Reflection for the Homily of '18th Sunday in Ordinary Times' (02/08/15) By Ashley D'monty.
सामान्य काळातील अठरावा रविवार
सामान्य काळातील अठरावा रविवार
‘विश्वासाद्वारे येशू
आपले
भोजन
व
पेय
बनतो’.
दिनांक: ०२/०८/२०१५.
पहिले वाचन: निर्गम १६:२-४,१२-१५
दुसरे वाचन: इफिसिकारांस पत्र
४:१७, २०-२४
शुभवर्तमान: योहान
६:२४-३५
प्रस्तावना:
आज आपण सामान्य काळातील अठरावा रविवार साजरा करत आहोत. आजची उपासना आपणास शारिरिक गरजांपुरते मर्यादित न राहता
आध्यात्मिक जीवनाकडे वाटचाल करण्यास आमंत्रित करत आहे.
निर्गम पुस्तकातील पहिल्या वाचनात आपण ऐकतो,
देव मोशेद्वारे आपल्या प्रजेस फारोच्या गुलामगिरितुन मुक्त करतो. परंतु
हिच त्याची प्रजा शारिरिक भुकेपोटी
कुरकुर करते व
परमेश्वर त्यांना मान्ना देऊन
तृप्त करतो. दुस-या वाचनात संत पौल इफिसिकरांस पाठविलेल्या
पत्रात ख्रिस्ताठायी एक अध्यात्मिक
जीवन जगण्यास सुचित करीत आहे. तर योहानलिखित शुभवर्तमानात येशूख्रिस्त ‘जीवनाची
भाकर’
आहे व त्याच्याठायी
सर्वांस सार्वकालिक जीवन प्राप्त होते असे सांगत आहे. जो
ख्रिस्ताठायी
जीवन जगतो त्याला कधीच भुक
व तहान
लागणार नाही
कारण त्याची दृष्टी ही परमेश्वराकडे लागली आहे.
मानवी जीवन हे केवळ शारिरिक गरजांपुरते
मर्यादित नसुन त्याचा कल आध्यात्मिक जीवनाकडे असायला
हवा. आपली
शारिरिक व आध्यात्मिक
प्रगती
आपल्या
ख्रिस्तावर असलेल्या
विश्वासाद्वारे होत असते. आपला हा विश्वास अधिकाधिक दृढ व्हावा व आपण
ख्रिस्ताठायी
नवजीवन जगावे म्हणून या मिस्साबलिदानात प्रार्थना करुया.
सम्यक
विवरण
पहिले
वाचन: निर्गम १६:२-४,१२-१५
इस्रायली
जनतेचे
वाळवंटातील
भोजन:
परमेश्वराने
इस्रायली जनतेला आपल्या अदभूत चमत्काराने फारोच्या गुलामगिरितुन मुक्त केले. मोशेच्या
नेतृत्वाखाली ते आता परमेश्वराने आश्वसित केलेल्या ठिकाणी प्रयाण करत होते. त्यांची
ही वाट्चाल फार खडतर होती कारण ते
अरण्यातून प्रवास करत होते. ह्या लोकांकडे अन्नसुदधा नव्हते. त्यामुळे
इस्रायली जनतेने देवाविरुदध मोशेकडे कुरकुर सुरु केली. ज्या
देवाने आपल्या अदभुत
चमत्काने इस्रायली
जनतेस फारोच्या गुलामगिरितुन मुक्त केले त्याच देवाचा आता त्यांना
विसर पडला. त्यांनी भोजनासंबंधी देवाकडे याचना करण्याऐवजी तक्रार केली. ते
आपला देवावरील विश्वास
जणु गमावून बसले होते. परंतु
परमेश्वराला आपल्या जनतेचा कळवळा आला व त्यांच्यासाठी
स्वर्गातून मान्ना पाठवला. इतकेच
नव्हे तर मांस म्हणुन पक्षीसुदधा पाठविले व आपल्या
जनतेस तृप्त केले.
पुढे जात असता इस्रायली
जनतेला पाण्याची टंचाई भासू लागली. दुर्दैवाने
लोकांनी पुन्हा मोशेकडे तक्रार केली. परमेश्वराच्या सर्व उपकारांचा त्या लोकांना विसरच पडत होता. आपल्या
शारिरिक गरजा भागविण्यापलीकडे त्यांना
काहीच
सुचत नव्हते. देव
पुन्हा त्यांची वाणी ऐकतो व खडकातून
त्यांस पाणी पुरवितो व त्यांची
तहान भागवतो. हा
प्रवास चाळीस वर्षे चालला व देवाने
आपल्या प्रजेस प्रत्येक संकटातून वाचविले. परंतु
लोकांनी
मात्र त्याची परतफेड अविश्वासाने व अनउपकाराने
केली. तरीही, परमेश्वराने
आपल्या प्रजेवर सातत्याने प्रेमाचा व करुणेचा
वर्षाव केला.
दुसरे
वाचन: इफिसिकारांस पत्र ४:१७, २०-२४
‘ख्रिस्तावर विश्वास ठेवणे म्हणजे काय’
हे संत पौल आपल्या ख्रिस्ती बांधवाना
स्पष्टपणे सांगत आहे.
संत पौल इफिसिकरांस
पाठविलेल्या पत्रात
म्हणतो, ‘आपले कुमार्ग सोडा आणि
ख्रिस्ताला आत्मसात करा कारण ख्रिस्ताविना
जीवन हे व्यर्थ आहे’. अविश्वासू मनुष्याला आपण कोठून आलो व कुठे
चाललो याची अजिबात जाणीव नसते. ती व्यक्ती एका जंगलात हरवलेल्या, दिशाहिन
असलेल्या व्यक्तीसारखी असते. कित्येक
वेळा ती व्यक्ती प्रवास सुरु केलेल्या जागी
फिरुन फिरुन परत येते,
कारण त्या
व्यक्तीच्या जीवनात ध्येय नसते. याउलट
ख्रिस्ती व्यक्तीच्या जीवनात स्पष्ट ध्येय असावे, त्या
व्यक्तीची वाटचाल ही स्वर्गाकडील
असावी. स्वर्गीय मार्गक्रमण
करत असताना विश्वास दिशा दाखवुन काय करावे व काय
टाळावे हे सांगत असतो.
ख्रिस्तामध्ये विश्वासु असणे म्हणजे पुर्णपणे एका नविन जीवनाला प्रारंभ करणे
होय. पौल
जीवनाची अंगरख्याशी तुलना करतो. ख्रिस्ती
व्यक्तिने आपल्या पापांचा जुना अंगरखा काढुन टाकून आत्म्याने परिपुर्ण होऊन नविन अंगरखा परिधान करावा. विश्वास म्हणजे जणू ख्रिस्तालाच अंगिकारणे,
ख्रिस्ताचे विचार आत्मसात करणे, ख्रिस्ताप्रमाणे बोलणे, प्रत्येक
क्षणी ख्रिस्त ज्याप्रमाणे वागला तसेच वर्तन आताच्या काळी ठेवणे होय.
शुभवर्तमान: योहान ६:२४-३५
जीवनाची
भाकर मीच आहे. जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो त्यास
सार्वकालिक जीवन प्राप्त होते.
लोक
आपली शारिरिक भूक बाजुला सारुन येशूची शिकवणूक ऐकत होते. त्यामुळे
ख्रिस्ताला त्यांचा कळवळा आला. तसेच
ज्याप्रमाणे गुरु शिष्यांना उदाहरणाद्वारे अवघड बाबी समजावून सांगत असतो त्याचप्रमाणे ख्रिस्ताने चमत्काराद्वारे यहुद्यांना
आपली पुढील शिकवणूक समजावून सांगितली. हि
पुढील शिकवणूक म्हणजेच आजचे शुभवर्तमान होय.
योहानाच्या शुभवर्तमानातील सहावा अध्याय जर आपण काळजीपुर्वक वाचला तर त्यामध्ये यहुद्यांनी येशूला विचारलेले सहा प्रश्न आढळतात. त्यातील
तीन प्रश्न हे आजच्या शुभवर्तमानात नमूद केलेले
आहेत. ह्या
प्रश्नांवरुन आपणास यहूदी लोकांनी ख्रिस्तावर विश्वास का ठेवला नाही याचे उत्तर मिळते.
अ) गुरुजी आपण येथे कधी आलात?
येशूने
ह्या प्रश्नाला उत्तर न देता
सरळ आपल्या शिकवणूकीला हात घातला. येशू
म्हणतो, ‘केवळ शारिरिक भूक भागविण्यात गुंग राहू नका,
कारण त्याने फक्त अल्प काळासाठी जीवन मिळते. त्याविरुद्ध, आध्यात्मिक
भोजनाने तृप्त
व्हा;
कारण त्यामुळे सार्वकालिक जीवन प्राप्त होते. हे
आध्यात्मिक भोजन मी तुम्हास देत आहे.
ब) आम्ही काय करावे अशी परमेश्वराची इच्छा आहे?
येशूने
उत्तर दिले, तुम्ही
त्या देवावर विश्वास ठेवा ज्याने मला पाठविले आहे. अर्थातच, तुम्ही
माझ्यावर विश्वास ठेवा.
क) आपण आम्हास कोणते चिन्ह
दाखवता?
ते
जणू विचारत होते, आम्ही
तुम्हावर विश्वास का ठेवावा? चमत्काने
सिदध करा कि आपण देवाकडून आला आहात. आम्ही
मोशेवर विश्वास ठेवला कारण त्याने आमच्या पुर्वजांना अरण्यात मान्ना खावयास दिला. आपण
आम्हासाठी काय करु शकता?
किती
आंधळेपणाने वागणारे हे यहुदी! ख्रिस्ताने
आद्ल्या संध्याकाळीच पाच हजारांना जेवू घालून एक मोठा चमत्कार केला. तरीसुदधा
ते म्हणाले आपण कोणते कृत्य करता?
येशू
मात्र शांतपणे त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देत म्हणतो, ‘तुम्ही मोठ्या गर्वाने मोशेने मान्ना दिल्याचे सांगता परंतू तो मोशे नसून माझा स्वर्गीय पिताच होता ज्याने तुम्हास मान्ना खावायास दिला. तोच मान्ना पित्याने आतासुदधा
पाठविला आहे व तो
मीच आहे. मीच
ते स्वर्गीय भोजन
आहे जे सर्व जगाला जीवन देते.
यहुद्यांचा
गर्व त्यांना
येशूची शिकवणूक समजू देत नव्हता. ते
अजुनही शारिरिक भुक भागविण्यामागे लागले होते. जे
सोईस्कर व चांगले
असून त्यासाठी त्यांना
काम करावे लागणार नव्हते. त्यामुळेच
ते येशूला विचारतात, प्रभूजी, ही भाकर आम्हास नित्य द्या. येशू
त्यांचा गर्विष्ट्पणा व स्वार्थ
बाजुला सारुन म्हणतो, ‘मीच ती
जीवनाची भाकर आहे; जो
माझ्याकडे येतो त्याला कधीही भूक लागणार नाही आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला कधीही तहान लागणार नाही’.
जे
येशूवर विश्वास ठेवतात तो त्यांचे भोजन बनतो. ज्याप्रमाणे
भोजन शारिरिक भुक भागवते त्याचप्रमाणे येशू आध्यात्मिक भूक भागवतो. तो
आत्म्यास तृप्त करतो. येशूशिवाय
आत्म्यास तृप्त करण्याचा दुसरा
पर्यायच नाही. येशूला
जर बाजुला सारले तर आत्म्याचे अस्तित्व नाहीसे होईल. जे
भोजन आपण दररोज सेवन
करतो आणि जे येशू आपणास देतो यामध्ये थोडा फरक आहे. आपण
सेवन केलेल्या भोजनाचे रुपांतर मांस, रक्त
व हांडामध्ये
होते. जेव्हा
आपण येशूला स्विकारतो, तो
आपले त्याच्या स्वत:मध्ये
रुपांतर करतो. हे
एक हळूवार रुपांतर आहे.
बोधकथा
१. एकदा
नेपोलियन व त्याचा
मित्र जीवनाविषयी बोलत होते. बोलता
बोलता अंधार पडला. ते
दोघेही खिडकीजवळ आले व बाहेर
पाहू लागले. दूर
आकाशात तारे चमकत होते, प्रकाशबिंदूप्रमाणे
ते दिसत होते. नेपोलियनची
नजर तिक्ष्ण होती;
तर त्याच्या मित्राची मात्र थोडी कमकुवत होती. आकाशाकडे
दर्शवित नेपेलियनने विचारले, ‘तुला हे तारे दिसतात का’? मित्राने उत्तर दिले, ‘नाही,
मला ते दिसत नाहित’. नेपोलियन म्हणाला, ‘तुझ्यात आणि माझ्यात नेमका हाच फरक आहे. ऐहिक
जीवनात गुरफट्लेला मनुष्य केवळ अर्ध्ये जीवन जगतो. दुर
दृष्टी असलेला मनुष्यच फक्त साता-समुद्रा पलिकडे पाहू शकतो, केवळ
तोच तारे पाहू शकतो’.
२. मी
एका पॅरिश मध्ये असताना तेथे एक पाळीव कुत्रा होता. हा
कुत्रा फार हुशार होता, कुणाही
अनोळख्या व्यक्तीला सहजा-सहजी
तो आत येऊ देत नसे. मला
तो कुत्रा फार आवडु लागला. मीच
त्याला रोज जेवण घालू लागलो. तो
माझ्याबरोबर खेळू लागला. मी
पॅरिशमध्ये प्रवेश केला कि तो माझ्या मागे पुढे पळत असे, त्याची
शेपटी तो जोरात हलवत असे. हे
दृष्य पाहुन मला खुप आनंद होई. पण
काही दिवसांनी माझ्या लक्षात आले की, माझ्यावर हा कुत्रा माया केवळ मी देत असलेल्या जेवणामुळेच करतो व मी
त्याचे मनोरंजन करतो. मला
फार वाईट वाटले कारण हा कुत्रा वेगळ्याच कारणार्थ माझ्याशी लळा लावून बसला होता.
अशाच प्रकारे ख्रिस्ताची सुदधा आजच्या शुभर्तमानात निराशा होताना पाहतो. त्याच्या
लक्षात आले की, लोक हे भूक भागवण्याकरीता त्याच्यापाठी धावत होते. आपण
कोणत्या दिशेने व कशासाठी
येशू मागे जात आहोत हे लक्षात घेणे फार गरजेचे आहे.
मनन- चिंतन
प्रभू
येशू आजच्या शूभवर्तमानात दुहेरी संदेश देत आहे. येशू
ही परमेश्वराची आपणास फार मोठी देणगी आहे व आपण
सर्वानी त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. हा
दुहेरी संदेश म्हणजे आपली ख्रिस्ताविषयी असलेली मनस्थितीच होय. आपला ख्रिस्ती विश्वास हा पुर्णत्वास शेजारप्रीतीने येतो. म्हणून
आपला शेजा-यावरही
आपला विश्वास असणे गरजेचे आहे. आपला
शेजारी हा सुदधा परमेश्वराची एक देणगी आहे. ते
देवाने आपल्या प्रतिरुपाप्रमाणे निर्मिलेले
आहेत व ते सुद्धा पवित्र आत्म्याची मंदिरे आहेत.
ज्या चुका ईस्रायली जनतेने केल्या त्याच चुका येशूच्या काळातही लोकांनी केल्या व आजही
आपण त्याचीच पुनरावृत्ती करीत आहोत. आपली परिस्थिती ही ‘गरज
सरो व वैद्य
मरो’
ह्या म्हणी प्रमाणे झाली आहे. जोपर्यंत
आपणाला परमेश्वर सर्व काही देत आहे तो तोपर्यंत आपणास त्याची आठवण पडत नाही. थोडे
काही उणे पडल्यास
लगेच कुरकुर सुरु होते. अडी-अडचणीच्या, संकटाच्या
वेळी आपण देवाचा धावा करतो पण आनंदाच्या क्षणी मात्र आपणाला देवाचा विसरच पडतो. संकटात
आपण तासणतास देवाचा धावा करतो परंतु आनंदाच्या वेळी मात्र आम्हास देवासाठी फारसा वेळ नसतो, आम्ही
शॉर्टकट
वापरतो कारण आमचे कार्यक्रम महत्वाचे असतात. हिच
का आमची ख्रिस्ती श्रदधा? हाच
का आमचा अढ्ळ विश्वास?
आपण
‘प्रेषितांचा
विश्वासांगिकार’
ही प्रार्थना म्हणत असताना मोठ्याने म्हणतो, त्याचा
एकुलता एक पुत्र आमुचा प्रभू येशू ख्रिस्त यावर माझा विश्वास आहे. हा
विश्वास आपण निव्वळ
असा म्हणतो, परंतु तो त्याहून अधिक मोलाचा आहे. मी
येशूवर विश्वास ठेवतो म्हणजे:
१. मी येशूची शिकवणूक खरी म्हणुन आत्मसात करतो.
२. मी त्याच्या सर्व आज्ञा पाळीन.
३. मी माझे सर्वस्व त्याच्याठायी त्यागीन.
४. मी विश्वास धरीन की, जे काही माझ्या आयुष्यात घडते ते त्याच्या प्रेमामुळेच घडते.
म्हणजेच ख्रिस्ताविषयी विविध पुस्तके वाचली म्हणजे झाले असे नाही, संपुर्ण
पवित्र शास्त्र माहित असणे किंवा विविध धार्मिक कार्यात सहभाग घेतला म्हणजे झाले असेही नाही तर ख्रिस्ताला माझ्या जीवनाच्या शिरोभागी स्थान देणे होय. ख्रिस्ताला
जीवनाचा केंद्रबिंदु बनविणे होय. म्हणून
त्यासाठी लागणारी विशेष कृपा परमेश्वराकडे मागुया.
विश्वासू
लोकांच्या
प्रार्थना
प्रतिसाद: हे प्रभो आमचा विश्वास दृढ कर.
१) आपले परमगुरु, महागुरु, धर्मगुरु व सर्व
व्रतस्थ बंधु-भगिनी
यांचा ख्रिस्तावरील विश्वास
अधिकाधिक दृढ व्हावा व त्याद्वारे
आपल्या ख्रिस्ती लोकांचा विश्वास त्यांनी बळकट
करावा म्हणून आपण प्रार्थना करुया.
2) आपल्या
ख्रिस्ती समुहात असलेल्या
ख्रिस्तावरील विश्वासाद्वारे
आपण एकमेकांवर प्रेम करण्यास प्रवृत्त व्हावे म्हणून आपण प्रार्थना करुया.
३) आपण सर्वांनी येशूवर केवळ अड्चणीच्या वेळी नव्हे तर प्रत्येक क्षणी विश्वास ठेवावा म्हणून प्रार्थना करुया.
४) जे लोक देवापासून दूर गेले आहेत, ज्यांचा
ख्रिस्तावर अजिबात विश्वास नाही अश्यांना
जाणीव व्हावी की येशूविना
जीवन जगणे असहाय व व्यर्थ आहे
तसेच त्यांनी लवकर
श्रदधेत परत यावे म्हणून आपण प्रार्थना करुया.
५) स्वार्थीपणा, गर्विष्ट्पणा हा ख्रिस्ताच्या शिकवणूकीस बाधा
आणत असल्यामुळे तो बाजूला सारुन ख्रिस्तमय होण्यास आपण प्रार्थना करुया.
६) थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक, सामाजिक गरजांसाठी प्रार्थना करूया.
No comments:
Post a Comment