Reflection for the SOLEMNITY OF THE MOST HOLY TRINITY (12/06/2022) by Fr. Benjamin Alphonso
पवित्र त्रैक्याचा सण
दिनांक: १२/०६/२०२२
पहिले वाचन: नितीसुत्रे ८:२२-३१
दुसरे वाचन: रोमकारास पत्र ५:१-५
शुभवर्तमान: योहान १६:१२-१५
प्रस्तावना:
आज पवित्र देऊळ माता
मोठ्या आनंदाने पवित्र त्रैक्याचा सोहळा साजरा करीत आहे. आपला देव एक आहे.
परंतु देवात तीन व्यक्ती आहेत पिता, पुत्र
व पवित्र आत्मा होय. देवाविषयी समजणे हे सोपे नाही. आजची तिन्ही वाचणे आपल्याला
पवित्र त्रैक्या विषयी माहिती देत आहे. आजचे पहिले वाचन नितीसुत्रे पुस्तकातून
घेतलेले आहे. ते आपल्याला देवाच्या महान ज्ञानाविषयी सागंत आहे. देवाने त्या सुंदर
अश्या सृष्टीची निर्मिती केली ह्यावरून आपल्याला समजते कि देव किती महान आहे.
दुसरे वाचन संत पौलने रोमकरास लिहिलेल्या पत्रातून घेतलेले आहे. जेथे पौल म्हणतो, देवामध्ये
तीनव्यक्ती आहे व हे रस्य विश्वासाद्वारे आपल्याला समजते तर आजच्या योहानलिखित शुभवर्तमानात
प्रभू येशू स्वत: विषयी, पित्याविषयी व पवित्र आत्म्याविषयी आपल्याला समजावून देत आहे. ह्या पवित्र मिस्सा बलिदानात प्रार्थना
करूया कि आपल्याला पवित्र त्र्यैक्याच रह्स्य समजाव.
मनन-चिंतन:
आज पवित्र देऊळ माता
पवित्र त्रैक्याचा सोहळा साजरा करत आहे. पवित्र्य त्र्यैक हे एक रहस्य आहे.
रहस्य समजणे कठीण असते. एकदा एक महागुरू स्वामी पवित्र त्रैक्याच्या रविवारी एका
धर्मग्रामात भेट द्यायला गेले होते. आपल्या ह्या भेटीच्या वेळी ते पवित्र मिस्सा बलिदान अर्पण करत होते. मिस्साच्या वेळी त्यांनी
प्रवचनात लोकांना प्रश्न विचारला कि पवित्र त्रैक्य म्हणजे नक्की काय? सर्वजण शांत होते. इतक्यात एक
लहान मुलगा उभा राहिला आणि म्हणाला, महागुरूस्वामी पवित्र त्रैक्य एक रहस्य आहे. त्यावेळी बिशप म्हणाले, शाब्बास मुला, तू संदर उत्तर दिले आहेस. आता मला साग
रहस्य म्हणजे काय? तो मुलगा हुशार होता. तो म्हणाला महागुरूस्वामी रहस्य म्हणजे जे मला समजत नाही आणि तुम्हांला
हि समजणार नाही.
होय माझ्या प्रिय
बंधू भगिनीनो, अनेक महान विधवान धर्मपंडित, विशेषकरून संतांनी हे रहस्य समजून
घेण्याचा प्रयत्न केला होता परंतु ते
त्यांना सहज शक्य झाले नाही. संत आगस्तीन
महान संत असून सुद्धा गोंधळून गेला होता. जगाच्या सुरुवातीपासून मनुष्य जात देव कोण आहे? देव कसा आहे? हे शोधण्याचा
प्रयत्न करत आहे. देवाला ओळखणे हे सोपे नाही. म्हणून देवाला समजण्यासाठी विश्वासाची
गरज असते.आपला विश्वास आपणाला सांगतो कि देव आपल्यापासून दूर नाही. तर आपला देव
आपल्या बरोबर आहे
संत योहानाच्या
शुभवर्तमानातून घेतलेले वाचन योहान ३:१६ -१८ आपल्याला एक महत्वाचा संदेश देत आहे
कि, देव प्रेम आहे. देव आपल्या सर्वावर प्रेम करतो. देव आपणा सर्वांवर प्रेम करतो.
देवाने जगावर एवढी प्रीती केली कि देवाने आपला एकुलता एक पुत्र ह्या जगात पाठवला.
देव विनाअर आपल्याला सर्व काही देत असतो.
रोमकारास पाठवलेल्या पत्रात संत पौल म्हणतो, “देवाने आपल्या एकुलत्या एका
पुत्राला ह्या जगात पाठवले फक्त आपल्यासाठीच व आपल्यावर असलेल्या प्रेमासाठी” (रोम
८ :३२). आजचा पवित्र त्रैक्याचा सण हा प्रेमाचा सण आहे. हा सन आपल्याला शिकवत आहे
कि देव आपल्यापासून दूर नाही. पवित्र त्रैक्य हे वैचारिक किवा बौद्धिक पातळीत न
समजनार रहस्य नाही तर देवाच्या खऱ्या
अस्तित्वाचा, देवाच्या प्रेमाच रहस्य आणि वास्तविकतेचा सण आहे. देवाच्या त्रैक्याचा अनुभव आपल्याला आपल्या दररोजच्या
जीवनात सुद्धा येऊ शकतो. ह्याची कल्पना आपल्याला एका खऱ्या घटनेवरून येईल. हि
सत्यघटना गुजरातची राजधानी अहमदाबाद येथे घडली होती.
अहमदाबाद येथे एक
सुप्रसिद्ध हृदयवहन (Cardiologist) आहेत त्यांची अपाईन्टमेंट मिळायला कमीत कमी तीन महिने तरी लागतात. एकदा
त्यांच्या कडे एक छोटी दहा वर्षाची मुलगी
आणली होती. तिला हृदयाचा त्रास होता तिच्या आईवडिलांनी तिला अनेक तज्ञ डॉक्टरांकडे
नेले होते पण काही फायदा झाला नाही. जेव्हा डॉ. शहा ह्या डॉक्टरांनी तिची तपासणी
केली तेव्हा ते त्या मुलीच्या आई वडिलांना म्हणाले कि केंस फार कठिण आहे. जर
तीच्या हृदयाचे ऑपरेशन केले तर तिच्या जगण्याचे चॉन्सेस फक्त ३० टक्के आहेत.
नाहीतर काही दिवसात ती मरणार. आई वडिलांनी निर्णय घेतला कि त्या मुलीच ऑपरेशन करायचं.
ऑपरेशनचा दिवस व वेळ ठरली. ऑपरेशनच्या दिवशी त्या छोट्या मुलीने म्हटले कि मला
मुख्य डॉक्टर बरोबर बोलायचे आहे. ऑपरेशन अगोदर डॉ. त्या मुलीशी बोलायला गेले.
तेव्हा ती मुलगी डॉक्टरला विचारते कि आम्ही रोज घरी प्रार्थना करतो आणि माझी
आई रोज मला सागते, कि देव हृदयात
असतो तुम्ही माझे हृदय उघडणार
तेव्हा तुम्ही बघा आणि मी शुद्धीत आल्यावर देव कसा दिसतो ते सांगा. हे ऐकून डॉक्टर
आश्चर्यचकित झाले होते कारण डॉक्टरांना त्यांच्या जीवनात पहिल्या वेळेला असा कोणी प्रश्न विचारला होता.
ऑपरेशन सुरु झाले मुलीच हृदय उघडले पण अचानक रक्तस्त्राव बंद पडला मुख्य डॉक्टर व
इतर डॉक्टरना वाटल कि केस फसली आणि त्या
क्षणी डॉक्टराणा मुलीचे शब्द आठवले आणि अचानक रक्तस्त्राव पुन्हा सुरु झाला. त्या
क्षणापासून डॉक्टरचा विश्वास वाढला कि देव खरोखर आहे.
होय देव अस्तिवात आहे तो आपल्या बरोबर आहे हे आपल्याला आजच्या पवित्र त्रैक्याचा
सण सांगत आहे. तर आजच्या ह्या पवित्र मिस्साबलिदानात प्रार्थना करूया कि आपला पवित्र त्रैक्यावर
विश्वास मजबूत व्हावा आमेन.
विश्वासू लोकांच्या प्रार्थना
प्रतिसाद: हे पवित्र
त्रैक्या आम्हांला आमच्या कुटुंबातील व समाजातील एकरूपता वाढविण्यास मदत कर.
१. आपले परमगुरु स्वामी, महागुरुस्वामी, धर्मगुरू, धर्मबंधू-भगिनी
ह्यांनी पवित्र त्रैक्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन ख्रिस्ती समाज, ख्रिस्ताठायी एकत्र करण्यास तत्पर राहावे म्हणून आपण प्रार्थना करू या.
२. आपल्या ख्रिस्ती समुदायातील
वेगवेगळे पंथ आपला स्वार्थ, भेदभाव बाजूला सारून एकत्र यावेत व
ख्रिस्ती जीवनाची साक्ष जगाला द्यावी म्हणून आपण प्रार्थना करू या.
३. आपल्या प्रत्येकाच्या
कुटुंबात ऐक्य, सलोखा नांदावा; सर्व प्रकारचा भेदभाव दूर व्हावा व
एक आदर्श कुटुंब व्हावे म्हणून आपण प्रार्थना करू या.
४. ख्रिस्ती जीवन जगत असताना
आपण सर्वांनी एकमेकांशी प्रेमभावनेने वागावे; परमेश्वराची
दया, क्षमा इतरापर्यंत पोहचवावी व शेवटी ईश्वराठायी चिरंतर
जीवन प्राप्त व्हावे म्हणून आपण प्रार्थना करू या.
५. आपल्या धर्मग्रामातील जे लोक आजारी आहेत, अशांना परमेश्वरी कृपेचा स्पर्श व्हावा, त्यांना आजारात सहनशक्ती लाभावी व त्यांचा आजार बरा व्हावा म्हणून आपण प्रार्थना करू या.
६. थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक व सामाजिक हेतूसाठी प्रार्थना करू या.
No comments:
Post a Comment