Wednesday 27 December 2023

 


Reflection for the 

Feast of Holy Family (31/12/2023)

 by Fr. Cajetan Pereira.



दिनांक: ३१-१२-२०२३

पहिले वाचन : बेनसिराची बोध वचने ३:२-६;१२-१४

दुसरे वाचन : कलस्सैकरांस पत्र ३:१२२१

शुभवर्तमान : लुक २:२२४०


पवित्र कुटुंबाचा सण



प्रस्तावना


आज देउळमाता आपल्या समोर पवित्र कुटुंबाचा आदर्श ठेवत आहे. कुटुंब आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. कुटुंबात आपली जडण-घडण होत असते. चांगल्या कुटुंबातच चांगली माणसे घडत असतात. पवित्र कुटुंब हे अपणासाठी एक आदर्श कुटुंब आहे. आजचे पहिले वाच आपणास उत्तम कुटुंब कसे असते व त्यात देवाची काय भूमिका असते याची प्रचिती आपणापुढे सादर करत आहे. संत पौल, आपणास चांगले जीवन जगण्यासाठी अनेक मूल्य जोपासावी लागतात त्या मूल्यांची ओळख आपणास करून देत आहे. शुभवर्तमानात आपणास आढळते की, पवित्र कुटुंब कशा प्रकारे आपली धार्मिक बांधीलकी पूर्ण करत आहे. आपण ही पवित्र कुटुंबाप्रमाणे पावित्र्याचे जीवन जगावे म्हणून या मिस्साबलीदानात प्रार्थना करूया.


मनन चिंतन


आज आपण जगाकडे नजर मारली तर, आपणास कळून चुकेल की, अनेक कुटुंबांची नासधूस झालेली आहे. अनेक अशी कुटुंब विभाग्ण्याच्या स्थितीवर आली आहेत. जागतिक ऐश्वर्य व जागतिक मूल्य हे कुटुंबाच्या नाशासाठी कारणीभूत आहेत. आपण पाहतो की, नवरा-बायकोमध्ये, सासू-सुनेमध्ये भांडण, भावा-बहिणींमध्ये भांडण, जमीन, पैशासाठी भांडण व अनेक अशा कारणास्तव लोक एक दुसर्यांचे वैरी झाले आहेत. एका कुटुंबाचे जणू काही अनेक तुकडे झालेले आहेत. हे सर्व करत असताना आपल्या वागणुकीचा परिणाम आपल्या भावी पिढीला सहन करावा लागतो, हे आपण मात्र विसरतो. आपली भावी पिढी आपल्या वडीलजनांच्या वागणुकी तून काय बोध घेणार ह्याचा विचार आपण करायला हवा. जो गैरआदर आज आपण आपल्या वडीलजनांना देत असतो तोच गैरआदर आपली मुलंही आपल्याला भावी भविष्यकाळात देणार आहेत.


ज्ञानग्रंथामध्ये उत्तम कुटुंबचा आढावा आपणास पहाण्यास मिळत आहे. त्यामध्ये लेखक आपणास सांगत आहे कि, पिता हा कुटुंबाचा मान आहे, तर मातेचा आपल्या मुलांवर पूर्ण अधिकार आहे. जो आपल्या पित्याचा मान करतो त्याची पापांपासून मुक्तता होते. जो आपल्या आईचा आदर करतो तो आपणासाठी स्वर्गात जागा तयार करत असतो. ज्ञानग्रंथात असेही म्हंटले आहे कि, अशा माणसाची प्रार्थना देव ऐकतो व त्याला उत्तरही देत असतो. आपण आपले आई-वडील म्हातारे झाले की, त्यांचा तिरस्कार करत असतो त्यांना वृद्धाश्रमात टाकत असतो. त्यांना पुरेसा आदर आपण देत नाही. जर का आपण आपल्या आई-वडिलांचा या वृद्धावस्थेत मान सन्मान केला त्यांची सेवा केली तर नक्कीच देव त्याची परत फेड करणार आहे. त्याचा मोबदला आपणास देणार आहे. ह्याउलट जर का आपण त्यांचा तिरस्कार केला तर, त्याचे प्रतिफ आपल्याला या जीवनामध् ये भोगावे लागणार आहे.


 आजचे स्तोत्र आपणास उत्तम असा संदेश देत आहे, तो म्हणजेधन्य तो व्यक्ती जो देवाचे भय धरतो आणि त्याच्या मार्गावर चालतो परमेश्वर त्याची प्रार्थना ऐकतो. अनेक वेळेला आपण मोठ मोठ्या मंदिरांमध्ये, परमेश्वराकडे आपल्या गरजा घेऊन जात असतो व त्याच्या उत्तराची वाट पाहत असतो. तर दुसरीकडे आपण आपल्या घरातील आपले आई-वडील, वृद्ध व्यक्ती यांची काळजी घेत नाही त्यांना आदर आपण दाखवत नाही, अशा व्यक्तींची प्रार्थना देव कसा ऐकणार. तरीही आपला देव प्रेमळ आहे तो आपल्या गरजा भागवत असतो परमेश्वराच्या या प्रेमळ स्वभावाचा आपण फायदा घेत असतो. तो सहनशील आहे पण अन्यायी नाही.


 संत पौल, आजच्या दुसऱ्या वाचनामध्ये आदर्श सामाजिक व कौटुंबिक जीवन कसे जगावे याची मुल्ये आपणा समोर सादर करीत आहे. आपण एकमेकांना क्षमा करावी, परमेश्वरला सदोदित धन्यवाद द्यावे, एकामेकांवर प्रेम करावे व शांतीने रहावे ही शिकवण आपणास या पत्राच्या माध्यमातून देत आहे. ही सर्व मुल्ये आपण आपल्या कुटुंबात जोपासावी व चांगले आदर्श जीवन आपण जगावे म्हणून आज ख्रिस्तसभा आपणा पुढे पवित्र कुटुंबाचा आदर्श ठेवत आहे.


आजच्या शुभवर्तमानांमध्ये आपण पाहतो की, योसेफ, मरिया व बाळ येशू आपले धार्मिक कार्य व धार्मिक कृत्ये पार पडण्यासाठी मंदिरात जात आहेत. शुद्धीकरण्याची रीत पार पाडण्यासाठी ते मंदिरात गेले असता, सिमोन संदेष्टा येशू बाळाला पाहून आनंदित होतो व त्याने देवाचे तारण पहिल्याने संतुष्ट होतो. त्याच्या आई-वडिलांसमोर तो भविष्यवाणीसुद्धा करतो. खरं पाहायला गेलं तर पवित्र मरीयेलाप्रभु येशू ख्रिस्ताला शुद्धीकरणाची गरज नव्हती, कारण ते आधीच शुद्धतेचे जीवन जगात होते. तरीसुद्धा ते मंदिरात शुद्धीकरणासाठी जात आहेत. यावरून आपणास कळून येते की, हे आई-वडील अर्थात मारिया आणि योसेफ येशूबाळाला परमेश्वराची आज्ञात्याच्या आज्ञेचे पालन करण्यास शिकवत आहे. अनेक वेळेस आपण आपल्या मुलांना जागतिक शिकवण देत असतो व त्यांना जगामध्ये प्रगतीशील बनवत असतो. त्यांच्या शिक्षणासाठी पाण्यासारखा पैसा खर्च करत असतो व त्यांना स्वावलंबी बनवत असतो. एकदा ते स्वावलंबी झाले की ते आपल्या आई वडिलांना दूर सारत असतात. ते त्यांची काळजी घेत नाही. जर का अवघ्या लहानपणापासूनच आई-वडिलांनी आपल्या मुलांना धर्मशिक्षण व मूल्य यांची शिकवण दिली असती तर त्यांची मुलं आज आपल्या आई-वडिलांची काळजी घेत असती. आजचा सण आपणास आवर्जून सांगत आहे की, आपण आपल्या मुलांचे चांगल्या प्रकारे संगोपन करावे. आपण चांगले आदर्श ख्रिस्ती जीवन जगावे व आपल्या वर्तनातून आपल्या मुलांना शिकवावे असा हा महान संदेश आपणास देत आहे. हे सर्व कार्य करण्यासाठी आपण समर्थ व्हावे म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताकडे आपण प्रार्थना करू या. आमेन.


विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद: हे प्रभू आमच्या कुटुंबाचे संरक्षण कर.


१. आपली देऊळमाता विश्वभर ख्रिस्ताचे प्रेम पसरवत आहे. हे प्रेमाचे कार्य पुढे नेण्यास त्यांना परमेश्वराची कृपा मिळावी व अधिका-अधिक लोकांना ख्रिस्ताच्या प्रेमाचा अनुभव यावा म्हणून आपण प्रार्थना करूया.

२. कुटुंब हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे. त्याचे महत्व जाणून कुटुंबाचे पालन पोषण करण्यास आपणास कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

३. आपल्या प्रत्येकांच्या कुटुंबात शांतीप्रेमऐक्य सतत नांदावे व आपण त्यागमय जीवन जगून आपले कुटुंब सदासर्वदा सुखी रहावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

४. जी कुटुंबे उध्वस्त झाली आहेतअशांना पवित्र कुटुंबाचे मार्गदर्शन लाभून त्यांना समजूतदारपणाचेशांतीचे व प्रेमाचे वरदान लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

५. आपल्या वृद्ध आईवडिलांना आपल्या प्रेमाचामायेचा व करुणेचा स्पर्श व्हावा व त्यांना आनंदी ठेवण्यास परमेश्वराने आपणास कृपा द्यावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

६. आता थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक हेतूसाठी प्रार्थना करूया 


No comments:

Post a Comment