Thursday 30 June 2022

Reflection for the 
 14th Sunday in Ordinary Time (03/07/2022) by Br. Suhas Farel 





सामन्य काळातील चौदावा रविवार




दिनांक – ०३ /० ७/२०२२ 
पहिले वाचन  यशया ६६:१०-१४
दुसरे वाचन - गळतीकारस पत्र ६:१४-१८
शुभवर्तमान लुक १०:१-१२, १७-२०

प्रस्तावना:

    ख्रिस्ताठायी जमलेल्या माझ्या प्रिय बंधू - भगिनींनो आज सामान्य काळातील चौदावा रविवार साजरा करीत असताना देऊळमाता आपणाला मिशन कार्यावर मनन चिंतन करण्यास बोलावत आहे.

     आपल्या मिशन कार्यामध्ये  आपन नेहमी आनंदी व उत्साहित असलो पाहिजेत. त्यासाठी आपणाला लागणारी कृपा व शक्ती परमेश्वर नेहमी देत असतो हेच आपण पहिल्या वाचनाद्वारे ऐकणार आहोत.

दुसरया वाचनामधे संत पौल आपणास परमेश्वरावर अढळ विश्वास ठेवण्यासाठी प्रवृत्त करत आहे. ज्याद्वारे आपणास शांती व सनातन द्या प्राप्त होते.तसेच आजच्या शुभवर्तमानाद्वारे आपन येशूच्या ७२ शिष्यांनविषयी त्याच्या मिशन कार्याविषयी ऐकणार आहोत.आपणा सर्वानाही देऊळमातेद्वारे देवाची सुवार्ता पसरविण्याचे मिशन सोपविले गेले आहे. आपले हे मिशन आपन चांगल्या प्रकारे बजावण्यासाठी लागणारी कृपा व शक्ती आपना सर्वाना लाभावी, म्हणून या मिस्साबलीमध्ये विशेष प्रार्थना करूया.

 

मनन चिंतन:

     २० व्या शतकापर्यत पूर्वजांचा असा गैरसमज होता कि मिशन आणि चर्च हे दोन्ही एक समान आहे. परतू काळांतराणे त्यांच्या लक्षात आले कि मिशन आणि चर्च हे समान नसून ते विभिन्न आहेत. मिशन हे स्वर्गीय पित्याने प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे या जगाला दिले आहे. येशू ख्रिस्तानी चचर्ची स्थापना केली जेनेकरून देवाचे मिशनकार्य हे चर्चद्वारे जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये पसरविले जाऊ शकते. याचा अर्थ असा कि चर्च हे मिशन कार्य पसरवण्याची महत्वाची भूमिका पार पाडत असते.

आपण सर्वजण चर्चचा अविभाज्य घटक आहोत. त्यामुळे मिशन कार्य हे आपल्या प्रतेकाची जबाबदारी आहे. आजच्या शुभवर्तमानामध्ये आपन वाचतो कि पिक भरपूर आहे परंतु कामगार खूप थोडे आहेत.आज चर्चची अवस्था जणू ह्या वाक्याप्रमाणे तंतोतत झाली आहे. चर्चचे काम भरपूर आहे परंतु मळ्यामध्ये काम करण्यासाठी येशूच्या हाकेला होकार देण्यासाठी खूप कमी युवक युवती समोर येत आहेत. घरामध्ये असणारा प्रार्थनेचा अभाव, आधुनिक तंत्रज्ञानाचा वाढता  वापर, बदलती जीवनशैली अशा अनेक घटकांमुळे आजची युवा  पिढी हि चर्च पासून दूर जात चालली आहे. युवक हे ख्रिस्तसभेचे मुख्य आधारस्तंभ आहेत. त्यामुळे युवकांना चर्चच्या कामामध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्सांहन देणे हि आपल्या सर्वाची जबाबदारी आहे.

     आज आपल्या धर्मग्रामातील क्रित्येक धर्मगुरू, धर्मभगिनी हि देवाची सुवार्ता पसरविण्यासाठी जगाच्या कानाकोपऱ्यात हालाकीचे जीवन जगत आहेत. कधी कधी त्यांना उपाशी पोटे तर कधी विना विजेने राहावे लागते. कधी  इतरांकडून होणारया अमानुष्य वागणुकीला तर कधी टीका व संकटाना  सामोरे जावे लागते, कधी  कुणाला छळले जाते तर कधी  कुणाचा खून केला जातो  कधी चर्चवर हल्ले केले जातात तर कधी चर्च प्रमुख्यावर खोटे आरोप चढवले जातात. अशा या दयनीय परिस्थितीमध्ये सुद्धा हे धर्मगुरु किवा धर्मभगिनी अतिशय आनंदी  जीवन जगत असतात. त्याच्या चेहऱ्यावर नेहमी स्मित हास्य असते, कारण परमेश्वराचा हात व आशीर्वाद नेहमी त्यांच्या सेवकांवर असतो, येशू ख्रिस्ताने सहन केलेल्या दुखांसमोर त्यांना हे दु:ख अतिशय शुल्क वाटते .

     आज देऊळ मातेला अशा मिशन कार्याची गरज भासत आहे. मिशन कार्य हे सर्वप्रथम आपल्या घरात सुरु व्हायला पाहिजे. घर घरात रोज रोजरिची प्रार्थना व्हायलाच पाहिजे. घरातील मोठ्या व्यक्तींना लहान मुलामुलींसाठी आदर्श असे जीवन जगायला हवे. कारण लहान बालके हि मोठ्यावर बसून बरयाच काही गोष्टी आत्मसात करत असतात. त्यामुळे त्याच्या योग्य संगोपणाची जबाबदारी हि मोठ्यांची असते. जर आज आपन आपल्या मुलांना प्रार्थनेचे बाळकडू पाजले तरच उद्या ते चांगले ख्रिस्ती नागरिक म्हणून उदयास येतील. आजच्या काळात जगाच्या भलेपनासाठी व कल्याणासाठी जर कुठल्या गोष्टीची गरज असेल तर ती गरज देवाच्या मिशन कार्याची आहे. देवाचा संदेश म्हणजे आशेची बातमी. आज बहुतेक जणांना देवाच्या बातमीपेक्षा, सुवार्तेपेक्षा दुसऱ्याच्या जीवनामध्ये काय चालले आहे यामध्ये रस असतो. अशा लोकाना जोपर्यत दुसऱ्याच्या कामांत नाक कुपसल्याशिवाय चेन पडत नाही. परंतु देवाचे मिशन कार्य म्हणजे दुसऱ्यांची निंदा नालस्ती करणे नव्हे तर स्वत:ला इतरासाठी झिजणे स्वत:ला मोठे न करता ख्रिस्ताला मोठे करणे होय.

     आज आपन विशेषत प्रार्थना करूया कि आपल्या धर्मग्रामातील जास्तीत जास्त युवक युवतीनि  देवाच्या मळ्यामध्ये काम करण्यास सहभाग दर्शवावा व देवाच्या शांतीचा व प्रेमाच्या संदेशाचे साधन बनून देवाला अनुसूचित असे जीवन जगावे.

 

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:  

प्रतिसाद: हे प्रभो आम्हाला सेवामय जीवन जगण्यास सहाय्य कर.

 १. आपले पोपकार्डीनल्सबिशप्सफादर्ससिस्टर्स ह्यांना अखिल ख्रिस्त सभेची धुरा सांभाळण्यास व प्रभूच्या प्रेमाचा व सेवेचा संदेश जगभर पसरविण्यास सामर्थ मिळावे म्हणून आपण प्रार्थना करूया. 

२. सर्व आजारी गरीब,अनाथ व अपंग ह्यांना मानसिक स्वास्थ व आरोग्य प्राप्त व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

३. ख्रिस्त आपल्या प्रत्येक कुटुंबाचा केंद्रबिंदू बनावाकौटूंबिक प्रार्थनेद्वारे आपले नाते ख्रिस्ताशी अधिक जवळचे व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

४. ह्या वर्षी अधिका अधिक पाऊस पडावाव आपल्या शेतांचीपिकांचीमासळीची चांगली वाढ व्हावी. तसेच वातावरण शुद्ध राहावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

५. आपण आताआपल्या सामाजिककौटूंबिक व व्ययक्तिक हेतूसाठी प्रार्थना करूया. 

 

    

No comments:

Post a Comment