Thursday 1 February 2024

 


Reflection for the 5th SUNDAY IN ORDINARY TIME (04/02/2024) by Br. JOSTIN PEREIRA.



दिनांक: ०४/०२/२०२४

पहिले वाचन: ईयोब ७:१-४,६-७

दुसरे वाचन: १ करिंथकरांस पत्र ९:१६-१९, २२-२३

शुभवर्तमान: मार्क १:२९-३९


सामान्य काळातील पाचवा रविवार


प्रस्तावना:

आज ख्रिस्तसभा सामान्य काळातील पाचवा रविवार साजरा करीत आहे. आजची उपासना आपल्याला येशू ख्रिस्ताच्या दैवी स्पर्शाबद्दल आणि प्रार्थनेचे महत्त्व या मुद्द्यावर मनन चिंतन करण्यास निमंत्रित करत आहे.

आजच्या पहिल्या वाचनात, आपण मानवी जीवन हे कष्टाळू आणि सुख-दु:खांच्या मिश्रणानी सजवलेले एक रहस्य आहे, याविषयी आपण एकतो. आजच्या दुसऱ्या वाचनाद्वारे संत पौल आपणास ख्रिस्ती सुवार्तेचा प्रचार करणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे, याची जाणीव करून देतो. तर मार्क लिखित शुभवर्तमानात, आपण येशू ख्रिस्ताने पेत्राची सासू व इतर रोगी यांना कसे बरे केले याविषयीचा वृत्तांत ऐकतो.

ख्रिस्तसभा आज पवित्र बालकांचा रविवार साजरा करीत आहे. यास्तव आज आपण सर्व बालकांसाठी विशेष प्रार्थना करूया जेणेकरून ख्रिस्ताच्या प्रेमाचा व मायेचा सहवास सदोदित त्यांच्या जीवनात रहावा व बालपणाचा गोडवा त्यांनी आपल्या कुटुंबाद्वारे अनुभवा म्हणून आपण या मिस्साबलीदानात विशेष प्रार्थना करूया.


मनन चिंतन:

अति पवित्र त्रेक्यातील दुसरी व्यक्ती, प्रभू येशू ख्रिस्त याला जाणण्याचे, प्रभू येशू ख्रिस्ताचा जवळून अनुभव घेण्याचे प्रमुख स्रोत आहे. शुभवर्तमानातून आपण प्रभु येशू ख्रिस्ताच्या अंतरंगाचा ठाव घेता येतो. त्याच्याशी एकरूप होता येतं. एकदा प्रभू येशू ख्रिस्ताची ओळख आपल्याला झाली की, आपणास आपल्या स्वतःची ओळख होते. आपण परमेश्वराची प्रतिमा आहोत हे आपल्याला कळून येते. आणि म्हणूनच आजच्या शुभवर्तमानात लोकांना पापाच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी परमेश्वराच्या प्रेमाचा आघात अनुभव देण्यासाठी, देवराज्याची प्रस्थापना करण्यासाठी, प्रभू येशू ख्रिस्त या जगात आला. आकर्षणाचे केंद्र बनला, लोकप्रिय होण्यासाठी किंवा यशस्वी होण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताला मुळीच रस नव्हता. त्याचे उद्दिष्ट आणि उद्देश त्याच्यासाठी स्पष्ट होते. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त संबंध गालीला सभोवताच्या परिसरामध्ये उपदेश करीत परमेश्वराच्या प्रेमाचा, दयेचा, कृपेचा अनुभव देते फिरला. जीवनदायी शब्द, तारणदायी शब्द, तारणदायी  कार्य याचा लाभ सर्वांना व्हावा म्हणून प्रभू येशूने सातत्याने प्रवास केला. Jesus remained continuously on the move, so that everyone can benefit from his saving and life giving word and work.

प्रभू येशूने आपले संपूर्ण आयुष्य लोकांना आरोग्य आणि जीवन देण्यासाठी आणि जीवन विपुलतेने देण्यासाठी तो फिरला. सातत्याने उपदेश करून दुःखनाईतांस व अनेक अशा रोगांनीं पिडलेल्या लोकास बरे करून प्रभू येशू, खरा परमेश्वर व खरा मानव झाला. परंतु मानव म्हणून नक्कीच आध्यात्मिक दृष्टिकोनातून स्वर्गीय आधाराची गरज आहे. ह्याची जाणीव प्रभू येशूला होती.  आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने रोज आपली आध्यात्मिक बॅटरी रिचार्ज केली.

पवित्र पुस्तकातील एक छोटस उदाहरण घेऊन मार्क लिखित शुभवर्तमानात अध्याय वचन ३० मध्ये रक्तस्रावाने पीडित असलेल्या त्या स्त्रीने येशू ख्रिस्ताच्या कपड्याला जेव्हा शिवले तेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताच्या शरीरातून शक्ती निघून गेली असा संदर्भ आपणास आढळतो. स्वतःला इतरांसाठी झिजवताना आध्यात्मिक मजबूती करण्याची गरज प्रभूला होती. आणि म्हणून प्रभु न चुकता भल्या पहाटे संपूर्ण रात्र प्रार्थना करत होता.

आजच्या शुभवर्तमानांमध्ये आपणा सांगण्यात आले आहे कि, भल्या पहाटे प्रभू येशू ख्रिस्त रानात जाऊन प्रार्थना करतो. भल्या पहाटे म्हणजे नितांत जागेत, शांतपणे परमेश्वराचे सानिध्य असल्याचा अनुभव घेतो. पित्याशी एकरुप होण्यासाठी प्रार्थनेमध्ये संपूर्णतः एकचित्त होण्यासाठी  प्रभू येशू ख्रिस्त त्या रानात जातो. जगातील समस्या पासून जगातील ताणतणावापासून दूर जाण्यासाठी नाही वरून जाण्यासाठी नाही तर पुढील सेवाकार्यासाठी, ताजेतवाने होण्यासाठी, प्रभू येशू ख्रिस्त रानात गेला.

प्रभू येशूची प्रार्थना, परमपित्याची परिपूर्ण स्तुती व आभार मानण्याची प्रार्थना होती. परमेश्वर पित्याने जे कार्य, जबाबदारी त्याच्यावर सोपवली आहे ती जबाबदारी सिद्धीस नेण्यासाठी, प्रभू येशूला प्रार्थनेची गरज होती. आपल्या प्रत्येकासाठी मध्यस्थी करणारी ही प्रभु येशू ख्रिस्ताची प्रार्थना होती.

आजच्या शुभवर्तमाना आपण तीन महत्त्वाच्या मुद्यावर मनन चिंतन करणार आहोत.

पहिला मुद्दा:

शुभवर्तमानात श्रद्धा पूर्णपणे आणि त्यावर मनन चिंतन केले पाहिजे. ते आपल्या हृदयात जतन केले पाहिजे. आपल्या शब्दाने, आपल्या कृतीने, आपल्या जीवनाने शुभवर्तमानाची साक्ष दिली पाहिजे. शुभवर्तमानाचा प्रचार आपण केला पाहिजे.

आजच्या दुसरे वाचनात संत पौल सांगत आहे, “Woe to me if I do not preach the gospel” म्हणजेच जर मी शुभवर्तमानाचा प्रसार करत  नसेल तर माझा धिक्कार असो. म्हणून आपल्या प्रत्येकाचे एक कार्य आहे कि, आपण आपल्या जीवनाद्वारे प्रभू येशू ख्रिस्ताचा प्रसार केला पाहिजे फक्त शब्दाने नव्हे तर आपल्या कृतीने, जगण्याने होय.

दुसरा मुद्दा:

या जीवनाच्या प्रवासामध्ये आपण भरकटत असतो बहकून जातो, आध्यात्मिक दृष्टीने आपण अशक्त होत असतो. ख्रिस्ताची साक्ष देण्यासाठी आपणास आध्यात्मिक असण्याची गरज असते. ही आध्यात्मिक ऊर्जा, आपल्या पवित्र आत्म्याच्या अभिषेकाद्वारे आपणाला मिळत असते. म्हणून आपण रोज प्रार्थना केली पाहिजे. पोप फ्रांसिस म्हणतात लहान मुलांसारखा आपला स्वर्गीय पिताशी संवाद असला पाहिजे. देवशब्दाचे वाचन, आपल्या कुटुंबामध्ये आपल्या प्रार्थनेमध्ये आपल्या दररोजच्या प्रार्थनेमध्ये झाले पाहिजे. त्यावर मनन चिंतन झाले पाहिजे. तेव्हाच आपली आध्यात्मिक बॅटरी आपण रिचार्ज करू शकू.

तिसरा मुद्दा:

या जगामध्ये जीवन जगत असताना दु:, अपयश यामुळे आपण निराश होत असतो. या तुटलेल्या नातेसंबंधासाठी, या मानासाठी, आपल्या प्रत्येकाला शारीरिक, आध्यात्मिक, मानसिक आरोग्य दानाची गरज असते. म्हणून आजच्या शुभवर्तमानात आपण सर्वांनी, पेत्राची सासू, या पात्रामध्ये स्वतःला पाहण्याचा प्रयत्न करा. पेत्राची सासू तापाने आजारी होती. परंतु जेव्हा प्रभू ख्रिस्ताचा आरोग्यदायी स्पर्श तिला होतो तेव्हा ती उठून त्याची सेवा करू लागते.

जेव्हा आपण शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक रोगातून बरे होतो तेव्हा प्रभू येशूची दया, कृपा इतरांना दाखवण्यासाठी आपण कदापि विसरू नये. आपणा सर्वांना प्रभूच्या आरोग्यदायी स्पर्शाची आणि प्रभूच्या सामर्थ्याची गरज आहे. केवळ बरे होण्यासाठी नाही तर प्रभुमध्ये परिपूर्ण होण्यासाठी आपणाला प्रार्थनेची गरज आहे. आज आपणपवित्र बालकांचा रविवार साजरा करत असतांना प्रभू येशूकडे विनंती करूया कि, सर्व बालकांना हे प्रभू स्पर्श कर व त्यांचे सर्व आजार दूर करून त्यांना कृपेने भर, म्हणून या मिस्साबलीदानात भाग घेताना विशेष प्रार्थना करूया.


विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: “हे प्रभो, तुझे कार्य करण्यास आम्हांला कृपा दे.”

१. आपले पोप महाशय, कार्डिनल्स, बिशप्स, सर्व धर्मगुरू व धर्मभगिनी ह्यांनी परमेश्वराचे कार्य करण्यात सतत व्यस्त असावे व इतरांना परमेश्वराच्या प्रेमाचा व चांगुलपणाचा अनुभव देण्यास त्यांच्यासाठी पवित्र आत्म्याची कृपा मागूया.

२. आपल्या धर्मग्रामातील तरुण-तरुणींनी प्रभू येशूच्या हाकेला होकार देऊन, त्याचे कार्य पुढे नेण्यास त् त्या सर्वांना प्रेरणा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया.

३. अनेक लोकं वेगवेगळ्या आजारांनी पिडीत आहेत. अशा सर्व लोकांना प्रभूचा आरोग्यदायी स्पर्श व्हावा व शिमोनच्या सासू प्रमाणे त्यांनी देखील इतरांची सेवा करावी म्हणून प्रार्थना करूया.

४. अनेक लोकं जे बेरोजगार आहेत व नोकरीच्या शोधात आहेत, त्या सर्वांना प्रभुचे मार्गदर्शन लाभावे व वेळीच त्यांना काम मिळावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

५. थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक व सामाजिक हेतूंसाठी आपण प्रार्थना करूया.

No comments:

Post a Comment