Thursday, 21 April 2022

Reflection for the Second Sunday of Easter (24/04/2022) By: Br. Pravin Bandya.



पुनरुत्थान काळातील दुसरा रविवार




दिनांक: २४/०४/२०२२

पहिले वाचन: प्रेषितांची कृत्ये :१२-१६

दुसरे वाचन: प्रकटीकरण : -१३, १७-१९

शुभवर्तमान: योहान २०:१९-३१

 




प्रस्तावना:

पुनरुत्थानकाळातील दुसरा रविवार हा दैवी रविवार म्हणून साजरा केला जातो. आजची उपासना पुनरुत्थित प्रभु येशू ख्रिस्ताची प्रभावी साक्ष देणाऱ्या श्रद्धावंताविषयी आपल्याला विचार करायला लावते. आजच्या पहिल्या वाचनामध्ये आपण प्रेषित प्रभू येशूच्या नावाने लोकांना रोगमुक्त करतात ह्याबद्दल ऐकतो. तर दुसऱ्या वाचनात संत योहानला वैभवशाली येशूचे दर्शन घडते. तसेच आपण शुभवर्तमानामध्ये पाहतो की, पुनरुत्थित ख्रिस्त शिष्यांना दर्शन देतो. ख्रिस्ताच्या दर्शनाने भयभीत झालेले शिष्य आनंदित होतात आणि प्रभू येशूख्रिस्त त्यांना शांतीच्या दनाने परिपूर्ण करतो.

आपण ह्या जगामध्ये जीवन जगत असतांना आपली किंवा आपल्या कुटुंबाची शांती निघून गेली असेल तर आज पुनरुत्थित ख्रिस्तकडे शांतीच्या दानासाठी प्रार्थना करूया.

 


मनन चिंतन:

आज आपण पुनरुत्थान काळातील दुसरा रविवार साजरा करीत आहोत. शिवाय दैवी दयेचा रविवार देखील साजरा करीत आहोत. आजच्या दिवशी ख्रिस्तसभा आपल्याला पुनरुत्थित ख्रिस्ताचे दर्शन घेण्यास बोलावत आहे. आजच्या शुभवर्तमानामध्ये आपण पाहतो की, संत थॉमस हा चिकित्सक वृत्तीचा होता. येशूला स्पर्श केल्याशिवाय आपण विश्वास ठेवणारच नाही असा आग्रह त्याने धरला. मात्र एकदा का त्याला पुनरुत्थित ख्रिस्ताचे दर्शन झाले, तेव्हा त्याने पुनरुत्थित ख्रिस्ताविषयी कबुली दिली की, माझा प्रभू व माझा देव.

पहिल्या वेळेस संत थॉमस हा ख्रिस्ताच्या दर्शनास मुला. कारण, त्याने सुरवातीला पुनरुत्थित ख्रिस्तावर विश्वास ठेवला नाही. आपलं जीवन देखील तशाच प्रकारे आहे. कधी-कधी ख्रिस्त आपल्याला दर्शन देतो, पण आपल्याला त्याचा अनुभव येत नाही.

एकदा राज्यामध्ये बातमी पसरलेली होती की, त्या राज्यातील महाराणीचा कोट्टी रुपयांचा सोन्याचा हार चोरीला गेला आहे. म्हणून सर्व लोकं त्या हाराच्या शोधामध्ये होते. एका व्यक्तीने विचार केला की, हा हार कोणा पक्षाने आपल्या चोचीमध्ये उचलुन नेला असेल. ह्या विचाराने तो व्यक्ती सोन्याचा हार शोधण्यासाठी जंगलाच्या दिशेने निघाला आणि नदीच्या काठावरून चालत असतांना त्याला तो हार नदीमध्ये दिसला. हार काढण्यासाठी तो वारंवार उडी मारत होता परंतु हार मात्र त्याच्या हातामध्ये सापडत नव्हता. एक संत माणूस त्या जंगलाच्या दिशेने जात असता त्याने त्याला हे वर्तन करतांना पाहिले आणि तो मनुष्य काय करीत आहे हे पाहण्यासाठी तो संत माणूस त्याच्याकडे गेला. जेव्हा त्या मनुष्याने संत माणसाला सर्व हकीकत सांगितली, तेव्हा तो संत माणूस त्याला म्हणाला की, तू ज्या सोन्याच्या हाराच्या शोधात आहेस तो हार तुझ्या डोक्यावर आहे. तो हार झाडाच्या एका फांदीवर होता आणि त्यांची सावली पाण्यात पडली होती.

आपलं जीवन देखील अशाच प्रकारचे आहे. आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या शेजाऱ्यामध्ये, दीन, दुबळे, व गरीब ह्यांच्यामध्ये पुनरुत्थित प्रभू येशूख्रिस्त आपणाला दर्शन देतो पण त्या व्यक्तिप्रमाणे आपल्यालाही ख्रिस्त दिसत नाही.

संत थॉमसप्रमाणे आपणाला देखील पुनरुत्थित ख्रिस्ताचं दर्शन घडावं व आपण देखील संत थॉमस प्रमाणे पवित्र जीवन जगण्यासाठी प्रेरित व्हावे म्हणून पुनरुत्थित ख्रिस्तकडे कृपा व शक्ती मागूया.

 

विश्वासू लोकांच्या प्रार्थना:

प्रतिसाद: “हे प्रभोआमची पुनरुत्थित ख्रिस्तावरील श्रद्धा दृढ कर.”

१.    आपले परमगुरु पोप फ्रान्सीसबिशप्सधर्मगुरू व व्रतस्थ लोकांनी त्यांच्यावर सोपवलेल्या जबाबदाऱ्या विश्वासपूर्वक पार पाडाव्यात आणि लोकांना दैवी दयेचा अनुभव घेण्यास मदत करावीम्हणून आपण प्रभूचरणी प्रार्थना करूया.

२.    जे निराश होऊन देवापासून दूर गेले आहेतत्यांना प्रभूने स्पर्श करून त्यांच्या जीवनात परिवर्तन घडून आणावे व त्यांनी परत एकदा प्रभूने दाखवलेल्या मार्गावर चालावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

३.    आपल्या देशाचा कारभार सांभाळण्यासाठी जे राज्यकर्ते नेमले गेले आहेतत्यांनी आपल्या सद्सदविवेकबुद्धीला जागवून सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीकोनातून जनतेचे प्रश्न व अडचणी जाणून घ्याव्यात व देशाच्या प्रगतीसाठी झटावे म्हणून आपण प्रार्थना करूया.

४.    शांती निर्माण करण्यासाठी व समेट घडवून आणण्यासाठी आज जगभरात अनेक संघटना कार्यरत आहेतत्यांच्या कार्यात प्रभूचा आशीर्वाद त्यांच्यावर सदैव असावा म्हणून आपण प्रार्थना करूया.

५.    आपल्या कुटुंबात प्रत्येक व्यक्तीला समानतेची व सन्मानाची वागणूक मिळावी तसेच प्रत्येक सदस्यातील बंधुभावाची भावना वृद्धिंगत होऊन एकमेकांतील जवळीकता वाढावी म्हणून आपण प्रार्थना करूया.


 


No comments:

Post a Comment