतो तर दुसऱ्या विळेस तो तृतीच्या प्रचंड वृक्ष जे आपल्या जीवनातल्या अडीअडचनींचे चिन्ह आहे त्या बद्दल  सांगतो. जगातील सर्वात लहान अशी ही बी आपल्याला  सर्वात मोठया अडथळयाना आपले शब्द पाळण्यास पुरे आहे असे म्हणतो.
          आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौल, आपण आपला  हा विश्वास कसा जगला पाहिजे, हे विस्तुत करतो. आपला विश्वास आपल्याशीच ठेवावा, हे पुरे नाही तर आपण इतरांना आपल्या शब्दाद्वारे, विचाराद्वारे आणि कृती द्वारे,  साक्ष दिली पाहिजे. आपला विश्वास झोपावा आणि त्याच प्रमाणे त्याचा प्रचार ही करावा.  जे बरोबर आहे त्याच्या वर घट्ट राहणे, वाईट कार्यांना नकार देणे, आपल्याजवळ कमी असूनही गरजवंताना मद्दत करणे, घुसखोरी, भ्रष्टाचार, धूम्रपान, ड्रग्ज या सर्वाना  नकार देणे हे सगळे लहान पण आपल्या विश्वासातील देवाला इतरांना समोर आणण्यासाठी प्रभावी मार्ग आहे.
           एक खरे ख्रिस्ती जीवन जगणे हे सुद्धा त्या तुतीच्या झाडाला मुळा सकट हालवण्यासारखे आहे. इतर लोकांसाठी असे जीवन जगायची पद्धत, एक रहस्यच आहे. ते अजून ही समजू नाही शकत. आजच्या या काळात सुद्धा आपण असे प्रामाणिक जीवन जगणे अशक्य आहे असे त्यांना वाटते परंतु  आपल्याला  याची जाणीव आहे की हे अशक्य नाही, कठीण नक्कीच पण पार पाडण्यासाठी ज्याची गरज आहे ते मात्र एका मोहरीच्या बिया ऐवढा आपल्या प्रभू येशू ख्रिस्तावर आपला विश्वास असणे गरजेचे आहे. 

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: हे प्रभू आमचा विश्वास वाढव.

१. ख्रिस्तसभेचे धुरा वाहणारे पोप महाशय, सर्व बिशप्स, धर्मगुरू व व्रतस्थ बंधू व भगिनी जे ख्रिस्ताच्या मळ्यात कार्य करतात त्यांचा विश्वास बळकट व्हावा व त्यांनी इतरांचा विश्वास बळकट करावा म्हणून प्रार्थना करूया.
२. कुटुंब हे विश्वासाचे जडण घडण करणारे ठीकाण आहे. प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीने विश्वास वाढवण्याची जबाबदारी पार पाडावी म्हणून प्रभूकडे प्रार्थना करूया.
३. आपल्या धर्माग्रामातील जी कुटुंबे विश्वासात डळमळले आहेत व चर्चला येत नाही अशा कुटुंबावर परमेश्वराचा पवित्र आत्मा यावा व त्यांच्या विश्वासात वाढ व्हावी म्हणून प्रभूकडे प्रार्थना करूया.
४. आपल्या ध्रामाग्रामातील जे लोक आजारी, दुःखी व कष्टी आहेत त्यांना प्रभूचा गुणकारी स्पर्श मिळावा म्हणून प्रभूकडे प्रार्थना करूया.
५. आपण शांतपणे आपल्या सामाजिक व व्यैयक्तिक हेतूसाठी प्रार्थना करूया.









No comments:

Post a Comment