Friday, 1 March 2024

 


Reflection for the Homily of 3rd Sunday of Lent (03/03/2024) by Fr. Rakesh Ghavtya.




दिनांक : ०३/०३/२०२४

पहिले वाचन : निर्गम २०:१-१७

दुसरे वाचन : करिंथकरांस पहिले पत्र १:२२-२५

शुभवर्तमान : योहान २:१३-२५

प्रायश्चित काळातील तिसरा रविवार



प्रस्तावना:

आज ख्रिस्तसभा प्रायश्चित काळातील तिसरा रविवार साजरा करत आहे. आजची उपासना आपल्याला देवाचे मंदिर शुध्द ठेवण्यास व आपली अंतःकरणे देवासाठी शुद्ध ठेवण्यासाठी पाचारण कर आहे. प्रत्येक देवमंदिर ही पवित्र जागा आहे. कारण तेथे परमेश्वर वास करतो. जरी देव सर्वठिकाणी उपस्थित असला तरी हा देव- पवित्र मंदिरात विशेषरित्या उपस्थित असतो. हाच आपला विश्वास व हीच आपली देवावरील श्रध्दा आहे. त्यामुळे आम्ही देवाच्या घरात भक्तीभाव दाखवावा, तेथे देवाच्या उपस्थितीची जाणीव करून घेऊन ती जागा पवित्र आहे म्हणून ओळखले पाहिजे. तसेच आम्ही सर्वजण आमचे शरीर पवित्र आत्म्याचे मंदिर आहे हे समजून सतत शुद्ध ठेवले पाहिजे. या मिस्साबलीदाना सहभाग घेत असताना, देवाकडे हीच कृपा मागुया की, आम्हाला शुद्ध अंत:करण दे, म्हणजे आम्ही देवाची चांगली लेकरे म्हणून ओळखली जावू व देवाच्या सानिध्यात राहून देवाचा अगदी जवळून अनुभव घेऊ.


चिंतन:

प्रायश्चित काळ हा आपल्याला अंत:करणे शुद्ध करण्यासाठी दिलेला काळ आहे. आम्ही आमची शरीरे देवाची मंदिरे बनवावि म्हणून आम्हाला देवाने ही अनमोल अशी संधी दिली आहे. प्रत्येक मंदिर हे देवाच्या उपस्थितीची जाणीव करून देते. देव 'सर्वव्यापी आहे. तो सर्वांचा निर्माता आहे. त्याची उपस्थिती सर्वत्र आहे देव जसा देवालयात उपस्थित आहे, तसाच तो आमच्या प्रत्येकाच्या अंतःकरणात वस्ती करतो. या देवाचा आम्ही अगदी जवळून अनुभव घ्यावा.

आजच्या पहिल्या वाचना निर्गम या पुस्तका, परमेश्वराने मोशेमार्फ इस्त्राएल लोकांना दहा आज्ञा दिल्या त्याविशयी ऐकतो. या दहा अज्ञांद्वारे त्यांना हा बोध करण्यात आला आहे की, इस्त्राएल त्योकांनी या आज्ञा पाळाव्यात म्हणजे ते त्यांची अंतःकरणे शुध्द ठेवतील व देवाशी एकरूप होति. दुसऱ्या वाचनात संत पौलरिंथकरास पत्रात म्हणतात की, वधस्तंभावर मारलेला येशु खिस्त हा देवाचे सामर्थ्य, ज्ञान व देवाच्या प्रेमाचे चिन्ह आहे.

तसेच शुभवर्तमानात संत योहान, मंदिराच्या शुद्धीकरणाचा वृतांत समोर ठेवत आहे. जेव्हा येशूने मंदिरात गुरे, मेंढरे व कबुतरे विकणारे आणि सराफ हे बसलेले पहिले तेव्हा तो संतापून गेला व त्यांचे सर्व सामान उडवून देवून त्यांना म्हणाला की, माझ्या पित्याच्या घराची बाजारपेठ करू नका. येशु त्यांना आधिकाराने म्हणाला की तुम्ही हे मंदिर मोडून टाका, आणि मी ते तीन दिवसात ते उभारीन.रेतर येशू आपल्या शरीररुपी मंदिराविषयी बोलला होता. पण ते त्यांना समजले नाही. परंतु येशु जे बोलला ते त्याने आपल्या पुनरुथानाने प्रकट केले, येशू तिसऱ्या दिवशी उठला. याविषयी पवित्र शास्त्र साक्ष देते.

आज आमच्यासमोर हेच आव्हान आहे की, आम्ही देवाची पवित्र मंदिरे बनावेत. त्यासाठी संत पौल करिंथकरांस पहिल्या पत्रात अध्याय ३:१६ म्हणतों की, "तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि तुम्हामध्ये देवाचा आत्मा वास करतो, हे तुम्हास ठाऊक नाही काय? जर कोणी देवाच्या मंदिराचा नाश करितो तर देव त्याचा नाश करील; कारण देवाचे मंदिर पवित्र आहे तेच तुम्ही आहा.

आज आपण आपल्या जीवनाची पडताळणी करून पाहीली तर आपल्याला खरोखर स्वतःविषयीची जाणीव झाली आहे का? आपण देवमंदिराचे पावित्र्य जपले आहे का? आपण आपले अंतःकरण शुद्ध ठेवले आहे का?

आज गरज आहे देवमंदिरा देवाशी संवाद साधण्याची. देव आपणाशी बोलतो व देव आपल्याला पवित्र करतो, म्हणून आपण ह्या देवमंदिराचं पावित्र्य जपावं. तसेच जेव्हा जेव्हा आपण देवमंदिरात प्रवेश करू तेव्हा तेव्हा हे लक्ष्यात ठेऊया कि, पवित्र मंदिरा देव उपस्थित असतो. म्हणून आम्ही शांतता व शिस्त पाळावी. त्याचबरोबर आमची अंतःकरणे आम्ही सतत शुद्ध ठेवावीत की, जेणेकरून आमच्या अंतकरणात देव येऊन निवास करील.


विश्वासू लोकांच्या प्रार्थना

प्रतिसाद: हे परमेश्वरा, आमची प्रार्थना ऐक.

१. आमचे पोप महाशय फ्रान्सीस, सर्व धर्मगुरू, धर्मभगनी, धर्मबंधु सर्व प्रापंचिक यांना या प्रायश्चित काळात देवाच्या दयेचा व प्रेमाचा अनुभव यावा व त्यांच्या प्रत्येक कार्या देवाचा त्यांना सहवास लाभावा म्हणून प्रार्थना करूया.

२. या प्रायश्चित काळात सर्व सरकारी पुढा-यांनी व कार्यकत्यांनी आपली जबाबदारी पार पाडताना विश्वासूपणा दाखवून आपल्या समाज्याच्या हितासाठी उत्तम कार्य करावे व त्यासाठी त्यांना इश्वरी प्रेरणा लाभावी म्हणून प्रार्थना करूया.

३. हया उपासकाळात सर्व भाविकांनी शुद्धतेचे जीवन जगावे व देव मंदिरात असताना आपली श्रद्धा बळकट करताना देवावर अवलंबून राहून देवमंदिराचे पावित्र्य जाणून घेऊन भक्तिभावाने उपासने सहभाव घ्यावा म्हणून प्रार्थना करूया.

४. आपल्या प्रत्येकाच्या कुंटुंबात देवाच्या अस्तित्वाची जाणीव व्हावी व देवाचे भय बाळगताना आपल्या कंटुंबात सलोख्याचे वातावरण निर्माण करून याच देवाला शरण जावे म्हणून प्रार्थना करूया.

५. आता थोडा क्षण शांत राहून आपल्या मनातील अंतःकरणातील सर्व हेतू, इच्छा, गरजा व विनंत्या येशूच्या चरणाजवळ ठेवूया विशेश प्रार्थना करूया.


No comments:

Post a Comment