Reflection for the 2nd Sunday in the Season of Lent (25/02/2024) by Fr. Benjamin Alphonso.
दिनाक: २५/०२/२०२४
पहीले वाचनी: उत्पली २२:१-२-१३,१५-१८
दुसरे वाचन : रोमकरास पत्र ८:३१-३५
शुभवर्तमान : मार्क
९:२-१०.
प्रायश्चित
काळातील दुसरा रविवार
प्रस्तावना:
आज पवित्र देउळमाता प्रायश्चित काळातील दूसरा रविवार साजरा करत आहे. आजची उपासना आपल्याला देवावरील विश्वास दृढ करण्यास आमंत्रित करीत आहे. आजच्या पहिल्या वाचनात आपण ऐकतो की, देव आब्राहामाला आपल्या एकुलत्या-एक पुत्राचा बळी देण्यास आज्ञा करतो. येथे परमेश्वर आब्राहमाच्या श्रद्धेची सत्वपरिक्षा
पाहतो व हयामध्ये आब्राहाम विजय मिळवितो दुसऱ्या वाचनात संत पौल रोमकरास पत्रात लिहितो की, परमेश्वराने
आपल्या स्वतःच्या एकुलत्या एका पुत्रास
मानवकल्याणासाठी अर्पण केले आणि तो
त्याच्या पुत्राद्वारे आपणास सर्व
काही देतो. तसेच शुभवर्तमानात येशूचे त्याच्या
तीन शिष्यांसमक्ष झालेल्या रुपांतराचे वर्णन ऐकावयास मिळते. आजच्या ह्या पवित्र मिस्सा-बलिदानात आपला विश्वास
मजबूत व्हावा म्हणून
प्रार्थना करूया.
मनन
चितंन:
आर्थर रॉबर्ट अश (Ashe) हा
इटली देशातला अतिशय नावाजलेला
टेनिसपट् होता. १९८३ मध्ये त्याच्या हृदयावर शस्त्रक्रिया करावी लागली. ज्यावेळी
त्याच्या शरीरात शस्त्रक्रिया करावी लागली
त्यावेळी त्याच्या शरीरात दुषित रक्त चढवल्यामुळे त्याला कर्करोगाची
लागण झाली.
त्यानंतर त्याच्या चाहत्याकडून त्याला अनेक पत्रे येत राहिली. त्यालीत एका पत्रात लिहलेले
होते इतक्या वाईट आजासाठी देवाने तुलाच का निवडले?
हया पत्राला उत्तर देताना आर्थर म्हणतो, पाच कोटी मुले टेनिस खेळू लागली, ५०
लाख मुले टेनिस खेळायला शिकली. व्यातीत ५ लाख मुले
व्यावसायिक टेनिस खेळाडू बनली.
त्यातील ५० हजार मुले टेनिस सर्किटमध्ये दाखल झाली. त्यातून ५ हजार मुले ग्रँडस्लॅम स्पर्धेसाठी
निवडली गेली. त्यालीन फन्त ५० टेनिसपटू
विम्बलडनसाठी निवडले गेले, त्यातील दोघे उपांत्य फेरीत आणि दोघे अंतिम फेरीत
पोहचले. त्या दोघांपैकी मी जेव्हा विम्बलडनसाठी विजेतेपदाचा करंडक उंचावला तेव्हा, मी देवाला कधीही विचारले नाही की, “माझीच निवड का केलिस?” मग
आता अश्या वेदना होत असताना, “माझीच निवड का केली?”, असे मी देवाला कसे विचारु. सराव तुम्हाला बळकट
बनवतो. दुःख आपल्याला माणूस बनवते. अपयश
आपल्याला विनम्रता शिकवते, यश
तुमच्या व्यक्तीमत्वाला धमक देते. परंतु
फक्त विश्वासच तुम्हांला पुढे
चालण्याची प्रेरणा देत असते.
आपल्याला आपल्या दैनंदिन जिवनात अनेक परिक्षेला सामोरे जावे लागते. तेव्हा आपल्याला नाकी कळते कि, आपला विश्वास, खरा
मजबूत आहे कि आपण विश्वास दुर्बल व खोल
आहे. जिवनाच्या परिक्षेत पास
(उत्तीर्ण) होने इतके सोपे नाही. देवाने
मोठमोठ्या लोकांची, संदेष्ट्यांची, प्रवत्याची
तसेच प्रसिद्ध लोकांची परिक्षा घेतली. आब्राहामाला आपण विश्वासाचा पिता सबोधतो. आजच्या पहिल्या वाचतात आपण ऐकतो कि, देवाने आब्राहामाची परीक्षा घेतली. त्याच्या एकुलत्या एक पुत्राचा, जो
देवाने त्याला दिला होता त्याचे बलिदान अर्पण करण्यास सागितले. आब्राहामाने आपली सहमती दर्शवली व त्याची त्याने तयारी
सुध्दा केली. देवाने आब्राहामाचा विश्वास बघितला. आब्राहाम देवाच्या परीक्षेत पास झाला व देवाने व्याला आशीर्वादित केले.
आजच्या शुभवर्तमानात आपण येशूचे
रुपांतर पाहतो प्रभू येशू आपल्या सोबत पेत्र, याकोब व योहान ह्यांना घेऊन उंच पर्वतावर जाऊन त्यांना आपल्या प्रतिष्ठेचे व गौरवाचे ओझरते दर्शन देतो. स्वर्गीय तेज प्रभू येशूच्या चेहऱ्यावर झळकत होते आणि मग मेघातून अशी वाणी झाली की, “हा माझा प्रिय पुत्र आहे, ह्याचे तुम्ही ऐका” परमेश्वर पिता येथे सुचवतो की, प्रभु येशू हा फक्त मानव नसून तो देव सुध्दा आहे. हयामागचा विशेष हेतू असा की, पित्याला
शिष्याचा विश्वास अधिक बळकट करायचा होता, कारण
काही दिवसापूर्वीच प्रभू येशूने स्वतःच्या
मरण व पुनरुत्थान हयाविषयी भविष्य सांगितले होते. म्हणूनच परमेश्वर
पिता येशूच्या शिष्यांची योग्य अशी तयारी
करीत होता, जेणेकरून ते ‘प्रभु येशू’ देवाचा पुत्र आहे असा
स्वीकार करतील.
प्रभु परमेश्वर आपल्या विश्वासाची परिक्षा नेहमी घेत असतो. आपला विश्वास मजबूत ठेवणे अगत्याचे आहे. आपण आपल्या समस्यांची प्रभु येशूच्या दुःखाबरोबर तुलनाही करू शकत नाही. म्हणूनच ह्या उपवास काळातील छोटे-मोठे प्रायश्चित व त्याग अतिशय आनंदाने करूया कारण प्रायश्चित काळ फक्त दुःखाचा काळ नसून आनंदाचा आहे. कारण आपण हया काळात आपल्या पित्याला काहीतरी परत देऊ शकतो ज्याने आपल्या तारणासाठी त्याचा एकुलता एक पुत्रास अर्पण केले.
विश्वासू लोकांच्या प्रार्थना
प्रतिसाद : हे प्रभू, तुझ्या जवळ येण्यास
आम्हाला सहाय्य कर.
१. हे सर्वसमर्थ, दयाळू पित्या, आज
आम्ही आमचे पोप फ्रान्सीस, महागुरु, धर्मगुरु, धर्मभगीनी, धर्मबंधू व सर्व प्रापं चिक याच्यासाठी प्रार्थना करतो जेणेकरून त्यांनी आपल्या कार्याद्वारे येशूची खरी साक्ष संपूर्ण जगाला करावी
म्हणून प्रार्थना करा.
२. ह्या
उपवास काळात सर्व भाविकांनी अतिशय पवित्र जीवन जगावे व प्रभूच्या अधिक जवळ यावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. दयाळू प्रभू, आजच्या
प्रभु रुपांतर सणाच्या दिवशी आमच्य हृदयाचे व
मनाचे परिवर्तन कर. जेणेकरून तूझे कार्य
करणासाठी सदैव आम्ही झटावे म्हणून प्रार्थना करतो.
४. आपल्या
प्रत्येकाच्या कुटुंबात शांती, प्रेम, ऐक्य सदैव नादत रहावे व आपण प्रभूच्या
प्रेमाने भरून जावे म्हणून प्रभूचरणी प्रार्थना करूया.
५. आता थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक हेतूंसाठी प्रार्थना करुया.
No comments:
Post a Comment