Monday, 3 April 2023

 



Reflection for the Homily of Good Friday (07/04/2023) By Br. Elias Itur.




शुभ शुक्रवार

दिनांक: ०७/०४/२०२३.

पहिले वाचन: यशया ५२:१३-५३:१२.

दुसरे वाचन: इब्री लोकांस पत्र ४:१४-१६;५:७-९.

शुभवर्तमान: योहान १८:१-१९:४२.


विषय: “बापा, त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात ते त्यांना समजत नाही”!



प्रस्तावना:

आज पवित्र शुक्रवार म्हणजे ख्रिस्ताच्या दु:खसहनाचा दिवस साजराकरत आहोत. मानवाला पापमुक्त करण्यासाठी ख्रिस्ताने दु:खयातना सोसून क्रुसावर आपले बलीदान अर्पण केले म्हणूनच ह्या दिवसाला पवित्र शुक्रवार म्हणून मानला जातो. आजच्या पहिल्या वाचनात यशया संदेष्टा सेवक गीताद्वारे ख्रिस्ताच्या दु:खप्राय यातना व मरणाचे भाकीत करतो. आपणा सर्वांचे पाप अंगीकारूनतो आपल्या अपराधामुळे घायाळ झालाआपल्या दुष्कर्मामुळे ठेचला गेला व त्याला बसलेल्या फटक्यांनी आपणास जीवन प्राप्त झाले. प्रभू येशूने आपल्या पापांचे ओझे स्वतःवर लादून आपणाला पापातून मुक्त केले आहे.

आजचे दुसरे वाचन आपणास जाणीव करून देते कीप्रभू येशू ख्रिस्त हा खरा याजक आहे आणि त्याच्याद्वारे आपणास तारण मिळणार आहे आणि म्हणून आपण त्याच्या आज्ञेत राहिलो पाहिजे.

योहानलिखित   शुभवर्तमानाद्वारे येशूचे दु:खसहन आणि यातनादायक मरण फार प्रभावी आणि प्रेरणादायी आहे हे आपल्या पुढे मांडण्यात आलेले आहे. देवाचा पुत्र पापी मनुष्यासाठी मरण पावला आणि त्याने देवाची क्षमा आपणास बहाल केली. आज आपण प्रभू येशूचे दु:खसहन व मरण ह्यावर चिंतन करीत असताना आपल्यालाही येशूप्रमाणे क्षमा करता यावी म्हणून आजच्या उपासनेमध्ये आपण परमेश्वराकडे प्रेरणा व कृपा मागूया.

मनन चिंतन:

वधस्तंभ हे ख्रिस्ती जीवनाचे एक प्रतिक आहे. हे प्रतिक जगाला ख्रिस्ताच्या अतिमौल्यवान प्रेमी त्यागाची आठवण करून देते. ह्या प्रेमाखातर प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या स्वताःच्या जीवाचा त्याग केला, आणि मृत्यूद्वारे मानवजातीवर आपले प्रेम व्यक्त केले. तेव्हा आजच्या दिवशी आपण सर्व एकत्र येवून येशूच्या वधस्तंभावरील सात शब्दांवर मनन चितन करूया.

१. पहिला उद्गार : क्षमेचा: “ हे बापा त्यांना क्षमा कर ; कारण ते काय करतात हे त्यांना समजत नाही” (लुक २३:३३-३४) आपल्या पापांची क्षमा करण्यासाठी येशू वधस्तंभवार गेला. तो येरुशलेमेला जाण्याचा कितीतरी पूर्वी त्याला ठावूक होते कि त्याला मारले जाणार आहे. नवीन करार आपणास शिकवितो कि, प्रभू येशू आपल्या पापांची खडणी भरण्यासाठी मुधामहून स्वतःला वधस्तंभवार खिळू ध्यावे म्हणून येरुशलेमेला गेला. “कारण आपल्याला देवाजवळ नेण्यासाठी ख्रीस्तानेही पापाबद्दल, म्हणजे नीतिमान पुरुषाने अनीतिमान लोकाकारीन्ता एकदा मरण सोसले” १ पेत्र ३:१८. येशू वधस्तंभवार असताना प्राथर्ना करत आहे कि, हे बापा, त्यांना क्षमा  कर, देवाने त्याच्या प्रथार्नेचे उतर दिले. जो कोणी येशूवर पूर्ण विश्वास ठेवतो त्याच्या पापांची क्षमा होते. त्याच्या मरणाने तुमच्या पापाबद्दल खंडणी भरलेली आहे. त्याच्या रक्ताने तुमचे पाप धुतले जाते.

२. दुसरा उद्गार: तारणाचा: लुक २३:३९-४३ तू आज माझ्याबरोबर सुखलोकातअसशील. दुसयाचे चोराचे बोल आहेत त्या खूप मोठे प्रकटीकरण पाहण्यास मिळते. त्यातून आपणास हे प्रगट होते कि, तारण हे केवळ बाप्तिस्मा किंवा मंडळीचा सभासद असल्याने मिळत नाही- त्या चोराने ह्या दोहोंपैकी काहीही केले नव्हते. “प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास तेव म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल” प्रेषित १६:३१.

३. तिसरा उद्गार: प्रीतीचा: योहान १९:२५-२७, बाई, पाहा, हा तुझा मुलगा! मह त्याने त्या शिष्याला म्हटले, पाहा, ही तुझी आई!  येशूने आपल्या आईची जबाबदारी ज्या शिष्यावर त्याची प्रीती होती त्या योहानावर सोपवली. तुमचे तारण झाल्यानंतर ख्रिस्ती जीवनात करण्यासारखे असे भरपूर आहे. तुम्ही इतरांची काळजी घ्यायला हवी.

४. चोव्था उद्गार: क्लेशाचा: मत्तय २७:४५-४६ माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केलास? येशूची ही क्लेशयुक्त आरोळी त्क्याची व तसेच देवत्वाची वास्तविकता दाखवील आहे. देव जो पुत्र वधस्तंभवार आपल्या पापे वाहत असताना , देव जो पिता त्याच्यापासून दूर गेलेला होता. बायबल सांगते, “कारण एकच देव आहे, आणि देव व मानव ह्यांच्यामध्ये ख्रिस्त येशू हा मनुष्य एकच मध्यस्त आहे.” १ तीमथी२:५.

५. पाचवा उद्गार: दुःखसहनाचा योहान १९: २८-२९ “मला तहान लागली आहे” येशूने आपल्या पापांची खंडणी भरण्यासाठी वधस्तंभवार असाह्य वेदना सहन केल्या. “ खरे पाहिले असता तो आमच्या अपरांधामुळे घायाळ झाला, आमच्या दुष्कार्मामुळे ठेचला गेला.” यशया ५:३-५.

६. सहावा उद्गार: प्रायश्चिताचा योहान १९:३० “ पूर्ण झाले आहे” आपण सर्वजन त्याच्या इशेप्रमाणे आपण येशू ख्रिस्ताच्या एकदाच झालेल्या देहार्पन्द्वारे पवित्र केलेले आहोत. वधस्तंभवार येशूने आपल्या सर्व पापाबंदल प्रयचीतकेले, व एकदाच सर्वाकरिता मरण पावला.

७. सातवा उद्गार: देवाला समर्पित होण्याचा लूक २३:४६ “ हे बापा, मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो” मुर्तुपुर्वी येशूने आपल्या शेवटच्या उदारात देव जो बाप याला आपले संपूर्ण समर्पण केल्याचे दिसत आहे.

असे काही लोक आहेत कि त्यांना म्हणतात के, फक्त देवावर विश्वास ठेवणे पुरेसे आहे. परंतु अस नाहीये, देवावर केवळ विश्वास ठेवून कोणाचेही तारण होत नाही. तर येशू स्वतःला म्हणाला कि, “माझ्याद्वारे आल्यावाचून पित्याकडे कोणी येत नाही”. योहान १४:६. येशू ख्रिस्त हाच स्वर्गात जाण्याचा अनेम मार्गापैकी एक मार्ग नव्हे, किंवा अनेक मार्गापैकी एक सर्वात चांगला मार्गही नव्हे: तर तो एकमेव मार्ग आहे. जर तुम्ही येशूवर विश्वास ठेवणार नाहीत, तर तुम्ही तारण गमवाल. तुम्ही कितीही चांगले असा, तुम्ही किती वेळा तरी चर्चला जात असा, किंवा पवित्रशास्त्र वाचीत असा, पण जर तुमचा विश्वास येशूवर नसेल तर तुम्ही आपले तारण गमाविलेले व्यक्ती आहात. “माझ्याद्वारे आल्यावाचून पित्याकडे कोणी येत नाही” येशू हाच एकमेव मार्ग आहे ज्याच्या रक्ताने आपली पापे धुवून शुद्ध होतात. आमेन.


No comments:

Post a Comment