Wednesday, 16 October 2019


Reflection for the Homily of Mission Sunday (20-10-2019) By Fr. Michael Fernandes.

                                                                





मिशन रविवार




दिनांक: २०/१०/२०१९
वाचन: निर्गम १७:८-१३ 
दुसरे वाचन: २ तिमथी  ३:१४-४:२
शुभवर्तमान: लूक १८: १-८

प्रस्तावना:

     आज देऊळमाता सामान्य काळातील एकोणतिसावा रविवार त्याचबरोबर मिशन रविवार साजरा करीत आहे. सर्व साधारणपणे मिशनह्या शब्दाचा अर्थ पाठवलेलाआपल्या स्नान-संस्काराद्वारे ख्रिस्तसभा आपल्याला जगाच्या कानाकोपऱ्यात सुवार्ता पसरविण्यासाठी पाठवत असली तरी मिशन कार्य सर्वात प्रथम घरात सुरु करायला सांगत आहे. Charity begins at home.
मिशन रविवार साजरा करणे म्हणजे नेमके काय करणे? मिशन रविवार साजरा करणे म्हणजे केवळ प्रार्थना करणे (to pray), आज्ञाधारकपणे (obey) जे काही ख्रिस्तसभा सांगेल ते ऐकणे आणि दान पेटीत (to pay) पैसे टाकण्यापर्यंत मर्यादित नाही तर आपल्याला मिळालेल्या स्नान-संस्काराद्वारे ख्रिस्त जगात प्रकट करणे होय. ह्या मिस्साबलीदानात सहभागी होत असता खरे मिशनरी बनण्यास देवाची कृपा मागुया.

सम्यक विवरण:

पहिले वाचन: निर्गम १७:८-१३

निर्गम पुस्तकातून घेतलेल्या वाचनात मोशे यहोशवाला आपल्यातले काही पुरुष निवडून आमालेकाशी युद्ध करण्यास सांगतो. जोपर्यंत मोशे टेकडीच्या माथ्यावर देवाची काठी घेऊन उभा राहतो तोपर्यंत यहोशवा पराक्रमी होतो. पण मोशेचा जेव्हा हात खाली होत असे तेव्हा आमलेकाची सरशी होई.
     पहिल्या वाचनांत जोपर्यंत मोशे हातात देवाची काठी पकडतो, तेव्हा इस्रायल सरशी होत असतात. ती मोशेची काठी नसून देवाची काठी होती. यहोशवा व मोशे हे आमालेकाच्या विरुद्ध युद्ध जिंकलेले नसून देवच ते युद्ध जिंकत असतो.

दुसरे वाचन: २तिमथी  ३:१४-४:२    

संत पौल आपला शिष्य तीमथी ह्याला तो बालपणापासून जे काही शिकलेला आहे त्याच्यावर विश्वास ठेवून तारणासाठी सज्ज होण्यास सांगत आहे. विशेषकरून पवित्र शास्राचा सद्बोध घेऊन नीतिशिक्षणाकरिता देवाचे भक्त व चांगल्या कामासाठी सज्ज होण्यास त्यास संत पौल सांगत आहे.

शुभवर्तमान: लूक १८: १-८

लूकच्या शुभवर्तमानात आपल्याला अत्याग्रही विधवाव जुलमी न्यायाधीशाचा दाखला देण्यात आलेला आहे. अत्याग्रही विधवा सातत्याने न्याय मिळविण्यासाठी न्यायाधीशाकडे जात असते. तेव्हा जुलमी न्यायाधीश म्हणतो, ‘मी देवाला भीत नाही किंवा माणसांना जुमानीत नाही तरी ह्या विधवेचा त्रास मला सहन होत नाही आणि तिला न्याय मिळवून देतो’. अत्याग्रही विधवेचा आणि जुलमी न्यायाधीशाचा संवाद ऐकून येशू आपल्याला एक विशिष्ट बोध देत आहे, तो म्हणतो, ‘अन्यायी न्यायाधीश जर असा वागत असेल, तर आपला स्वर्गीय पिता जे त्याच्याकडे रात्रं-दिवस धावा करतील त्यांना न्याय देणार नाही काय?’
मनुष्य मनुष्याला चांगला न्याय देऊ शकत नसला तरी , खऱ्याचे खोटे करून आणि खोट्याचे खरे करून अनेक खटले जिंकल्याचे आपण ऐकतो परंतु देवाचा न्याय रास्त आणि सत्याशी एकनिष्ठ आहे. खऱ्या-खोट्याचा खेळ तेथे खेळला जात नाही.
     येशूच्या काळात स्रीला दुय्यम स्थान दिले जात असे; आणि विधवेची तर अवहेलना केली जात असे. तिला समाजात स्थान आणि मान नसताना ती एखाद्या पुरुष्याच्या घरी परत परत गेली तर ती एक घृणास्पद गोष्ट मानली जात असे. परंतु ती अत्याग्रही विधवा आपल्याला दाद आणि न्याय मिळेपर्यंत त्या जुलमी न्यायाधीशाकडे जात असे. म्हणून प्रार्थना करताना खचून न जाता सातत्याने आणि सदा सर्वदा आपण प्रार्थना करावी हाच ह्या दाखल्याचा विशेष मुद्दा आपणास पटवून देण्यात आला आहे.

मनन चिंतन:

          येशू ख्रिस्ताचा प्रकाश अनुभवून तोच दिव्य आणि पवित्र प्रकाश जे अंधकारात आहेत त्यांना त्या दिव्य प्रकाशात आणणे व ख्रिस्ताची ओळख करून देणे तीच व्यक्ती खरी मिशनरी. एक मिशनरी जो देवाची उपस्थिती आपल्या हृदयात व जीवनात अनुभवल्या नंतर तीच तो दुसऱ्यांना आपल्या पित्याची साक्ष नेहमी अनुभवली त्या द्वारे त्याने तारण कार्य व देवाचे राज्य पसरविण्यांस एक मोठा मिशनरी झाला. ख्रिस्तामध्ये असलेली देवाची उपस्थिती सर्व लोकांमध्ये दिसावी म्हणून मिशनरी कार्य करत असतो. मिशनरी ख्रिस्तमय जीवन जगून लोकांमध्ये अर्थपूर्ण नातेसंबंध जोडतो, देवाच्या पवित्र मनात आणि हृदयात उभे करत असतो.
          मिशनरी दया व प्रेम ह्याद्वारे आपल्या भोवती असलेल्या लोकांवर व समाजावर ख्रिस्ताचा प्रकाश पसरवत असतो. देवाच्या पवित्र शब्दाद्वारे मिशनरी  समाजात देवा विषयी प्रीती निर्माण करतो. समाजात असलेली अनिश्चितता, अहंकार, भीती, विश्वासाचा अभाव व कमजोरी मिशनरी ख्रिस्ताच्या जीवनाद्वारे तो दूर करून प्रेमाने साम्राज्य निर्माण करतो. मिशनरी ख्रिस्ताच्या अनुभवाद्वारे भिती व चिंता दूर करून लोकांना ख्रिस्ताजवळ आणतो.
          मिशनरी हे सर्व करताना तो स्वतःला विसरत असतो. तो लोकांची सेवा करण्यात मग्न असतो. देवाचे राज्य व त्या राज्यात लोकांनी कसे राहावे ह्यासाठी तो रात्रंदिवस प्रयत्न करत असतो. देवाशी लोकांचा पवित्र शब्दाद्वारे समेट व एकी कशी निर्माण करावी ह्यासाठी मिशनरी येशू सारखे जीवन जगत असतो. मिशनरी येशू प्रमाणे त्याग करून लोकांना आपल्या जीवनाचे घटक बनवतो. तो लोकांप्रमाणे साध व गरीबीचे जीवन जगून त्यांची येशूवर श्रद्धा व विश्वास वाढविण्यासाठी मदत करतो. मिशनरी अहोरात्र लोकांबरोबर राहून त्यांचे दुःख व समस्या आपल्या  स्वतःवर घेत असतो. मिशनरी आपल्या जीवनाद्वारे खिस्ताला जाहीर  पणे प्रकट करत असतो. तो स्वतःचा विचार करत नाही पण लोकांमध्ये आनंद व शांती, त्यांना देव कसा अनुभवता येईल, तारणमय जीवन कसे जगता येईल त्यासाठी देवाकडे प्रार्थना करत असतो.
          उदाहरण: आमचे Capuchin Italian मिशनरी केनिया इथे अनेक वर्षापासून ख्रिस्ताची सुवार्ता पसरवत आहेत. जंगलात, दऱ्या-खोऱ्यात व डोंगरावर राहणाऱ्या लोकांना ख्रिस्ताची ओळख करून देत आहेत. घरापासून इतक्या दूरच्या देशात येऊन फक्त ख्रिस्ताला हृदयात घेऊन आलेले मिशनरी लोकांसाठी मरण पावले. असेच एक Capuchin मिशनरी एका जंगलात राहून लोकांची सेवा करत होते. त्यांना अस्थमाचा आजार होता व त्यामुळे त्यांना खूप त्रास होत असे. एक दिवशी गावात लोकांना भेटत असताना त्यांना शेळीचे दुध पिण्यास दिले व दुसऱ्या दिवशी त्यांचा अस्तमा बरा झाला. काही लोकांनी पैसे  गोळा करून त्यांच्यासाठी दोन शेळ्या विकत घेतल्या. दररोज  शेळीचे दुध प्याल्यानंतर त्यांना बरे वाटायचे.
          एक दिवस एक गरीब व्यक्ती दूरच्या गावातून फादरना भेटण्यास येते. त्या व्यक्तीला पैश्याची गरज होती करण त्याची बायको आजारी व तीन मुलांना खाण्यास अन्न नव्हते. त्या व्यक्तीने फादरना शेळ्या देण्यास विनंती केली. फादरनी कसलाही विचार न करता त्या दोन शेळ्या त्या व्यक्तीला दान म्हणून दिल्या. दुसऱ्या दिवसा पासून त्यांना पुन्हा अस्तामाचा त्रास होवू लागला. अनेक दिवस ते आजारी होते. गावात लोकांना भेटण्यास येत नाही म्हणून लोक त्यांना भेटण्यासाठी जात. फादर मृत्यू पावले होते. गरिबासाठी आपले जीवन अर्पूण ख्रिस्तासारखे बलिदान केले.
          मिशनरी सर्वावर प्रीती करून ख्रिस्त अजून जिवंत आहे असे दर्शवितो. शेजारी कोण? मिशनरी सर्वाना ख्रिस्ताचे प्रेम देऊन जे अंधारात आहेत त्यांना प्रकाश देणे. शेजारी जो देवाच्या प्रेमासाठी भुकेला, तान्ह्लेला असतो तो शेजारी. ज्यांना  नाव आणि चेहरा नाही करण तो गरीब आहे त्याला ख्रिस्ताच्या प्रेमाद्वारे माणूस म्हणून स्विकारले जाते.
          मिशनरी एकमेकांत व समाजात प्रीतीचे पूल बांधत असतात. हे प्रीतीचे व विश्वासाचे पूल देवाच्या शब्दावर उभारलेले असतात. ख्रिस्ताच्या कृपेद्वारे मिशनरी समाजात जी फुट पडलेली असते. ती ख्रिस्त स्पर्शाद्वारे भरून काढतो. ज्या भेदाच्या  उभारल्या आहेत. त्या तोडून एक कुटुंब व समाज देवाच्या उपस्थितीत निर्माण करतो. फक्त प्रेम प्रसरविणे समाजात हे ध्येय मिशनरी आपल्या मनात ठेवून येशू ख्रिस्ताचे नाव व शुभवर्तमान तो पसरवित असतो. ह्या ख्रिस्त प्रीतीला सीमा, जात पात नाही.
          मिशन रविवार देवाची शुभवार्ता लोकांना देण्यासाठी प्रथम ख्रिस्ताला आपला तारणकर्ता म्हणून स्विकारावा लागेल. येशूच्या शिकवणी नुसार आपले मानवी व आध्यात्मिक जीवन हे समाजात व देऊळमातेत जे गरीब व गरजू आहेत त्यांना देवाची प्रीतीत व श्रद्धेत आणावे.  येशू ख्रिस्ताने समाजात एकमेकांशी प्रेमाचे संबंध जोडण्यास पूर्णपणे वचनबद्ध राहिला व सर्वांना देवाच्या राज्यांची गोडी लावली.
          प्रत्येक मिशनरी हाच ख्रिस्ताचा बोध, शिकवण व संदेश घेऊन लोकांमध्ये जातो. मिशनरी आपल्या जीवनाद्वारे ख्रिस्त प्रगट करतो. स्वातामध्ये असलेला जिवंत ख्रिस्त तो शुभवर्तमानाद्वारे लोकांना देत असतो. प्रत्येकाचे कार्य व मिशन एकच, ते म्हणजे सर्व लोकांमध्ये ख्रिस्ताचा चेहरा ओळखावा व त्यांची सेवा करावी. प्रत्येक ख्रिस्ती हा मिशनरी आहे. जो सेवा करण्यासाठी आपल्या मनात व हृदयात असलेली भीती व अनिश्चितता टाकून लोकांमध्ये ख्रिस्ताचा चेहरा पाहतो. सेवा करत असलेल्या लोकांना ख्रिस्ताच्या प्रीतीत परिवर्तन करावे व ख्रिस्ताचे अस्तित्व व ओळख घेण्यासाठी त्यांना शुभवर्तमान शिकवतो. ख्रिस्त हा खरा देवाचा पुत्र जो शब्द होऊन देह झाला, आम्हामध्ये राहिला, आपल्या जीवनाचा तो खरा मार्ग, सत्य व जीवन झाला.
          मिशन रविवारी एक प्रेमाचे, सेवेचे बंधन व संबंध निर्माण करण्यास येशूची शिकवण लोकापेर्यत पोहचविण्यास आमंत्रण देत आहे. असा समाज व देऊळ माता निर्माण करावी की जेथे ख्रिस्ताच्या शब्दाला मान व सन्मान मिळेल. देवाची कृपा व आशीर्वाद सर्वांना उपलब्ध आहेत जर ख्रिस्ताला जीवनाचा राजा व भाकर स्वीकारली  तर येशू जिवंत भाकर एकमेकांची सेवा व आधार देण्यास आपल्या जागामध्ये पाठवत असतो. आज जागात गरज आहे. ती सलोखा व बंधू भावाचे संबंध निर्माण करण्याची. देवाच्या सुवर्तेद्वारे ख्रिस्त आपल्यात व दुसऱ्यामध्ये हजर असतो व परीवर्तन करून एक सुंदर व निर्मळ जगण्यास कृपा देतो अशी शिकवण प्रत्येक ख्रिस्ती जानांनी द्यावी.    

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: ऐकावी प्रार्थना, करतो मी याचना.’

१. आपल्या धार्मिक नेत्यांनी, देऊळ मातेची शिकवणूक सर्व ख्रिस्ती लोकांपर्यंत पोहचवावी व त्यांना ती योग्यरीतीने आचरणात आणण्यासाठी मदत करावी म्हणून आपण प्रार्थना करूया.
२. ज्या धर्मगुरुनी, धर्मभगिनींनी व प्रापंचीकांनी स्वत:ला मिशन कार्यासाठी वाहून घेतलेले आहे अशा निष्ठावंतांवर परमेश्वराच्या कृपेचा वरदहस्त सदैव असावा व त्यांना त्यांच्या कृत्यातून प्रभूची सुवार्ता पसरविण्यास धैर्य लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
३. आपल्या धर्मग्रामातील आजारी व्यक्तींना चांगले आरोग्य, बेरोजगारांना रोजगार आणि दुःख-संकटात सापडलेल्यांना प्रभूचे दैवीसामर्थ्य प्रदान व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया.
४. ख्रिस्ती श्रद्धेमुळे ज्या ज्या लोकांवर अन्याय, अत्याचार होत आहेत, त्यांना ख्रिस्ती श्रद्धेशी एकनिष्ठ राहण्यासाठी प्रभूचा कृपाशिर्वाद मिळावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
५. सर्व पत्रकारांनी त्यांचे कार्य करीत असता नैतिकता व सत्यता ह्यांनी प्रेरित व्हावे आणि सामान्य शोषित जनतेसाठी ते प्रवक्ते बनावेत म्हणून प्रार्थना करूया.
६. थोडावेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक व कौटुंबिक हेतूंसाठी प्रार्थना करूया.


           

No comments:

Post a Comment